डरकाली सांबार्‍याची पाककृती......(मालवणी)

Submitted by विभाग्रज on 18 December, 2011 - 20:52

"डरकाली सांबार्‍याची पाककृती "
सांबारा आमका म्हायती फक्त काळ्या/सफेद/हिरव्या वाटाण्याचा.पण डरकाली सांबारा पयलाच आयकलास ना?कृती लिवन घेवा.
.......... कांत्याचे आवशी, आज आमच्याकडे म्हाळ आसा जरा मदत करुक ये हा गे.
कांत्याची आवस सांबारा स्पेश्यालिश्ट,लांब लांबसुन तिका बोलावना येयचा,मग वाडितल्या कार्याक ती काय नाय म्हणतली.
घरात दोन तिन चुली पेटले,व्हायनावर दोन चुली,बाळग्याची आवस आणि कांत्याची आवस व्हायनावर आपापली कामा करतत.वाटाने उकडुन झाले,वाटपा काडुन झाली आणि कांत्याच्या आवशिन सांबारा फोडणेक घातल्यान.सांबारा रटरटाक लागला तसो वास निसतो घम घमाक लागलो.कांत्याची आवस मदी मदी ढवळता हा,टोपाक लागता न्हये ना म्हणान.
हकडेन बाळग्याच्या आवशिन भाजी फोडनेक घातल्यान,तेच्या ठसक्यान कांत्याची आवस खळवाटली,
तिका जोराचो खोकलो ईलो,आणि पिवळा जर्द डरकाल(कफ) घाबकन भायर ईला आणि म्हाराजा सांबार्‍याच्या टोपात जावन पडला.कांत्याच्या आवशिन डावलान काडुचो बरोच प्रयत्न केल्यान,पण शेवटी तुपच ता ईरगाळला सांबार्‍यात.शेवटी कांत्याच्या आवशिक वाटला बाळग्याच्या आवशिचो लक्ष नाया म्हनान ति चिडिचुप रवली.पण ती खळवाटली तेव्हाच बाळग्याच्या आवशिचो लक्ष होतो,तिने ता बघल्यान होता.
...........हकडे खळ्यात पंगती बसले,बाळग्याच्या आवशिन बाळग्याक बोलावन घेतल्यान आणि घडलेली घटना सांगल्यान, सांबारा खाव नको म्हनान सांगल्यान.
बाळग्यान पंगतिक बाजुक बसलेल्या पक्याक सांगल्यान,पक्यान मक्याक,मक्यान तुक्याक,तुक्यान धाक्याक,धाक्यान रामाक,रामान सोमाक,सोमान गोमाक.सांबारा कोणिच खावक नाय.
कांत्याच्या आवशिचा काय झाला आसात तेचो तुम्हि अंदाज बांदा.
ईती श्री डरकाली सांबार: पाककृती समाप्तः!

गुलमोहर: 

हेच्या पुढे म्हाळवसात कोणाकडे जेवक जावचय नाय,सांबार बगलय की 'यक्स' होतला. दु.म. विभाग्रजजी सायोंका मालवणी झणझणीत सांबारा बनवची रेसिपी वाटली असतली.लवकर कथेचा शिर्षक बदला.

फाल्कोरानु बिंदास जावा म्हाळांका जेवक्,कांत्याच्या आवशिन सांबारा बनवचा सोडल्यान आसा.