मायबोलीवर प्रवेश करताना (लॉगिन) एक महत्वाचा बदल.

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

मायबोलीवर प्रवेश करण्याच्या पायरीत (लॉगिन) एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे. हा बदल काही आठवड्यांनी जास्त प्रकर्षाने जाणवेल.

यापूर्वी लॉगिन करण्यासाठी मायबोली आयडी वापरावा लागत असे. या पुढे काही आठवडे आयडी किंवा ईमेल यापैकी काहीही एक वापरून मायबोलीवर प्रवेश करता येईल. तुमच्या परवलीच्या शब्दामधे (पासवर्ड) काहीही बदल नाही आणि तोच चालेल. तुमच्या आयडीतही काही बदल नाही.

मायबोलीकर मायबोलीवर वेगवेगळ्या पद्धतीने येत असतात. त्यातलाच एक मार्ग म्हणजे मोबाईल फोन. ज्यांच्याकडे अगदी आधुनिक फोन आहेत त्यांना सहसा देवनागरी आयडी वापरून प्रवेश करायला अडचण येत नाही. पण हे सगळयांनाच जमतं असं नाही. कधी कधी देवनागरीतला आयडी फोनवरून लॉगीन करण्यासाठी किचकट असू शकतो. किंवा काही फोनवर मोबाईलवरून देवनागरीत वाचता आले तरी लिहता येत नाही अशा अनेक अडचणी येतात आणि मग फक्त मोबाईलसाठी म्हणून त्यांना आणखी एक ( Happy ) डुप्लि़केट आयडी घ्यावा लागतो.

आतापासून ही नवीन सोय वापरून तुम्ही ईमेल देऊन मायबोलीत प्रवेश करू शकता. कृपया सगळ्यांनीच ईमेल वापरून लॉगिन करायची सवय करा. काही आठवड्यांनी फक्त ईमेल वापरून मायबोलीत प्रवेश करता येईल. म्हणजे प्रवेश करताना कुठल्या पानावर आहे, तिथे देवनागरी चालते आहे का रोमन हे लक्षात ठेवण्याची गरज नाही. भविष्यातल्या इतरही काही सुविधा देण्यासाठी ईमेलद्वारे लॉगिन आवश्यक ठरते आहे.

तुमचा आयडी बदलणार नाही. तो तुम्हाला हवा त्या भाषेत तसाच राहिल आणि तुमच्या लेखनावर पूर्वीप्रमाणेच दिसत राहील.

विषय: 
प्रकार: 

धन्यवाद !

लॉग-इन करताना युजरनेम / इ-मेल देताना default language ही मराठी आहे. mobile device वरुन मराठी - इंग्रजी असा drop-down वापरुन बदल करणे त्रासदायक आहे. पुढील बदल करताना ह्यावर काही उपाय शोधता येईल का?

मी इमेल वापरुन लॉगीन होण्याचा प्रयत्न करत आहे. खालील screen capture पहा. ड्रॉपडाउन मधे मराठी असेच आहे.
Screen shot 2011-11-27 at 3.43.03 PM.png

मोबाईलवरुन ..
photo.PNG

तुम्ही पहिल्या पानावरून लॉगीन करत असाल तर Default इंग्रजी आहे. तुम्ही आतलं एखादं पान वापरून लॉगिन करत असाल तर मराठी आहे.

काही आठवड्यांनी लॉगीन सरसकट इंग्रजीत असेल. मग ही अडचण आणि कुठल्या पानावरून आपण प्रवेश करतो आहोत हे लक्षात ठेवावे लागणार नाही.

तुम्ही तुमच्या व्यक्तिरेखेत गेलात तर कुठला ईमेल वापरला होता ते कळू शकेल. तुम्ही तुमच्या प्रोफाईलमधूनही भाषा बदलू शकता.

आत्ताच अन्कॅनी यांनी सांगितले की अकाउंट सेटींग मधे language preference मधे इंग्रजी असे निवडले असेल तर मला आला तसा प्रॉब्लेम येणार नाही.
आत्ताच तसे करुन पाहिले आणि मी वर लिहिला तसा प्रॉब्लेम नाही आला. धन्यवाद अन्कॅनी !

धन्यवाद अ‍ॅडमिन. मी माबोवर येताना http://www.maayboli.com/new4me_all ह्या बुकमार्क वरुन लॉगीन करतो.

थँक्स ! मी कालपासून टॅब्लेटवरून माझ्या आयडीने मायबोलीवर येण्याचा प्रयत्न करत होते. जमत नव्हतं.. आणि हा बदल! खूप धन्यवाद!

>>> बाप रे! कोणत्या आयडीचा कोणता इमेल अ‍ॅड्रेस आहे ते लक्षात नाही... Lol Lol Lol
अगदी अगदी!
असो.

चांगली उपयुक्त सुविधा आहे.
कारणमिमांसे सकट इथे लिहील्यामुळे रोमन वर्सेस देवनागरी असा वाद उद्भवणार नाही अशी आशा आहे.
आताच्या आता जाऊन पहिल्यान्दा या आयडिचा माझा इमेल आयडी काय आहे ते बघुन घेतो Wink

छान सोय. धन्यवाद अ‍ॅडमीन-टीम.
मात्र प्रत्येक नव्या टॅबवर मायबोली लोगो न दिसता, दृपलसाहेबांचं दर्शन होत आहे.

मला ही फोनवरून लॉग इन होता येत नव्हते. त्यामुळे इंग्रजी अक्षरात 'आणखी एक ' डुप्लिकेट आयडी घ्यायच्या विचारात होतो बरे झाले लौकर पाहिले. Proud

नीळा लंबगोल अजून एक तासात कुणाला दिसायला नको काही ठिकाणी अगोदरच नीट दिसायला लागला असेल. कृपया ब्राऊझरचे पान ताजेतवाने करून पहा आणि अजून तासाभरात गेला नाही तर इथेच कळवा.

अरे वा! मस्त सोय. धन्यवाद.
निळा लंबगोल आताही दिसतोय आणि अधूनमधूनही दिसतो.

मी मेलनीच लॉगीन करुन आलो.
येधे हे विचारावेसे वाटते की,
प्रोफाईल मधे कोणताही मेल दिला तर त्याने लॉगीन होईल का. कारण माझा मेल चोरीला गेला आहे.

आणि भविष्यात जर तुम्ही पासवर्ड विसरला तर तुम्हाला लॉगिन पण करता येणार नाही आणि मेल वर पासवर्डही मागवता येणार नाही. त्यामुळे नेहमीच जी ईमेल तुम्ही वाचता/वाचू शकता तीच देणे योग्य होणार नाही का?

Pages