Submitted by उदयन. on 14 December, 2011 - 06:27
मित्रांनो आनंदाची बातमी आहे...............................
यंदाची ३१ तारीख शनिवारी आलेली आहे.................
त्यामुळे मज्जा जरा जास्त वेळ होऊ शकेल...............
मी ३१ ला घरीच असतो.. रात्रीचे १२ वाजता देवपुजा करतो ( नंतर वर्षभर करत नाही ) आणि टीव्ही वरचे कार्यक्रम बघत बघत झोपतो..
माझ्यामते वर्षाचा पहिला दिवस तरी लवकर आणि शुध्दीत उजडावा......
२-३ तारखेला काय ते सेलेब्रेशन जोरात मग...... तसे वर्षभर असतेच म्हणा.
कोण कोण कश्या पध्दती ने साजरी करणार आहेत.....?
कुणाचा अनोखा कार्यक्रम असेल तर कृपया वाटुन घेवु या का........ ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आम्ही मिस्टरांच्या मित्रांचा
आम्ही मिस्टरांच्या मित्रांचा ग्रुप कुटूंबासकट ३१ डिसेंबर साजरा करतो. खर तर हे एक मी निमित्त समजते एकत्र भेटण्याचे. ह्याच दिवशी सगळे एकत्र येउन धम्माल करता. आम्ही गृहीणी प्रत्येक जण आधी ठरवून घरून जेवणातले वेगवेगळे पदार्थ आणतो. आधी मुलांचे गेम खेळतो मग त्यांना चित्र काढायला बसवून कपल्स गेम खेळतो. मग जेवणाचा स्वाद मग शेकोटी आणि भेंड्या.
मला काही कपल्स गेम सुचवा प्लिज.
एखाद्या गडावर संध्याकाळीच
एखाद्या गडावर संध्याकाळीच पोहोचणार, निवडकच मित्र मंडळी सोबत असणार .... त्यामुळे चुलीवरचा स्वयंपाक, शेकोटी भेंड्या. सकाळी गडावर भटकंती आणि घरी परत ..... हे सर्व सालाबाद प्रमाणेच
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गडावर -- अभक्ष्य भक्षण आणि अपेय पान दोन्हीला बंदी आहेच
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@िलंवूभाऊ .... कर्ता करवता
@िलंवूभाऊ .... कर्ता करवता जाणार म्हणजे
@उदयवन, मला प्रश्न व त्याचा
@उदयवन, मला प्रश्न व त्याचा सन्दर्भ कळला नाही![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
म्हणजे कर्त्या माणसाला काम
म्हणजे कर्त्या माणसाला काम करत करतच वर्ष उजाडणार...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमचं रामभरोसे असतं. जमलं तर
आमचं रामभरोसे असतं.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
जमलं तर मजा. नै जमलं तर जेव्हा दंगा घालता येइल त्याला इयर एंड म्हणून घ्यावे
बाकी कित्येक लोक जसे दारू पिण्याचे प्लान करतात, तसंच सुरश सारखे लोक गडावर वै. जातात
रच्याकने: एक पेशंट विचारत होता. २६ पासून पायी शिर्डी पर्यंत जाण्यास परवानगी आहे का? मी नुकतंच मी त्यांचं ऑपरेशन केलं असल्याने मी नाही म्हटलो. तो (वय वर्षे ५४-५५) म्हणाला, मग सरळ ३१ ला गाडिने जाऊन येईन दर्शनाला. गेली ७ वर्शे जातोय..
मी निधर्मांध नास्तिक असूनही उगाच बरं वाटलं ऐकून.
अरे देवा.....बिचारा
अरे देवा.....बिचारा हॅरी....... त्याचे पुढील वर्ष कसे जाणार याचीच चिंता लागली आता>>> चिमुरी -------- कठीण तुझ>>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
रच्याकने, प्लॅन्स काहिही असोत, ते पूर्ण करा म्हणजे झालं... म्हणजे नवीन वर्षाचे केलेले संकल्पही पूर्ण करायला जमतील![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
>>>> मी निधर्मांध नास्तिक
>>>> मी निधर्मांध नास्तिक असूनही <<<<![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
(माझा नविन वर्षाचा सन्कल्प)
रिकामं मडक केव्हाही चान्गलं!
सगळच्या सगळं एकाच निखळ "भक्तिभावाने" भरता येत. अन्य काही भेसळ होत नाही.
अजुन कुणाचेच काही नाही का
अजुन कुणाचेच काही नाही का कार्यक्रम?????
लिंब्या, तुझे सगळे प्रतिसाद
लिंब्या,
तुझे सगळे प्रतिसाद बाय डिफॉल्ट इग्गी आहेत रे!
कशाला माझ्या बोलण्यावर टायपायचे कष्ट घेतोस?
कॅमेरा घेऊन घराच्या किंवा
कॅमेरा घेऊन घराच्या किंवा जवळच्या सोसायटीच्या गच्चीवर ठाण मांडणार...१२ वाजता झालीच मस्त आतिशबाजी तर फोटो काढता येतील...
दंगा-मस्ती, कॅंपमध्ये निरुद्देश भटकणे आदी अनेक प्रकार कित्येक वर्षे केलेत आता नाही त्यात मज्जा येत...कुठे बाहेर जायचे तर रस्त्यावर प्रचंड गर्दी...घरी बसायचे तर टीव्हीवरच्या अत्यंत त्रासदायक व अत्यंत बाष्कळ विनोदाने भरलेल्या कार्यक्रमांची शिक्षा...
त्यापेक्षा एमपी३वर छान भिमसेन नाही तर कुमार ऐकत, गच्चीत गादी टाकून पडून रहायचे....चुकून माकून चांदण्या दिसल्याच तर बोनस....:)
ज्यांचे जगण्याचे सर्व दिवस
ज्यांचे जगण्याचे सर्व दिवस चिंतेचे, ज्यांना या नव्या वर्षाचा आनंद, उत्साह काही नाही त्यांच्या गप्पागोष्टी करुन... अगदीच नाही तर त्यांच्या हातावर त्या रात्री मिठाई ठेवून साजरा करणार ३१ डिसेंबर... त्यांच्या चेहऱ्यावरील एका हास्यलकेरीने येतील की आकाशातील चादण्याही सेलिब्रेट करायला...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
२५
२५
एखाद्या न पिणाऱ्या मित्राला
एखाद्या न पिणाऱ्या मित्राला घेऊन बसणार.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आणि त्याला रात्रभर जाम पिडणार !
यंदा मी पण कुटूंबाबरोबर
यंदा मी पण कुटूंबाबरोबर आनंदाने ३१ डिसें. साजरा करायचं नक्की केलं होतं. पण ....
भाऊ _/\_
भाऊ
_/\_
अरे वा.......भाउ.........
अरे वा.......भाउ.........
Pages