Submitted by saakshi on 7 December, 2011 - 05:27
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
कैरी - १ मध्यम आकाराची
फोडणीसाठी :
तेल - १ मोठा चमचा
मोहरी - अर्धा चमचा
जीरे - अर्धा चमचा
हळद - दोन चिमूट
मीठ - चवीनुसार
तिखट - १/४ चमचा
गूळ - १ चमचा बारीक चिरून
क्रमवार पाककृती:
१. कैरीच्या बारीक पातळ फोडी करून घ्याव्यात. फोडी करताना साल काढू नये.
२. तव्यात तेल गरम करून घेऊन त्यात जीरे, मोहरी चांगले तडतडवून घ्यावेत.
३. मग कैरीच्या फोडी घालून परतावे.
४. मीठ, तिखट घालून परतावे.
५.शेवटी गूळ घालून गूळ विरघळेपर्यंत परतावे.
मस्त चुट्चुटं तय्यार!!!!!!!!!!
लगेच तव्यावरून ताटात घेऊन गट्टम करावे....
वाढणी/प्रमाण:
दोघांसाठी........ अर्थात कैरी किती आवडते त्यावर अवलंबून....... :स्मित:
अधिक टिपा:
एकदा फोडणी झाली की , मंद आचेवर परतावे अन्यथा फोडी पातळ असल्याने जळण्याची शक्यता...
कैरी पाडाची असली तर आणखीनच बहार!!!!!!!!!!
माहितीचा स्रोत:
आज्जी
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा प्रकार माझ्या आवडीचा.
हा प्रकार माझ्या आवडीचा. आम्ही ह्याला रायत म्हणतो.
हा प्रकार माझ्या आवडीचा. >>>
हा प्रकार माझ्या आवडीचा. >>> माझ्याही जागूतै.......
शेवटी ते तळाशी राहणारं फोडणीचं तेल पण चपातीच्या एका घासाने पुसून खाते मी........
मस्त्म
मस्त्म

मस्त. लाळेरं आणलंच पाहिजे.
मस्त. लाळेरं आणलंच पाहिजे.
चुट्चुट चटपटीतच, मस्तच !!!
चुट्चुट चटपटीतच, मस्तच !!!
नाव व पदार्थ दोन्ही छान. पण
नाव व पदार्थ दोन्ही छान.
पण मुली, कैर्या कुठून आणायच्या ग आत्ता? 
मला मिळाल्या होत्या कैर्या
मला मिळाल्या होत्या कैर्या मागच्या आठवड्यात. आज-उद्यात बघते मिळताहेत का. कैरी माझी अतिशय आवडती. कितीही प्रकार समजले तरी कमीच पडतात. मस्त पाकृ
वा! पदार्थ ओळखीचा आहे.. पण
वा! पदार्थ ओळखीचा आहे.. पण नाव पहिल्यांदाच ऐकलं.. मस्तच नाव आहे चपखल एकदम!
स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स
स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!स्लर्प!
भयंकरच तोंपासु
हा प्रकार छान आहेच. पण
हा प्रकार छान आहेच.
पण कैर्या मिळत नाहीत त्यावेळी कच्ची पपई वापरुन पण हा प्रकार करता येईल, आंबटपणाला लिंबू पिळायचा.
एकदा जामनगरला अश्याच बिनमोसमी दिवसात कैरीचे ताजे लोणचे पानात वाढले होते. चौकशी केल्यावर ते पपईचे होते, असे समजले.
मस्त. लाळेरं आणलंच पाहिजे. >
मस्त. लाळेरं आणलंच पाहिजे. > हा हा हा हा!!! पण रेसीपी खरच छान आहे!
धन्स लोक्स!!!!!!!!! लाळेरं
धन्स लोक्स!!!!!!!!!

लाळेरं आणलंच पाहिजे>>>>>> मामी........
पण मुली, कैर्या कुठून आणायच्या ग आत्ता?>>>> मला कोण जाणे कशा, पण परवा मिळाल्या होत्या...
तों पा सु!! अल्पनाचा
तों पा सु!!
अल्पनाचा सखुबत्ता आठवला.
अनघा, इकडे कैर्या मिळायला लागल्या. पाठवू का? घेण्यासाठी अ'बाद स्टेशनला जावे लागेल फक्त, पहाटे साडेचार वाजता
मस्त, आम्ही यात मेथी दाणा पण
मस्त, आम्ही यात मेथी दाणा पण घालतो.
आरती, मेथी घातलीस तर मेथांबा
आरती, मेथी घातलीस तर मेथांबा होईल ना?
कारण रेसिपी साधारण तशीच आहे.
मेथांब्याच्या जवळचा प्रकार
मेथांब्याच्या जवळचा प्रकार आहे. आम्हि त्याला कोयाडं पण म्हणतो. छान तों.पा.सु.
धन्यवाद मंजूडी, आरती, सायो,
धन्यवाद मंजूडी, आरती, सायो, मोहन कि मीरा...
आम्हि त्याला कोयाडं पण म्हणतो>>> माझ्यासाठी नवीन नाव......
मेथांबा म्हणजे काय???
सायो म्हणतेय ते बरोबर आहे.
सायो म्हणतेय ते बरोबर आहे. फोडणीत मेथ्या घालून वरील चुटचुटं केलं की मेथांबा, आणि अख्खी कैरी घातली की कोयाडं.
फोडणीत मेथ्या घालून वरील
फोडणीत मेथ्या घालून वरील चुटचुटं केलं की मेथांबा, आणि अख्खी कैरी घातली की कोयाडं.>>> अरे व्वा!!!!!! मस्तच!!!!! ३ कैर्या चिरुन एका वेळी ३ पदार्थ.......
मस्त रेसिपी . मी यात ओले
मस्त रेसिपी .:)
मी यात ओले खोबरे, थोडे तांदुळ, व थोडी उडदाची डाळ तेलावर परतुन वाटुन घालते. आंबट गोड मस्त
लागतो. त्याला कायरस म्हणतात.
प्रिति १> ओले खोबरे, थोडे
प्रिति १> ओले खोबरे, थोडे तांदुळ, व थोडी उडदाची डाळ तेलावर परतुन वाटुन > यालाच `उडदामिथी' म्हणतात न?
कारण रेसिपी साधारण तशीच आहे.
कारण रेसिपी साधारण तशीच आहे. >> म्हणुनच मला वाटले इथे फक्त नाव वेगळे आहे
नाव मस्त आहे अगदी.
नाव मस्त आहे अगदी.
धन्यवाद प्रिति१, रावी,
धन्यवाद प्रिति१, रावी, आर्च..........
sakshi खुपच छान्.वाचुन् पानि
sakshi खुपच छान्.वाचुन् पानि sutalay tondala.