Submitted by एम.कर्णिक on 14 December, 2011 - 13:33
बाबा माझ्या बर्थडेला गिफ्ट काय देणार?
बघा हं, चिल्लरपिल्लर नाय चालणार
आई म्हटली होती जिलबी आर्डर करणाराय
तुमच्याकडुन सांगा नक्की काय मिळणाराय?
केक हवा मोठ्ठा त्यावर मिकी माऊस हवा
अंगा पण छान छान हवा नवा नवा
नवे कोरे बूट हवेत दिवे लागणारे
चालताना पिक पॉक आवाज देणारे
आणखी पण काही तरी तुमच्याकडून हवय
आत्ताच नाही सांगत, माझं अजून ठरायचय
आबा काय देणारायत ठाऊक आहे मला
मीच तर लावलंय त्याना कबुल करायला
सिक्रेट आहे आमचं मी तुम्हाला का सांगू?
लगेच लागाल तुम्ही ते माझ्याकडे मागू
बरं बरं सांगतो, एक चॉक्लेटचा डबा
शंभर चॉक्लेट्वाला मला देणार आहेत आबा
त्यातलं एक चॉक्लेट मी देईन तुम्हाला
देणार असाल सायकल जर तीन चाकी मला
गुलमोहर:
शेअर करा
शाब्बास. बंटीबाबा चांगले
शाब्बास. बंटीबाबा चांगले यशस्वी व्यापारी होणार तर.
कविता मस्त जमली आहे.
(No subject)
छान आहे. पण एवढं सांगणारं बाळ
छान आहे. पण एवढं सांगणारं बाळ अंगा म्हणेल का? तो शब्द नाही पटला.
मस्त. बंटीबाबाला अनेक
मस्त.
बंटीबाबाला अनेक आशिर्वाद
किती वर्षाचा होणारे बंटीबाबा?
सह्ही आहे 'खंडणी'............
सह्ही आहे 'खंडणी'............
अरे वा! बंटीबाबा झाले दोन
अरे वा! बंटीबाबा झाले दोन वर्षांचे? हॅप्पी बर्थ डे!
बनु ताईंचे काय चाललेय सध्या?
वत्सला +१
वत्सला +१
सहीच
सहीच
गोड आहे .... "त्यातलं एक
गोड आहे ....
"त्यातलं एक चॉक्लेट मी देईन तुम्हाला
देणार असाल सायकल जर तीन चाकी मला" >>>
हे अधिक आवडलं. अगदी बालसुलभ वाटलं.
(No subject)
मस्त!
मस्त!
चिमणला ह्यापी ब्डे!
चिमणला ह्यापी ब्डे!
मस्त आहे...लहानपण देगा
मस्त आहे...लहानपण देगा देवा....
मस्त.
मस्त.
अबबब! त्यातलं एक चॉक्लेट मी
अबबब!
त्यातलं एक चॉक्लेट मी देईन तुम्हाला
देणार असाल सायकल जर तीन चाकी मला >>>>>> हे सहीये.
वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद.
सर्वांचे मनापासून आभार. आर्च,
सर्वांचे मनापासून आभार.
आर्च, बंटीबाबांचा शब्दसंग्रह मोठा आहे. जन्माला आल्याबरोबर त्यानी खुद्द परमेश्वराशी संभाषण केले होते तेही मधूनमधून इंग्रजी वाक्ये वापरून ( पहा http://www.maayboli.com/node/12723). तेव्हा कधी तरी बालसुलभ शब्द बोलायचा मोह त्याना झाल्यास नवल नसावे. त्याना संभाळून घ्या ही विनंती.
मस्त. >>> चालताना पिक पॉक
मस्त.
>>> चालताना पिक पॉक आवाज देणारे >>> यातला 'आवाज देणारे' शब्दप्रयोग खूपच आवडला.
त्यातलं एक चॉक्लेट मी देईन
त्यातलं एक चॉक्लेट मी देईन तुम्हाला
देणार असाल सायकल जर तीन चाकी मला>>
बंटीबाबा चांगले यशस्वी व्यापारी होणार नक्कि .. कविता क्युट
कर्णिक साहेब १) तुमच्या
कर्णिक साहेब
१) तुमच्या बंटीला आता कधीतरी माबो वर घेउन या, इथल्या थोरामोठ्याना भेटवा
२) त्याच्या सोबत त्याचे काही मित्रमैत्रिणी आहेत का? त्यानाही घेऊन या.........
उद्देश : बंटी या पात्रास अजरामर करावे त्याचे आयुष्यातील असे छोटे मोठे किस्से कहाण्या तुमच्या कवितातून नक्कीच अजरामर होणार तेसेच बंटी माबोवर येवून , इथल्या थोरामोठ्याना भेटून
माबोकरानाही अमर करू शकतो असे मनोमन वाटत आहे .खूप धमाल येईल नै.!
पुलेशु !!!!!
अरेच्चा, हे कस कॉय राहिल
अरेच्चा, हे कस कॉय राहिल वाचायच.
मस्त खंडणी
बंटीबाबा चांगले यशस्वी व्यापारी होणार तर.>>>> +१
कर्णिक साहेब
१) तुमच्या बंटीला आता कधीतरी माबो वर घेउन या, इथल्या थोरामोठ्याना भेटवा
२) त्याच्या सोबत त्याचे काही मित्रमैत्रिणी आहेत का? त्यानाही घेऊन या.........>>>>>>++१
गोडमिट्ट!
गोडमिट्ट!
>>पण एवढं सांगणारं बाळ अंगा
>>पण एवढं सांगणारं बाळ अंगा म्हणेल का?
अंगा म्हणजे काय?
खोडकर बंटीबाबा, सगळं वदवून
खोडकर बंटीबाबा, सगळं वदवून घेतोय गोड गोड बोलून.
मस्त ! जिप्सी +१ !
मस्त !
जिप्सी +१ !
तुम्हा सगळ्या रसिकांचे आभार
तुम्हा सगळ्या रसिकांचे आभार मानीन तितके थोडेच आहेत !
वा वा! वाचायची राहून गेली
वा वा! वाचायची राहून गेली होती. मस्त; तुम्ही आता मायबोलीचे पितामह झालात. आता लवकर दुसरे पुस्तक पण काढा प्लीज.