नागपुरी वडाभाता बरोबरचा चींचेचा सार!

Submitted by धनुकली on 12 December, 2011 - 09:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धा कप चींच
लाल तिखट
गुळ (चींचे बरोबरीचा)
तेल, मोहोरी, जीरं, हिंग, लाल मिर्च्या, कढीपत्ता
थोडी चिरलेली कोथिंबीर
मीठ

क्रमवार पाककृती: 

चींच गरम पाण्यात भीजवुन कोळुन घ्या.
गाळुन घेतल्यास उत्तम.
त्यात हवे तेव्हढे पाणी घाला (जवळपास ४ कप)
फोडणी साठी, तेल गरम करा
मोहोरी, जीरं घाला, तडतडल्यावर हिन्ग घाला.
कढीपत्ता, लाल मिर्च्या घालुन तळल्यासरखे करा.
आता त्यात कोळ, गुळ, तिखट, मिठ घाला.
छान उकळी येउ ध्या. ५ मिन. पर्यंत. ( एक जीव झाले पाहीजे)
कोथिंबीर घालुन वडाभाता बरोबर साईड डीश म्हणुन हाणा!!

वाढणी/प्रमाण: 
२ व्यक्तींना पुरेसे
अधिक टिपा: 

गुळाचे प्रमाण अवडीनुसार बदला.. नाही तर पीयुश लागेल हे! :ड
बित्तु च्या मिर्च्यांना घबरणार्यांना धीर येइल. फोडणीतल्या मिर्च्या पचवायला औषध! Happy

माहितीचा स्रोत: 
आई, नेट साभार!
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त पाककृती. याला चिंचवणी पण म्हणतात बहुतेक.

आडो, तूप-जिर्‍याची फोडणी पण देतात. यात दाण्याचा बारिक कूट घातलेला खाल्लाय.

आडो: चालते.. गुळचट चव जास्त येते अशाने.. चांगली लागेल.

मृ: यात दाण्याचा बारिक कूट घातलेला खाल्लाय>> अगदी.. पण तेच.. गोड पणा वाढतो..
झणझणीत तेलाच्या फो डणीला नल अन वॉईड ( null and void ) करुन टाकेल.. म्हणुन फक्त थोडा गुळ लिहीला आहे. अवडी नुसार बदल करता येइल.

याला चिंचवणी पण म्हणतात बहुतेक >>>> बरोबर

आणि कैरीचे करतात त्याला आंबोवणी म्हणतात, ही सुद्धा काहीजण वडाभातासोबत खातात Happy

ताकाची कढी, चिंचवणी आणि आंबोवणी -- सर्वच आंबट्-गोड पणा झणझणीत वडाभातासोबत मजा आणतात Happy Happy Happy

सुरशः हे सगळं माहीत नव्हत.. आंबोवणी वगैरे.. धन्स.. आता कळलं.
जामोप्या: रस्सम वेगळे.. त्यात गुळ कमी वापरतात. रेसीपी बरीच वेगळी असते. पण रस्सम चा जवळचा नातेवाईक समजा ह्या साराला. Happy

रस्सम मधे मसाला भरपूर घालतात. कढीपत्ता, धणे, मेथी, सुक्या मिरच्या असं सर्व तेलावर परतून बारीक करून त्याचा रस्सम मसाला बनवतात. शिवाय त्यात गूळ कमी असतो. काळी मिरीपण घालतात. Happy

हे चिंचेचे सार आमच्याकडे फार फेवरेट आहे. पटकन होते आणि झंझट जास्त नाही.

बाकी, कुणी चिंच गूळ वगैरे एकत्र ठेचून त्याचा गोळा बनवतात (आम्ही चमच्याला लावून खायचो) तो खाल्लाय का?

आम्ही चमच्याला लावून खायचो

आम्हीपण ... त्यात एक लसूण घालायचा. वरवंट्याने ठेचायचे. Proud

सोप्पी कृती Happy केले पाहिजे एकदा
बाकी, कुणी चिंच गूळ वगैरे एकत्र ठेचून त्याचा गोळा बनवतात (आम्ही चमच्याला लावून खायचो) तो खाल्लाय का? >>> हो. जिरं पण घालायच त्यात Happy आम्ही कुल्फीच्या काडीला लावून खायचो.

मवा: हो सोप्पय. कुठल्याही चमचमीत पदर्था बरोबर चालेल हे खायला. Happy

माझा बेत आहे शनीवारचा !! वडाभात आणि सार!
या घरी Happy

सीमा आंबट असतं पण खूप नाही.
अर्धा वाटी चींच घेउन त्याचा कोळ काढायचा आणि त्यात किमान ४ वाट्या पाणी घालायचं. तरी आंबट झालं? Sad

किती पाणी घातलं? मी केलं की फोटो टाकेन. मग अंदाज येइल तुम्हाला. थोडी साखर/ गुळ घालुन अन मीठ वढवुन बघा!

इंद्रधनु , माझ्याकडे चिंच नव्हती. मी पल्प वापरलेला. त्यामुळे अंदाज चुकला असावा. परत करुन बघेन पुढच्या आठवड्यात. आमसुलाचं रसम आवडत. त्यामुळे हे पण आवडेल अस वाटतय. Happy