प्राजक्ताच्या पावसात निर्वस्त्र

Submitted by pradyumnasantu on 4 December, 2011 - 22:05

प्राजक्ताच्या पावसात निर्वस्त्र

विचित्र रात्र
मी ग्लानीत
ती येते

ती मला स्पर्षते
मला न्याहाळते
मी उत्तेजित
ती घालते माझ्या वस्त्रांना हात
आणि मी निर्वस्त्र
बावरलेला, तरीही
नैसर्गिक भावनांच्या अंकीत
त्या विचित्र रात्री
***
एकाएकी आकाश निरभ्र व्हावे अन श्वास ताजा व्हावा
तसा होतो तिच्या आवाजाचा शिडकावा :
***
"पेशंट अन नर्स हे वेगळे नाते
तुमचे स्पंजिंग करणे हे माझे कर्तव्य येथे
मातेच्या हाताने तुम्हाला स्पर्शिन
मातेच्या नजरेने तुम्हाला पाहीन"
***
ग्लानीत मला दिसतो प्राजक्ताच्या फुलांचा पाऊस
आगळी प्रतिमा उमटते नेत्री
त्या विचित्र रात्री

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

रचना चांगली आहे.
परिचारिकेचे नाते यावर आधारीत कविता, मांडली असली तरी भिडे काकांना अनुमोदन.

पेशंट -नर्स नात्यातला पवित्रपणा सांगण्याचा प्रयत्न केलात तरी शेवटपर्यंत कवीच्या अंगातला मिस्कीलपणा शेवटपर्यंत जात नाही अस शेवटच्या ओळीत वाटलंबुवा !!!!!!!!!!!!!
"ग्लानीत मला दिसतो प्राजक्ताच्या फुलांचा पाऊस"
बाकी उत्तम आहे कविता .
मलातर शेवटच्या ओळीमुळे जास्तच आवडली

उल्हासजी, मु.कु.:
थोडासा पुन:प्रयत्न केलाय.
----
वैभवजी:
तसे काही नाही. वैयक्तिक अनुभवावरील ही कविता, तितक्याच निर्मळतेने मांडली आहे.
-----
विभाग्रजजी:
अमेरिकेत विवस्त्र इस्पितळ खुलताच उद्घाटनाचे आमंत्रण आपणास पाठवण्याची सोय करतो.

प्राजक्ताच्या पावसात निर्वस्त्र--Pradyumnasantu----नर्स
DATE-------------------अभिषेक्९---------डॉक्टर
.................................?(कवी.....?).......वार्डबॉय
पुढची कविता वार्डबॉयवर येवूदेत असा लिखानाचा अर्थ होता.
अमेरिकेत विवस्त्र इस्पितळ खुलताच उद्घाटनाचे आमंत्रण आपणास पाठवण्याची सोय करतो.>>>>
आभार,
अमेरिकेत विवस्त्र इस्पितळ >>>>शक्य आहे,ज्यांची त्यांची संस्क्रुती.
कृपया कपडे काढुन येण्याची अट घालू नये
सर्व लिखान "निर्मळ" करमणुकिसाठी,विपर्यास नसावा.

सुरेख.
ऊस मुळांपासून शेंड्यापर्यंत गोड असला तरी तो पेरापेराने खाण्यात गोडी जास्त वाटते. तसं या कवितेच्या नव्या मांडणीमुळं वाटलं. गोडी वाढली.