संवेदनक्षम

Submitted by विनायक.रानडे on 8 December, 2011 - 07:08

वेदना समजण्याची क्षमता, हा मी समज करून घेतलेला अर्थ, शब्दार्थ जाणकारांनी दुरुस्ती करावी त्यांचे स्वागत. मी किती संवेदनक्षम ( सेन्सिटीव्ह ) आहे हे आहार, विचार, संस्कार आणि परिस्थितीशी संबंधित आहे. ह्याची जाणीव मला निद्रानाशाच्या आजारातून झाली - नशीब माझे भाग १. ह्याचे शास्त्रीय कारण रक्ताचा दर्जा बदल व शरीरातील आम्लाचे प्रमाण असावे. मी कोणत्या / किती विषयांशी संवेदनक्षम असावे ह्याची प्राथमिकता बाल वयात माझे पालक ठरवतात, मग शिक्षकवर्ग त्यांच्या कुवती नुसार त्यात भर घालतात, नंतर सामाजिक परिस्थिती त्यात चढ उतार घडवते. जे बालवयात खरे-खोटे होते त्याचे अर्थ वयोपरत्वे बदलतात, तसेच काहीसे चांगले-वाईट, लहान-मोठे, फायदा-तोटा वगैरे विषयांचे होते.

मी ह्या व्यक्तीची पाया बांधणी व दर्जा माझ्या जन्माच्या आसपास माझ्या जन्मदात्यांच्या ( दात्यांच्या पंचांगात लिहिलेले ) तन, मन, धन व काळ ह्यावर ठरवला गेला. त्यांची तेव्हाची शारीरिक क्षमता, मनस्थिती, वैचारिक समतोल, सांपत्तिक स्थिती आणि त्या काळातील सांसारिक / सामाजिक स्थितीमुळे ठरवला गेला. आम्ही ६ भावंड सगळ्याच बाबतीत खूप मोठ्या फरकाने वेगळे आहोत, मोठ्या बहिणीत व माझ्यात १८ वर्षांचे अंतर म्हणूनच मला मी एक नको असलेले शेंडेंफळ असल्याची जाणीव झाली, विशेष असे की बर्‍याच वर्षानंतर माझ्या आईनेच माझ्या ह्या कल्पनेला सत्य असल्याचा दुजोरा दिला तेव्हा तिला तिचे रडणे आवरेना, हा माझ्या संवेदनक्षम असण्याचा परिणाम.

टक्केवारीच्या जगात ९० टक्के जोड्या अपघाताने पालक झालेले असतात, ८ टक्के थोडेफार फरकाने ठरवून पालक झालेले असतात, दोन टक्के लोक योजना बद्ध, तन, मन, धन व काळ ह्या सगळ्याचा विचार करून मोठ्या दिमाखाने पालक होण्याची फळे चाखतात. प्रत्येक व्यक्ती जन्माने संवेदनक्षम असते त्याची पातळी व दर्जा कमी करणारे प्रामुख्याने पालकच असतात, त्यानंतर एक एक मंडळी आपापल्या परीने हातभार लावतात, ते कसे ? बघूया ह्या मंडळींचे योगदान. मोठ्यांचा आदर करावा ( मोठे कोण / कसे / कधी / का ठरवणार ). तुम्ही सुखी असाल तर इतरांच्या सुखाचा विचार करा ( मी अजून सुखी होण्याच्या प्रयत्नात अडकलो आहे, इतर कोण ? ) वगैरे.

९० टक्के पालक मंडळी त्यांच्या पाल्ल्याला एक जबाबदारी पदरी पडली म्हणून पाळतात. सुरुवात होते ति बाळ जन्माला आल्यापासून, संबंधित मंडळी सल्ला देत प्रयोग करतात. आहार कसा / कोणता / केव्हा, कोणत्या देवाला जा, डॉक्टर की वैद्यबुवा की एखादा बाबा, हे सगळे सल्लागार मंडळी ठरवतात. बाळ थोडे मोठे होताच बहुतांशी पालकांना संवेदनक्षमता जोपासणे विभिन्न कारणांनी शक्य नसते आणि ते मूल शिक्षण क्षेत्रातील विविध कारखान्यात ढकलले जाते. शाळेत जाणे हि एकमेव प्राथमिकता असते. पुढे अशा ९० टक्के पाल्ल्यांची प्राथमिकता उरते ती फक्त गूण / प्रमाणपत्र / प्रशस्तिपत्र मिळवणे. ह्यांच्या संवेदनक्षम असण्याचे महत्त्व व क्षेत्र हळूहळू संकुचित होते.

ति १० टक्के पालक मंडळी पाल्ल्याच्या संवेदनक्षमतेची व क्षेत्राची योजना बद्ध वाढ करणे हे कर्तव्य समजून प्रयत्नशील असतात. ह्यातील जनहित संस्कारांनी संवेदनक्षम असतात ती मंडळी जमेल त्या माध्यमातून जनतेचे भले व्हावे म्हणून प्रयत्नशील असतात, तर जे स्वहित संस्कारांनी संवेदनक्षम असतात ते जमेल त्या माध्यमातून जनतेला संभ्रमात गुरफटून स्वहित साधण्यात मग्न असतात. स्वहित संवेदनक्षम गटात राजकारणी, सल्लागार, बिल्डर / डेव्हलपर, संस्थांचे अध्यक्ष, व्यापारी, शिक्षक . . .यादी तुम्ही जर संवेदनक्षम असाल तर शोधून वाढवू शकाल. मी पण ना . . अहो तुम्ही इथपर्यंत वाचत आलात ते संवेदनक्षम आहात म्हणूनच, हो ना ?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

टक्केवारीच्या जगात ९० टक्के जोड्या अपघाताने पालक झालेले असतात, ८ टक्के थोडेफार फरकाने ठरवून पालक झालेले असतात, दोन टक्के >>> ही टक्केवारी भारतातली आहे की जगातली? कोणी काढली आहे?

अनघा_मीरा बाई प्रश्न फार मुद्याचा काढलात त्याबद्दल आभारी. हा "झाकली मुठ सव्वालाखाची" प्रकार आहे. मोठ्या प्रमाणात संत्र्या पासून मंत्र्या पर्यंत ही टक्केवारीची आधुनीक पद्धत वापरात आहे. ह्याचा उपयोग आज मीडीयातून व लोकसभेतून रोज आपल्या समोर येतो आहे. त्या प्रकाराचा राग म्हणूनच मी मुद्दाम हा टक्केवारी प्रकार वापरला आहे. ह्याबाबतीत भारतात व इतरदेशातील वास्तव्यात लोकांशी बोलताना जे लक्षात आले त्याची ही टक्केवारी आहे. मुद्दा संवेदनक्षमतेचा आहे.

ह्याचा प्रत्यक्ष अनुभव - WHO चा एक शल्य चिकीत्सकांचा सेमीनार मी ५ दिवस रेकॉर्ड करत होतो, त्यात एका ब्रिटीश चिकीत्सकांने टक्केवारी सांगत त्याच्या यशाचे गुणगान केले, त्याचा ५ वर्षात २% फेल्युअर रेट असल्याचे त्याने दाखवले होते. नंतर बर्‍याच जणांनी टक्केवारीचा उपयोग करत त्यांचे शल्य क्रियेतील यशाचे गुणगान केले होते. एका भारतिय चिकीत्सकाने ५ वर्षात २२% फेल्युअर रेट दाखवला त्याला तिथे जमलेल्यांनी विचीत्र प्रश्न विचारून बेजार केले होते. सेमिनारचा चेअरमन मदतीला पुढे आला, तो जर्मन होता. त्याने भारतात १५ वर्ष काम केले होते. त्याने ब्रिटीश चिकीत्सकाला ५ वर्षातील एकूण शल्य क्रिया विचारल्यावर त्या फक्त २३ होत्या त्याचे ते २% होते, तर भारतियाने ५ वर्षात हजार शल्य क्रिया केल्या होत्या त्या संखेच्या २२% त्याने संख्या दाखवली होती. तेव्हा मला काय म्हणायचे आहे हे तुम्हाला लक्षात आले असेल अशी मी माझी समजूत करुन घेतो. राग मानू नका!!!

हा "झाकली मुठ सव्वालाखाची" प्रकार आहे. >>> म्हणजे काय? अन माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तुम्ही विनायक.रानडे बुवा

अनघा_मीरा बाई हा प्रकार आत्मपरिक्षणाचा आहे तुम्ही स्वत:चे, तुमचे आप्त, शेजारी ह्यांचे संवेदनशील असाल तर नीरीक्षण करा व तुमची टक्केवारी मला कळवा.

मी स्वतः एक पालक होण्या आधी ज्या जोडप्यांना पश्न केला त्यांचे प्रथम उत्तर "ह्या वर आम्ही विचार केला नव्हता, इतक्या लवकर पहिले मुल नको होते, पण घडले तसे स्विकारले! ही सगळी देवाची करणी वगैरे", ते हे ९०% पण काही जोड्प्यांनी अगदी अभिमानाने कोणती काळजी घेतली त्याचे मोजक्याच शब्दात वर्णन केले होते. नंतर ह्या व अशा प्रश्नांचा शोध वाढला व अजून ही सुरू आहे. सुनियोजीत प्रयत्न किंवा अभाव त्या परिणामांचा शोध माझ्या क्षमते नुसार आजही चालू आहे. ह्या शोधात तुम्हाला सहभागी होण्याची इच्छा असल्यास कळवा, त्याला काही शास्त्र असल्यास कळवा. तुमचे स्वागत आहे.

बाऊन्सर गेला
--- मंदार डोक्यावर शिरस्त्राण ठेव... मला पण खुप परिश्रम पडलेत पचायला :अरेरे:.

<<ह्या वर आम्ही विचार केला नव्हता, इतक्या लवकर पहिले मुल नको होते, पण घडले तसे स्विकारले! ही सगळी देवाची करणी वगैरे>> Lol

< ह्या शोधात तुम्हाला सहभागी होण्याची इच्छा असल्यास कळवा>

म्हणजे तुमच्या आजूबाजूला कोणी इन द फॅमिली वे असेल तर अभिनंदन करण्याऐवजी किंवा त्या जोडीने, 'काय, प्लानिंग करून की प्लान बोंबलल्याने, पुढचा काय काय विचार केलात?' असं विचारलं तर त्यांची तुमच्याबद्दलची संवेदनक्षमता नक्की उफाळून येईल.

ती टक्केवारी सोडता पहिल्यांदाच जरा एका मुद्द्यावर लिहिल्यासारखे वाटले. १० टक्के केवळ एक आकडा म्हणुन वापरला असला तरी जरा जास्तच आहे. मला नाही वाटत १% पेक्षा जास्त असे पालक असतात म्हणुन. आजकाल मात्र ती संख्या थोडीफार वाढते आहे. पण तरी एन्ड-प्रॉडक्टमधे फार फरक पडलेला नाही.

संवेदनक्षम सर्वच असतात, पण ते कशा प्रती ते मात्र वेगवेगळे असते. तुम्ही पण कशा प्रती आहात संवेदनक्षम ते लिहिलेच नाही.

मिरर न्युरॉन्सबद्दल ऐकले आहे का? त्यांचा आणि संवेदनक्षमतेचा काय संबंध असु शकेल याबद्दलचा हा एक लेखः http://www.mindtweaks.com/wordpress/?p=152

आशिषजी (aschig) ह्याला मी सकारात्मक प्रतिक्रीया मानतो, ह्याने चर्चा करायला हुरूप येतो.

संवेदनक्षम असणे म्हणजे भोवताली घडणारी स्पंदने समजून घेण्याची क्षमता व त्या स्पंदनांना साजेशी स्पंदने निर्माण करण्याची क्षमता असा माझा समज आहे. ही क्षमता कमी अधिक प्रमाणात प्रत्येकात असते पण त्याचा वीकास किंवा त्यावर मर्यादा हे आहार, विचार, संस्कार आणि परिस्थितीशी संबंधित आहे. मी लिहिलेल्या मराठी, इंग्रजी लेखाला आलेल्या अथवा मी केलेल्या विवीध कामाच्या प्रतिक्रीयांनी मला हा फरक जाणवला व जाणवतो आहे. मुद्दाम मोजक्याच शब्दात लिहिल्याने वाचक त्याचा अर्थ त्याच्या संवेदनक्षमते प्रमाणात मत प्रदर्शन करणार हे अपेक्षीत होते तेच साध्य झाले. त्यावरून ती प्रतिक्रीया लिहीणारी व्यक्ती कोणत्या पातळीवर वीचार करत असेल ह्याची साधरण कल्पना करता येणे सोपे होते. ह्याचा फायदा ओळख वर्तुळाची घेर मर्यादा ठरवण्यात मला मदत होते आहे, होणार.

Back to top