तांदळाच्या ओल्या फेण्या (फोटोसह)

Submitted by दिनेश. on 14 November, 2011 - 00:17
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ दिवस
लागणारे जिन्नस: 

क्ष

क्रमवार पाककृती: 

क्ष

वाढणी/प्रमाण: 
चार जणांसाठी
अधिक टिपा: 

क्ष

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

तीन-पाच डब्यांचा टिफीन असतो त्यातले डबे काढुन टाकायचे आणि खाचात बसतिल अश्या ताटल्या घ्यायच्या आणि त्यावर फेण्या लावता येतिल कदाचित Happy

उमा जोशी, पळसाच्या पानावर करतात त्या पानग्या. हळदीच्या पानावर पण लावतात. एक छान फ्लेवर येतो अश्या पानग्यांना Happy कोकणातला ब्रेफा Happy

लाजो, खाचेत डबा बसेल, झाकणं कशी बसतील? झाकणं तर डब्याच्या खाचेत बसतात. (अब हम फेण्या करकेही रहेगी)

फोटो नाही पण रेखाटन असे आहे.

stand.JPG

माझ्या आईची पद्धत, एका मोठ्या भांड्यात पाणी घालून त्यावर कापडाचा दादरा बांधायचा आणि ते पाणी उकळत ठेवायचे. त्या दादर्‍यावर पिठाच्या ३ ताटल्या पसरुन ठेवायच्या आणि त्यावर झाकण ठेवायचे. ३/४ मिनिटात शिजतात.

कूकरमधे चाळणी उलटी ठेवून, त्यात एकमेकात न अडकणार्‍या थाळ्या ठेवता येतात.

माझी पद्धत, झाकण असलेल्या पॅनमधे पाणी उकळत ठेऊन, पिठाची ताटली ठेवली. तिला उंच काठ होते त्यामूळे ती तरंगत राहिली. मग त्यावर काचेचे झाकण ठेवले.

खटाटोप आहे खरा, पण वेळ मजेत जातो.

लाजो, खाचेत डबा बसेल, झाकणं कशी बसतील? झाकणं तर डब्याच्या खाचेत बसतात. (अब हम फेण्या करकेही रहेगी)>>>> मी कुठे म्हंटल झाकण बसवायची?? त्या खाचेत छोट्या ताटल्या बसवायच्या..... सेम दिनेशदांनी चित्र काढलय तशी अरेंजमेंट होइल.

आपल्या कल्पनाविलासांना वैतागून कोणीतरी फेण्यास्टॅन्डाचा फोटो टाकेलच आता.<<<
फेण्यास्टॅण्डशिवायच्या यशस्वी उपायांचा फोटो टाकावा म्हणून सगळे कल्पनाविलास चालू आहेत खरंतर. Happy

लाजो, तो डब्यांचा स्टॅण्ड उंच असतो की गं. कुकराचं झाकण वरच्यावर राहील.. Happy

नी, कुकरमधे नाही लावायचा.. मोठ्या पातेल्यात लावायचा...

अजुन एक आयडिया.... बांबु स्टीमर असतात त्यात एका वेळेस २-३ छोट्या पसरट ताटल्या ठेऊन करता येइल ....पण छोट्या छोट्याच फेणुटल्या होतिल Proud यात २-३ टीयरचे स्टीमर पण मिळतात त्यात करता येतिल.

एलेक्ट्रिक स्टीमर असेल तर त्यातदेखिल होतिल Happy याला सुद्धा २-३ टीयर्स असतात.

त्या खाचेत छोट्या ताटल्या बसवायच्या>>> ओह्हो! समजलं.. आणि चित्र पाहिल्यावर अजून छानच समजलं. Happy

मी इडलीपात्र वापरणार Happy

stand.jpg

आईकडचा फेण्यांचा स्टॅंड साधारण असा दिसायचा. यात मधे पातळ अल्युमिनीयमच्या ताटल्या होत्या. आणि आपल्या इडली पात्राच्याच उंचीचा होता साधारण....

मस्त.
हे लहानपणी खुप खाल्ले आहे. ताजे-ताजे गरम गरम पण आणि वाळवुन नंतर तळुन पण.
आमच्या कॉलनित कुणाकडेतरी स्टँड होता, तोच सगळ्याघरी फिरायचा Happy

ढोकळा स्टँडसारखंच आहे की हे पात्रं.
मंजू, माझ्याकडे आहे ढोकळा स्टँड. तुला पाहिजे असेल तेव्हा तुला देण्यात येईल. पोळपाट लाटणं घेऊन शेजारी पापडाला गेल्यावर ५-६ लाट्या मिळतात तसं ढोकळा स्टँडबरोबर अर्धी फेणी मिळेलच Wink

हेहेहे फेण्यापेक्षा त्या कशात करायच्या याचीच चर्चा मस्त रंगलिये Happy

बायदवे - मी लहान असताना (कोणे एके काळी - असे म्हणावे लागत आहे Sad ) आम्ही पातेल्यात पाणी ठेवायचो ते उकळले की, त्यावर १ ताटली झाकण ठेवतात तसे झाकयचो. त्या आधी ताटलीच्या खालील बाजुला हे बॅटर डोशासारखे पसरवुन पटकन ती बाजु वाफेवर झाकायचो.

१-२ मी. मधे ताटली काढली की ती फेणी, चाकु वा चक्क सुईने उचकटली की संपुर्ण सुटायची मग ती तोंडात वा कागदावर वाळवायला जायची. तेच का हे?

तसे असेल तर १ पातेले व त्यावर फिट बसणार्‍या ताटल्या पुरेशा आहेत यासाठी Happy

आमच्याकडे आई एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवुन त्यावर एक कापड बांधायची, जरा खोलगट पण भांड्यातल्या पाण्याला लागणार नाही असे, त्यात २-३ छोट्या ताटल्यात पीठ घालुन वरुन मेन पातेल्यावर एक झाकण ठेवायची.. दिनेशदांनीही तसं लिहीलंय.

मस्त प्रकार आहे. (पण खटपटीचा आहे.) फोटो फारच तोंपासू दिसतोय.

दिनेशदा, मोदकाचं तयार पीठ मिळतं ते वापरून करता येईल का?

डोरेमेसा, थाई राईस वापरता येईल. तांदळाला चिकटपणा हवा.
मामी, नक्कीच वापरता येईल. मोदक उत्तम वळतील अशाच तांदळाचे केलेले असते ते.

इडली पात्रात इडली च्या साच्यांमधे अगदी पातळ थर देउन करता येतील का?
तसेच दिनेशदा हे तयार केलेले बॅटर कीती दिवस टिकते?
आणि तुम्ही मोमोज ची कल्पना दिली आहे ती पण जरा सविस्तर सांगता का?
आधी खाल्ला नाहीये पण कॄती पाहुन करावसे वाटते आहे. प्लिज दिनेश्दा सगळे सविस्तर सांगा ना?

इतकी वाफ स्टँड कसा असावा व कश्या फेण्या उकडणार ह्यावरच घातली तर फेण्या वाफणार कश्या? Wink

ह्या घ्या ढोकळा स्टँड, चार, सहाचा सुद्धा मिळतो, असा

असे स्टँड आणून किचनात जागा अडवा. फेण्या मात्र सहा महिन्यातून एकदाच करा..(फु. स.)

निर्मयी,
इडलीचे साचे खोलगट असल्याने सगळे पिठ मधे जमा होईल.
मोमोजसाठी मात्र इडलीचे साचे वापरता येतील.
सारणाचे साहित्य तयार करुन ते साच्यात ठेवायचे. आणि सारण
जेमतेम झाकेल एवढेच पिठ त्यावर टाकायचे. आणि इडलीप्रमाणेच
वाफवायचे. साच्यातून निखळून काढल्यावर, त्यावर चिली सॉस
घालून खायचे. इडलीचा साचा मात्र सच्छिद्र नसावा.

दिनेश ----- मी करुन पहिल ..एक्दम झकास .....मी इडली पत्रात केले एक - एक ..पण एकदम सही ......

Pages