बासमती तांदूळ १ किलो
मटण किंवा चिकन १/२ किलो
दही ४०० ग्रॅम
अननस १ (गोल चकत्या करुन)
सुके आलू बुखार (७-८)
४-५ कांदे (उभे चिरुन)
बटाटे (उभे कापुन)
लवंग - १६
दालचिनी ८ तुकडे
तमालपत्र ८
वेलची १०
काळीमिरी १६
जिर १ चमचा
मिरची पावडर १ चमचा
आल, लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट २ ते ३ मोठे चमचे
हिंग
हळद
मिठ
३-४ चमचे तेल
तुप
गव्हाचे पिठ (मळून)
१) बिरयाणी करायला घ्यायच्या १ तास आधी तांदुळ धुवुन निथळत ठेवा.
२) चिकन किंवा मटण साफ करुन त्याला दही व वाटण चोळून १ तास मुरवा.
३) एका मोठा पातेल्यात तांदळाच्या दुप्पट किंवा त्यापेक्षा जास्त पाणी उकळत ठेवा. त्यात मिठ, जिर, ४ वेलची, ४ मिरी, ४ लवंग, २ दालचिनीचे तुकडे, २ तमालपत्र घाला. पाणी उकळले की त्यात तांदूळ टाका. ५-६ मिनीटांनी तांदूळ जरा अर्धवट शिजले की त्यातील अर्धे तांदूळ चाळणीत निथळवत ठेवावेत. नंतर अजुन ३-४ मिनीटांनी उरलेले शिजत आलेले तांदुळ दुसर्या चाळणीत निथळवत ठेवावेत.
४) एका भांड्यात तेल टाकून त्यात ४ मिरी, ४ लवंगा, २ वेलची, २ दालचीनीचे तुकडे, २ तमालपत्र घालून त्यावर कांदा बदामी रंगावर कुरकुरीत शिजवा. असा कांदा शिजवण्यासाठी तेल नेहमीपेक्षा थोडे जास्त वापरावे.
५) मुरवलेल्या मटण्/चिकनला हिंग, हळद, मिरची पुड, ८ मिरी, ८ लवंगा, ४ वेलची, ४ दालचीनीचे तुकडे, ४ तमालपत्र, आलुबुखार, उभे चिरलेले बटाटे व २ चमचे तुप घालुन एकत्र करा.
६) बिरयाणी करण्यासाठी एक मोठे टोप घ्या. त्या टोपाला आतून तुप लावा. टोपात चिकनचे मिक्स केलेले मिश्रण पसरून घ्या. पसरलेल्या चिकन्/मटणवर तळलेला अर्धा कांदा टाका. त्यावर अननसाच्या चकत्या लावा.
७) चकत्यांच्या वर कच्चट तांदळांचा थर लावा व त्यावर थोडे तुप पसरवा.
८) राहिलेला अर्धा कांदा ह्या तांदळांवर पसरवा व शिजत आलेला भात ह्या थरावर लावा. परत थोडे तुप पसरवा.
९) टोपावर अगदी व्यवस्थित बसणारे झाकण लावा (हवा बाहेर गेली नाही पाहीजे असे). झाकण वसवून झाकण व टोप जोडणारी कडा गव्हाच्या मळलेल्या पिठाने गोलाकार घट्ट पॅक करा.
१०) टोप पातळ असल्यास पहीली १५ मिनीटे मोठ्या गॅसवर बिरीयाणीचे टोप ठेवा किंवा मिडियम गॅस वर टोप ठेवा मग अॅल्युमिनियमच्या तव्यावर हे टोप ठेउन अर्धा ते पाऊण तास ही बिरयाणी शिजू द्या. जर निखारे असतील तर तेही झाकणावर ठेवल्यास बिरयाणी अजुन चांगली दम होते.
११) बिरयाणी तयार झाली की टोप गॅसवरुन उतरवून १० मिनिटे ठेवा. मग चमच्याने किंवा कालथ्याने गव्हाच्या पिठाचे आवरण काढा आणि झाकण उघडा. बिरयाणीचा वाफाळणारा दणदणीत वास घरभर पसरुन सगळ्यांना भुक लागेल. मग लगेच वाढायला घ्या. वाढताना मोठा कालथा थेट काली रोवून थरासकट बिरयाणी वाढा.
ही बिरयाणी रायत्यासोबत खावी.
ह्या बिरयाणीतील आलूबुखार लहान मुलांना विशेश आवडतात. माझ्या पुतण्याची व श्रावणीची त्या आलूबुखारांवर झुंबड असते.
अननस गोड लागतो थोडा पण भातात त्याची चव किंवा स्वाद मिक्स होत नाही. पण भाताबरोबर खायला चांगला लागतो.
जागु ताई... तुम्हि ग्रेट
जागु ताई... तुम्हि ग्रेट आहात... कसलि....अप्रतिम दिसतेय.. बिरयाणि... उपवास आहे.. माझा. आणि मी हे बघतेय... तोंपासु..... :G:G
दीपा उद्याच्या भाऊबिजेसाठी
दीपा उद्याच्या भाऊबिजेसाठी करण्यासाठी आजच टाकली आहे रेसिपी.
मस्त.
मस्त.
अननस अणि आलूबुखार च addition
अननस अणि आलूबुखार च addition एकदम भारी आहे. पाककृती लिहीण्याची पद्धत आणि फोटोही छान पण बिरयाणीत पुदीना अणि वरुन केशरी दुध असल्याशिवाय काही मजा नाही.
मस्त र्बियाणी
मस्त र्बियाणी
सह्हीच!
सह्हीच!
जागुले, महान __/\__
जागुले, महान __/\__
कंसराज, लाजो बाबु धन्स. बीएस
कंसराज, लाजो बाबु धन्स.
बीएस धन्स. पुदिना वाटणातही टाकू शकतो. आता पुढच्यावेळी तुमच्या टिप्स प्रमाणे करुन बघेन.
भारी दिसतेय एकदम. आता करावीच
भारी दिसतेय एकदम. आता करावीच लागणार.
_/\_
_/\_
जा>>>>>गु...
जा>>>>>गु... तोंडाला इत्कं पाणी सुटलंय कि काही लिहिताच येत नाहीये......स्लर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्प!!!!!!!!!!!!!!
भारीच आहे !! एक्दम
भारीच आहे !!
एक्दम तोपासु.
अननसाची आयडिया आवड्या. करुन बघतेच.
सावली, चिंगी, डॅफोडील्स
सावली, चिंगी, डॅफोडील्स धन्यवाद.
वर्षू
झकास..
झकास..
छान
छान
जागु. मस्तच ग... वाचुन आणि
जागु. मस्तच ग... वाचुन आणि फोटो बघुन खरचं तोडाला पाणी सुटतयं....:)
हिच बिर्याणी हवी होती....अशीच
हिच बिर्याणी हवी होती....अशीच हवी होती...
दुसरे काही खाऊ नका आधी नाहीतर पश्चाताप होईल. >> अगदी सहमत
खासच!!! जागू, एक प्लेट
खासच!!!
जागू, एक प्लेट पार्सल पाठवून दे
अम्मी, वाल्याकोळी, प्रिती,
अम्मी, वाल्याकोळी, प्रिती, चातक धन्यवाद.
जिप्स्या आतले घटक वाचुनच बोलतोयस ना ?
छानच आहे..
छानच आहे..
जिप्स्या आतले घटक वाचुनच
जिप्स्या आतले घटक वाचुनच बोलतोयस ना ?>>> तो ग्रेव्हीटेरीयन आहे ना मग बिर्याणी साठी राईस इटेरीयन होईल
चिउ धन्स. डॅफोडील्स
चिउ धन्स.
डॅफोडील्स
अवेळी नाही ते फोटो
अवेळी नाही ते फोटो टाकल्याबद्दल जागू यांचा तीव्र निषेध!
बिर्याणी पाहून तोपासू!
जागुएश अगदीएश
जागुएश अगदीएश मस्तएश
आवडेश्.....तु खुप चांगली आहेस्स?
१ प्रशन................. क्रुती ३ ४ ५ सगळ्यात्च मिरीलवंगावेलचीदालचीनीचे तुकडेतमालपत्र घातले आहे जास्त तिखट नाही क होणार????????????
जागु मला शिकव ना, फक्त
जागु मला शिकव ना, फक्त व्हेज..
मासे ठिक आहे, चिकन मटण अपने बस की बात नही.
मस्त....
मस्त....
तु खुप चांगली आहेस्स? आता हा
तु खुप चांगली आहेस्स? आता हा प्रश्न मलाच विचारलस तर मी होच सांगणार ना
नाही तिखट होत. जर हेच प्रमाण कुटून घातले तर तिखटपणा वाढेल. आख्यामुळे स्वाद वाढतो आणि तिखटपणा कमी येतो.
दक्षे मी दर शनिवारी व्हेज पुलाव करते. त्याची रेसिपी देऊ का ?
तु खुप चांगली आहेस्स? असे
तु खुप चांगली आहेस्स? असे नाही
तु खुप चांगली आहेस्स असे लिहायचे होते ...
मला दे व्हेज पुलाव रेसिपी
जागू सगळ्यांना दे व्हेज पुलाव
जागू सगळ्यांना दे व्हेज पुलाव ची रेसीपी
छान रेसेपी,...उद्यापासून
छान रेसेपी,...उद्यापासून महिनाभर उपवास.... मी काय करू?
Pages