बेस साठी:
१ वाटी कणिक, १ वाटी मक्याचे पीठ, १ चमचा बेकिंग पावडर, १ चमचा मीठ, २ टेबलस्पून ऑलिव ऑइल, भिजवायला पाणी.
टॉपिंग साठी:
[ऐच्छिक आणि आवडी प्रमाणे]
चीज, ऑलिव ऑईल,मिरेपूड, लाल सुकलेली मिरची (क्रश्ड),मीठ, टोमॅटो केचप.
सिमला मिरची, टोमॅटो च्या चकत्या, कांदा, लसणाचे काप, पनीर, मश्रूम, इ.इ.
बेस साठी लागणारे सगळे साहित्य एकत्र करावे. साधारणपणे आलू पराठयाची कणिक भिजवतो तसे भिजवून घ्यावे. आता टॉपिंगची तयारी करावी. टॉपिंगसाठी घेतलेल्या भाजीचे आपल्याला हव्या त्या आकाराचे / प्रकारचे तुकडे करून घ्यावे. तो पर्यंत पीठ भिजू द्यावे. हाताला थोडी कोरडे पिठ लावून कणकेचे, छोटे हवे असल्यास ४, मोठे हवे असल्यास २ गोळे करावे. हलक्या हाताने गोल आकारात लाटावे. या आकराला तयार पराठ्या इतका थिकनेस असावा. सुरीने वरून ४-५ टोके द्यावेत म्हणजे अवनमधे फुगणार नाही. गोलाला वरुन थोडेसे ऑलीव ऑइल चमच्याने लावावे आणि टेम्परेचर २५० ला सेट करुन अवन मधे ३ ते ४ मिनिट ठेवावे.
४ मिनिटांनी बाहेर काढून बेसला टोमॅटो केचप, ऑलिव ऑइल, लावुन घ्यावे. आपल्या आवडी प्रमाणे टॉपिंग सजवून वरून मीठ, मिरेपूड, मिरची पूड टाकावी. हवे असल्यास पुन्हा थोडे ऑलिव ऑइल टाकावे. चीज किसावे. १५-२० मिनिट बेक करावे. चीज वितळले आणि बेस क्रिस्पी झाला, हे चेक करुन बाहेर काढावे.
हा पिझा मुळ इटालियन पिझा सारखा क्रिस्पी आणि पातळ होतो.
छान आहे.
छान आहे.
मस्तच दिसतोय मैदा नसल्याने
मस्तच दिसतोय
मैदा नसल्याने पोटालाही चांगला.
वॉव! तोंपासु. नक्की करून
वॉव!

तोंपासु. नक्की करून बघणार!
सोप्पाय एक्दम.
छान रेसेपी आहे, पनीर साधे
छान रेसेपी आहे, पनीर साधे वापरण्यापेक्षा मॅरिनेटेड वापरले तर पिझ्झा आणखी टेस्टी होईल
यीस्ट च्या ऐवजी बेकिन्ग पावडर
यीस्ट च्या ऐवजी बेकिन्ग पावडर ना.
करून बघणार. केचपच्या ऐवजी इटालिअन पिझा सॉस पण मस्त लागेल.
परवा करीना कपूरचा आवड्ता फोर चीज पिझा दाखिवला त्यातही पातळ बेस होता. व वरून आराग्युला लीव्हस फ्रेश. चार प्रकारची चीजे
आरती मला खुप आवडला हा तुझा
आरती मला खुप आवडला हा तुझा पिझ्झा. मी प्रिंट काढून घेतेय. ऑलिव्ह ऑइलच्या ऐवजी तेल/बटर किंवा साजूक तुप चालेल का? ऑलिव्ह ऑइल माझ्याकडे नाही म्हणून विचारल. नाहीतर घेईन मी. पण २ वेळा आणल काही पदार्थांसाठी आणि थोडसच वापरून ते पडून राहील होत.
आरती, थँक्स ! मी 'य' वर्ष
आरती, थँक्स ! मी 'य' वर्ष पिझ्झा बेस कसा करतात या प्रश्नात होते. मग रेडीमेड बेस आणताना मैदा तर नको आणि wheat सहजी मिळत नाही म्हणुन परेशान. तु ने तो मेरा कामही कर दिया ! मस्तच !
जागु, बिंदास आण गं ऑलिव ऑइल. उरलं तरी वाया नाही जात. केसांना लाव. मस्त सॉफ्ट होतात किंवा थंडीत गरम करुन बॉडी मसाजला वापरायचं. स्कीन असली मस्त होते. एकदम सॉफ्ट आणि शायनी !
वरिजिनल तो वरिजिनलच पित्झा.
वरिजिनल तो वरिजिनलच पित्झा. छानच लागणार.
ते जाड रोडगे कुणी पापिलर केले तेच समजत नाही !
मूळ पिझ्झा मैद्याचा असतो ना
मूळ पिझ्झा मैद्याचा असतो ना ?
हे हलकं वाटतंय जरा
जागू, बटर चालते. पास्ता
जागू, बटर चालते. पास्ता करताना मी बरेचदा ऑलिव ऑईलच्या ऐवजी बटर वापरते.
पण मनिमाऊ म्ह्णते तसे इतर उपयोग पण आहेतच तेलाचे.
अमा, मी तर विचार करते आहे पुढच्या वेळेस, बेकिंग पावडर सुद्धा वापरु नये. ऑलिव ऑइल थोडे जस्त घालुन तितकेच क्रिस्पी होते का बघते (आणि सांगते) कारण फुगवायचे तर नाहीचे.
जागू, ऑ. ऑ. मी तर रोजच्या
जागू, ऑ. ऑ. मी तर रोजच्या स्वैपकला पण वापरते...पडून नक्की रहाणार नाही. मनिमाउ +१
आरती, मस्त रेसिपी.
आता सगळ्यांचा सल्ला मनावर
आता सगळ्यांचा सल्ला मनावर घेउन मी ऑलिव्ह ऑइल आणणारच. :स्मितः
छान रेसिपी आरती. टोमॅटो केचप
छान रेसिपी आरती. टोमॅटो केचप ऐवजी पिझ्झा सॉस करून ठेवता येइल. खूप सोप्पा आहे करायला. त्यात मस्त फ्रेश हर्ब्स घालायचे. सुरेख स्वाद येतो. एकदा करून बरणीत भरून ठेवला की पास्त्याला वगैरे पण वापरता येतो. किंवा नुस्ता ब्रेडच्या स्लाईस वर सॉस आणि चीज घालून ५-६ मि. बेक करून झटपट स्नॅक्सचा प्रकार होतो.
बिल्वा, रेसिपी लिही ना पिझ्झा
बिल्वा, रेसिपी लिही ना पिझ्झा सॉसची. मी 'ढ' विद्यार्थी आहे. नुसतं असं एका ओळीत सांगुन नाही मला कळणार.
बिल्वा, लिहीच मी पिझा,
बिल्वा, लिहीच

मी पिझा, पास्ता साठी फ्रेश हर्ब्स आणि टोमॅटो प्युरी वापरते. पण तुझी सॉसची आयडिया इंस्टंट्साठी जास्त चांगली आहे.
आरती ऑनलाइन सापडलीस तर पटकन
आरती ऑनलाइन सापडलीस तर पटकन सांगुन टाक कि आटा 'आलू पराठयाची कणिक भिजवतो तसे भिजवून घ्यावे' म्हणजे नक्की कसं? घट्ट कि जरा सैल?
बरं लिहीन आज संध्याकाळी
बरं लिहीन आज संध्याकाळी
जरा सैल. जास्त जोर न लावता
जरा सैल. जास्त जोर न लावता लाटता आले पाहिजे. नेहमीच्या कणके पेक्षा सैल. पण पु.पो पेक्षा घट्ट.
माझी इटॅलियन मैत्रिण क्रस्टवर
माझी इटॅलियन मैत्रिण क्रस्टवर वर लिहिल्याप्रमाणेच ऑऑ आणि टोमॅटो केचप चोळून घ्यायची. त्यावर मग जे हवं असेल ते घालून बेक.
मी पिझ्झा क्रस्ट न वापरता पॉकेटलेस पिटा ब्रेड वापरते.
आरती, थँक्स ! मला पिझ्झा अती
आरती, थँक्स ! मला पिझ्झा अती आवडतो, पण घरी केलेलाच. फक्त मैदा बेसचं अपराधीपण असायचं मनात आता तेही दुर. बेससुद्धा घरी केलेला म्हणजे आता मी मस्त आडवा हात मारु शकते.
मस्त रेसिपी आरती. मला गव्हाचे
मस्त रेसिपी आरती. मला गव्हाचे पीठ + यीस्टची एकत्रित चव आवडली नाही म्हणून मी एकदोनदा अर्धी कणिक, अर्धा मैदा असा केला होता पण ह्यात यीस्टच नाही त्यामुळे आता ह्याच पद्धतीने करुन बघेन
दोन प्रश्न: अवन २५० से. का ? ( म्हणजे साधारण ४५० फॅ )
मक्याचे पीठ म्हणजे कॉर्नमील अपेक्षित आहे का ? कॉर्नमील रवाळ असते आणि कॉर्नफ्लोअर वस्त्रगाळ. एकदम फरक पडेल रेसिपीत म्हणून विचारले.
अवन २५० से. का ? >>
अवन २५० से. का ? >> हो.
मक्याचे पीठ म्हणजे कॉर्नफ्लोअर. पटेल कडुन आणले आहे 'कोर्न फाईन फ्लोअर'
मस्त! नक्की करून बघणार वर तू
मस्त! नक्की करून बघणार
वर तू उत्तर दिले आहेस तरी अजून कन्फ्युजन आहे. मक्याचे पीठ म्हणजे, "मक्के दि रोटी" करता वापरतात ते पिवळं जरा जाडसर की सूप/चायनीज पदार्थात दाटपणा आणायला वापरतात ते पांढरं वस्त्रगाळ? दोन्ही आमच्याईथे कॉर्नफ्लोअर नावानी मिळते.
राखी, मी पांढरं वस्त्रगाळ
राखी, मी पांढरं वस्त्रगाळ वापरल, पण रवाळ वापरले तरी फर फरक पडेल असे वाटत नाही. करुन बघायला हवे.
मस्त रेसिपी कॉर्नफ्लार ऐवजी
मस्त रेसिपी
कॉर्नफ्लार ऐवजी कॉर्न मिल (थोडे रवाळ) वापरता येते. कॉर्नमिल घालुन पिझ्झाबेस च्या रेसिपीज आहेत आंतरजालावर.
बेपा ऐवजी थोडे दही घालता येइल.
पिझ्झासॉस ऐवजी टॉम चटणी, टॉम पेस्तो/बेसिल पेस्तो/ग्रिल्ड वेजी पेस्तो लावुन सुद्धा पिझ्झा मस्त लागतो
वरतुन फ्रेश बोकोन्चिनी/मोझरेल्ला चीज असेल तर....... बात बन गयी
मस्तच आहे ही रेसिपी. या
मस्तच आहे ही रेसिपी. या विकांताला नक्की करणार. सॉस च्या पाक्रु ची वाट पहाते. नाहीतर आहेच बरिला वगैरेचा तयार सॉस.
छान वाट्तेय रेसिपी. माझ्याइथे
छान वाट्तेय रेसिपी. माझ्याइथे व्हीट पिझ्झा बेस मिळतो दुकानातही.
बिल्वा, रेसिपी लिही ना पिझ्झा
बिल्वा, रेसिपी लिही ना पिझ्झा सॉसची. मी 'ढ' विद्यार्थी आहे. नुसतं असं एका ओळीत सांगुन नाही मला कळणार.>> मलाही
धन्यवाद सगळ्यांना
धन्यवाद सगळ्यांना
मला हा पिझ्झा करुन बघायचा आहे
मला हा पिझ्झा करुन बघायचा आहे पण माझ्याकडे मक्याचे पीठ नाही आणि कोर्न फ्लोअर पण नाहीये तर ते न वापरता कसा करता येइल का मक्याचे पीठ आणणे मस्ट आहे?
Pages