आधिचे भाग वाचण्यासाठी येथे टिचकी मारा.
केप टाऊन - निसर्ग सौंदर्याचा खजिना- भाग १
केप टाऊन - निसर्ग सौंदर्याचा खजिना- भाग २
...........................................................
खर तर टेबल माऊंटनला पहिल्याच दिवशी जाणार होतो. त्या साठी ऑनलाईन बुकिंग पण केली होती. पण घाईगडबडीत तिकिट प्रिंटआउट ऑफीसच्या डेस्क वरच विसरलो. इथे सायबर कॅफे शोधुन तिकिट प्रिंटआउट काढायला तिसरा दिवस उगवला.
सकाळीच ते काम उरकुन आम्ही टेबल माऊंटनला निघालो. वाटेत अर्धचंद्राकृती कॅम्स बे लागतो. गेल्या दोन दिवसात इथुन बर्याच वेळा पास झालो होतो पण कधी थांबलो नव्हतो. आज तिथे थांबुन थोडे प्रची घेतले.
कॅम्स बे
प्रचि १प्रचि २
प्रचि ३ वार्याची दिशेनुसार लायन्स हेड किंवा सिग्नल हिल वरुन पॅराग्लायडींग करता येत
प्रचि ४ आता हा पण्यात पडणार बहुतेक असे वाटत असतांनाच तो लिलया काठावर उतरला
प्रचि ५
टेबल माऊंटन
टेबल माऊंटन हे केप टाऊन शहराचे मुख्य आकर्षण. टेबलच्या पृष्टभागासारख्या भासणार्या अंदाजे ३ कि. मी. व्यासाच्या पठारा मूळे याला टेबल माऊंटन म्हणतात. समुद्रसपाटी पासुन उंची साधारण ३५०० फुट. बर्याच वेळा हा माऊंटन ढगांनी झाकला जातो त्याला टेबल क्लॉथ म्हणतात (पहिल्या भागाच्या प्रतिसादात माबो आयडी चिंगी ने दिलेला झब्बु बघा).
वर जाण्यासाठी केबल कार ची सोय आहे. १९२९ पासुन ही केबल कार अस्तितवात आहे. सुरवातीची केबल कार २५ लोकांची ने आण करु शकत होती. १९९२ मधे त्या बदलुन नवीन कार बसवण्यात आल्या ज्या एकावेळी ६५ लोकांची ने आण करु शकतात. मुख्य म्हणजे या कार ३६० अंश कोनात फिरतात जेणे करुन प्रत्येकाला शहराचा संपुर्ण देखावा दिसावा.
बरेच हौशी ट्रेकर हा माऊंटन चढुन पण जातात.
प्रचि ६ अप्पर केबल स्टेशनप्रचि ७ लोअर केबल स्टेशन
प्रचि ८ केबल कार
प्रचि ९ लायन्स हेड
प्रचि १० अर्धचंद्राकृती कॅम्स बे
प्रचि ११ अर्धचंद्राकृती आकाराचा कॅम्स बे थोडा झुम आउट करुन
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५ हा आणखी एक वेडा फकीर. कुठलाही ब्रश न वापरता फक्त बोटांनी काचेवर पेटींग बनवुन विकत होता. त्याला विचारले तु रोज वर येतोस का तर हो म्हणाला. म्हटलं तुला रोज केबल कारचं २०० रॅन्ड (द. अफ्रिकेचे चलन) तिकिट कसं परवडतं तर म्हणाला की तो रोज चढुन वरती येतो. सलाम केला मी त्याला आणि त्याच्या जिद्दिला.
प्रचि १६ डाव्या हाताला दुर समुद्रात दिसते आहे ते रोबेन द्विप. या द्विप वर एक तुरुंग आहे जिथे नेल्सन मंडेला यांना २७ वर्ष कैदेत ठेवलं होत. अलिकडच्या बाजुला गोल आकार दिसतो ते केप टाऊन स्टेडियम आणि त्याच्या बाजुची टेकडी सिग्नल हिल.
प्रचि १७ केप टाऊन स्टेडियम झुम इन करुन
प्रचि १८ रोबेन द्विप झुम इन करुन
प्रचि १९ ढग की पाणी. फरक करु शकता का?
प्रचि २० केप टाऊन शहर आणि विस्तिर्ण समुद्र किनारा
प्रचि २१ कॅम्स बे. इथलं पाणी खुपच थंड होत. जवळ जवळ आईसकोल्ड. पण पिल्लु पाण्यातुन बहेर निघेच ना. धम्माल केली त्याने पाण्यात.
गेल्या दोन दिवसात आम्हाला ढगांमुळे सनसेट दिसला नव्हता. म्हणुन आज कॅम्स बे वर ठाण मांडुन बसलो होतो. पण आजही नशिबात नव्हता सनसेट. मग तिथुन निघालो आणि हॉटेल वर परत गेलो.
चौथा दिवस
आज आम्ही परतीचा प्रवास चालु केला. त्या आधी सकाळी कॉन्सटनशीया व्हॅली ला भेट दिली. केप टाऊन जसे निसर्ग सौंदर्यासाठी फेमस आहे तसेच ते फेमस आहे ते इथल्या वाईन साठी.
कॉन्सटनशीया व्हॅलीतील थंड वातवरणामुळे इथे पिकणारे द्राक्ष वाईन बनवण्यासाठी योग्य मानले जातात. त्यामुळे इथे बरेच वाईन यार्ड आणि वाईन बनवणार्या फॅक्टरीज आहेत. त्यातल्याच सर्वात जुन्या ग्रुट कॉन्सटनशीया वाईन इस्टेटला भेट दिली.
खर तर इथे त्याचे पुर्ण पुर्ण प्रचि देणार होतो पण त्यातले बरेच प्रचि हे इनडोअर आहेत. या लेख मालिकेत आत्ता पर्यंत साधली गेलेली निळी नवलाई त्या फोटोंमुळे बिघडेल अशी भिती वाटली म्हणुन त्या फोटोंचे कोलाज करुन येथे टाकतो आहे.
शक्य झाल्यास एक स्वतंत्र धागा उघडुन या फोटोंसकट वाईन बनवण्याची प्रक्रिया आणि वाईन टेस्टींग बद्दल सविस्तर महिती लिहीन.
प्रचि २२!!!समाप्त!!!
मित्रांनो.. हा अंतिम भाग
मित्रांनो.. हा अंतिम भाग तुमच्या सुपूर्त करतांना खुप आनंद होतो आहे. आधिच्या दोन भागांना उस्फुर्त प्रतिसाद देउन माझे मनोबल वाढवलेत या बद्दल अनेक अनेक धन्यवाद.
वॉव मस्त!! ही प्रचि मालिका
वॉव मस्त!! ही प्रचि मालिका फारच भारी झालीये!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हेही फोटो छान. इथे ठिकाणाला
हेही फोटो छान. इथे ठिकाणाला भेट द्यायलाच हवी. तुमच्या फोटोंमुळे ते वाटू लागलं त्याबद्दल धन्यवाद.
हॅट्स ऑफ ! जबरदस्त होती हि
हॅट्स ऑफ ! जबरदस्त होती हि मालिका..
२ रा व ३ रा भाग जबरदस्त आहे.
२ रा व ३ रा भाग जबरदस्त आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच.
मस्तच.
मस्तच फोटु ... छान सफर घडली
मस्तच फोटु ... छान सफर घडली आमची ...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद
सुंदर होती ही सफर. थॅन्क्यू.
सुंदर होती ही सफर. थॅन्क्यू.
संपूर्ण मलिकाच अत्यंत
संपूर्ण मलिकाच अत्यंत सुंदर.... निळशार पाणि पाहून डोळे निवले अगदी.....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
व्वॉव जबरदस्त ! आत्ताच्या
व्वॉव जबरदस्त ! आत्ताच्या आत्ता केप टाऊनला जावसं वाटतयं.
Wow! मस्त. वेड्या फकिराला
Wow! मस्त. वेड्या फकिराला सलाम.
वायनरीचे फोटो अजून चालले असते.
चला जीटीजी करुया तिकडे..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मस्त्_सफर्_घडली.
मस्त्_सफर्_घडली.
हाही भाग ज ब र द स्त च
हाही भाग ज ब र द स्त च![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
समाप्त पाहुन जरा वाईट वाटलं
. इथे ठिकाणाला भेट द्यायलाच हवी. तुमच्या फोटोंमुळे ते वाटू लागलं त्याबद्दल धन्यवाद.>++१
अरे आमच्याकडून थँक्स तुला...
अरे आमच्याकडून थँक्स तुला... सुपर्ब सफर घडवल्याबद्दल.. बस्स तूम अब नॉनस्टॉप क्लिकते रहो !
अ प्र ति म
अ
प्र
ति
म
छान सफर! मस्त फोटो!
छान सफर! मस्त फोटो!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा ही भाग सुरेख ठिकाणाला भेट
हा ही भाग सुरेख![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ठिकाणाला भेट द्यायलाच हवी. तुमच्या फोटोंमुळे ते वाटू लागलं त्याबद्दल धन्यवाद.
>>> +१
वॉव... सुप्पर्ब
वॉव... सुप्पर्ब फोटोज...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
युनिवर्सल पिक्चर्स च्या सुरुवातीला दाखवतात तसे निळेनिळे पर्वत्,समुद्र... आँखों की ठंडक..
रच्याकने..पिल्लू फारच ग्वाड दिसतंय
आता हिरव्या फोटोंची वाट पाहत बसतो आम्ही सर्व
अप्रतीम फोटो. इतक्यात संपली
अप्रतीम फोटो. इतक्यात संपली हि अतीशय सुंदर फोटो मालिका.
तूमच्या पूढच्या सफरीच्या प्रतिक्षेत.
या लेख मालिकेत आत्ता पर्यंत
या लेख मालिकेत आत्ता पर्यंत साधली गेलेली निळी नवलाई त्या फोटोंमुळे बिघडेल अशी भिती वाटली म्हणुन त्या फोटोंचे कोलाज करुन येथे टाकतो आहे.>>>>>>>>>> खरा दर्दी आहेस बाबा...
पण ते हिरवे फोटोही वेगळा भाग करुन जरुर टाक.
तो वेडा फकीर, मंडेलांना बंदिस्त केले होते तो तुरुंग - सर्व छान टिपलेस...
खूप खूप धन्यवाद - असाच फिरत रहा व फोटो काढून इथे टाकत रहा......
मस्त! हे ही फोटो फारच सुंदर
मस्त! हे ही फोटो फारच सुंदर आहेत. +१ सायो. जमेल तेव्हा नक्की जाणार केपटाऊन ला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद मंडळी. पण ते हिरवे
धन्यवाद मंडळी.
पण ते हिरवे फोटोही वेगळा भाग करुन जरुर टाक>>> नक्की प्रयत्न करणार
वॉव ! काय भारी होते तीन्ही
वॉव ! काय भारी होते तीन्ही भाग! अगदी मज्जाच केलेली दिसते. आणि आइस कोल्ड पाण्यात पिल्लूला बरं घेऊन गेलात तुम्ही!
फोटो अ प्र ती म!
सर्वच भाग
सर्वच भाग अ*प्र*ति*म*...............................
हॅट्स ऑफ******
निळाई....निळे गगन... निळी धरा.... अवघी निळाई..........
तुमच्या ड्रायव्हिंगला व
तुमच्या ड्रायव्हिंगला व जिद्दिला सलाम. मस्त फोटोज.
सगळेच फोटो लई लई लईच भारी
सगळेच फोटो लई लई लईच भारी आलेत. मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
निळाई बघुन डोळे तॄप्त झाले.
असेच भरपुर फिरत रहा आणि आम्हा सगळ्यांना खुष करत रहा.
तिन्ही भाग अत्यंत सुंदर झाले
तिन्ही भाग अत्यंत सुंदर झाले आहेत. इतकी छान सफर घडवल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
मस्त..
मस्त..:)
मस्त सफर वायनरीचे फोटो अजुन
मस्त सफर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वायनरीचे फोटो अजुन हवे होते.
सुंदर सफर...
सुंदर सफर...
Pages