आमचे एकत्र कुटूंब आहे. म्हणजे होते. मी मोठा, लहान भाऊ. दोन महिन्यापूर्वी मालमत्तेची विभागणी झाली. वडिलांनी जे कमावले त्यापेक्षा जास्त मी एकत्र कुटूंब असताना कमाविले. पण वाटताना मात्र भावाने ती एकत्र संपत्ती धरली, मी तश्या रिसीट दाखवल्या पण एकुणच नाराजीचा सूरच निघाला. विभाजन झाल्यावर असे ठरले की मी जे कमाविले त्याचा पण काही हिस्सा द्यायचा, मी ही लहान भाऊ असल्याने मान्य केले. व ती रक्कम अर्धी दिली. ठरल्याप्रमाणे अर्धी पुढील मार्च मध्ये व्याजासह देणार होतो. अचानक काही दिवसांपूर्वी (विभागणी झाल्यावर) भाऊ दोघांना घेऊन आला व माझ्या घरातील (जे लॉक होते व चावी भावाकडे होती) फर्निचर घेऊन गेला, पण आता तो म्हणत आहे, ते विसर. सामानाची किंमत खूप आहे. मी अनेकदा मागितले पण तो काही दाद देत नाही. शिवाय अर्धी रक्कम पण लगेच दे असे तो म्हणत आहे. मी अर्धी रक्कम दिली व व्याजासह रकमेचा पोस्टडेटेड चेकही दिला होता. विभाजन झाल्यावर त्याने असे का करावे हे अनाकलनीय आहे.
मी काय करू?
१. पोलिसांकडे जाऊ का? - माझ्याकडे सर्व लिखित पुरावा आहे.
२. कोर्टात जाऊ का? - पण मग हे भिजत घोंगडं पडेल. व कदाचित १० वर्षांतही ही केस सोडवली जाणार नाही.
३. भाऊ म्हणून विसरू का? ( मालमत्ता साधारण काही लाख होईल) पण तरीही चेक द्यावाच लागेल.
४. उर्वरित रक्कम देऊ नको का?
मनात पहिला विचार असा आला की
मनात पहिला विचार असा आला की एकदम असे त्याने असे कसे काय केले?
काहीतरी सांगायचं राहिलं आहे का?
sakhkha भाउ, सगल खाऊ.
sakhkha भाउ, सगल खाऊ. तुम्हि कदक रह आनि ५०% वातनि करा. यापुधे एक पैसा मुलिच देऊ नका.
नाहीतरी तुम्ही भावाला काही
नाहीतरी तुम्ही भावाला काही रक्कम देणे होताच. आता ती रक्कम आणि फर्निचरची बाजारु किंमत यात फारसा फरक नसेल, तर विसरा.. फक्त भावाकडून फर्निचर मिळाले असे लिहून घ्या.. किमान फोनवरुन रेकॉर्ड करुन त्याची सी डी करुन ठेवा, तीच पावती समजा.. आणि मुळात फर्निचरच्या तुमच्या पावत्या आहेत का? नाहीतर कोर्टात जाऊन तरी काय करणार? आणि आनंदाने रहा..
भाऊ विश्वासघातकी आहे हे जितक्या लवकर कळेल तितकं बरं असतं... तुमचं अजून कर्तृत्वाचे वय भरपूर शिल्लक असेल तर सगळं विसरुन आपापल्या कामाला लागा.
पोलिस, कोर्ट या पायर्या
पोलिस, कोर्ट या पायर्या चढण्यापुर्वी दोघे ज्या व्यक्तीला मानता, अशा एका माणसाला मध्यस्थ ठेवून चर्चा करुन बघा. वर बेफि म्हणताहेत तसा काहितरी मामला असेल.
जर तूमच्याकडे कागदपत्र असतील तर कायदा तूमच्या बाजूनेच असेल पण त्याला, किमान १०/१५ वर्षे लागतील. त्यात वेळ आणि पैसा जाईलच शिवाय मनस्तापही होईल. तुम्हाला दर महिन्याला कोर्टात हजर रहावे लागेल (कामधाम सोडून) आणि वकिलाच्या ऑफिसमधे तिष्ठत बसावे लागेल.
समजा चर्चेतून जर काही तोडगा निघाला, तर मात्र त्यासंबंधात कायदेशीर कागदपत्रे तयार करुन घ्या.
मुळात भाऊ तुमच्या रहाण्याच्या
मुळात भाऊ तुमच्या रहाण्याच्या ठिकाणी कसा आला? तुम्ही वाडवडिलार्जित घरात आहात का?
वाडवडिलार्जित घर, दागिने, फर्निचर, अविवाहीत बहिणींची जबाबदारी, कर्जे ... सगळे प्रश्न एकदाच सोडवून घ्या.. काहीही बाकी शिल्लक ठेऊ नका.
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. इस्टेटीसाठी रामायण झाले, महाभारत झाले, आपण तर सामान्य आहोत.
फक्त भावाकडून फर्निचर मिळाले
फक्त भावाकडून फर्निचर मिळाले असे लिहून घ्या >> नाही तो लिहून द्यायला तयार नाही.
मुळात भाऊ तुमच्या रहाण्याच्या ठिकाणी कसा आला? तुम्ही वाडवडिलार्जित घरात आहात का? >> नाही हे माझे दुसरे घर आहे, मी दुसर्या शहरात राहतो.
काहीतरी सांगायचं राहिलं आहे का? >> नाही जे आहे ते सांगीतलं, मी स्व कर्तृत्वाने खूप वर गेलो आहे. वडील शिक्षक होते. त्यांची एकुण मालमत्ता काही लाखात कशी येईल? तरी मी बरेच लाख केवळ भाऊ आहे म्हणून दिले. त्याचा मेव्हणा दुर्दैवाने गुंड प्रवृत्तीचा आहे, हे लग्नानंतर कळाले, लोकल नगरसेवकाचे बँकिंग आहे त्याला.
मध्यस्थाला घेतले होते पण कोणी ऐकत नाही, फर्निचर वापस केले तर अजून एक लाख वाढवून देईल असेही सांगीतलं. काही फायदा नाही. प्रश्न आहे त्याने असे का करावे? ते उलगडत नाही.
फौजदारी करा व सरळ गुन्हा
फौजदारी करा व सरळ गुन्हा नोंदवा, जर तो दाद देत नसेल तर.
फौजदारीच विचार आला पण आई
फौजदारीच विचार आला पण आई म्हणते तू मोठा, देऊन टाक त्याला जे हवे ते. आईची भिती वाटते, तिला ह्यात त्रास होईल. ठरल्याप्रमाणे सर्व घडत होते पण त्याने अचानक सीमारेषा ओलांडून माझ्या घराच्या गोष्टींचा कब्जा केला. आई मुळे काय करावे हे सुचत नाही. आई म्हातारी आहे. मलाही ह्या प्रकारात हक्क सोडू नये वाटते कारण मी पण मेहनतीने कमावले आहे. विभाजन पण मध्यस्थ व आई तर्फे झाले, मी काही केले नाही. पैसे दिले तर बायको नाराज होईल, नाही दिले तर आई.
कुठल्या पक्षाच्या नगरसेवकाचं
कुठल्या पक्षाच्या नगरसेवकाचं बॅकिंग आहे???? त्याचे बाप शोधून काढा.. त्याच पक्षातले...
सहसा पांढरपेशा माणूस या थराला न जाता एस्केप रूट स्विकारतो....
मुळात ठरवा, नडायचं आहे की सगळ्यावर पाणी सोडायचं आहे.... एकदा तुम्ही ठाम झालात एका मतावर की मग वेगवेगळे मार्ग ठरवता येऊ शकतात....
भावाला मिळणार्या पॉलिटिकल बॅकिंगला घाबरू नका..... एकदा अद्दल शिकवायची ठरवलीत भावाला तर जितके पैसे तुमचा भाऊ घशात घालतोय, त्यातला काही हिस्सा सरळ आमदाराला पक्षाला मदत म्हणून ऑफर करा..... नगरसेवकाचं काय घेऊन बसला राव.
अर्थात, हे सगळं करायचं की नाही हे मुळात तुम्ही काय स्टँड घेताय त्यावर अवलंबून आहे. तुम्हाला भावाला पुरून उरायचं असेल तर असे अनेक मार्ग हाताळता येतील.....!!!
देव तुम्हाला बळ देवो.
नाही दिले तर आई. अरारारा...
नाही दिले तर आई.
अरारारा... वपुंच्या पार्टनरचं दुखणं दिस्तय हे! मुष्किल आहे.
यात एक काम करता येईल... त्याने उरलेले पैसे मागेपर्यंत काहीदेऊ नका.. मधल्या काळात हे सगळे पोलिस स्टेशनला लेखी कळवा. पोलिस चौकीत पोलिस त्याच्याकडून आणि तुमच्याकडून पैसे, फर्निचर जे काय पोहोचले ते लिहून घेतील.. त्याची प्रत ठेवा.
मी अर्धी रक्कम दिली व
मी अर्धी रक्कम दिली व व्याजासह रकमेचा पोस्टडेटेड चेकही दिला होता.<<
ताबडतोब स्टॉप पेमेंट करा!
आता सविस्तर
आता सविस्तर प्रतिसाद.
साहेब,
आपण वडिलोपार्जित इस्टेटीस लाथ मारण्याच्या परिस्थितीत असाल, तर जरूर मारा. आपल्याला तीर्थरूपांनी केलेली कमाई नसेल तर फाके पडतील अशी परिस्थिती नक्कीच नसावी.
बंधूंनी 'मोठेपणा' विसरून 'लिगली' तुमच्या घरी 'दरोडा' (बळजबरीने तुमच्या घरात घुसून वस्तू घेऊन जाणे) घातला आहे. खुशाल फौजदारी करा.
प्रश्न राहिला आईंचा.
त्या कुणासोबत रहातात?
मी ३ रुपयांची पैज लावतो, त्या तुमच्या सोबत रहातात. अन तरीही त्यांची सगळी सिंपथी बंधूंना आहे. घरोघरी मातीच्या चुली आहेत हो.
आईंच्या मानसिकतेची जास्त काळजी करू नका. त्यासाठी इतर इलाज आहेत. शेवटी बिरबलाची गोष्ट आठवा. हौदात पाणी फार झालं, तेंव्हा माकडिणीने पिलू पायाखाली घेतलं होतं.
भाऊबंदकी फार जुनी आहे. सगळीकडे आहे. बापकमाई वर लाथ मारण्याची तुमची औकात (इन्कम) असेल, तर नक्कीच मारा. पण आपकमाई वर कुणी डोळे वर करून पाहिलं तर, डोळे काढून घ्या, हा मूळ अन रोखठोक सल्ला.
मी ३ रुपयांची पैज लावतो, त्या
मी ३ रुपयांची पैज लावतो, त्या तुमच्या सोबत रहातात. अन तरीही त्यांची सगळी सिंपथी बंधूंना आहे
अगदी सहमत.. अशा केसेस मध्ये आई 'बाय डिफॉल्ट' मोठ्या मुलालाच सामील असते. म्हणून तर वपुंच्या पार्टनरचं दुखणं म्हटलं...
जागोपार्टनरप्यारे ..
तुम्ही लहान आहात कि मोठे हे
तुम्ही लहान आहात कि मोठे हे एकदा कन्फर्म करा..
अहो मीच मोठा पहिल्या ओळीतही
अहो मीच मोठा पहिल्या ओळीतही लिहिले आहे.
सहसा आई लोक ज्या मुला/मुलीचे उत्पन्न कमी असते त्याचाशी सहानुभूती बाळगून असतात असे वाटते. बापकमाई काही नव्हतीच. आपकमाईपण गेली / जात आहे
आई तुमच्याकडे राहते यात सगळं
आई तुमच्याकडे राहते यात सगळं आलं. पण दुसराही मुलगा तिचाच आहे.
या वयात आईला काय वाटत असेल याची कल्पना आपल्याला ज्या दिवशी येईल तेव्हा हे उद्भवणार नाही. तुमच्या घरातली सगळी परिस्थिती या लिखाणावरून समजत नाही....
एखादा चुकीचा सल्ला दिला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कित्येकदा आपल्या डोक्यात सोल्युशन येऊन गेलेलं असतं. आईशी चर्चा करा... नातेवाईक, शेजारी यांच्याशीही चर्चा करा आणि ठरवा.
तुम्हाला सल्ला देण्या इतकी मी
तुम्हाला सल्ला देण्या इतकी मी अनुभवी नाही आहे कदाचित पण रहावलं नाही म्हणून हा प्रतिसाद.....स्वतःवर विश्वास ठेवा आणि नेहमी खरयच्या बाजूने उभे राहा. जर ती संपती तुम्ही मेहनत करून कामवाली असेल तर इतक्या सहज हार नका मानू. भाऊ जर चुकत असेल तर त्याला धडा शिकवण्याचे खूप मार्ग आहेत. नुसती नगरसेवकाची ओळख आहे, गुंडा प्रवृती आहे म्हणून मागे फिरण्यात काही अर्थ नाही.
नेहमी काय होत संकट आल्यवर आपण सुरवातीला खूप घाबरून जातो आणि त्या tension मध्ये चुकीचे निर्णय घेतो. नीट विचार केला तर काही दिवसांनी तुम्हाला हाच प्रॉब्लेम छोटा वाटेल. तरी मला असे वाटते कष्टाचे पैसे असतील तर असे कुणालाही फुकट खाऊ देवू नका. आणि नगरसेवकाला आणि गुंडांना तर अजिबातच घाबरू नका. आई ला तर स्पष्ट सांगा की ......"हीच वेळ आहे जेव्हा तुला माझ्या बाजूने उभं राहायचं आहे आणि आपण सगळे मिळून ह्या संकटाचा सामना करू".
सल्ला देत नाही, पण कथा वाचून
सल्ला देत नाही, पण कथा वाचून सध्या मायबोलीवर चालणार्या विविध चर्चांशी रुपकात पाहिल्या. कारण हल्ली गांधी, सावरकर जोरात आहेत.
मोठा भाऊ - भारत
छोटा - पाक
अर्धी रक्कम - ५५ कोटी
हडप केलेला भाग - फर्निचर = काश्मिर
कोर्ट-पोलीस - युनो
रक्कम न देण्याचा तुमचा व इतरांचा विचार - कारण झालेला करार (अर्धी रक्कम दिली होती, वाटनी झाली हे सर्व) मोडून तुमची सीमा रेषा (घर) उघडले.
असो हे प्रश्न काय नेहमीचेच झाले. वर सगळे म्हणत आहेत त्या प्रमाणे लढा. तुमचे पैसे जात असतील तर लढणे योग्य. पण "वयात आईला काय वाटत असेल याची कल्पना आपल्याला ज्या दिवशी येईल तेव्हा हे उद्भवणार नाही." हे ही महत्त्वाचेच.
दिनेशदा बेफि म्हणतायेत तसे
दिनेशदा बेफि म्हणतायेत तसे मध्यस्थ ठेवुन प्रथम बोला.
बरेचदा छोटेसे गैरसमज उग्र रुप धारण करतात.
तुम्ही एकत्र कुटुंबात असताना कदाचित बरीच मदत केली असेल यामुळे तुम्हाला अन्याय झाला असे वाटत असेल. पण भावाच्या द्रुष्टीकोनातुन तुम्ही एकत्र रहात होतात त्यामुळे नोकरी लागल्यावर पण तुम्हाला फार खर्च नव्हते (घरभाड, घरखर्च) तर थोडा खर्च तुम्ही एकत्र कुटुंबात केला तर काय झाले. कदाचित तुमच्या नोकरीमुळे घरातील लहान सहान कामे पण त्याला करायला लागली असतील.
याउलट त्याला नोकरी लागल्यावर जर तो स्वतंत्र रहात असेल तर घरापासुन घरखर्च त्यालाच चालवायला लागत असेल.
असे पण असु शकते की तो कुठल्या तरी अडचणीत असेल आणि तुम्हाला सांगत नसेल.
मध्यस्थ वापरणे योग्य. अजुन एक गोष्ट या पुढील रक्कम देण्याआधि तुम्ही त्याला काही देणे लागत नाहित हे नक्की त्याच्याकडुन लिहुन घ्या.
कोर्टात जाण्यात काहीही हशील
कोर्टात जाण्यात काहीही हशील नाही. कारण तिकडे प्रकरणे फक्त पडुन रहातात. आमचा वैयक्तिक अनुभव फार वाईट आहे.
मध्यस्थ हा उत्तम मार्ग आहे. चर्चा करुनच मार्ग काढता येईल. भाऊ जे सामान घेवुन गेला त्याची किंमत जर तुम्ही देणार असलेल्या किमती पेक्क्षा जास्त असेल तर ते पैसे देवु नका. पैसे देणं मस्ट असेल तर मात्र एक वकिलाची नोटीस देवुन पहा. तो सामान घेवुन गेला हे तुम्ही शाबीत करु शकत असलात तरच हा मार्ग आहे. तुमच्या कडे त्या वेळचे साक्षिदार आणि सामान तुमचेच आहे हे शाबीत करायला त्याच्या खरेदी पावत्या असणे जरुरी आहे.
भाऊ जर अरेरावी करत असेल तर मात्र पोलिसांकडे जाणे योग्य. उद्या पैसे दिल्यावर देखिल तो अरेरावी करुन अजुन सामान वगैरे घेवुन गेला तर? त्या पेक्षा त्याला एक वचक असलेला बरा.
आई ला नीट पटवुन द्या. तिची फुस किंवा पाठिंबा होता म्हणुनच ही वेळ आली. भाऊ असे वागण्या मागे कदाचित तिची सहानुभुती हा ही एक भाग असु शकतो. वेळीच त्या खंबीर राहील्या असत्या तर ही वेळच आली नसती. अत्ता जात आहेत ते पैसे ना त्यान्चे आहेत ना त्यांच्या नवर्याचे. मुलाचे (म्हणजे तुमचे) जरी असले तरी ते द्यायचे की नाही हे त्या कमावत्या मुलाने ठरवायचे.
तुमची आई तुमच्या भावाची गॅरेंटी घेते का की सगळे सेटल झाल्या वरही परत तो येणार नाही?
ही जी सगळी सेटलमेंट आहे त्याची लिखापढी झाली आहे का? असेल तर मार्ग सोप्प्पा आहे. सरळ वकिलाची नोटीस ठोका.
उरलेले पेसे देउ नका सामानाचे
उरलेले पेसे देउ नका
सामानाचे काय तो हीशेब करा आणि ते सामान त्याच्या कडे आहे याचा पुरावा शोधा,
सगळे ठीक होईल ,वर सांगीतल्या प्रमाणे स्वतावर विश्वास ठेवा,
स्व कमाईचा पेसा आहे तर लढा
वाटण्या झाल्यावरही तुमच्या
वाटण्या झाल्यावरही तुमच्या घराची चावी तुमच्या भावाकडे का??? ते सुद्धा तुम्ही दुसऱ्या शहरात राहत असताना... आधी घरच कुलूप बदला.
तुमच्या भावाची स्थिती कदाचित बरी नसेल तर तुमच्या आईला त्याच्याबाबत वाटणारच. पण म्हणून त्याने तुमच्या घरातून वस्तू नेता कामा नयेत. तुम्ही police complaint करण्यापेक्षा offline सोडवता येत का बघा.
काही वेळा पोलिसांची नागरी दक्षता समिती असते. शहरातले चांगले प्रतिष्ठित लोक त्यात असतात. ते मदत करतात. आईशी बोलून तिलाही समजावून सांगा. आईला सगळी मुल सारखीच, पण कमकुवत असतो ना त्याच्याकडे मन ओढ घेत.
भांडण करून मनस्ताप होतात, पण तुम्ही दुबळे आहात असा त्याचा समज होऊ देऊ नका. वाटण्या तरी कायदेशीर करून घ्या. पैसे जाण्यापेक्षा आपल्या माणसांचा विश्वासघात जास्त त्रासदायक असतो.
आईला सगळी मुल सारखीच, पण
आईला सगळी मुल सारखीच, पण कमकुवत असतो ना त्याच्याकडे मन ओढ घेत.
------- १०० %
फौजदारी करा.
फौजदारी करा.
सुटला का प्रश्न?
सुटला का प्रश्न?
अनेक आठवणी अनुभव दाटून आले.
अनेक आठवणी अनुभव दाटून आले. आईचे, वडिलांचे, सासर्यांचे, आजेसासूचे ...
बापरे.. हे मी आज
बापरे.. हे मी आज वाचलं..
भाऊबंदकी फार जुनी आहे. सगळीकडे आहे. बापकमाई वर लाथ मारण्याची तुमची औकात (इन्कम) असेल, तर नक्कीच मारा. पण आपकमाई वर कुणी डोळे वर करून पाहिलं तर, डोळे काढून घ्या, हा मूळ अन रोखठोक सल्ला.
>> हा इब्लिसांचा सविस्तर प्रतिसाद अगदी पटला.