बंटीबाबांची खंडणी

Submitted by एम.कर्णिक on 14 December, 2011 - 13:33

बाबा माझ्या बर्थडेला गिफ्ट काय देणार?
बघा हं, चिल्लरपिल्लर नाय चालणार

आई म्हटली होती जिलबी आर्डर करणाराय
तुमच्याकडुन सांगा नक्की काय मिळणाराय?

केक हवा मोठ्ठा त्यावर मिकी माऊस हवा
अंगा पण छान छान हवा नवा नवा

नवे कोरे बूट हवेत दिवे लागणारे
चालताना पिक पॉक आवाज देणारे

आणखी पण काही तरी तुमच्याकडून हवय
आत्ताच नाही सांगत, माझं अजून ठरायचय

आबा काय देणारायत ठाऊक आहे मला
मीच तर लावलंय त्याना कबुल करायला

सिक्रेट आहे आमचं मी तुम्हाला का सांगू?
लगेच लागाल तुम्ही ते माझ्याकडे मागू

बरं बरं सांगतो, एक चॉक्लेटचा डबा
शंभर चॉक्लेट्वाला मला देणार आहेत आबा

त्यातलं एक चॉक्लेट मी देईन तुम्हाला
देणार असाल सायकल जर तीन चाकी मला

गुलमोहर: 

गोड आहे ....

"त्यातलं एक चॉक्लेट मी देईन तुम्हाला
देणार असाल सायकल जर तीन चाकी मला" >>>
हे अधिक आवडलं. अगदी बालसुलभ वाटलं.

Happy

अबबब!
त्यातलं एक चॉक्लेट मी देईन तुम्हाला
देणार असाल सायकल जर तीन चाकी मला >>>>>> हे सहीये.
वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद.

सर्वांचे मनापासून आभार.
आर्च, बंटीबाबांचा शब्दसंग्रह मोठा आहे. जन्माला आल्याबरोबर त्यानी खुद्द परमेश्वराशी संभाषण केले होते तेही मधूनमधून इंग्रजी वाक्ये वापरून ( पहा http://www.maayboli.com/node/12723). तेव्हा कधी तरी बालसुलभ शब्द बोलायचा मोह त्याना झाल्यास नवल नसावे. त्याना संभाळून घ्या ही विनंती.

त्यातलं एक चॉक्लेट मी देईन तुम्हाला
देणार असाल सायकल जर तीन चाकी मला>>
बंटीबाबा चांगले यशस्वी व्यापारी होणार नक्कि .. कविता क्युट Happy

कर्णिक साहेब
१) तुमच्या बंटीला आता कधीतरी माबो वर घेउन या, इथल्या थोरामोठ्याना भेटवा
२) त्याच्या सोबत त्याचे काही मित्रमैत्रिणी आहेत का? त्यानाही घेऊन या.........
उद्देश : बंटी या पात्रास अजरामर करावे त्याचे आयुष्यातील असे छोटे मोठे किस्से कहाण्या तुमच्या कवितातून नक्कीच अजरामर होणार तेसेच बंटी माबोवर येवून , इथल्या थोरामोठ्याना भेटून
माबोकरानाही अमर करू शकतो असे मनोमन वाटत आहे .खूप धमाल येईल नै.!
पुलेशु !!!!!

अरेच्चा, हे कस कॉय राहिल वाचायच.
मस्त खंडणी Happy

बंटीबाबा चांगले यशस्वी व्यापारी होणार तर.>>>> +१

कर्णिक साहेब
१) तुमच्या बंटीला आता कधीतरी माबो वर घेउन या, इथल्या थोरामोठ्याना भेटवा
२) त्याच्या सोबत त्याचे काही मित्रमैत्रिणी आहेत का? त्यानाही घेऊन या.........>>>>>>++१

वा वा! वाचायची राहून गेली होती. मस्त; तुम्ही आता मायबोलीचे पितामह झालात. आता लवकर दुसरे पुस्तक पण काढा प्लीज.