१. साधारण चार ते पाच मोठ्या संत्र्यांची साले
२. अडीच वाट्या साखर
३. चार टेबलस्पून मिल्क पावडर
४. एक वाटी काजू किंवा बदामाची पावडर
५. एक टिस्पून लिंबाचा रस
६. चमचाभर तूप
१. संत्र्यांची साले सगळे दोरे काढून कूकरमध्ये उकडून घ्यावीत.
कडूपणा उतरेल अशी भिती वाटत असेल तर सालांचा जाडसर पांढरेपणा धारदार सुरीने खरवडून घ्या. सालं उकडण्यासाठी कूकरच्या दोन शिट्या पुरतात. साले थंड झाल्यावर त्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यावी. वर दिलेल्या प्रमाणासाठी ही पेस्ट एक वाटी व्हायला हवी. पेस्टची किंचीत चव घेऊन बघा. कडसर चव असेल तर एकाऐवजी अर्धी किंवा पाऊण वाटी पेस्ट घ्या.
२. नॉनस्टीक पॅनमध्ये किंवा कढईत चमचाभर तूप गरम करून एक वाटी संत्र्याच्या सालींची पेस्ट आणि अडीच वाट्या साखर त्यात घालावी.
३. साखर विरघळून मिश्रण उकळले की त्यात लिंबूरस घालून नीट मिसळून घ्यावा.
४. नंतर काजू किंवा बदाम पावडर आणि मिल्क पावडर घालून मिश्रण एकजीव करावे.
५. गॅस मंद ठेवून मिश्रण परतावे. त्याचा गोळा फिरू लागला की गॅसवरून खाली काढून ताटात थापावा.
६. आवडीप्रमाणे बदामाचे काप किंवा वर्ख लावून सजावट करावी. हव्या त्या आकारात बर्फ्या कापाव्यात.
ही तयार बर्फी (वडी म्हणा हवंतर )
वड्यांच्या फिनिंशिंगसाठी माफी द्या.
आणि जुन्यापान्या मोबाईलच्या तिसर्या जगातील कॅमेर्याने फोटो काढलेला आहे.
१. गेल्या वर्षी मानुषीने संत्र्याचे सोप्पे सरबत लिहिले होते. त्यातली संत्र्याचे साल उकडण्याची युक्ती भारीच आवडली होती. प्रत्यक्षात ते साल उकडून त्याची पेस्ट केल्यावर त्याचा जो स्वाद आला होता तो भयंकरच आवडला होता. तीच पेस्ट इतर गोड पदार्थात वापरता येईल असं वाटून जरा एक दोन प्रयोग केले. त्यातला केक पारच फसला. ही संत्रा बर्फी मात्र पहिल्याच प्रयत्नात बर्यापैकी जमली. नंतर करून करून प्रमाण योग्य जमले.
२. ह्यात संत्र्याच्या सालीचा स्वादच इतका मस्त असतो की इतर केशर, वेलची इत्यादी स्वादांची गरज पडत नाही.
३. आता संत्र्यांचा मोसम चालू होतोय. नक्की करून पहा.
छान लागेल हे. (असाच एक ग्रीक
छान लागेल हे.
(असाच एक ग्रीक पदार्थ असतो. मिल्क पावडर वगळता कृतीही अशीच.)
मला आवडते संत्राबर्फी... फोटो
मला आवडते संत्राबर्फी... फोटो पण टाका जमल्यास
नवर्याच्या मित्राने
नवर्याच्या मित्राने नागपूरहुन संत्रा बर्फी आणली होती. प्रचंड आवडली होती. पण पुन्हा कधी कुठे मिळाली नाही आता ह्या प्रकारे करुन बघेन.
मस्तच करुन बघणार
मस्तच
करुन बघणार
वॉव!! आम का आम और गुठलियोंके
वॉव!! आम का आम और गुठलियोंके भी दाम.... संत्रे खायचे, सोलायचे व सालीची बर्फी... बहुत ही बढिया!
रेसिपी इन्टरेस्टिंग आहे! फोटो
रेसिपी इन्टरेस्टिंग आहे! फोटो द्या!
संत्रे खायचे, सोलायचे व
संत्रे खायचे, सोलायचे व सालीची बर्फी>>>
अरुंधती, अय्या! खाऊन झाल्यावर मग कसे बरे संत्रे सोलणार?
जमलं तर सोमवारी फोटो टाकते.
नागपूरची (बहुतेक हल्दीरामची)
नागपूरची (बहुतेक हल्दीरामची) खाल्ली होती. अगदी नागपूरातल्या दुकानातच.. पण त्यात संत्रेच नसते. कोहळ्यापासून बनवतात ती. भरपूर रंग आणि इसेन्स घातलेला असतो.
त्यापेक्षा कि चांगली, कुठलाच कृत्रिम रंग वा इसेन्स घालायची गरज नाही.
संत्र्याची साले टाकायचे
संत्र्याची साले टाकायचे जीवावर येते. आता असे वापरुन पाहायला पाहिजे.
खुपच छान रेसिपी.. एकदा नक्कीच
खुपच छान रेसिपी.. एकदा नक्कीच करुन पाहायला आवडेल .:)
मंजूडी सोप्पी आणि छान रेसिपी
मंजूडी सोप्पी आणि छान रेसिपी आहे. साल कडू लागत नाही का ग ?
जागू, सालीचे धागे-दोरे
जागू, सालीचे धागे-दोरे काढल्याने आणि शिजवल्याने कडूपणा येत नाही.
मंजूडी, काय सही रेसिपी गं.
मंजूडी, काय सही रेसिपी गं. संत्राबर्फी अशा प्रकारे करता येईल हे कधी डोक्यातही आलं नसतं. नक्की करुन बघणार
बर मग आता करूनच बघते. धन्स
बर मग आता करूनच बघते. धन्स मंजूडी.
मस्त. फोटो नक्की टाक. सवडीने
मस्त. फोटो नक्की टाक. सवडीने करुन बघणेत येईल.
कृपया धागे दोरे काढलेल्या
कृपया धागे दोरे काढलेल्या सालीचाही फोटो टाका !!! पाकृ मस्तच!! करुन बघेन!!
भारी. नक्की करुन बघणार.
भारी. नक्की करुन बघणार.
मस्त्..करुन बघणार.
मस्त्..करुन बघणार.
मस्तं पाकृ मंजू!
मस्तं पाकृ मंजू!
मंजु, या दिवाळीत मी ईथे वाचुन
मंजु, या दिवाळीत मी ईथे वाचुन केली होती. सेम रेसीपी आहे ! छान होते. मी त्यात खवा घातला होता. त्यामुळे मिल्क पावडरचा जो एक टिपीकल वास येतो तो नाही येत.या रेसीपीत रिकोटा चीज घातल आहे.
अशी करतत बर्फी? सालीची करत
अशी करतत बर्फी?
सालीची करत असतील हे कधी डोक्यातच नाही आले. थँक्स मंजू.
मस्त पाकृ. करायला हवी.
मस्त पाकृ. करायला हवी.
बाब्बो संत्र्याच्या सालीचा
बाब्बो संत्र्याच्या सालीचा वापर.. ग्रेट आहेस! फोटो टाक आणि खायला कधी येउ ते पण सांग.
धन्यवाद.
मस्त रेसीपी. करुन बघणार.
मस्त रेसीपी. करुन बघणार.
मस्त रेसिपी.. करून बघेल.
मस्त रेसिपी.. करून बघेल.
दिनेशदा, कोहळ्याची वडी कशी
दिनेशदा, कोहळ्याची वडी कशी करतात ह्याची माहीती देऊ शकाल का? मला कोणी आवळा "घेवून" कोहळा दिला तरी फसल्यासारखे वाटेल कारण त्या कोहळ्याचे काय करतात हेच नाही माहीत. मंडईत कोहळा बर्याच ठिकाणी दिसला परवा..संत्रा बर्फी कोहळा वापरून करायची इच्छा आहे. पण तो घरी चिरता येतो का? की फणसासारखे तेही स्किल चे काम आहे..प्लीज जरा सांगाल का?
मस्त रेसिपी!
मस्त रेसिपी!
आं? संत्रा बर्फीत संत्र्याचा
आं? संत्रा बर्फीत संत्र्याचा रस नसतो? मला वातले संत्र्याचा रस घालून त्याला सॉलिड करण्याचे पदार्थ टाकून वड्या बनवत असतील....
नागपूरच्या हल्दीराममध्येही संत्रारस नसतो? हे भयंकर आहे...
सुमेधा, कोहळा कुठ्ल्याही
सुमेधा,
कोहळा कुठ्ल्याही भाजीसारखा सहज कापता येतो. पण तो नेहमी मोठाच (जून)
घ्यायचा असतो.
त्याला किसताना पाणी सूट्ते.
त्याचा पेठा, सांबार, सार, सांडगे, खीर असे बरेच प्रकार करता येतात.
कुठल्याही कडधान्याबरोबर चांगला लागतो.
रोचीन, आता पुन्हा ही बर्फी
रोचीन, आता पुन्हा ही बर्फी करेन तेव्हा प्रत्येक पायरीचे फोटो टाकेन इथे.
अमया, ती भानसची पाकृ मस्त आहे एकदम. बर्फी ऐवजी छोटे पेढे वळून पिठीसाखरेत घोळवायची कल्पना मस्त आहे.
बाजो, संत्र्याच्या चवीपेक्षा त्याचा स्वादच महत्त्वाचा असतो. आणि तो सालीतच असतो. बर्याच पाककृतींमध्ये स्वादासाठी संत्र्याची साल, लिंबाची साल किसून वापरतात. मिनोतीची एक खोबर्याच्या बर्फीची पाककृती आहे, त्यात तिने संत्र्याचा ताजा रस वापरला आहे.
Pages