Submitted by धनुकली on 12 December, 2011 - 09:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
अर्धा कप चींच
लाल तिखट
गुळ (चींचे बरोबरीचा)
तेल, मोहोरी, जीरं, हिंग, लाल मिर्च्या, कढीपत्ता
थोडी चिरलेली कोथिंबीर
मीठ
क्रमवार पाककृती:
चींच गरम पाण्यात भीजवुन कोळुन घ्या.
गाळुन घेतल्यास उत्तम.
त्यात हवे तेव्हढे पाणी घाला (जवळपास ४ कप)
फोडणी साठी, तेल गरम करा
मोहोरी, जीरं घाला, तडतडल्यावर हिन्ग घाला.
कढीपत्ता, लाल मिर्च्या घालुन तळल्यासरखे करा.
आता त्यात कोळ, गुळ, तिखट, मिठ घाला.
छान उकळी येउ ध्या. ५ मिन. पर्यंत. ( एक जीव झाले पाहीजे)
कोथिंबीर घालुन वडाभाता बरोबर साईड डीश म्हणुन हाणा!!
वाढणी/प्रमाण:
२ व्यक्तींना पुरेसे
अधिक टिपा:
गुळाचे प्रमाण अवडीनुसार बदला.. नाही तर पीयुश लागेल हे! :ड
बित्तु च्या मिर्च्यांना घबरणार्यांना धीर येइल. फोडणीतल्या मिर्च्या पचवायला औषध!
माहितीचा स्रोत:
आई, नेट साभार!
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान! पुढच्या प्रयोगात करून
छान! पुढच्या प्रयोगात करून पाहू!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त वाटतेय. बित्तूचा वडाभात
मस्त वाटतेय. बित्तूचा वडाभात करायचा योग आला तर नक्की करेन.
वेगळी कृती. ह्याला तुपाची
वेगळी कृती. ह्याला तुपाची फोडणी कशी वाटेल?
मस्त पाककृती. याला चिंचवणी पण
मस्त पाककृती. याला चिंचवणी पण म्हणतात बहुतेक.
आडो, तूप-जिर्याची फोडणी पण देतात. यात दाण्याचा बारिक कूट घातलेला खाल्लाय.
आडो: चालते.. गुळचट चव जास्त
आडो: चालते.. गुळचट चव जास्त येते अशाने.. चांगली लागेल.
मृ: यात दाण्याचा बारिक कूट घातलेला खाल्लाय>> अगदी.. पण तेच.. गोड पणा वाढतो..
झणझणीत तेलाच्या फो डणीला नल अन वॉईड ( null and void ) करुन टाकेल.. म्हणुन फक्त थोडा गुळ लिहीला आहे. अवडी नुसार बदल करता येइल.
साउथ इंडियन रस्सम असेच असते
साउथ इंडियन रस्सम असेच असते थोडेफार. खास रस्सम मसालाही मिळतो
याला चिंचवणी पण म्हणतात
याला चिंचवणी पण म्हणतात बहुतेक >>>> बरोबर
आणि कैरीचे करतात त्याला आंबोवणी म्हणतात, ही सुद्धा काहीजण वडाभातासोबत खातात![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ताकाची कढी, चिंचवणी आणि आंबोवणी -- सर्वच आंबट्-गोड पणा झणझणीत वडाभातासोबत मजा आणतात
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटो..?? माबो वर फोटो फार
फोटो..??![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माबो वर फोटो फार आवश्यक झालाय आज्काल..
मी_चिऊ: ह्या विकांताला करुन
मी_चिऊ: ह्या विकांताला करुन फोटो डकवते!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरशः हे सगळं माहीत नव्हत..
सुरशः हे सगळं माहीत नव्हत.. आंबोवणी वगैरे.. धन्स.. आता कळलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जामोप्या: रस्सम वेगळे.. त्यात गुळ कमी वापरतात. रेसीपी बरीच वेगळी असते. पण रस्सम चा जवळचा नातेवाईक समजा ह्या साराला.
रस्सम मधे मसाला भरपूर घालतात.
रस्सम मधे मसाला भरपूर घालतात. कढीपत्ता, धणे, मेथी, सुक्या मिरच्या असं सर्व तेलावर परतून बारीक करून त्याचा रस्सम मसाला बनवतात. शिवाय त्यात गूळ कमी असतो. काळी मिरीपण घालतात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे चिंचेचे सार आमच्याकडे फार फेवरेट आहे. पटकन होते आणि झंझट जास्त नाही.
बाकी, कुणी चिंच गूळ वगैरे एकत्र ठेचून त्याचा गोळा बनवतात (आम्ही चमच्याला लावून खायचो) तो खाल्लाय का?
आम्ही चमच्याला लावून
आम्ही चमच्याला लावून खायचो
आम्हीपण ... त्यात एक लसूण घालायचा. वरवंट्याने ठेचायचे.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सोप्पी कृती केले पाहिजे
सोप्पी कृती
केले पाहिजे एकदा
आम्ही कुल्फीच्या काडीला लावून खायचो.
बाकी, कुणी चिंच गूळ वगैरे एकत्र ठेचून त्याचा गोळा बनवतात (आम्ही चमच्याला लावून खायचो) तो खाल्लाय का? >>> हो. जिरं पण घालायच त्यात
जामोप्या, अनघा, त्याला काय
जामोप्या, अनघा, त्याला काय म्हणतात??
मला खरंच आठवत नाहीये
नाही ग आठवत.. स्वत:च स्वत:चा
नाही ग आठवत.. स्वत:च स्वत:चा करुन खाल्लेला पहिला पदार्थ
मस्तय. वडाभात नाही केला तरी
मस्तय. वडाभात नाही केला तरी हे करुन पाहीन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नंदिनी त्या तशा काड्या शाळे
नंदिनी त्या तशा काड्या शाळे बाहेर विकत मिळायच्या. आम्ही चुर्ण म्हणयचो.
मवा: हो सोप्पय. कुठल्याही
मवा: हो सोप्पय. कुठल्याही चमचमीत पदर्था बरोबर चालेल हे खायला.
माझा बेत आहे शनीवारचा !! वडाभात आणि सार!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
या घरी
केलं आज. पण खरी चव कशी असते?
केलं आज. पण खरी चव कशी असते? खुप आंबट असते का? बरच आंबट झाल होत सार.
सीमा आंबट असतं पण खूप
सीमा आंबट असतं पण खूप नाही.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
अर्धा वाटी चींच घेउन त्याचा कोळ काढायचा आणि त्यात किमान ४ वाट्या पाणी घालायचं. तरी आंबट झालं?
किती पाणी घातलं? मी केलं की फोटो टाकेन. मग अंदाज येइल तुम्हाला. थोडी साखर/ गुळ घालुन अन मीठ वढवुन बघा!
मस्त पाकृ! आता वडाभाताचा बेत
मस्त पाकृ! आता वडाभाताचा बेत करेन तेव्हा जोडीला सारही करेन!
इंद्रधनु , माझ्याकडे चिंच
इंद्रधनु , माझ्याकडे चिंच नव्हती. मी पल्प वापरलेला. त्यामुळे अंदाज चुकला असावा. परत करुन बघेन पुढच्या आठवड्यात. आमसुलाचं रसम आवडत. त्यामुळे हे पण आवडेल अस वाटतय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ओह्ह अच्छा.. पल्प जास्त घट्ट
ओह्ह अच्छा.. पल्प जास्त घट्ट असेल म्हणुन.