Submitted by पुरोगामी on 21 November, 2011 - 04:55
नुकताच एक हिंदि सिनेमा पाहिला. सुरवातीला सिनेमाचे नाव हिंदित दिसले. नंतर ते इंग्रजीत दिसले व नंतर ते उर्दुत दाखवले. पण मराठी, कानडि, गुजराति, तेलगु अशा इतर कोणत्याहि भाषेत नाव दाखवले नाही. जर सिनेमाचे नाव ३ भाषात दाखवितात, तर ते इतर राज्यांच्या भाषेत दाखवायला पाहिजे. हा इतर भाषांवर अन्याय आहे. एकतर फक्त हिंदित दाखवा किंवा सर्व १४ भाषात दाखवा. १४ पैकी फक्त ३ भाषात नाव दाखविणे अयोग्य आहे. तुम्हाला काय वाटते याबद्दल?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता काय सिनेमा बघणार की फक्त
आता काय सिनेमा बघणार की फक्त त्याचे नावच बघणार
पाकिस्तानात इथल्या शिणेमाच्या
पाकिस्तानात इथल्या शिणेमाच्या पायरेटेड सी डी जातात.. ती खास त्यासाठी सोय आहे.. भारतात कुठेही गेले तर हिंदी इंग्लिश कळतेच... आणि थेटराच्या बाहेर लोकल भाषेत रंगाने लिहिलेले असतेच..
आता काय सिनेमा बघणार की फक्त
आता काय सिनेमा बघणार की फक्त त्याचे नावच बघणार >>>
'जब वि मेट' , 'जोधा अकबर' हे
'जब वि मेट' , 'जोधा अकबर' हे मराठीत नि हिंदीत वेगळे दिसते का?
काय ढोंगी लोक आहेत? मराठीत लिहा म्हणे!! कुठल्याहि मराठी माणसाला चार शब्दाचे वाक्य, मधे एक दोन इंग्रजी शब्द घुसडल्याशिवाय बोलता येत नाही. इथे 'मायबोली' वर कवितांची शीर्षके हिंदी, इंग्रजी!
ढोंगी नुसते, उग्गीच फालतू विषयावर वाद घालून शेवटी राडा करायचा नि चोर्या मार्या करायच्या!! यांच्याकडे लक्ष देऊ नका.
नरेंद्र, नाव उर्दूत नसते तर
नरेंद्र,
नाव उर्दूत नसते तर फारसी लिपीत असते. (आता बेटा या सिनेमाचे नाव ऊर्दूत लिहायचे तर वालिद, औलाद वगैरे लिहावे लागले असते.)
ती लिपी भारतात पूर्वापार वापरात होती. सिंधी भाषा पण याच लिपीत लिहीली जाते. त्यामूळे तिचा संबंध पाकिस्तानाशी आणि मुसलमानांशी जोडता येणार नाही.
इतर भारतीय भाषात ते डब तरी केले जातात किंवा सबटायटल्स असतात. ( यांना मराठी शब्द माहित नाहीत, मला. )
हिंदी भाषा ही भारताची
हिंदी भाषा ही भारताची 'राष्ट्रीय' भाषा आहे - भारतीय लोकांना चित्रपटाचे नाव कळायला हे पुरे.
तर दुसरी 'इंग्रजी' 'आंतरराष्ट्रीय' भाषा आहे.- म्हणजे अभारतीयाला सुध्दा चित्रपटाचे नाव कळायला पुरे.
आणि तिसरी दिनेशदांनी सांगीतलेच आहे वर.
तेव्हा आणखी भाषेची गरजच काय? उगाच 'उच्चला किबोर्ड आणि लागलात बडवायला'.....?
नाव उर्दूत नसते तर फारसी
नाव उर्दूत नसते तर फारसी लिपीत असते. (आता बेटा या सिनेमाचे नाव ऊर्दूत लिहायचे तर वालिद, औलाद वगैरे लिहावे लागले असते.)>>>
अॅक्चुअली मला असे वाटत नाही. 'बेटा' (म्हणजे ब - ए - ट - आ) (ज्यांना उर्दू लिहिता येते किंवा आपण स्वतः अधिक सागू शकालच म्हणा) असे लिहायला वालिद, औलाद असे भाषांतर करण्याची गरज नाही. जसे 'वालिद, औलाद' हे आपण देवनागरीत वाचले तसे बेटा उर्दूत लिहून वाचता येईल.
हो बेफी, तेच मी म्हणतोय ते
हो बेफी, तेच मी म्हणतोय ते भाषांतर नसते तर लिप्यांतर असते. (मला हि लिपी लिहिता / वाचता येते )
माझ्या आठवणीप्रमाणे उत्तर प्रदेशच्या काही भागात हिच लिपी वापरात होती. (नीट माहित नाही, पण बहुतेक मुन्शी प्रेमचंद पण याच लिपित लिहित असत.)
बहुधा प्रेमचन्द त्या लिपीत
बहुधा प्रेमचन्द त्या लिपीत लिहीत नसावेत, माहीत नाही. लिहीत असले तर आश्चर्यच वाटेल मला तरी! पण नवीन माहिती समजल्याचा आनंदही!
उर्दू चा अर्थ 'छावणी' असा होतो. मुघलांच्या आणि पठाणांच्या भारतातील आक्रमकांना आपल्या लोकांशी बोलता यावे म्हणून त्या भाषेचा जन्म झाला. अर्थात, हा प्रतिसाद अवांतर आहे व नरेंद्र यांची माफी मागतो.
, हा प्रतिसाद अवांतर आहे व
, हा प्रतिसाद अवांतर आहे व नरेंद्र यांची माफी मागतो.
>>>>> माफी पण १४ भाषांमध्ये मागावी लागेल
'हा धागा अवांतर आहे'
'हा धागा अवांतर आहे'
उर्दूत (की फारसी?) लिहीणे
उर्दूत (की फारसी?) लिहीणे गरजेचेच नाही..... उगाचच आपलं...
धागा अवांतर>>> चातकराव,
धागा अवांतर>>> चातकराव,
"मंदार्_जोशी" साहेब बरोबर
"मंदार्_जोशी" साहेब बरोबर बोललेत.ऊर्दु किंवा फार्सिमधे नाव दाखवण्यामागे कुणाला तरी खुश करायचा हेतु असणार.ज्याची अजिबात गरज नाहि.
हिंदी भाषा ही भारताची
हिंदी भाषा ही भारताची 'राष्ट्रीय' भाषा आहे - भारतीय लोकांना चित्रपटाचे नाव कळायला हे पुरे.
तर दुसरी 'इंग्रजी' 'आंतरराष्ट्रीय' भाषा आहे.- म्हणजे अभारतीयाला सुध्दा चित्रपटाचे नाव कळायला पुरे.
आणि तिसरी दिनेशदांनी सांगीतलेच आहे वर.तेव्हा आणखी भाषेची गरजच काय? उगाच 'उच्चला किबोर्ड आणि लागलात बडवायला'.....?
"चातक"साहेब, हिंदि ही भारताची राष्ट्रभाषा नाही हे मधे टिव्हीवरच्या एका चर्चेत ऐकले होते. युपि-बिहारिंनी असे मुद्दाम पसरवले आहे असे वक्त्यांचे म्हणणे होते. एकदोन जण तर म्हणाले की सर्व १४ भाषा राष्ट्रभाषा आहेत. हिंदी सिनेमाचे नाव फक्त हिंदित द्यावे. इंग्लिश व उर्दुत देत असाल तर इतर ११ भाषात पण दाखवा.
तुम्ही एखादा पिक्चर काढा,
तुम्ही एखादा पिक्चर काढा, त्याला हव्या त्या लिपित नाव द्या..
निर्मात्याने पदरचे पैसे खर्च करुन पिक्चर काढायचा, त्यावर कुठल्या लिपित नाव द्यायचे हे मंदार जोशी कोण ठरवणार?
आता "भ"च्या लिपीत बाफ पेटणार
आता "भ"च्या लिपीत बाफ पेटणार
(No subject)
हिंदि ही भारताची राष्ट्रभाषा
हिंदि ही भारताची राष्ट्रभाषा नाही
नसेना का.. पैसा निर्मात्याचा म्हटल्यावर त्याने कुठल्याही लिपित नाव द्यावे आणि कुठल्याही भाषेत शिणेमा काढावा.. मेरे मेहेबूब ऊर्दू भाषेत होता.. आपल्याला तरी आवडला .. गांधिजीनी उर्दु आणि हिंदी भाषा मिसळून हिंदुस्तानी भाषा तयार केली.. असले काहीतरी गोडसेप्रेमी मंडळी बडबडत फिरत असतात.. ऊर्दूला विरोध हा त्याच राजकारणाचा भाग आहे...
प्रश्न चांगला आहे. पुढचा धागा
प्रश्न चांगला आहे.
पुढचा धागा कदाचित
बंगाली सिनेमाच नाव तमीळमधे का नसते
असा असू शकतो......
आंतरराष्ट्रीय स्तरावरचा धागा
आंतरराष्ट्रीय स्तरावरचा धागा
फ्रेंच सिनेमाचे शिर्षक इंग्लीशमधे का नसते ?
प्रश्न पडणं महत्वाचं...
अगदीच आचरट प्रश्न आहे... इथे
अगदीच आचरट प्रश्न आहे... इथे भाषेचा प्रश्नच येत नाही तर येतो लिपीचा प्रश्न.... आणि हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांची लिपी एकच आहे देवनागरी... ते मराठी भाषिक काय किंवा हिंदी भाषिक काय.. वाचायला येतेच...
आणि समजा जर हिंदी पिक्चर तामीळ मधे रिलीज केला तर तामीळ लिपीत नाव नक्कीच सापडेल.. शोध घेऊन बघा...
सगळ्याच सिनेमांचे नाव तीन
सगळ्याच सिनेमांचे नाव तीन भाषांमधे (लिप्यांमधे) दाखवत नसतात. आधीच्या अनेक सिनेमांत दाखवत असत, आता एक (हिंदी) किंवा दोन (हिंदी, इंग्रजी) भाषांमध्येच असतात.
बाकी धागाकर्त्याची 'पोटदुखी' कशामुळे आहे हे कळले, त्यामुळे जास्त लिहिण्यात अर्थ नाही.
प्रश्न अचूक आहे! हिन्दी
प्रश्न अचूक आहे!
हिन्दी सिनेमान्चे नाव, देवनागरी व रोमन व्यतिरिक्त अन्य लिपीत "फक्त फारसीमधेच" व तेही आवर्जुनच का असते याचे कारणाचा मागोवा घेता, पूर्वापार आजवर सिनेनिर्मितीला होणार्या वित्तपुरवठ्याच्या स्त्रोताकडे जावे लागते.
त्या हिंदी सिनेमाचे नाव देणं
त्या हिंदी सिनेमाचे नाव देणं गरजेचं होतं.. मला वाटतं देशप्रेमी नावाचा सुप्रहिट्ट (बिहारी) हिंदी सिनेमा असावा ( महाराष्ट्रात बंदी असलेला )
तो पिक्चर कोणत्या टेरीटरीत
तो पिक्चर कोणत्या टेरीटरीत चालणार त्यावर पण ते अवलंबून असेल... कारण जर तुमच्या पिक्चरसाठी भारताच्या वायव्येकडचा प्रदेश तसेच गल्फ मध्ये मागणी असेल तर तिथल्या लोकांसाठी फारसी लिपीत नाव लिहावे लागेल.. नाहीतर त्यांना कुठून कळणार पिक्चरचे नाव काय आहे ते.
प्रश्न अचूक आहे!<< लिंबूभौना
प्रश्न अचूक आहे!<<
लिंबूभौना अनुमोदन...
हिंदि सिनेमाचे नाव इतर भाषात का नसते. हा खुप महत्वाचा प्रश्न आज देशासमोर उभा आहे आणि तो प्रश्न सोडवणे, हे एकच आव्हांन आज देशासमोर आहे.
आणि तो लवकारात लवकर सोडवावा ही मायबाप काँग्रेजी सरकारला विंनती.
सबटायटल्स हा देखील गंभीर
सबटायटल्स हा देखील गंभीर प्रश्न आहे.
मला वाटतं रिलीज होणा-या प्रत्येक सिनेमात १४ भारतीय भाषा आणि प्रमुख जागतिक भाषा या सर्वांमधे सबटायटल्स असावीत असा कायदा व्हायला हवा. स्क्रीन भरून गेली तरी चालेल म्हणजे वाक्या वाक्यामधूअ अभिनय दाखवता येईल
ऊर्दु किंवा फार्सिमधे नाव
ऊर्दु किंवा फार्सिमधे नाव दाखवण्यामागे कुणाला तरी खुश करायचा हेतु असणार.ज्याची अजिबात गरज नाहि.>>> आता आला उंट डोंगराखाली!!!!!! उगाच १४ भाषात का नाही वगैरे ताकाला जाउन भांडं लपवायचे उद्योग!!!
अब आया ऊंट पहाड के नीचे....
अब आया ऊंट पहाड के नीचे.... उगाच भाषांतर करुन हिंदी , ऊर्दूवर अन्याय कशाला करताय?
टायटलचा रंग हा मुद्दा अजून कसा आला नाही? हिंदी टायटल भगव्यारंगात आणि उर्दू टायटल हिरव्या रंगात असते... हिरवा रंग्वापरुन इतर रंगावर अन्याय केल्याबद्दल जाहिर निषेद .. मायबोलीवर हिरवी स्मायली आहे, पण भगवी स्मायली नाही.. यातून विशिष्ट समाजाला गोंजारण्याचे आणिहिंदुना डावलायचे मायबोलीचे धोरण दिसुन येते. म्हणून मायबोलीचापण निषेध !
Pages