
पिठी साखर १ वाटी
काजू पावडर २ वाट्या
दुधाची घट्ट साय २ चमचे
पाणी पाव वाटी
तुप १ चमचाभर
कढई किंवा जाड बुडाचे पातेले तापायला ठेवावे.
काजूची पुड केली नसेल तर करुन घ्यावी. तयार पुड दोन वाट्या भरायला हवी.
कढईमध्ये एक वाटी साखर, दोन चमचे साय व पाव वाटी पाणी घालून साखरेत साय एकत्र होईल असे मिसळावे. गॅस मिडीयम हाय वर ठेउन सतत ढवळत रहावे.
साखर वितळेल व बाजुने बुडबुडे यायला सुर्वात होईल मग लगेच त्यात काजु पावडर घालून मिश्रण ढवळावे. मिश्रण गोळा व्हायला लागले की लगेच गॅस बंद करुन कढई खाली उतरवावी.
ताटाला किंवा पोळपाटाला तुप लाउन भरभर गोळ्याची पोळी लाटावी. हवा असल्यास चांदीचा वर्ख लावावा. मग लगेच धारदार सुरीने हव्या त्या आकाराच्या वड्या कापाव्या
शंकरपाळ्याच्या आकारत कापताना कडेचे तुकडे उगाच अर्धवट पडतात. म्हणून ह्या साध्या सोप्या चौकोनी
वेरिएशन म्हणून आंबा कतली करता येईल बच्चा पार्टी ला आंबे आणि काजूकतली दोन्ही खूप आवडीचे. एकत्र करुन फार सुन्दर कॉम्बिनेशन आंबाकतली होते.
मी वरिल दिलेल्या प्रमाणात एक वाटी साखरे ऐवजी एक वाटी आंब्याच्या फोडींचा गर वापरला. बाकी क्रूती सेम. एक आंबा काजू चा गोळा आणि एक फक्त काजू कतलीचा गोळा असे दोन्ही एकावर एक ठेउन भरभर लाटायचे. नेहमी प्रमाणे कापायचे. छान दोन रंगाची काजूकतली बनते.
फ्रेश आम्बा नसेल तर फ्रोझन पल्प वापरता येईल.
कोणतीही बर्फी किंवा वड्या बनवताना मिश्रणाचा गोळा होत आला की चमचाभर पिठीसाखर भुरभुरवायची आणि पटकन मिक्स करुन मग वड्या थापायच्या/लाटायच्या. असे केल्याने वड्या/ बर्फी चिकट न होता एकदम खुटखुटीट होते.
काजू सादळलेले(मउ) असतील तर काजु पावडर निट होत नाही.
काजु पावडर बनवताना मिक्सर फर्स्ट स्पीड वर किंवा ईंच वर चालवावा एक एक मिनिटाच्या गॅप ने. दोन ते तिन मिनिटात चांगली सपीट पावडर बनते.
केली ग डॅफो अगदी
केली ग डॅफो

अगदी गोळाहोईपर्यंत नाही ठेवले. घट्ट्पणा आल्यवर लगेच ताटलीत थापले. छान झाली आहे.
साय नव्हती म्हणुन, पाण्याच्या ऐवजी दुध वापरले. रंग पांढरा स्वच्छ नाही आला. पण बाकी अगदी चितळे हो
आरती, ह्याला म्हणतात उरक.
आरती, ह्याला म्हणतात उरक. छान दिसत्येय तुझी काजुकतली.
अगो+१. माझ्याही लेकीला खूप
अगो+१.
माझ्याही लेकीला खूप आवडते. नक्की करुन पाहणार.
धन्यवाद डॅफो.
जबरा दिसतेय!
जबरा दिसतेय!
सुपर!!! माझ्याही लेकीला
सुपर!!! माझ्याही लेकीला भन्नाट आवडते काजुकतली. आजच करुन तिला चकित करते.
करा करा चकीत करा. मी
करा करा चकीत करा. मी पहिल्यांदा केलेली तव्हाचे लेकाच्या चेहर्यावरचे एक्सप्रेशन्स आठवले. त्याला इतकी आवडली की. मिठाईच्या डब्यात भरुन घरच्यांना दिली. चितळेंची आहे सांगुन. आणी घरी केले हे कळल्यावर मला घरच्यांनी दम दिला की आता दुसरी काक ची रेसीपी ट्राय करु नकोच
मस्तच आणि सोपी आहे!! नक्की
मस्तच आणि सोपी आहे!! नक्की करुन बघणार या रविवारी.
धन्यवाद मैत्रिणींनो ! अरे वा
धन्यवाद मैत्रिणींनो !

अरे वा आरती एक्दम फटाफट
पण अजुन थोडीशी व्ह्यायला हवी होती. कच्ची दिसतेय. अस वाटतंय.
माझी पण तयार थँक्स
माझी पण तयार
थँक्स डॅफोडिल
फिनिशिंग नाहिये पण
काजूकतलीची साथ आलीय अमृता,
काजूकतलीची साथ आलीय

अमृता, खाल्लीस की फिनिशिंग विसरशील
(No subject)
छान ! अमृता चांगली जमलीये.
छान ! अमृता चांगली जमलीये. लेक खुश होईल.


पुढच्या वेळी एक पॉईंट किंचीत लवकर बंद कर. थोडीशी घाई करावी लागते लाटायला आणि वड्या पाडायला
काजूकतलीची साथ आलीय >> केश्वी
लवकरच दुसरी साथ आणायला पाहिजे.
धन्यवाद धन्यवाद!! सकाळी
धन्यवाद धन्यवाद!!
सकाळी जीमला जा दुपारी काजुकत्ल्या खा.
हाईला!! आरती आणि अमृताला १००
हाईला!! आरती आणि अमृताला १०० पैकी १०० मार्क... काय फटाफट उरकाने केल्यात काजूकतल्या
मस्तच तोंपासु काजुकतली,
मस्तच तोंपासु

काजुकतली, पार्सल प्लीज
मंजू, आता संत्री आणायला
मंजू, आता संत्री आणायला निघत्ये. किती बै मी उरकाची.
फिनिशिंग नाहिये पण >> माझ्या
फिनिशिंग नाहिये पण >> माझ्या टीपात राहिलेच की लिहायचे.
लाटताना बटर पेपर ठेवुन लाटावे. अगदी मस्त तुळतुळीत होतात.
Mrs.Jayashri Kuber gave this
Mrs.Jayashri Kuber gave this tip on etv.keep the cashonuts for half an hour in the freeze to get smooth powder to make kajukatali&kajuche modak.
कच्ची दिसतेय. अस वाटतंय. >>
कच्ची दिसतेय. अस वाटतंय. >> नाही अजिबातच.

अजुन थोडी ठेवली असती तर कडक झाली असती. नेहमी वड्या करत असल्याने अंदाज आला आणि गॅस बंद केला
तु गोळा म्हणजे नक्की काय केले त्या 'स्टेप' चा फोटो टाक बरे
(No subject)
आरती, अमृता एकदम उरक आहे बरका
आरती, अमृता एकदम उरक आहे बरका तुम्हाला.
अमृता काजूकतली तर मस्तच पण खालची सिरॅमिकची प्लेट पण मस्तच.
माझे अगदी सोपे पदार्थ बिघडवण्याचे रेकॉर्ड बघता काजूकतली करेन की नाही माहित नाही पण तशी एक प्लेट नक्की करणार मी.
डॅफो ती बटरपेपर टाकून मग लाटायची युक्ती वर कृतीत टाक ना.
थँक्स रुने, प्लेट बनवुन टाक
थँक्स रुने, प्लेट बनवुन टाक तू.. हाडाची पॉटर तू

आरती, अमृता वाचुन गंमत वाटली कारण आरती माझ्या बहीणीच नाव आहे.
कुठल्याही वड्या वर बटरपेपर टाकुन लाटाव्यात. काल नव्हता घरी म्हणुन चालवलं. एखादा जाड प्लास्टीक कागद पण चालला असता पण तो ही नव्हता.
तुळतुळीत>>>
तुळतुळीत>>>:हाहा:
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/2812
http://www.maayboli.com/node/6220
दुसरेकाही शोधताना सापडल्या.
धन्स आरती अमृता मी ही
धन्स आरती
अमृता मी ही प्लास्टीक पेपर वर लाटते. किंवा ताटात थापल्या तर वरुन जाड पेपर धरुन वड्या थापते.
मार्केटमधल्या काजुकतली बद्दल
मार्केटमधल्या काजुकतली बद्दल निगेटिव्ह कमेंट्स ऐकून होतो, पण जिभलीबाईंचे चोचले पुरवण्यासाठी आता घरीच बनवण्याचा विचार आहे. सुरी ऐवजी पिझ्झाकटर कट करायला वापरला तर फिनीशींग चांगली येईल ना?...
सही
सही
इथे (अमेरिकेत) चांदीचा वर्ख
इथे (अमेरिकेत) चांदीचा वर्ख मिळतो का? लेकीला काजुकतली दाखवल्यावर वरती चकचकीत लाउन करुन दे म्ह्णुन लागली आहे.
मस्त कृती आहे. वर्ख नाही मिळाला तरी करुन बघण्यात येईल.
अनु पटेल किंवा सब्जी मंडी मधे
अनु पटेल किंवा सब्जी मंडी मधे वर्ख मिळतो. कसली सोपी क्रुती वाट्टेय. नक्की करुन पहाणार.
आज सगळ प्रमाण निम्म घेऊन १
आज सगळ प्रमाण निम्म घेऊन १ वाटीच्या करुन बघितल्या,
साय घातली न्हवती. तरी वड्या छान झाल्या :).
Pages