केप टाऊन - निसर्ग सौंदर्याचा खजिना- भाग २

Submitted by शापित गंधर्व on 22 December, 2011 - 03:47

पहिला भाग वाचण्यासाठी येथे टिचकी मारा.
केप टाऊन - निसर्ग सौंदर्याचा खजिना- भाग १
...........................................................

आज आमच टार्गेट होत केप पॉईंट आणि केप ऑफ गुड होप. जवळ जवळ असणारे हे दोन्ही पॉईंट्स टेबल माऊंटन नॅशनल पार्क चे भाग आहेत.
वाटेत सायमन्स टाऊन लागतं जिथे बोल्डर्स बिच आहे. या बोल्डर्स बिच वर अफ्रिकन पेन्गविनची कॉलनी आहे. पण ते आम्ही संध्याकाळी परतीच्या वाटेवर कव्हर करणार होतो.

बोल्डर्स बिच
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८ प्रचि ७ मधली बोट या प्रचित पण आहे. जरा झुमून बघा Wink
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११ सायमन्स टाऊन कडुन केप पॉईंट कडे येणारा रस्ता
केप ऑफ गुड होप
केप टाऊन शहरा पासुन साधारण ५० कि. मी. अंतरावर असलेले केप ऑफ गुड होप हे दक्षिण आफ्रिकेतील अटलांटिक महासागराच्या किनार्‍यावरील दक्षिण टोक आहे. अनेकदा चुकीने केप ऑफ गुड होपचा आफ्रिका खंडाचे सर्वात दक्षिणेकडील टोक असा उल्लेख केला जातो, पण वास्तविकपणे केप अगुलास हे आफ्रिका खंडाचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे.

ऐतिहासिक काळात युरोपातुन भारतीय उपखंडाकडे प्रवास करणार्‍या सागरी बोटींना आफ्रिका खंडाला वळसा घालून यावे लागत असे. केप ऑफ गुड होप पर्यंत पोचणे हा ह्या प्रवासातील एक मोठा टप्पा मानला जात असे. इ.स. १४८८ सालातल्या मे महिन्यात बार्तुलुम्यू दियास हा पोर्तुगीज खलाशी या केप ऑफ गुड होप पर्यंत सर्वप्रथम पोचला.

प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८ समुद्र तळाशी वाढलेले रंगबेरंगी शेवाळ
प्रचि १९ शिंपले
प्रचि २०
केप पॉईंट
प्रचि २१
प्रचि २२ जुने लाईट हाऊस
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६ अस्मादिक निसर्गाचा आनंद घेतांना (ठेंक्यू टु बायको ;-))
प्रचि २७ नविन लाईट हाऊस - जुने लाईट हाऊस खुप लांबुन दिसायचे ज्या मुळे नाविकांचा गोंधळ व्हायचा प्लस धुक्यात जुने लाईट हाऊस दिसायचे नाही म्हणुन हे नविन लाईट हाऊस जरा खाली किनार्‍याजवळ बांधलेगेले
प्रचि २८ केप पॉईंट पासुन विविध देशांच्या राजधान्यांची दिशा आणि अंतर दाखवणार जुन्या लाईट हाऊस वरचा स्तंभ

इथल्या निसर्ग सौंदर्याने इतके वेडे झालो होतो की तिथुन पाय निघेना. परत निघालो तेव्हा अंधार पडु लागला होता. परतिच्या वाटेवर पेन्गविन कॉलनीला थांबयचे होते. पण खुपच उशिर झाला. दुर्दैवाने आम्हि पेन्गविन कॉलनी बघु शकलो नाही.
इतक्यात हॉटेलवर जायचा मुड नव्हता. बाहेरच कुठेतरी जेवण करुन सिग्नल हिल वर जायचा बेत ठरला. एक इंडियन रेस्टॉरंट शोधले आणि जेवण करुन सिग्नल हिल च्या दिशेने निघालो. पण दुर्दैवाने पाठ सोडली नव्हती. GPS ने आम्हाला गंडवल. नुसताच गोल गोल फिरवत होता. ११ वाजुन गेले तरी सिग्नल हिल काही सापडेना. मग वैतागुन परत हॉटेल वर आलो.

क्रमशः

केप टाऊन - निसर्ग सौंदर्याचा खजिना- भाग 3 (अंतिम) - कॅम्स बे, टेबल माऊंटन आणि कॉन्सटनशिया वाईन यार्ड
एक झलक.

गुलमोहर: 

जिप्सी.... मित्रा हा भाग तुला अर्पण.... तुलाच का? तर तुझे माबोवरचे फोटो बघुन मला पण फोटोग्राफीची उर्मी आली म्हणुन....खर तर माझी रास धनु ...म्हणजे "जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन". क्षणात हे तर क्षणात ते. सगळ्या गोष्टी करायची हौस पण टिकवुन काहीच नाही ठेवता येत. आता ही फोटोग्राफीची उर्मी किती दिवस टिकते बघायच Happy

कसले अप्रतिम फोटो आहेत. पाण्याचा आणि आकाशाच निळाशार रंग बघून जीव शांत झाला. एकदा इथे जायलाच हवं असं वाटून गेलं. हे निसर्गसौंदर्य बघून सगळा ताण विसरुन मस्त रिलॅक्स व्हायला झालं असेल नक्कीच.

माय गॉड... अ फ ला तू न..... सुरेख फोटो.. अप्रतिम रंग आहेत.
खरेच डोळे निवले नुसते फोटो बघूनच.

जबरी..... मस्तच.
हे निसर्गसौंदर्य बघून सगळा ताण विसरुन मस्त रिलॅक्स व्हायला झालं असेल नक्कीच.+++++१

काय ती अप्रतिम निळाई. डोळ्याचे पारणे फिटले. साऊथ आफ्रिका इतका सुंदर आहे हे मला खरंच माहीत नव्हते ( घोर अज्ञान ! ). ह्या देशाकडे लक्ष वेधल्याबद्दलही धन्यवाद Happy
तुम्ही इतक्या स्वच्छ उन्हात फिरत असताना बाहेर टेंपरेचर किती होते ? बाळाच्या अंगावर स्वेटर नाही म्हणजे अजिबातच थंडी नसणार पण तरी कुतूहल म्हणून विचारले Happy
ही पोस्ट लिहितालिहिताच केप टाऊनच्या वर्षभराच्या हवामानाचा ग्राफ पाहिला. ड्रीम वेदर आहे वर्षभरच Happy

प्रकाशचित्र विभाग खर्‍या अर्थाने समृद्ध करणारे फोटोज. Happy
सिं प ली अ मे झिंग!!!!!!

जिप्सी.... मित्रा हा भाग तुला अर्पण>>>>>धन्स धन्स धन्स रे Happy

सायो, दिनेशदा>>>>>> +१

ती समुद्रकिनार्‍यावरची पेंग्वीन्सची कॉलनी बघायला जाण्याची खूप वर्षांची इच्छा आहे.
या फोटोंमुळे परत त्याची आठवण झाली. अमेझिंग आहे हे सगळं. असे निळेशार पाणी, निरभ्र आकाश, स्वच्छ आणि पांढरेशुभ्र समुद्रकिनारे अजून काय हव आयुष्यात.

सायो Biggrin

क्लास क्लास क्लास Happy
केवळ उच्च.
तुझ्या आणि कॅमेर्‍यातील केमिस्ट्री फोटोत दिसतेय रे मित्रा.
ही केमिस्स्ट्री टिकवुन ठेव. Happy

सगळ्या गोष्टी करायची हौस पण टिकवुन काहीच नाही ठेवता येत>>>>
जल्ला मी बी धनुच सेम हीअर. Happy

काय सुंदर आहे हे सगळे. खरच तुम्ही तुमच्या आय डी मधुन "शापित" शब्द काढुन टाका.

हे येवढे सुंदर असेल असे वाटले नाही. म्हणुनच गोरा साहेब तिकडुन हलला नाही. नैसर्गिक सौंदर्य आणि संपत्ती ने नटलेला देश.

सुदैवी आहात.

Pages