मी राधिका...

Submitted by सत्यजित on 10 January, 2008 - 08:39

ती...
गुपित मनाचे
कुपित मनाच्या
मी लाजेने जपले
ती साक्ष मनाची
अप्रोक्ष मनाच्या
कुणी कसे ओळाखले?

तो..

जरी आणुन आव
डोळ्यात भाव
तुझ्या कधी ना लपले
हे बंध कशाचे?
का डोळ्यात कुणाच्या
दिसे स्वप्न आपुले

तू भासवले ना
मला कधी जे
ते मला गं होते कळले
ना जाणुन काय
आपसूक पाय
त्या वळणा वरती वळले

रेशिम नाजुक
रेशिम साजुक
नाते जाते विणले
का कुणास ठाउक
होता भावुक
मन गाणे तुझे गुणगुणले

नयनांस आस
कानास भास
सारे तुझेच होती
क्षण विरहाचे
क्षण मिलनाचे
मनात झाले मोती

शिंपला मनाचा
कधी मोर घनाचा
किती हा रुपे घेतो
सोडुन कावा
वाजवित पावा
कान्हा राधेचा होतो.

-सत्यजित.

गुलमोहर: 

लय, शब्दं सगळच सुंदर, सत्यजितम!
पुन्हा पुन्हा वाचतेय!
छानच!

दाद ला अनुमोदन. परत परत वाचावी इतकी छान जमली आहे.

मीटर कुठे कुठे गोचि करतंय बॉ. पण लयीची मांडणी लई भारी !

वा! छान गीत.
चाल लावली आहेस का?

Back to top