मी लेखक असते तेव्हा,
नाकारत असते मी भाग होणं, कोणत्याही समूहाचा वगैरे..
रचनेच्या नावाखाली नियमांत बांधून, आत्मा मारुन टाकलेल्या प्राणिमात्रांपेक्षा,
माझ्या कल्पनेतले स्वैर, मुक्त आणि उत्फुल्ल जीव,
खुणावत असतात मला...
मी लेखक असते तेव्हा,
मला गरज नसते ईश्वराच्या कृपेची वगैरे..
कारण मी स्वतःच ईश्वर असते मी निर्माण केलेल्या जगाची..
त्याच्या निर्मितीपेक्षा कितीतरी सरस निर्मिती करुन,
मी स्वतःला कधीच सिद्ध केलेलं असतं माझ्या नजरेत..
मी लेखक असते तेव्हा,
मला भासत नाही उणीव कोणत्याच नात्यांची वगैरे..
या जगातल्या आपमतलबी आणि फायद्या तोट्यांची गणितं मांडणार्या नात्यांपेक्षा,
माझ्या लेखणीतून फुलणारी,
कितीतरी सुंदर, निखळ आणि नितळ नाती जगत असते मी,
प्रत्येक क्षणी प्रत्येक रुपात...
पण मी लेखक नसते तेव्हा,
कोसळत जातात माझ्यावर या जगात व्यतित केलेले क्षण,
कोसळत जाते मग मीच स्वतःमधून..
गुडघे टेकून हताशपणे..
गदगदत राहते एका आशेची वाट बघत..
ईश्वराला मीच नाकारलेलं असतं,
त्यामुळे बंद असते वाट त्याच्याकडे जायची..
बाहेरचं जग आणि नाती आता भुलवू शकत नाहीत मला..
त्यांच्याकडे जाणं शक्य असूनही पाठ फिरवते मी तिकडे,
आणि मी निर्माण केलेल्या जगात आता मलाच प्रवेश नसतो...
मी लेखक नसते तेव्हा...............
अप्रतिम..
अप्रतिम..
सुंदर, आवडलं...
सुंदर, आवडलं...
धन्यवाद..!
धन्यवाद..!
छान आहे. आवडलं.
छान आहे. आवडलं.
सुरेख
सुरेख
छान...
छान...
सर्वांचे आभार..
सर्वांचे आभार..
सुंदर... मनाला भावलं
सुंदर... मनाला भावलं
पहीला आणि तिसरा पॅरा जास्त
पहीला आणि तिसरा पॅरा जास्त आवडला.
धन्यवाद..
धन्यवाद..