बासमती तांदूळ १ किलो
मटण किंवा चिकन १/२ किलो
दही ४०० ग्रॅम
अननस १ (गोल चकत्या करुन)
सुके आलू बुखार (७-८)
४-५ कांदे (उभे चिरुन)
बटाटे (उभे कापुन)
लवंग - १६
दालचिनी ८ तुकडे
तमालपत्र ८
वेलची १०
काळीमिरी १६
जिर १ चमचा
मिरची पावडर १ चमचा
आल, लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट २ ते ३ मोठे चमचे
हिंग
हळद
मिठ
३-४ चमचे तेल
तुप
गव्हाचे पिठ (मळून)
१) बिरयाणी करायला घ्यायच्या १ तास आधी तांदुळ धुवुन निथळत ठेवा.
२) चिकन किंवा मटण साफ करुन त्याला दही व वाटण चोळून १ तास मुरवा.
३) एका मोठा पातेल्यात तांदळाच्या दुप्पट किंवा त्यापेक्षा जास्त पाणी उकळत ठेवा. त्यात मिठ, जिर, ४ वेलची, ४ मिरी, ४ लवंग, २ दालचिनीचे तुकडे, २ तमालपत्र घाला. पाणी उकळले की त्यात तांदूळ टाका. ५-६ मिनीटांनी तांदूळ जरा अर्धवट शिजले की त्यातील अर्धे तांदूळ चाळणीत निथळवत ठेवावेत. नंतर अजुन ३-४ मिनीटांनी उरलेले शिजत आलेले तांदुळ दुसर्या चाळणीत निथळवत ठेवावेत.
४) एका भांड्यात तेल टाकून त्यात ४ मिरी, ४ लवंगा, २ वेलची, २ दालचीनीचे तुकडे, २ तमालपत्र घालून त्यावर कांदा बदामी रंगावर कुरकुरीत शिजवा. असा कांदा शिजवण्यासाठी तेल नेहमीपेक्षा थोडे जास्त वापरावे.
५) मुरवलेल्या मटण्/चिकनला हिंग, हळद, मिरची पुड, ८ मिरी, ८ लवंगा, ४ वेलची, ४ दालचीनीचे तुकडे, ४ तमालपत्र, आलुबुखार, उभे चिरलेले बटाटे व २ चमचे तुप घालुन एकत्र करा.
६) बिरयाणी करण्यासाठी एक मोठे टोप घ्या. त्या टोपाला आतून तुप लावा. टोपात चिकनचे मिक्स केलेले मिश्रण पसरून घ्या. पसरलेल्या चिकन्/मटणवर तळलेला अर्धा कांदा टाका. त्यावर अननसाच्या चकत्या लावा.
७) चकत्यांच्या वर कच्चट तांदळांचा थर लावा व त्यावर थोडे तुप पसरवा.
८) राहिलेला अर्धा कांदा ह्या तांदळांवर पसरवा व शिजत आलेला भात ह्या थरावर लावा. परत थोडे तुप पसरवा.
९) टोपावर अगदी व्यवस्थित बसणारे झाकण लावा (हवा बाहेर गेली नाही पाहीजे असे). झाकण वसवून झाकण व टोप जोडणारी कडा गव्हाच्या मळलेल्या पिठाने गोलाकार घट्ट पॅक करा.
१०) टोप पातळ असल्यास पहीली १५ मिनीटे मोठ्या गॅसवर बिरीयाणीचे टोप ठेवा किंवा मिडियम गॅस वर टोप ठेवा मग अॅल्युमिनियमच्या तव्यावर हे टोप ठेउन अर्धा ते पाऊण तास ही बिरयाणी शिजू द्या. जर निखारे असतील तर तेही झाकणावर ठेवल्यास बिरयाणी अजुन चांगली दम होते.
११) बिरयाणी तयार झाली की टोप गॅसवरुन उतरवून १० मिनिटे ठेवा. मग चमच्याने किंवा कालथ्याने गव्हाच्या पिठाचे आवरण काढा आणि झाकण उघडा. बिरयाणीचा वाफाळणारा दणदणीत वास घरभर पसरुन सगळ्यांना भुक लागेल. मग लगेच वाढायला घ्या. वाढताना मोठा कालथा थेट काली रोवून थरासकट बिरयाणी वाढा.
ही बिरयाणी रायत्यासोबत खावी.
ह्या बिरयाणीतील आलूबुखार लहान मुलांना विशेश आवडतात. माझ्या पुतण्याची व श्रावणीची त्या आलूबुखारांवर झुंबड असते.
अननस गोड लागतो थोडा पण भातात त्याची चव किंवा स्वाद मिक्स होत नाही. पण भाताबरोबर खायला चांगला लागतो.
जागु सुके आलुबुखार कुठून
जागु सुके आलुबुखार कुठून घेतलेस?
प्रिती, निकीता सोमवारी देते.
प्रिती, निकीता सोमवारी देते. ह्या शनीवारी केला की फोटो काढेन.
प्रसिक तुलाही हा पुलाव त्यावर उपाय.
साधना अग ड्रायफ्रुट्स मिळतात त्या दुकानात मिळतील.
जागु पुलाव रिमांडर
जागु
पुलाव रिमांडर
जागु इतकी सोप्पी आणि हिट
जागु
इतकी सोप्पी आणि हिट बिर्याणी..मजा आया.. काल केली होती..टोप घासायची गरज पडणार नाही अशी संपली
मस्त! पण अननसाने गोड चव येत
मस्त! पण अननसाने गोड चव येत नाहि का? जागू मला तुझ्या रेसिपि खुप आवड्तात. आज पहिल्यादा आले. अजुन मराठि लिहिण्याचि सवय नाहि.
जागु ताई, मी केली बिरयणी पण
जागु ताई, मी केली बिरयणी पण टोपाला खालुन लागत होती. मग झाकण काढुन हलवायला लागली. नाहीतर वास लागला असताना.
:अरेरे.
(मग ती बेदम (दम नसलेली ) बिरयाणी झाली ना????)
पण चव छान होती. अननस घातला नव्हता. सगळ्यांनी बेदम हाणली.
बासमती तांदूळ १ किलो >> या
बासमती तांदूळ १ किलो
>> या मधे अर्धा किलोच तांदुळ वापरला तर बाकी मसाल्यामधे काय बदल करावा लागेल. प्लिजच जागु , दिनेशदा सांगा ना
छान
छान
अप्रतिम रेसिपी लिहिल्येस
अप्रतिम रेसिपी लिहिल्येस जागू.
मि बनवली होती जबरदस्त टेस्ट
मि बनवली होती जबरदस्त टेस्ट फक्त आलू बुखारा कोथे मिळाला नाही तेवढच राहीले फक्त
रावण खरच ह्याचा वास इतका
रावण खरच ह्याचा वास इतका सुंदर येतो की होतानाच खावीशी वाटते. आलु बुखार नसला तरी एवढा फरक नाही पडत. पण लहान मुलांना ते आलू बुखार खायला आवडातात.
करून पहायला हवी. इथे आता मटण
करून पहायला हवी. इथे आता मटण चांगले मिळतेय रमदान दिवसात.
अननसाने गोड चव नाही येत का?(तुम्ही लिहिलेय पण पुन्हा विचारतेय.. तिखट जेवणात गोड कधी टाकले नाही)
झंपी गोड चव पुर्ण बिरयाणीला
झंपी गोड चव पुर्ण बिरयाणीला नाही लागत. पण मध्येच ही फोड खाली की वेगळी चांगली टेस्ट येते. आणि जर गोड आजिबातच नसेल आवडत तर अननस नाही टाकला तरी चालेल. पण एकदा ट्राय तर करुन बघा.
Pages