जुन्या , नविन गाण्यांची ओळख....

Submitted by उदयन. on 23 September, 2011 - 08:16

नमस्कार.
हा जुनाच धागा होता. पण वाहता असल्याने चांगली माहीती वाहुन जात होती..म्हणुन आता धागा काढला आहे
यावर चांगले चांगले गाणी असतील त्यांच्या संबधात माहीती देता येतील जेणे करुन इतरांना सुध्दा फायदा होइल..
कित्येक गाणी चांगले असतात पण आपण ते ऐकतच नाहीत माहीती अथवा फारशी प्रसिध्दी न मिळाल्याने..
त्याच बरोबर गाण्यात काही विशेष बाबी असतील तर त्या सुध्दा इथेच लिहा.....
जुन्याधाग्यावर काही विशेष माहीती उरलेली होती......खालील प्रमाणे
=============================================================
मर्डर चित्रपट मधील भीगे होंठ तेरे........या गाण्यात...जर लक्षपुर्वक ऐकले तर.......गाणे मागुन गाणे चालु आहे हे लक्षात येईल......मुख्य गायकाचे गाण्याचे बोल संपल्यावर कमी आवाजात परत तीच ओळ रिपीट होते.........असे हे गाणे संपुर्ण पणे रिपीट होते....ऐसे वाटते कि ECO sound चालु आहे..............
====================================================================
whats your raashee ? या चित्रपटातील जाओ ना हे गाणे पुर्णपणे गिटार या वाद्यावर वाजवले आहे.......
======================================================================
ताल चित्रपटातले............शेवट चे गाणे इश्क बिना ........या गाण्यात टाळ या वाद्याचा अप्रतिम वापर केलेला आहे......याच गाण्यात इश्क बिना चे वेगळे रुप दाखवण्यात आले आहे.......जेव्हा अचानक अनिल कपुर स्टेज वर येतो.........तेव्हा या सुंदर प्रेमळ गाण्याचे एका स्वार्थी...प्रेमात असफल होत आहे..रागावलेला अनिल कपुर आपल्या संगीता द्वारे बदल करतो ते बघण्या सारखे आहे.......पडदया वर अनिल कपुर ने अप्रतिम अभीनय केला आहे,,पण संगीतात सुद्धा रहमान सर ने तो अभिनय गाण्यात उतरवला आहे....त्याची तळमळ त्याचा राग संगीता तुन प्रेक्षका पर्यंत पोहचतो.......त्यात बसरी चा भाग छान आहे....थीम शेवटी खेचल्या सारखी केली आहे ......जणु काही अनिल एश ला आपल्या कडे बळजबरी ने खेचु पाहतोय
=======================================================]====
भुंगा :-
"के पग घुंगरू बांध मीरा नाची थी" या गाण्यातली धून, त्याचे मधले पिसेस यावर जतिन ललित आणि त्या काळातल्या इतर संगीतकारांची सगळी गाणी तयार झालीत..
प्रत्येक वेळी कान देऊन ऐकले हे गाणे की कुठला ना कुठला म्युझिक पीस वरू उचललेली नवी गाण्याची चाल लक्षात येते.
=====================================================================
मे ख्वाबो कि शेहजादी..........मि. इंडिया मधील हे गाण्याचे सुरवातीचे बोल (शीन्चु..हीन्चु.. ) लिहिले गेले नव्हते.......हे गायिका कविता क्रुष्णमुर्ती यांनी स्वतः गायले आहेत........संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना चीनी भाषेत काही हवे होते सुरवातीला........त्यांनीच कविता याना काही ही मनात येइल ते गा असे फर्मावलेले होते........
======================================================================
शंकर महादेवन चे एक गाणे ब्रिथलेस ( कोई जो मिला था) जे संपुर्ण एका श्वासात म्हणतले आहे ......( असे वाचन्यात आले आहे)......या गाण्यात अंतरा मुखडा असा काहीच प्रकार नाही.............संबंध गाणे एका गद्या प्रमाणे असुन ते गाण्यात आले आहे.......
=======================================================================
हम किसी से कम नही..........या चित्रपटात.....शेवटी जी डांस कॉम्पिटिशन होते......त्यात प्रत्येक गाण्याला एकच अंतरा आहे....
====================================================================
सागर चित्रपटात........जे थीम संगीत आहे.......ज्या सिन मधे ऋषी कपुर पहिल्यांदा डिंपल ला बघतो......त्या थीम संगीता वर बर्मनसाहेबांनी एक गाणे बनवले आहे....आजा मेरी जान (किशन कुमार ...गुलशन कुमार चा भाउ. ) या चित्रपटात शिर्षक गीताची चाल या थीम संगीता वरुन घेतलेली आहे..
=========================================================================
Manaswee
सिनेमा : जैत रे जैत
मी रात टाकली हे गाणं दोन वेगवेगळ्या कवींच्या कवितांचं मिळून बनलंय. पहिलाच प्रयोग असावा हा..
========================================================================
Manaswee
सिनेमा : इजाजत
एकदा आरडीला काही पत्रकारांनी विचारलं कि तुमच्याकडच्या चाली पाहून आश्चर्य वाटतं. तुमच्या बाबतीत असं म्हणतात कि तुम्ही वर्तमानपत्रातल्या बातमीलाही चाल लावाल.. हे खरं आहे का ?आरडी ने हसतच हो म्हणून टाकलं..ही गोष्ट गुलझार यांच्या कानावर गेली ( पत्रकारांचं काम). त्यावर त्यांनी गद्य असं पत्र लिहीलं आणि याला चाल लावा असं आरडीला सांगा असं सांगितलं. आरडीने ते पत्र एकदाच वाचलं आणि पुढच्याच क्षणाला चाल बाहेर पडली.. ते गाणं होतं..
मेरा कूछ सामान .....तुम्हारे पास पडा हे...!!!
============================================================
Manaswee
सिनेमा : शर्मिली
बर्मनदा (सीनियर) यांनी किशोरला गाणं ऐकवलं आणि गायला सांगितलं. किशोरदा काही ते गाणं म्हणेनात. मुझसे नही होगा म्हणत. बर्मनदा म्हणत गाना पडेगा.दुस-या दिवशी किशोरदा आले नाहीत. तिस-याही दिवशी आले नाहीत. निरोप पाठवला तर आजारी आहेत म्हणून निरोप आला. बर्मनदा स्वतः किशोरच्या घरी गेले. घर शोधून पाहीलं पण किशोरदा दिसले नाहीत. शंका आली म्हणून ते बाथरूम चेक करायला गेले तर किशोरदा तिथे लपून बसलेले.बर्मनदांनी चांगलीच हजेरी घेतली आणि स्टुडिओत घेऊन गेले आणि जोपर्यंत हे गाणं तू गात नाहीस तोपर्यंत घरी जायचं नाही असा दम भरला. त्यांनी खरच किशोरदाला सोडलं नाही. गाणं अवघड होतं पण त्यांनी ते किशोरलाच म्हणायला लावलं.. खिलते है गुल यहां..हेच ते अजरामर गाणं..
ही आठवण सांगताना किशोरदा भावुक झालेले.
======================================================================
Manaswee
सुन सायबा सुन हे गाणं बनल्यापासून वीस वर्षांनी सिनेमात वापरलं गेलं.
=====================================================================
जिंदगी ना मिले दोबारा..........या चित्रपटात सॉनोरिटा नावाचे एक गाणे आहे यात रितिक , अभय देओल आणि फरहान अख्तर यांनी हे गाणे गायले आहे..............तिघांचे गायन प्रकार भयानक असल्याने...... संगीतकाराने तिघांना कोरस मधे गायला लावले...आणि फक्त एक एकच कडवे सोलो म्हणुन दिलेले आहे...... बाकी सगळे गाणे स्पनिश भाषेत आहे.......... नविन प्रयोग म्हणता येईल याला
========================================================================

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

रा.वन ची गाणी ऐकलीत....? प्रचंड वेगवान आहेत... बहुतेक विशाल-शेखर यांना तुम्हाला हवे ते करा असे बोलले गेले आहे...कारण प्रयोग फार केलेले आहेत या गाण्यांमधे... एक प्रकार चा इंटरनॅशनल लुक देण्याचा प्रयन्त केला गेला आहे...........

१) छम्मक छल्लो. = या गाण्यात इंटरनॅशनल गायक एकॉन ला चक्क हिंदी मधे गायला लावले आहे..काही बोल चुकलेले आहेत पण शब्द सोडले तर संगीत फार छान आहे
२) दिलदारा = हे एकमेव स्लो शांत गाणे या चित्रपटात आहे... शफाकत अमानत अली याने फार सुंदर रितीने गायले आहे.
३) क्रिमिनल = एकॉन चे अजुन एक हिंदी इग्लिश गाणे...यात विशाल आणि श्रुती पाठक यांनी साठ दिलेली आहे..हे सुध्दा वेगवान आणि इंटरनॅशनल पठडीचे गाणे आहे
४)भरे नैना = तुम्ही ठुमरी / क्लासिकल गाणे बाझ गिटार आणि ड्रम वर ऐकले आहेत का? .....हो चक्क क्लासिकल गाणे नंदनी च्या आवाजात आहे आणि त्याला बाझ गिटार ची साथ आहे..सतार ,विणा यांच्या जागी एक नविनच प्रयोग विशाल-शेखर यांनी केलेला आहे...त्याच बरोबर मधे मधे ड्रम्स चा सुध्दा वापर करुन गाणे वेगवान लयबध्द बनवले गेले आहे...
५) राईट बाय युअर साइड = सिद्द यांनी गायलेले सोलो गाणे आहे..टिपिकल हिंदी गाणे आहे..
६) रफ्तारे : विशाल वर अजुन ही आर. डी बर्मन चा पगडा आहे.. बर्मन यांच्या सारख्या आवाजात हे गाणे गायले गेले आहे.. वेगवान असुन ड्रम बिट्स तर अफलातुन आहेत..थीम म्युझिक यातुनच वापरण्यात आलेले आहे
७) जिया मोरा = एक अजुन प्रयोग..सुखविंदर सिंग च्या आवाजात क्लासिकल चीज या गाण्यात वापरली गेली आहे.. बाकी गाणे फक्त डिजे जसे प्रयोग करतात तसेच प्रयोग केले गेले आहे.. शब्द कमी संगीतच जास्त असा काही प्रकार आहे यात.. डिस्क डिजे टाईप छान वापर केला गेला आहे... ड्रम्स चे बिट प्रत्येक ठेक्याला वेगवेगळे वाजवले गेले आहेत..
८) ९) १०) मधे ३ वेगवेगळ्या थीम म्युझिक दिलेल्या आहेत...वेगळ्या आहेत जरा

जसे संगीत वेगवान दिलेले आहे तसा चित्रपट सुध्दा वेगवान असायला हवा.. अन्यथा शाहरुख चे १५० कोटी गेले समजायचे..... Happy

हो........... रा.वन थ्रीडी आहे......थ्रीडीतच बघण्यात मजा आहे...
===================================================================
नमस्ते इंडीया....... नवीन अल्बम आहे...
राहुल शर्मा ( पंडीत शिवकुमार शर्मा यांचा मुलगा) आणि केनी जी ( जगविख्यात सेक्सोफोनवादक )
या दोघांनी मिळुन हा अल्बम आणला आहे.. फ्युजन प्रकार यात आहे...
ज्यांना फ्युजन हा प्रकार आवडतो त्यांच्यासाठी खास आहे... सेक्सोफोन आणि संतुर यांचे जुगल बंदी यात आहे..
संगीताबरोबरच गाणी सुध्दा आहे..

नक्कीच ऐका..क्लासिकल आणि आणि वेस्टर्न यांचा संगम...........

असे कुठेतरी वाचनात आले होते कि, येरे घना हे काव्य देखील आरती प्रभू, आणि शांता शेळ्के यांचे संयुक्त काव्य आहे..

रॉकस्टार
ए आर रेहमान चे संगीत असणारा .....बराच प्रसिध्दीमधे असणार्‍या चित्रपटाची गाणी इतकी काही खास नाही आहे...... रॉकस्टार म्हणुन एकही गाणे नाही आहे जसे रॉक ऑन मधे होतीत......
साडा हक ऐथे रख..... हे एकच गाणे बंडखोर वृतीचे आहे... समाजा विरुध्द बंड पुकारलेला नायक.. अशी काही शी छबी या गाण्यातुन प्रकट होते.......
बाकीची यथातथाच आहेत.......
रेहमान टच ची कव्वाली कम गाणे एक आहे.. पण ते ही इतके भिडणारे नाही वाटले...
सगळी गाणी मोहीत चौहान च्या आवाजात आहे........ त्याचा आवाज स्लो शांत रॉमँटिक गाण्यातच शोभुन दिसतो..बाकी काही वेगळे करायला गेला तर आवाज वेगळाच वाटतो....... Happy

डॉन २
बहुप्रतिक्षीत आणि चर्चीत चित्रपटाचे संगीत शंकर एहसान लॉय या त्रिकुटी ने दिलेले आहे..
यातल्या गाण्यात पहिल्या चित्रपटाच्या संगीताचा प्रभाव फार आहे.. थीम म्युझिकचे प्रत्येक गाण्यात भरपुर वापर केलेला आहे ( मधे मधे तो सुध्दा खटकतो ).. सबकुछ शाहरुख असल्याने आणि त्यातल्या त्यात तो व्हिलन स्वरुपातला असल्याने एक ही स्लो - रोमांटिक गाणे नाही आहे.. Happy बरोबर आहे व्हिलन कसा झाडाभोवती फिरत फिरत गाणे म्हणणार..

१) जरा दिल को थाम लो - अनुशा मनी आणि विशाल यांच्या आवाजात हे गाणे आहे... पहिल्या चित्रपटातील (डॉन१) रात बाकी यावरुन घेतल्या सारखे वाटते...नविन आणि वेगवान संगीत या गाण्याचे वैशिष्टे म्हणावे लागेल..

२) दुश्मन मेरा - सुनिथा सरथ्ये आणि शंकर महादेवन यांनी गायलेल्या या गाण्यात जुगलबंदी आहे.. प्रश्नोत्तरे सारखे हे गाणे आहे... सालसा संगीत आणि त्यानुसार कांगोचा अप्रतिम वापर या गाण्यात केलेला आहे..

३) मुझको पहचान लो - के के च्या आवाजात जुन्या गाण्याचा नविन संगीत दिलेले आहे... छोटेखानी एंट्री साँग म्हणायला हरकत नाही.. Happy

४) है ये माया - उषा उथ्थप यांनी गायलेले गाणे शान चित्रपटातल्या टायटल साँग ची आठवण करुन देते..
सबकुछ उषा असेच या गाण्याचे वर्णन आहे.. Happy

शेवटी अग्निपथ चित्रपटाचे संगीत आले...... अजय - अतुल या मराठी जोडीचे कौतुक......
करण जोहर च्या महत्वाकांक्षी चित्रपटाचे संगीत अप्रतिम असणारच... त्यात अजय-अतुल ने दिले आहे म्हणजे खासच.....

१) चिकणी चमेली :- मराठी लोकप्रिय गाणे ( कोंबडी पळाली) या चाली वरुन हे गाणे घेतले आहे.. आणि चक्क हे गाणे श्रेया घोशल ने म्हणाले आहे... ऐकताना बिलकुल वाटत नाही की हे गाणे तिने गायलेले आहे.. कारण अशी गाणी गाण्याचे पेटंट फक्त सुनिधी कडेच होते... पण श्रेया ने कुठे ही कमी पडु दिले नाही... जोरदार गाणे आणि दमदार आवाजा बरोबर दणके बाज संगीत.....

२) ओ सैयान :- सुफी बाज असलेले राहत फतेह अली खान यांच्या आवाजात हे गाणे आहे...शांत सुरवट.. जोडीला संतुर आणि सतार यांचा मेळ उत्तम बसवला गेला आहे... सुंदर रचना आहे...

३) गुन गुन गुनात :- गाण्याचे नाव ऐकल्यावर शांत सोज्ज्वळ वाटते पण नाही थांबा गाण्यापुढे गायिके चे नाव सुनिधी आहे...खास मराठी ठेका असलेले हे जोरदार गाणे आहे... संगीत ऐकल्यावर धांगडधिंगा घालुन नाचावेच वाटते... सर्व मराठी वाद्याचा आवर्जुन समाविष्ठ केले गाणे आहे.....ढोल ..ताशे.. चिपळ्या.. टाळ.. सगळेच आहे

उदीत नारायण ने सुध्दा काही भाग गायला आहे... फार दिवसांनी आवाज ऐकला त्याचा Happy

४) शाह का रुतबा :- ही एक कव्वाली आहे. सुरवातीला जंजीर चित्रपटातल्या कव्वाली ची आठवण करुन देते (पठाणी टाईप).. भारदस्त आवाजाचा शेहनशाह सुखविंदर आणि आनंद राज आनंद यांच्या आवाजात एक वेगळा बाजाची कव्वाली आहे.. अजय-अतुल टच पदोपदी जाणावतो ऐकताना..

५) अभी मुझमे कही :- मुलायम आवाजाचा सोनु निगम याने हे गीत गायले आहे.. शांत हळुवार रॉमँटीक गाणे आहे.. ऐकताना अंगावरुन मोरपिस फिरवत आहे इतक्या तरलते ने गायले आहे.....

६) देवा श्री गणेशा :- अजय च्या खास रांगड्या आवाजात गणेशस्तुती चे गाणे आहे... एकदम कडक...

========================================================================

धूम - ३ ची गाणी ऐकली. प्रीतम चं म्युझिक आहे.
१) टायटल सॉंग "धूम मचाले" तर आहेच नेहेमी प्रमाणे पण एवढं अपील झालं नाही (धूम -२ चं "धूम मचाले" जास्त आवडलं होतं).

२) मलंग - खूप आवडलं. शिल्पा राव आणि सिद्धार्थ महादेवन ने मस्त गायलं आहे. हे आतापर्यंतचं सर्वात महागडं गाणं आहे असं ऐकलंय.

३) कमली - सुनिधी रॉक्स. एकदम तिच्या टाईप चं गाणं आहे आणि तिने गायलंय पण छान with all those sunidhee special variations.

४) तू ही जुनून - रोमँटिक गाणं आहे मोहित चौहान च्या आवाजात. नेहेमीप्रमाणे छान अन कानांना सुखद गाणं.

५) बंदे है हम उसके - ही एक कविता आहे जी आमिर पण म्हणतो सिनेमामध्ये...ट्रेलर मध्ये पहिलंच असेल. गाण्याला शिवम महादेवन आणि अनिश शर्मा चा आवाज आहे. आदित्य चोप्रा ने लिहिलेली कविता आहे ही असं ऐकण्यात आलंय.

६) "धूम मचाले" चं एक अरेबिक व्हर्जन पण आहे.