जंगल सफारी - क्रुगर नॅशनल पार्क - दक्षिण अफ्रिका - भाग २

Submitted by शापित गंधर्व on 24 November, 2011 - 08:21

१८/१९/२० नोव्हेंबर ला तीन दिवसची क्रुगर नॅशनल पार्कची सफर करण्याचा योग आला. त्या जंगल सफारीचा हा वॄत्तांत.

पहिला भाग वचण्यासाठी येथे टिचकी मारा.
जंगल सफारी - क्रुगर नॅशनल पार्क - दक्षिण अफ्रिका - भाग १
----------------------------------------------------------------------------

...त्या मॅप वर नजर टाकुन आम्हि आमचा पुढचा विभाग ठरवला आणि परत जंगलात निघालो.
पार्कच्या या भागात बरीच वहाने तिसत होती. आम्ही हळुहळू पुढे सरकत होतो. एका ठिकाणी पुलावर दोन तीन गाड्या थांबलेल्या दिसल्या. काय आहे बघु म्हणुन आम्हि पण थांबलो. तिथे आम्हाला दर्शन दिले बिग फाईव्ह मधल्या तिसर्‍या प्राण्याने. जंगली म्हैस. पाणि प्यायला आलेली. सुरवातीला एकच होती मग तिच्या मागुन आणखी दोघी आल्या. आजुबाजुला भरपुर हिरवेगार गवत होते. त्यांचा मोठा कळप तिथेच कुठेतरी असण्याची शक्यता होती.
सधारण १.६ मिटर उंची असणार्‍या या म्हशींचे वजन ७५० किलो पर्यंत असु शकते. हे नेहमी मोठ्या कळपात रहातात. कधि कधि तर एका कळपात ४५०/५०० म्हशी असतात. जितका कळप मोठा तितकी सुरक्षित रहाण्याची शक्यता जास्त. बर्‍याच वेळा कळपा पासुन वेगळे पडलेले म्हातारे किंव्हा एखादे कोकरु सिंह/चित्त्याचे शिकार बनतात.
१ मिटर पर्यंत वढणारे लांब आणि मजबुत शिंग हे त्यांचे स्वसंरक्षणाचे हत्यार असले तरी हे प्राणि तुमच्यावर विनाकारण हल्ला करु शकतात. त्यमुळे यांच्या पासुन दुर राहिलेलेच बरे.

पाणि प्यायला आलेल्या म्हशी
बाजुच्याच झाडावर सुगरणिंची घरटी लटकत होती

थोडं पुढे गेल्यावर रस्त्याच्या बाजुला एक गजराज उभा होता. फारच म्हातारा वाटत होता तो. पण फोटोसाठी मस्त पोज दिल्या गजराजाने.
अफ्रिकन नर हत्तींची उंची ३.२ मिटर ते ४ मिटर आणि वजन ५००० ते ६३०० किलो तर मादि हत्तीची उंची २.५ मिटर ते ३.४ मिटर आणि वजन २८०० ते ३५०० किलो पर्यंत असते. अफ्रिकन हत्तींचे सुळे फार मोठे आणि वजनदार असतात. १०३ किलो वजनच्या सुळ्याचा रेकॉर्ड आहे. शांत स्वभावाचे हे प्राणि कळपात रहतात. पण तरुण नर हत्ती एकटेच फिरणे पसंत करतात.

अफ्रिकन हत्ती

आजुबजुला थोडफार भटकलो पण कुठलाच नविन प्राणि दिसला नाही. २:३० वाजले होते. मग रेस्टकँप वर परत जायचं ठरवलं. रिसेप्शन वरुन आमच्या कॉटेजची चावी घेतली आणि कॉटेजवर गेलो. जाण्यापुर्वी आठवणीने संध्याकळच्या "गेम ड्राईव्ह" ची बुकिंग केली.
कॉटेजवर गेल्यावर मस्तपैकी अंघोळ करुन फ्रेश झालो. बायकोने घरुन येतांना पुरी भाजी बनवुन आणली होती तिच्यावर यतेच्छ ताव मारला. रात्रभरचं जगरण आणि नुकतचं झालेल्या जेवणामुळे डोळ्यांवर झापड येत होती. पण आत्ता झोपलो तर ४:३० वाजताच्या "गेम ड्राईव्ह" ला जाता येणार नाहि याचि कल्पना होती. म्हणुन निद्रादेवी कडुन "टाईम प्लिज" घेतली. वेळ जावा म्हणुन या लेखासाठी थोड्याफार नोट्स कढल्या आणि फोटो लॅपटॉप मधे कॉपी केले.

गेम ड्राईव्हला लहान मुलांना परवानगी नसल्यामुळे बायको आणि पिल्लु कॉटेजवर थांबले आणि मी एकटाच गेम ड्राईव्हला गेलो.
थोडसं गेम ड्राईव्ह बद्दल. पहाटे पहाटे आणि संध्याकाळी प्राणि जास्त अ‍ॅक्टिव्ह असतात. म्हणुन पार्क अथॉरीटिज पहटे ४:०० आणि संध्याकाळी ४:३० वाजता प्रत्येकी ३ तास एका उंच आणि ओपन गाडितुन जंगल भटकंती आयोजित करतात. अर्थात तुम्हाला त्यासाठी वेगळे पैसे मोजवे लागतात. तुमच्या गाडिचा ड्रायव्हर हाच तुमचा गाईड असतो. आजुबाजूच्या परिसराचा अनुभव आणि गेल्या दोन तिन दिवसात ठरावीक ठिकाणी पाहिले गेलेले प्राणि या महितीच्या आधारे तुमचा गाईड कम ड्रायव्हर तुम्हाला जंगलाच्या त्या त्या भागात घेउन जातो. गाडित तुम्ही उंचीवर असल्यामुळे आजुबाजूचा परिसर तुम्हाला व्यवस्थित दिसतो. वाटेत भेटणार्‍या प्राणि/पक्षां बद्दल गाईड महिती देतो. प्राणि/पक्षांच्या लकबी, स्वभाव विशेष, त्यांच्या रहाण्याच्या जगा अशी बरीच माहिती तो पुरवतो.
या सगळ्यामुळे मला गेम ड्राईव्ह कडुन बर्‍याच अपेक्षा होत्या.

हिच ती गेम ड्राईव्हची गाडि

आमची गाडि जंगलाच्या विविध भागातुन फिरत होती. पण नविन काहिच दिसत नव्हत. तेच ते इंपाला, म्हशि आणि हत्ती. असेच पुढे सरकत होतो तर एका ठिकाणी बर्‍याच गाड्या थांबलेल्या दिसल्या. म्हटलं नक्किच काहितरी खास असणार. खुपशा गाड्यांमुळे जमा झालेल्या ट्रॅफिक मधुन आमच्या ड्रायव्हरने गाडि पुढे घुसवली आणि समोर तो दिसला. जंगलचा राजा. सिंह. अगदी रस्त्याच्या कडेलाच शांतपणे झोपला होता. आजुबजूला उभ्या असलेल्या गड्यांचा त्याच्यावर काहिच फरक पडत नव्हता. तो आपला शांतपणे पडुन. मधेच एक डोळा उघडुन आमच्या कडे बघायचा परत झोपायचा. लगेच कॅमेरा सरसावला आणि भरपुर प्रचि काढले.
गाईडने माहिती पुरवली की सिंह खुप आळशी असतात. दिवसातले जवळ जवळ १८ ते २० तास ते कुठेतरी झाडाझुडपा खाली पडुन रहातात. आठवड्यातुन एकदा किंवा दोनदा शिकार करतात. ते पण म्हैस/हिप्पोपोटोमस सरख्या मोठ्या प्राण्याची. उगाच पळापळ करुन पोट पण नाही भरणार म्हणुन ते इंपाला सरख्या लहान प्राण्यांच्या मागे लागत नाहित. बर्‍याच वेळा शिकार सिंहीणीच करतात आणि गरच पडलीच तर नर सिंह त्यांना मदत करतात. पण शिकार मरली की स्वताचा वाटा मागयला सर्वात पुढे. बर्‍याच वेळा तर या झटापटीत लहान छाव्यांना काहीच खायला मिळत नाही आणि मग बिचारे उपासमारीने मरतात. सिंहाचे साधारण आयुष्यमान १५ ते २० वर्षे. नर आणि मादिची उंची जवळपास सरखीच (१ मिटर) असली तरी त्यांच्या वजनात बराच फरक असतो. नरचे वजन १८० ते २३० किलो तर मादिचे ११५ ते १६० किलो.
गाईड ने आणखी माहिती पुरवली की हा जो सिंह इथे झोपला आहे त्याचे भाऊ आहेत जे नेहमी त्याच्या सोबत रहातात. हा इथे आहे म्हणजे ते दोघे पण इथेच आजुबाजूला कुठेतरी असणार म्हणुन त्यांना शोधायला आम्हि पुढे सरकलो. पण शोधायची गरजच पडली नाही. ५०/६० मिटर वर ते दोघे थोडेसे आतल्या बाजुला झोपले होते. बरच वेळ तिथे थांबलो पण त्यांची काही उठायची चिन्ह दिसेनात. गाईडने सांगितले की बरच वेळ ते तिथुन हलणार नाहित. आपण पुढे जाउ आणि थोड्यावेळाने परत येउन बघु.

झोपलेले सिंह

पुढे गेल्यावर इंपालाचा एक मोठा कळप दिसला. त्यातले हे "थ्री ईडियट"

मग दिसली बबुन जातीची माकडे. भरपुर होती. जवळ जवळ ५००/६००. त्यातल्याच एका कुटूंबाचे हे प्रचि. ८/१० दिवसांच ते पिल्लु या जगात आल्याचा आनंद साजरा करत होतं.

बबुन मकडाचे कुटूंब

एव्हाना अंधार पडु लागला होता. सर्च लाईटच्या प्रकशात आमची शोधाशोध चालु होती. पण कसलं कायं. काहिच नजरेस पडत नव्हतं. एक ससा तेव्हडा दिसला. सर्च लाईटच्या प्रकशात त्याचे लालभडक डोळे चमकत होते.

ससा

७:३० वाजत आले होते. ड्रायव्हरने गाडी रेस्टकँप कडे वळवली. परतीच्या वाटेवर सिंहांवर नजर टाकली तर ते अजुन झोपुनच होते. मग त्यांना तिथेच सोडुन आम्हि रेस्टकँपवर परतलो.

कॉटेजवर परतलो तर बायको आणि पिल्लु नुकतेच उठले होते. बायको रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. पिल्लुशी खेळता खेळता बायकोला गेम ड्राईव्हचा अनुभव सांगितला. मला सिंह दिसले म्हटल्यावर हळहळली बिचारी. माझ्यासाठी नाहि हो, स्वत: साठी. तिचा चान्स मिस झाला होता ना. उद्या पहाटेच तुला तिकडे घेउन जतो म्हणत तिची समजुत काढली. परत एकदा दिवसभराच्या भटकंतिची उजळणी झाली. पहिल्याच दिवशी बिग फाईव्ह मध्यल्या चार प्राण्यांच दर्शन झालं म्हणुन स्वत:वरच खुष. मग जेवण करुन निद्रादेविच्या स्वाधिन झालो.

क्रमशः

गुलमोहर: 

.

पुन्हा एकदा अप्रतिम फोटो....
सुगरणींच्या खोप्याचा तर परफेक्ट वॉलपेपर पिक आहे....
गजराजाचे नंतरचे दोन्ही फोटो थोडे ओव्हर एक्पोज झाल्यासारखे वाटतायत त्यामुळे आधीचाच थोडा डार्क आला असला तरी मस्त इफेक्ट साधतोय....
आळशी सिंहाचा आणि बबूनच्या पिल्लाचा पण फारच क्लास...

बबुन चे पिल्लु पाहुन दचकलोच सेम आमच्या बॉस सारख दिसतय.
Biggrin Biggrin Biggrin

व्वाह, मस्तच फोटो आणि सफरही Happy
शेवटी क्रमशः पाहुन बरं वाटल Happy

बबुन चे पिल्लु पाहुन दचकलोच सेम आमच्या बॉस सारख दिसतय>>>>>:हहगलो:

सही आहेत सगळे फोटो. सुगरणीच्या घरट्यांच फोटो आवडला. आणि माहिती ही मस्त मिळतेय. या मालिकेचा पुढचा भाग केव्हा रिलीज करताय? Happy

बबुन चे पिल्लु पाहुन दचकलोच सेम आमच्या बॉस सारख दिसतय. Proud
बॉस मायबोलीचा वाचक नाही आहे ना? Happy
शापित गंधर्व मस्त फोटो. आवडले.

मुबलक प्राणी असल्यान जंगल सफारीला मजा आली अन प्र.ची. खासच एकदम मस्त आवडेश Happy
जमल्यास काही जंगलातील सुंदर स्थळांचे प्र.ची. पण टाका भौ आसतील तर म्हणजे साधारण जंगलाचा आस्वाद
Happy पु.भा.प्र.

छान माहिती व फोटोज्...
सुगरणिच्या घरट्यांचा व हत्तीचे फोटो विशेष आवडले...

Back to top