![mango kaju katali](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/recipe_images/2020/12/15/mangokajukatali_small.jpg)
पिठी साखर १ वाटी
काजू पावडर २ वाट्या
दुधाची घट्ट साय २ चमचे
पाणी पाव वाटी
तुप १ चमचाभर
कढई किंवा जाड बुडाचे पातेले तापायला ठेवावे.
काजूची पुड केली नसेल तर करुन घ्यावी. तयार पुड दोन वाट्या भरायला हवी.
कढईमध्ये एक वाटी साखर, दोन चमचे साय व पाव वाटी पाणी घालून साखरेत साय एकत्र होईल असे मिसळावे. गॅस मिडीयम हाय वर ठेउन सतत ढवळत रहावे.
साखर वितळेल व बाजुने बुडबुडे यायला सुर्वात होईल मग लगेच त्यात काजु पावडर घालून मिश्रण ढवळावे. मिश्रण गोळा व्हायला लागले की लगेच गॅस बंद करुन कढई खाली उतरवावी.
ताटाला किंवा पोळपाटाला तुप लाउन भरभर गोळ्याची पोळी लाटावी. हवा असल्यास चांदीचा वर्ख लावावा. मग लगेच धारदार सुरीने हव्या त्या आकाराच्या वड्या कापाव्या
शंकरपाळ्याच्या आकारत कापताना कडेचे तुकडे उगाच अर्धवट पडतात. म्हणून ह्या साध्या सोप्या चौकोनी
वेरिएशन म्हणून आंबा कतली करता येईल बच्चा पार्टी ला आंबे आणि काजूकतली दोन्ही खूप आवडीचे. एकत्र करुन फार सुन्दर कॉम्बिनेशन आंबाकतली होते.
मी वरिल दिलेल्या प्रमाणात एक वाटी साखरे ऐवजी एक वाटी आंब्याच्या फोडींचा गर वापरला. बाकी क्रूती सेम. एक आंबा काजू चा गोळा आणि एक फक्त काजू कतलीचा गोळा असे दोन्ही एकावर एक ठेउन भरभर लाटायचे. नेहमी प्रमाणे कापायचे. छान दोन रंगाची काजूकतली बनते.
फ्रेश आम्बा नसेल तर फ्रोझन पल्प वापरता येईल.
कोणतीही बर्फी किंवा वड्या बनवताना मिश्रणाचा गोळा होत आला की चमचाभर पिठीसाखर भुरभुरवायची आणि पटकन मिक्स करुन मग वड्या थापायच्या/लाटायच्या. असे केल्याने वड्या/ बर्फी चिकट न होता एकदम खुटखुटीट होते.
काजू सादळलेले(मउ) असतील तर काजु पावडर निट होत नाही.
काजु पावडर बनवताना मिक्सर फर्स्ट स्पीड वर किंवा ईंच वर चालवावा एक एक मिनिटाच्या गॅप ने. दोन ते तिन मिनिटात चांगली सपीट पावडर बनते.
काय सुबक झालीय !! काजू पावडर
काय सुबक झालीय !!
काजू पावडर तयार मिळते का ? (घरी नीट होत नाही.)
जबरीच दिसतायत !!!! करुन
जबरीच दिसतायत !!!!
करुन बघण्यात येइल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त ! सोपी रेसिपी ! दिवाळीत
मस्त ! सोपी रेसिपी !
दिवाळीत गिफ्ट म्हणून आलेल्या सुकामेव्याचा उपयोग करता येईल
व्वा
व्वा
दिनेशदा तुम्ही छान म्हणताय
दिनेशदा तुम्ही छान म्हणताय म्हणजे मला शाबासकी मिळाल्या सारखे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वर टिपा अॅड केल्या पावडर संदर्भात.
मस्त, सोपी वाट्तेय.
मस्त, सोपी वाट्तेय.
मस्तच. तोपासु.
मस्तच. तोपासु.
अगं काय सुंदर फोटो दिसतोय....
अगं काय सुंदर फोटो दिसतोय.... एकदम लाळगाळू! पटकन उचलून खावीशी वाटतेय.
इकडे क्रॉफर्ड मार्केटात ड्रायफुटच्या दुकानात 'काजू चुरा' मिळतो. काजूचे साधारण अर्ध्या मिलीमीटरचे असे अगदी सूक्ष्म तुकडे असतात. हलव्यात, खिरीत टाकायला पटकन उपयोगी येतो. पावडर करण्यासाठी तो काजू चुरा मिक्सरमध्ये इंचरवर पाव-पाव मिनीटासाठी तीन चारदा फिरवला की मस्त काजूची सपीठी तयार होते.
मस्त दिसतेय काजुकतली माझी
मस्त दिसतेय काजुकतली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझी नणंद काजू भिजत घालून गोळ्यासारखं वाटते काजूकतलीसाठी.
अफाट फोटो आहे. इतकी चांगली
अफाट फोटो आहे. इतकी चांगली काजूकतली घरी होऊ शकते याचंच मला आशचर्य आहे.
डॅफो, हि महत्वाची टिप आहे.
डॅफो, हि महत्वाची टिप आहे. मला कोरडे वाटता येतील का याची शंका होती, म्हणून दूधात भिजवून वाटले तर, शिजवताना इतके तेल सुटले, कि पिळून काढावे लागले. (नायजेरियातले काजू)
गल्फ मधे सुक्या मेव्याच्या दुकानात, एक खास यंत्र असायचे. त्यात आपल्याला हव्या त्या सुक्यामेव्याचे काप, पुड वगैरे करुन मिळायची.
तोंपासु... मस्तच
तोंपासु... मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साय नसेल तर काय वापरता
साय नसेल तर काय वापरता येईल??
मिल्कमेड वापरल तर? ( अर्थात साखर वगळावी लागेल. )
डॅफो...मस्तच.
डॅफो...मस्तच.
मी नेहमी अशीच करते. फक्त साय
मी नेहमी अशीच करते. फक्त साय घालत नाही.
काही सुचना
१] काजु पुड करताना थोडे थोडे ( साधारण अर्धा कप ) काजु घेउन करावी. अन्यथा तेल सुटते.
) वर फिरवावा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मिक्सर इंचर (
२] पुड केली की पोहे चाळायच्या चाळणीने चाळुन घ्यावी.
३] एकतारी पाक झाल्यावर काजु पावडर मिक्स करावी.
४] मिश्रण ड्राय झाले तर पाण्याचा हात लावावा. पातळ राहिले तर ( ३० सेकंद ) मावेत ठेवावे.
५] सारख्या आकाराच्या आणी लवकर वड्या पाडण्यासाठी मुलांची फुटपट्टी ( स्टीलची ) वापरावी
६] साठवताना बटर पेपर ठेउन त्यावर वड्या ठेवाव्यात. पुन्हा बटर पेपर आनी वड्या अशे थर ठेवावेत.
पाव किलो काजुची १५-२० मिनीटात साधारण ४००-४५० ग्रॅम कतली होते.
धन्यवाद !! साय नसेल तर काय
धन्यवाद !!
साय नसेल तर काय वापरता येईल??
मिल्कमेड वापरल तर? ( अर्थात साखर वगळावी लागेल. )>>>
साय वगळलिस तरी चालेल पण मिल्क्मेड नको.. चिकट चिक्की होईल.. नकोच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
थोडीशी मिल्क पावडर वापरुन प्रयोग करुन बघ.
साय वगळलिस तरी चालेल पण
साय वगळलिस तरी चालेल पण मिल्क्मेड नको.. चिकट चिक्की होईल.. नकोच. >> अनुमोदन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी न वापरताच केलीय आत्तापर्यंत १०-१२ वेळा तरी.
मस्तच.. साय फेटुन घ्यावी का
मस्तच..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साय फेटुन घ्यावी का आधी?? न फेटताही लगेच मिक्स होते का पाण्यामुळे? करुन्च बघते..
एकदम मस्त
एकदम मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बढिया है!
बढिया है!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सहज आठवलं. उल्हासनगरमधे
सहज आठवलं.
उल्हासनगरमधे शेंगदाण्याचे पिठ वापरुन, काजूचे साचे वापरुन काजूगर करायची फॅक्टरी होती...
असे मला एका डोंबिवलीच्या मित्राने सांगितले होते.
डॅफो, अगदी प्रोफेशनल लूक आहे
डॅफो, अगदी प्रोफेशनल लूक आहे हं तुझ्या काजुकतलीचा. छानच.
काय कातिल काजूकतली आहे! मस्तच
काय कातिल काजूकतली आहे! मस्तच पाककृती. करून बघावी. (ही का.क. मायबोलीवरची नेक्स्ट मलईबर्फी होईल असा अंदाज आहे. )![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
संपदा, मस्त पा कृ; त्या वड्या
संपदा, मस्त पा कृ; त्या वड्या इतक्या मस्त दिसताहेत की पटकन उचलून तोंडात टाकाव्याश्या वाटताहेत.आणि कृती पण सोपी आहे.
भारी!!
भारी!!
खुपच सोप्पी कृती. लगेच
खुपच सोप्पी कृती. लगेच करणार.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कॉफी ग्राईंडरमधे काजुपुड खुप छान होते, असा माझा अनुभव आहे
करुन बघा.
एकदम कातील दिसतेय ही काजू
एकदम कातील दिसतेय ही काजू कतली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कसली खास दिसतेय!
कसली खास दिसतेय!
वा,मस्तच. माझ्या मुलाला
वा,मस्तच. माझ्या मुलाला काजूकतली प्रचंड आवडते त्यामुळे घरी करायला शिकणं मस्ट आहे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगोबाई, मग करा बघू लवकर
अगोबाई, मग करा बघू लवकर काजुकतली!:स्मित:
मस्त रेसिपी.
Pages