Submitted by दिनेश. on 14 November, 2011 - 00:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३ दिवस
लागणारे जिन्नस:
क्ष
क्रमवार पाककृती:
क्ष
वाढणी/प्रमाण:
चार जणांसाठी
अधिक टिपा:
क्ष
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पदार्थ तर एकदम मस्त! पण
पदार्थ तर एकदम मस्त! पण नेहमीसारखा सुटसुटीत नाही वाटत. कोणी करून दिला तर खायला लगेच तयार .:)
दिनेशदा आमच्या कडे रेडीमेड
दिनेशदा आमच्या कडे रेडीमेड तांदळाचे पीठ मीळते....त्यात ही जाडसर, बारीक (नाईस) असे प्रकार मिळतात.... मग तेवा मी नक्कि कोणते पिठ वापरु.... आणि किती दिवस भिजवु
मस्त! आई करायची तांदळाच्या
मस्त!
आई करायची तांदळाच्या फेण्या. मस्त गरम गरम लुसलुशीत फेणी मोदकपात्रातुन काढल्या रे काढल्या की फस्त व्हायच्या
याच्याबरोबर मस्त फोडणीच्या मिरचीचे लोणचे आणि दही किंवा ताजे लोणी... स्वर्ग!!!!!
आईकडे एक फेण्या लावायचा स्टॅंड होता. त्यात अॅल्युमिनीयमच्या पातळ ताटल्या होत्या. एका वेळेस ५-६ फेण्या व्हायच्या.
हो लाजो, तो स्टॅंड असला तर
हो लाजो, तो स्टॅंड असला तर काम अगदी सोपे होते.
मयूरी, पिठ बारिक वापरायचे. ते २४ तास भिजवले तर चालेल. त्यात रवा आणि साबुदाणा घालावा लागेल. ते मिश्रण एकदा मिक्सरमधून फिरवावे लागेल. ओरिजीनल चव नाही येणार पण चालू शकेल.
हम्म....एकदम तोंपासु दिसतोय
हम्म....एकदम तोंपासु दिसतोय हा पदार्थ!
करुन पहायला हवा.
दिनेशदा ..... घ्या .......
दिनेशदा .....
घ्या ....... परीक्षा घ्या !!! एक तर असे नवनविन पदार्थ आणी वर फोटो सुद्धा ?
Any way .... मला हे अप्पमच्या सारखे दिसले, मऊ लुसलुशीत.
केरळी अप्पम असेच करतात. तांदूळ दोन दिवस भिजवून ठेवून, आंबवतात मग बारीक वाटून घेतात. ( आंबवण्या साठी त्यात ताडी घालतात.)
मग अप्पम पीठ तव्यावर घालून तवा फिरवतात जेणे करून पीठ चहूबाजूने लागेल व अखंड अप्पम तयार होइल, (अप्पम तवा वेगळा असतो, सर्व साधारण छोट्या कढाई सारखा)
अप्पम थोडेसे गोडसर व मऊ लुसलुशीत असतात. चिकन स्टू किंवा अंडाकरी बरोबर देतात.
हो विवेक, हो त्यासाठी मनगट
हो विवेक, हो त्यासाठी मनगट मजबूत लागते. आणि त्याला जाळी पण छान सुटते.
त्या मानाने हा सोप्पाय !
मस्त पाककृती..
मस्त पाककृती..
आमच्याकडे पापड्यांचा ६
आमच्याकडे पापड्यांचा ६ ताटल्यांचा स्टेंड होता त्यावर तांदुळपिठी [तसेच मैदा ]रात्री भिजवुन त्याच्या मीठ,तीळ घालुन कूकर मधे १० मिनिटे वाफवुन आई करत असे..त्यातल्याच काही मिश्रणात ती वाटलेली हिरवी मिरची ,जिरे घालुन वाफवुन त्यावर कच्चे गोडे तेल घालुन आम्हाला खायला देत असे..उन्हाळा [पापड्यांचा सीझन ]सोडुन इतर वेळेला ही करत असे..आवडता नाश्ता असे आमचा..बरोबर आंबा/लिंबु लोणचे.....बालपणीचा काळ सुखाचा..
नीर डोश्यासारखं आहे का हे?
नीर डोश्यासारखं आहे का हे?
हे खाल्लं होतं एका
हे खाल्लं होतं एका मैत्रिणीकडे. या फोटोतल्यापेक्षा अर्ध्या जाडीच्या लुसलुशीत मऊसूत फेण्या, वरून तूप आणि बरोबर चटणी... ओहोहो स्वर्ग..
त्या स्टॅण्डवर केल्या असतील तर एकदम बर्याच होतात.
पण च्यायला पेशन्सचं काम आहे.
सहि.....आज तन्दुळ भिजत पडतिल
सहि.....आज तन्दुळ भिजत पडतिल नक्की ....कसे झाले ते सन्गिनच ....
हो नीधप, माझ्याकडे बर्याच
हो नीधप,
माझ्याकडे बर्याच ताटल्या नसल्याने आळस केला नाहीतर या अर्धपारदर्शकच होतात. अक्षरशः विरघळतात तोंडात.
साध्या, नेहमीच्या वापरातील घटकातून मस्त रुचकर पदार्थ तयार होतो.
दक्षिणा, त्यापेक्षा भारी प्रकरण आहे हे. कोल्हापूरच्या सालपापड्या माहित असतीलच.
स्टँड नसेल तर कुकरात एकावर एक
स्टँड नसेल तर कुकरात एकावर एक ताटल्या ठेवायच्या का? कन्फ्युजन आहे. दिनेशदा, कुकरातली रचना सांगा प्लिज.
इडलीच्या कुकरमधे करायचं असेल
इडलीच्या कुकरमधे करायचं असेल तर इडली स्लॉटमधे हे बॅटर टाकलं तर होल्समधुन खाली सांडेल का? मला साध्या कुकरमधे कसं करायचं कळतच नाहीए. म्हणजे प्लेटस ठेवायच्या कशा? मी हे करणार नाहीच बहुतेक. पण आपली उत्सुकता.
मला वाटतं छोट्या प्लेटस एका
मला वाटतं छोट्या प्लेटस एका लंगडीत एक अश्या वाफवू शकतो. कुकरात जेवढ्या लंगड्या मावतील तेवढ्या प्लेटस. किंवा लंगड्याच उलट्या टाकायच्या. (छे उगाच कैच्याकै कल्पनाविलास करत बसण्यापेक्षा गप बसलेले बरे.. )
माझ्या डोळ्यासमोर पण इडलीचे
माझ्या डोळ्यासमोर पण इडलीचे साचे स्टँडात उलटे ठेवायचे असं काहीसं दृश्य तरळतंय
वरच्या फोटोत दाखवली आहे तेवढी मोठी करायची असेल तर मला ढोकळा पात्रात करावी लागेल.... पण एकावेळी एकच होईल.
दिसतंय तरी मस्त. पण वाफवायचे
दिसतंय तरी मस्त. पण वाफवायचे काम कटकटीचे आहे..
(मला लाजोने सुशीसाठी केलेल्या फेण्या आठवल्या.. एकदम पारदर्शक)
फेण्या स्टॅण्डचा फोटो कुणी
फेण्या स्टॅण्डचा फोटो कुणी टाकेल काय?
लंगडी म्हणजे काय? पातेलं का?
लंगडी म्हणजे काय? पातेलं का? जर एका पातेल्यावर एक प्लेट ठेवली तर दुसरं पातेलं कसं ठेवायचं? का पातेल्यापेक्षा छोटी घेवुन आत ठेवायची? फारच किचकट प्रकार वाटतो आहे फेणी बनवणं. रिवर व्ह्यु मधे जावुन अप्पम खाणं जास्त सोप्पं पडेल.
पुण्यात रिवर व्ह्यु सोडुन अजुन कुठे छान अप्पम मिळतात?
खुप च छान आहे हा पदार्थ
खुप च छान आहे हा पदार्थ दिनेशदा.. पण मेहनत पण आणि वेळ्खाउ पण वाटतोय.. एकदा नक्की
करुन बघणार आहे पण .:)
खुप च छान आहे हा पदार्थ
खुप च छान आहे हा पदार्थ दिनेशदा.. पण मेहनत पण आणि वेळ्खाउ पण वाटतोय.. एकदा नक्की
करुन बघणार आहे पण .:)
खुप च छान आहे हा पदार्थ
खुप च छान आहे हा पदार्थ दिनेशदा.. पण मेहनत पण आणि वेळ्खाउ पण वाटतोय.. एकदा नक्की
करुन बघणार आहे पण .:)
आम्ही अशा फेण्या पळसाच्या
आम्ही अशा फेण्या पळसाच्या पानावर करतो. आणि त्याबरोबर साईचे दही....
लंगडी म्हणजे ज्यात डाळ किंवा
लंगडी म्हणजे ज्यात डाळ किंवा भात लावतात कुकरात ते भांडं.
प्लेट त्याच्या आतल्या आकाराची घ्यायची. किंवा सरळ लंगड्याच उलट्या म्हणजे बंद बाजू वर अश्या लावत जायच्या.
नी, थँक्स गं. म्हणजे
नी, थँक्स गं. म्हणजे 'लंगडी'चा अर्थ सांगण्यासाठी आणि त्याहुनही जास्त या मस्त आयडियेसाठी. अगं माझ्या छोटुश्या कुकरमधे, तळहाताच्या साइझचे छोटु छोटुसे डबे आहेत, त्यामधे हे बॅटर टाकलं तर सहजी एकावेळेस तीन, अशा फेणीज बनवता येतील.
करून बघ. मला खात्री नाहीये
करून बघ.
मला खात्री नाहीये हा. पचका नाही झाला तर मग सांग इथे.
मग मी करेन..
सरळ लंगड्याच उलट्या म्हणजे
सरळ लंगड्याच उलट्या म्हणजे बंद बाजू वर अश्या लावत जायच्या.>>>> कुकरमध्ये सगळ्यात खाली ठेवलेली लंगडी झाकली जाईल ना? मग त्यावरील फेणी शिजेल का?
तोच प्रश्न खरंतर मलाही आहे.
तोच प्रश्न खरंतर मलाही आहे. की लंगड्या वापरल्या तरी खालच्या फेण्या झाकल्या जाणार मग त्यांचं काय होणार.
)
उलटी चाळणी, त्यावर प्लेट परत त्यावर बसणारी उलटी चाळणी असे केले तर... (आता खरंच आवरा..
त्यापेक्षा इडलीच्या
त्यापेक्षा इडलीच्या साच्यांमध्ये करून पाहिल्यास प्रयोग फसण्याची शक्यता कमी आहे
(आपल्या कल्पनाविलासांना वैतागून कोणीतरी फेण्यास्टॅन्डाचा फोटो टाकेलच आता.)
Pages