Submitted by भरत. on 1 November, 2011 - 01:41
हितगुज दिवाळी अंक २०११ वाचून झाला, आता बाकीच्या अंकांकडे मोहरा वळवुया
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हितगुज दिवाळी अंक २०११ वाचून झाला, आता बाकीच्या अंकांकडे मोहरा वळवुया
मटाच्या अंकाने घोर निराशा
मटाच्या अंकाने घोर निराशा केली. सुनीताबाईंचा कुमार गंधर्वांवरचा लेख (जो त्यांच्या पुस्तकात आधी वाचला होता), हृदयनाथ मंगेशकरांचा आशावरचा आणि व्यंकटेश माडगुळकरांचा बनगरवाडीबद्दलचा लेख सोडला तर बाकी सगळे फुकट.
तळवलकरांचे चार लेख आहेत. किती थंड. पुलंवरच्या मृत्यूलेखात 'पी एल यांचे' हा प्रयोग (पुन्हा पुन्हा ).अर्थात मी मटाचा वाचक नसल्याने त्यांची शैली माझ्यासाठी नवीन आहे.
किस्त्रीममध्ये ह मो मराठे आणि श्यामसुंदर मुळे यांनी गेल्या अंकापासून पुढे (पुढे म्हणणे चूक, आहेत तिथेच) चालू केले आहे. संजय सोनवणी यांचा 'पुरोगामी महाराष्ट्राचा खरा चेहरा' हा लेख खूप आवडला. संतुलित , संयमी तरीही परखड.
भारतीय तत्त्वज्ञान, वैदिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड लावणारे तीन लेख आहेत.
पद्मगंधा : पद्मगंधा हा
पद्मगंधा : पद्मगंधा हा चोखंदळ वाचकांसाठीचा दिवाळी अंक आहे इति संपादकीय. कमल देसाई यांच्या संजय आर्वीकर यांनी घेतलेली मुलाखतीचा दुसरा भाग (पहिला भाग २००३च्या अंकात) यात आहे. संपूर्ण वाचण्याएवढा पेशन्स माझ्याकडे नसल्याने मी चोखंदळ वाचकात मोडत नसल्याचे समाधान झाले.
नागनाथ कोतापल्ले, अर्चना अकलूजकर आणि नीलिमा बोरवणकर यांच्या कथा आणि कुमार नवाथेंचा यशवंत देव आणि कुमार केतकर यांच्यावरचा लेख आवडले.
अंकाचा विशेष पत्रसंस्कृती : वाङमयीन पत्रव्यवहार हा आहे. पण अत्यंत विस्कळीत मांडणीमुळे धड वाचला नाही.
लोकमत पॉवर ही थीम घेऊन अतिथी संपादक शोभा डे यांनी सामर्थ्याचा शोध घेतला आहे. त्यांच्या शब्दांत या अंकाचे संपादन करताना त्यांनी रेघेबाहेर पाऊल घालण्याची हिंमत दाखवली आहे.
अमिताभ बच्चन, निता अंबानी, नंदन निलेकणी, डॉ रामचंद्र गुहा, अरुण टिकेकर, कुमार केतकर, सुधा मूर्ती, अतुल कुलकर्णी अशा वजनदार नावांनी अंक सजला आहे. बिग बीने संस्कारांच्या पॉवर बद्दल लिहिले आहे.
अंकाचे निर्मितीमूल्य त्यातल्या भरपूर जाहिरातींना साजेसे आहे.
Pages