केप टाऊन - निसर्ग सौंदर्याचा खजिना- भाग २

Submitted by शापित गंधर्व on 22 December, 2011 - 03:47

पहिला भाग वाचण्यासाठी येथे टिचकी मारा.
केप टाऊन - निसर्ग सौंदर्याचा खजिना- भाग १
...........................................................

आज आमच टार्गेट होत केप पॉईंट आणि केप ऑफ गुड होप. जवळ जवळ असणारे हे दोन्ही पॉईंट्स टेबल माऊंटन नॅशनल पार्क चे भाग आहेत.
वाटेत सायमन्स टाऊन लागतं जिथे बोल्डर्स बिच आहे. या बोल्डर्स बिच वर अफ्रिकन पेन्गविनची कॉलनी आहे. पण ते आम्ही संध्याकाळी परतीच्या वाटेवर कव्हर करणार होतो.

बोल्डर्स बिच
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८ प्रचि ७ मधली बोट या प्रचित पण आहे. जरा झुमून बघा Wink
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११ सायमन्स टाऊन कडुन केप पॉईंट कडे येणारा रस्ता
केप ऑफ गुड होप
केप टाऊन शहरा पासुन साधारण ५० कि. मी. अंतरावर असलेले केप ऑफ गुड होप हे दक्षिण आफ्रिकेतील अटलांटिक महासागराच्या किनार्‍यावरील दक्षिण टोक आहे. अनेकदा चुकीने केप ऑफ गुड होपचा आफ्रिका खंडाचे सर्वात दक्षिणेकडील टोक असा उल्लेख केला जातो, पण वास्तविकपणे केप अगुलास हे आफ्रिका खंडाचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे.

ऐतिहासिक काळात युरोपातुन भारतीय उपखंडाकडे प्रवास करणार्‍या सागरी बोटींना आफ्रिका खंडाला वळसा घालून यावे लागत असे. केप ऑफ गुड होप पर्यंत पोचणे हा ह्या प्रवासातील एक मोठा टप्पा मानला जात असे. इ.स. १४८८ सालातल्या मे महिन्यात बार्तुलुम्यू दियास हा पोर्तुगीज खलाशी या केप ऑफ गुड होप पर्यंत सर्वप्रथम पोचला.

प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८ समुद्र तळाशी वाढलेले रंगबेरंगी शेवाळ
प्रचि १९ शिंपले
प्रचि २०
केप पॉईंट
प्रचि २१
प्रचि २२ जुने लाईट हाऊस
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६ अस्मादिक निसर्गाचा आनंद घेतांना (ठेंक्यू टु बायको ;-))
प्रचि २७ नविन लाईट हाऊस - जुने लाईट हाऊस खुप लांबुन दिसायचे ज्या मुळे नाविकांचा गोंधळ व्हायचा प्लस धुक्यात जुने लाईट हाऊस दिसायचे नाही म्हणुन हे नविन लाईट हाऊस जरा खाली किनार्‍याजवळ बांधलेगेले
प्रचि २८ केप पॉईंट पासुन विविध देशांच्या राजधान्यांची दिशा आणि अंतर दाखवणार जुन्या लाईट हाऊस वरचा स्तंभ

इथल्या निसर्ग सौंदर्याने इतके वेडे झालो होतो की तिथुन पाय निघेना. परत निघालो तेव्हा अंधार पडु लागला होता. परतिच्या वाटेवर पेन्गविन कॉलनीला थांबयचे होते. पण खुपच उशिर झाला. दुर्दैवाने आम्हि पेन्गविन कॉलनी बघु शकलो नाही.
इतक्यात हॉटेलवर जायचा मुड नव्हता. बाहेरच कुठेतरी जेवण करुन सिग्नल हिल वर जायचा बेत ठरला. एक इंडियन रेस्टॉरंट शोधले आणि जेवण करुन सिग्नल हिल च्या दिशेने निघालो. पण दुर्दैवाने पाठ सोडली नव्हती. GPS ने आम्हाला गंडवल. नुसताच गोल गोल फिरवत होता. ११ वाजुन गेले तरी सिग्नल हिल काही सापडेना. मग वैतागुन परत हॉटेल वर आलो.

क्रमशः

केप टाऊन - निसर्ग सौंदर्याचा खजिना- भाग 3 (अंतिम) - कॅम्स बे, टेबल माऊंटन आणि कॉन्सटनशिया वाईन यार्ड
एक झलक.

गुलमोहर: 

निव्वळ अ प्र ति म!! Happy
खरच मंत्रमुग्ध होते या स्वर्गीय सौंदर्याने. ...लाईट हाउस, शिंपले, निळी नवलाई, आणि शांतता!! सुंदर!

जबरदस्त! अशक्य सुंदर!!

ब्रिटीशांकडुन स्वातंत्र्य मिळाल्यावरही बर्‍याच फॉरेनर्सनी वेदर आणि निसर्गसौंदर्य या कारणानी तिथेच राहणे पसंत केले असे तिथल्या स्थानिक लोकांकडुन ऐकले आहे.

फक्त आहा हा आणि आहाहा.......
स्वप्ननगरी का "गंधर्व" (अशापित) नगरी बघतोय असे वाटतंय.....
खूप धन्यवाद - या फोटोतून सफर घडवून आणल्याबद्दल.......

धन्यवाद मित्र/मैत्रिणींनो... डोळ्यात पाणी आणलत तुम्ही माझ्या... इतक्या कौतुकाची सवय नाही हो... लोभ असाच राहु द्या.

हे निसर्गसौंदर्य बघून सगळा ताण विसरुन मस्त रिलॅक्स व्हायला झालं असेल नक्कीच>>> १००% खरं आहे. पैल्यांदा बाहेर कुठे गेल्यावर नुसतेच पॉईंट बघायची धावपळ न करता निसर्गाचा आनंद लुटला.

नुसती पेंटींग्ज वाटताहेत...>>> धन्यवाद दिनेशदा

बाळाच्या अंगावर स्वेटर नाही म्हणजे अजिबातच थंडी नसणार पण तरी कुतूहल म्हणून विचारले >>> सध्या इथे समर चालु आहे. टेंपरेचर २७/२८ च्या आसपास.

ती समुद्रकिनार्‍यावरची पेंग्वीन्सची कॉलनी बघायला जाण्याची खूप वर्षांची इच्छा आहे>>> कधि येताय बोला. सोबतच जाऊ.

रुनी, एवढं सगळं मिळाल्यावर एका बीच हाऊसची आणि रिटायरमेंटचीच कमी रहाते आयुष्यात>>> प्रचि ६ मधले घर विकणे आहे. इंट्रेसटेड?

सगळ्या गोष्टी करायची हौस पण टिकवुन काहीच नाही ठेवता येत>>>>
जल्ला मी बी धनुच सेम हीअर>>> खर आहे तर मग हे Wink

काय सुंदर आहे हे सगळे. खरच तुम्ही तुमच्या आय डी मधुन "शापित" शब्द काढुन टाका>>> Happy

भन्नाट भन्नाट फोटो. दिल खुश हो गया. कधी एकदा साऊथ आफ्रिकेला जातो असं झालंय>>> लवकर या वाट बघतोय

Pages