मॅजिक किंगडम
लिबर्टी स्वेयर बोटीने आम्ही मॅजिक किंगडम च्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आलो.
बोटीतून दिसलेले डिस्ने चे रेसोर्ट.
गजबजलेल्या मुख्य रस्त्यावरून थोडे पुढे गेलो आणि सिंड्रेला चा महाल दिसला. हेच मुख्य आकर्षण आहे.
डिस्नेवर्ल्ड चा स्वप्न सत्यात आणणारा जादुगार !
वॉल्ट डिस्ने - द अल्टिमेट फॅन्टसी -यशवंत रांजणकर(राजहंस प्रकाशन )हे पुस्तक मिळाले तर जरूर वाचा.
मिकी माऊस ,मिनी,गुफी सात बुटके,डोनाल्ड डक ,हिमगौरी ,पिनाचिओ,मेरीमेड असे सर्व डिस्ने कॅरॅक्टर्स मुलांना भेटून त्याच्याशी गप्पा मारतात त्यांना सह्या देतात.मुलांना पण खूप अप्रूप असते त्याचे.
कार्टून वेड्या मुलांना ह्या मिकी ,गुफी,सिंड्रेला बरोबर फोटो काढायला खूप छान वाटते.
आणि आपलेपण वाटावा म्हणून मधून मधून डिस्ने टीम मधले कोणीना कोणी आपल्याला शुभेच्छा देत असतात.आणि मुलांना खेळायला रिंग किवा स्टिकर्स देतात.मग दुखणारे पाय पाय चालू लागतात.
सगळी कडे छान परिसर असल्याने फोटो काढायची ज्यांना आवड आहे त्यांना भरपूर वाव आहे.
मग आम्ही राईडस घ्यायला निघालो.सुट्ट्यांचे दिवस असल्याने रांग खूप मोठी असायची ,उभे राहून पायांची वाट लागायची.
मुलांबरोबर नाचताना डिस्ने ची हसरी नाचरी टीम.
काही राईडस च्या सुरुवातीला आधीच सूचना दिलेल्या असतात.त्या वाचून आपण जायचे कि नाही ठरवायचे.
मागे सिक्स फ्लॅग ला गेलो होतो , पण तिथे अशा काही राईडस होत्या कि वाटायचे,हि राईड आहे की शिक्षा ?
तसे डिस्नेपार्क मध्ये जाणवले नाही.
उदाहरणार्थ.
स्पेस ऑर्बिट सफारी.
अलिस इन वंडरलँड, सिंड्रेला , हिमगौरी आणि सात बुटके,डोंगरातली रेल्वे अशा राईडस होत्या.अंधारातून भुते ,परी ,सिंड्रेला ,मिकी असेहि भेटत .मधून पाण्यातून तर मधेच आगीमधून चाललो आहोत
असा भास होई.तर कधी उंचावरून एकदम दरीतून रेल्वे जाई.पण ती दरी येईपर्यंत गुहेतून जाताना छान हलते देखावे असत.त्यात आपण रममाण असताना एकदम झूऊऊऊऊऊऊऊम.....दरीतून गाडी जाई,
दरी पण कशी तर पाणी असलेली ... पाण्याच्या शिडकाव्यात भिजून आपण बाहेर येतो.ह्या दरी मध्ये कॅमेर्यातून आपला फोटो पण काढला जातो ,पण फोटो जरा महाग वाटला.घाबरलेले आपण कसे दिसतो
ते पण बघायला मिळते.आम्ही नुसता फोटो पाहून घेतला!
अलाउद्दीन चा उडता गालीचा.(इथे हा गोल गोल फिरतो.)
चित्रकार तो ...
बोटीतून दिसलेला देखावा.
स्विस रॉबिनसन चे कुटुंब राहत असलेल्या महाकाय झाडावर पण जावून आलो.आधी वाटले हे खरे आहे कि काय पण ते बनवले होते.
जेवायची खोली .....
पाणी वर कसे आणले जाते ......
सर्व माबोकारांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
Happy New Year 2012 !!!
रात्री फायरवर्क्स ,लेसर शो खूपच मनोवेधक होता.त्यात वेगवेगळ्या रंगाची उधळण असल्याने महाल खूप जादुई भासत होता.सोबतीला सुरीले संगीत होते मग काय....!
श्रवणीय सुरांच्या तालावर फायरवर्क्स पाहून स्वर्गात आल्यासारखे वाटले क्षणभर!
रात्री ११ पर्यंत हा शो सुरु होता.सगळ्यांबरोबर माझाही कॅमेरा सज्ज झाला होता.
रात्री दिसणारा सिंड्रेला चा महाल!
एक परेड पण खूप प्रेक्षणीय असते.मिकी,डोनाल्ड डक,सिंड्रेला आणि राजपुत्र,मेरीमेड,ससे,मासे,पर्या असे बच्चे कंपनीची दोस्त मंडळी ही सगळी ह्या परेड मध्ये असतात.
रात्री लाईटस चे ड्रेस घालून हि मंडळी नृत्य करत जातात.रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लोक आधीच आपली जागा पकडून ठेवतात.सर्वजण कॅमेरे सज्ज करून वाट पाहत होते.
छानसे संगीत सुरु झाले कि एक एक रथ सरकू लागतात.पर्या ,मिनी,डोनाल्ड सगळी नाचत मुलांशी हात मिळवत पुढे जातात.
ह्या आनंद्यात्रेतील काही क्षण पकडण्याचा प्रयत्न.
शो संपल्यावर मोनोरेल ने परत निघालो.
आह्हा.. दिव्ती...
आह्हा.. दिव्ती... परेड्,रात्रीचे ,फायरवर्क्स चे देखावे तर खासच..
बापरे केव्हढी गर्दी दिसतीये..
राईड्स चे फोटो पण मस्त आहेत..
रच्याकने पोरं क्यू मधे उभं राहून कंटाळली असतील ना!!!
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
मस्त फोटो.
मस्त फोटो.
व्वा ग्रेट... फायरवर्क्स
व्वा ग्रेट...:स्मित:
फायरवर्क्स ,लेसर शोचे फोटो अप्रतिम...
मस्त फोटो..ती राईड Kingda Ka
मस्त फोटो..ती राईड Kingda Ka (प्रचि ८)आहे ना? तुम्ही बसलात का त्यात? लय भारी आहे.. नुसता आरडा ओरडा, हात पाय लटलटतात उतरल्यावर....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
वॉव मस्त फोटोज
वॉव मस्त फोटोज![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटू आवडल्याबद्दल
फोटू आवडल्याबद्दल धन्यवाद!
मस्त फोटो..ती राईड Kingda Ka (प्रचि ८)आहे ना? तुम्ही बसलात का त्यात? लय भारी आहे>>
ती राईड म्हणजे शिक्षा आहे ,आम्ही नाही बसलो त्यात!कोण स्वताला शिक्षा करून घेईल, त्याने बसावे !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो ह्या साठी टाकला आहे ,कि मॅजिक किंगडम मध्ये अश्या भीतीदायक आणि पाय लटपटणार्या राईड नाहीत हे सांगायला!
मस्त फोटो! फोटो बघून पुन्हा
मस्त फोटो! फोटो बघून पुन्हा एकदा जुन्या आठवणी जागृत झाल्या. रात्रीची इलेक्ट्रॉनिक परेड तर अप्रतिम असते. एकंदरीत डिझ्नी वर्ल्ड म्हणजे आनंदाचा महासागर!
मस्त फोटोज !!!
मस्त फोटोज !!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वा
व्वा ssssssssssssssssssssssssssssssss व
मस्त प्रचि मजा आली ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रात्रीचे फोटोज अप्रतिम.
रात्रीचे फोटोज अप्रतिम.
व्वा! छान सफर झाली डिस्ने
व्वा! छान सफर झाली डिस्ने वर्ल्डची! सिन्ड्रेलाचा महाल अगदी जादुई आहे.
सुंदर प्र.ची. अन सुंदर सफर
सुंदर प्र.ची. अन सुंदर सफर !!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे, हे फोटो मी पाहिलेच
अरे, हे फोटो मी पाहिलेच न्हवते....
मस्तच फोटो आणि वर्णन.
मस्त!
मस्त!
वा वा... छानच चित्रसफर..
वा वा... छानच चित्रसफर..