जीवनाचं सार

Submitted by pradyumnasantu on 24 December, 2011 - 13:08

जीवनाचं सार

समुद्र एक माझ्या मनात
खूपच गोष्टी भरल्यात त्यात
एक खडक,एक किनारा, एकेक नातं
जबाबदा-यांनी भरलेलं एकेक पोतं
संकटांचे दगड
तर अक्षरश: रग्गड
सौख्य आनंदाचे शिंपले
जे इथे तिथे वेचले
सगळंच हे ओझं
अखेर फेकायचंय माझं
पण सगळ्यात प्रश्न मोठा
म्हणजे किना-यावर फुटणा-या लाटा
त्या कसल्या, कशाच्या, कुठून उद्भवल्या, काहीच नाही कळत
खळाळत, उसळत, भळाळत
थेट काळजात घुसतात नकळत
मला आता खात्री वाटतीय
नक्कीच त्या आहेत जवळच्या व्यक्तींविषयीच्या भावनांच्या
उदा. पत्नी, मुलं, भावंडं, मित्र, नातवांच्या
त्यांच्याबद्दल आपली काय निरिक्षणं आहेत यांच्या
पण लाटा फुटून गेल्या
तरी भावना उमजत नाही
काय वाटतय नक्की या नात्यांबद्दल ते समजत नाही
हे जर असं स्वत:च्या पत्नी-मुलांविषयी
तर मग असा येतो विचार
बाकीच्यांविषयी मत बनवायचा तरी
मला काय अधिकार?
लाटांनी फुटावं,
वा-यानं घोंगावत वहावं
समुद्रानं रोरावत रहावं
आपण आपले निर्विकार
हेच की काय खरं जीवनाचं सार

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

समुद्र एक माझ्या मनात....खूपच गोष्टी भरल्यात त्यात
एक खडक,एक किनारा, एक नातं....जबाबदा-यांनी भरलेलं एक पोतं
संकटांचे दगड....तर अक्षरश: रग्गड
सौख्य आनंदाचे शिंपले....जे इथे तिथे वेचले
खूप छान.

खरच ,मन समुद्रासारखेच अमर्याद,अथांग.....ज्यानी या लाटांवर विजय मिळविला ते देवत्वाला पोहोचले.सुंदर कविता.

समुद्रानं रोरावत रहावं>>>>>>याला गाज असे म्हणतात,गर्जण्याचा अपभ्रंष असू शकतो.

छान आहे,याला जिवन असे नाव.

समुद्र एक माझ्या मनात
……….जे इथे तिथे वेचले
इथपर्यंत विचारांचा फ्लो व्यवस्थित वाटला.

पण त्यापुढच्या ओळींमध्ये आशय मांडताना (की मला समजताना)
काहीसा गोंधळ झाल्यासारखा वाटतोय.

लाटांनी फुटावं,
वा-यानं घोंगावत वहावं
समुद्रानं रोरावत रहावं
आपण आपले निर्विकार
हेच की काय खरं जीवनाचं सार

सुंदरच !! Happy