The most awaited music drama of the year is finally released... "रॉकस्टार" हा म्युझिक ड्रामा तर झालाय पण ती एक प्रेमकथा आहे. आणि त्यात एका रॉकस्टारची कथा फार कमी आहे. एक कोणतीही जनरल लव्ह स्टोरी म्हणून खपून गेली असती (ज्यात हिरो पोटापाण्याचा उद्योग म्हणून गायक आहे.. ) फिल्मविषयी चांगली गोष्ट म्हणजे म्युझिक. गाणी पहिल्यांदा ऐकली तेव्हा अपेक्षाभंग झाल्यासारखा वाटलेला. अस वाटत होतं की Rockstar music is lacking of rock पण फिल्म पाहताना फक्त म्युझिकच रॉकचा फील देतं. कारण मूळ कथेत फारसा दम नाही. एक चांगला विषय आणि इम्तियाज सारखा दिग्दर्शक असताना कथा खूप चांगल्या पद्धतीने मांडली जायला हवी होती. जे झालेलं नाहीये. मुळात नायकाचं संगीताविषयीचं प्रेम, रॉकस्टार बनण्याची इच्छा, त्याचं मध्यमवर्गीय असणं यातली कोणतीच गोष्ट ठळकपणे व्यक्त होत नाही. बर्र, पूर्वायुष्य जाऊ दे पण त्याचा नंतरचा पण संघर्ष नीट मांडला न गेल्यामुळे त्याचं अग्रेसिव्ह होणं पण पटत नाही. त्याचा आधीच्या आयुष्यातला इनोसन्स दाखवायला रणबीरला जमलं नाही. मतिमंद वाटतो. त्यामानाने नंतरचा अभिनय बराय..(कदाचित तो त्याच्या स्वभावाच्या जवळ जाणारा असावा.. ) त्याचं हीरविषयीचं प्रेम जसं व्यक्त झालय तसं त्याचं संगीताविषयी पण व्यक्त व्हायला हवं होतं. दोघांची केमिस्ट्री चांगली आहे पण कथेत त्यांच्या प्रेमाची खोलीदेखिल नीट आली नाहीये. नातं बांधलं जातानाचा आणि घट्ट होतानाचा काळ तो इंपॅक्ट सोडत नाही आपल्यावर. आता नर्गिस फाकरीविषयी, इम्तियाजला परदेशी नायिकांमध्ये काय इंटरेस्ट आहे हे एक कळत नाही.. त्याला काश्मिरी ब्युटीच वापरायची होती तर आपली (?) कॅट काय वाईट होती? आणि नाही म्हणायला बॉलीवूडमध्ये इतकी वर्षे काढल्यावर थोडा फार अभिनय करते ती. त्यामानाने नर्गिस म्हणजे काहीच नाही. दिसायला पण कॅटसारखी नाही, नाचताही येत नाही, अभिनयही नाही.. संवाद असायला हवे तितके फाडू नाहीत. पण चांगलं संगीत आणि तेही मुबलक वापरल्यामुळे चित्रपट बघू शकतो आपण शेवटपर्यंत. (पावणेतीन तास..) इर्शाद कामिलचं लिरीक्स पण भारी. भारी अशा अर्थी की एका सिनेमाचं संगीत म्हणून जे असतं त्यापेक्षा प्रयत्नपूर्वक ते वेगळं ठेवायला चांगलच जमलय त्यांना. बाकी, शम्मी कपूर ला बघून भरुन आलं मला तरी. कथानकाला वेग आहे. १४ गाणी असूनही जास्त वाटत नाहीत हे विशेष.
एकूणातच चित्रपट एकदा पाहू शकतो पण एका रॉकस्टारची कथा म्हणून नाही तर एक म्युझिकल लव्ह स्टोरी म्हणून. आणि म्हणायचंच झालं तर चित्रपटाचे खरे रॉकस्टार आहेत रेहमान आणि कामिल..
रॉकस्टार
Submitted by मी मुक्ता.. on 12 November, 2011 - 11:19
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद........ (वेळ आणी पैसा
धन्यवाद........
(वेळ आणी पैसा वाचवल्या बद्द्ल)
१४ गाणी असूनही जास्त वाटत
१४ गाणी असूनही जास्त वाटत नाहीत हे विशेष. >>>> हे नाही पटलं. सेकंड हाफमध्ये गाणी थांबत किंवा संपतच नाहीत !! शिवाय फार लाऊड वाटली काही काही ठिकाणी.. डोक चढलं अक्षरशः.
शम्मी कपूरला बघून छान वाटलं खूप.. ! रणबीरने काम चांगलं केलय.. पहिला हाफ ठिक आहे.. पण दुसरा हाफ फारच ताणलाय !
इथला प्रतिसाद बदलत आहे. गाणी
इथला प्रतिसाद बदलत आहे.
गाणी हळु हळु आवडायला लागली आहेत. ( थोडक्यात मुरायला लागली आहेत )
वेळ आणी पैसा वाचल्या
वेळ आणी पैसा वाचल्या बद्द्ल... धन्यवाद.
आणि म्हणायचंच झालं तर
आणि म्हणायचंच झालं तर चित्रपटाचे खरे रॉकस्टार आहेत रेहमान आणि कामिल..
आणखी एक नाव अॅड करतो- मोहित चौहान. जवळपास प्रत्येक गाणे त्यानेच म्हटलेले आहे.
सिनेमाविषयी माझे मत नंतर सविस्तर लिहितोच, पण तूर्त सिनेरसिकांना विनंती आहे की त्यांनी (वेळ आणि पैसे वाचवण्याच्या नादात) एखादा 'कंसेप्ट' मुव्ही चुकवू नये. सिनेमा पाहूनच आपल्या वेळ आणि पैशाच्या विनियोगाचे गुणोत्तर ठरवावे.
बाकी सगळीकडे बरा म्हणाले
बाकी सगळीकडे बरा म्हणाले होते.
गाणी निदान ऐकायला ठिक वाटली.
ए आर रेहमानचे म्युझिक
ए आर रेहमानचे म्युझिक सुरुवातीस कधीच अपील होत नाही. ते जसजसे मुरते तसे ते आवडू लागते...
नर्गिस फाक्रीच्या अभिनयाबद्दल
नर्गिस फाक्रीच्या अभिनयाबद्दल तर चांगले लिहुन आलेय बर्यचश्या रिव्ह्युज मध्ये.... कतरिना आणि सोनम कपूर यांच्याशी दिसण्यात साधर्म्य पण अभिनयात दोघींपेक्षाही वरचढ असे काहीसे!
ए आर रेहमानचे म्युझिक
ए आर रेहमानचे म्युझिक सुरुवातीस कधीच अपील होत नाही. ते जसजसे मुरते तसे ते आवडू लागते...>>> +१
ए आर रेहमानचे म्युझिक
ए आर रेहमानचे म्युझिक सुरुवातीस कधीच अपील होत नाही. ते जसजसे मुरते तसे ते आवडू लागते...
>> खरंय. पण रॉकस्टारची गाणी अतिच बोर वाटली. बघुया किती वेळ लागतो मुरायला ते
>>पण रॉकस्टारची गाणी अतिच बोर
>>पण रॉकस्टारची गाणी अतिच बोर वाटली.
ऐकत रहा. जब्बरदस्त गाणी बनवली आहेत. एखाद्या पक्ष्याच्या उडण्याच्या लयीत बनवलेले "फिरसे उड चला" किंवा 'कुन फाया कुन' कव्वाली , रागभरोसे केलेले साड्डा हक, थोडेसे मेहिकन स्टाईलचे हवा हवा.
नादान परिंदे आणि साड्डा हक [ओरियांथीने वाजवलेले] मधले गिटारचे पिसेस आणि ड्रम्स जबर्या आहेत.
आज रॉकस्टार पाहिला. महान
आज रॉकस्टार पाहिला. महान चित्रपट आहे. मला प्रचंड आवडला. कुठलाच भाग नको होता, कुठलेही सिन्स नसतील तरी चालतील असे वाटले नाही. सिनेमोटोग्राफी उत्तम. गाणी चित्रपट पहाताना ऐकली तर जास्त उत्तम वाटतील. त्यांना बॅग्राउंड आहे. रहेमानचे म्युझिक जबरदस्त आणि गायकही महान. गिटारचे पिसेस खरच मस्त आहेत.
रणवीरला या चित्रपटासाठी अवॉर्ड मिळायला हरकत नाही. त्याच्या करीअर मधला हा चांगला माइलस्टोन ठरावा. नर्गीस मस्त दिसलीये. खूप इनोसन्ट. तिच्या रोल मध्ये सूट होते ती.
गाणी फार छान वाटलीत ! फारशी
गाणी फार छान वाटलीत ! फारशी अपेक्षा न ठेवता बघा असं सगळे मित्र म्हणत आहेत..
नंद्या + १.
' रॉकस्टार'ची गाणी खूप
' रॉकस्टार'ची गाणी खूप आवडलीत.रेहमानने प्रत्येक मूडमधलं गाणं द्यायचा प्रयत्न केलाय. भारतात रॉक संस्कृतीला अजूनही हिप्पींचं फ्यॅड म्हणून आकसाने बघितलं जातं तो आकस दूर होण्यास खूप मदत होईल असं वाटतं. मनातली भडास काढायला सतार, सारंगी कशाला फक्त? एलेक्ट्रीक गिटार प्रत्येक स्ट्रींग मधून ओरियांथी जे सांगते ती आजच्या तरुणाईची भाषा आहे म्हणून ती जास्त पटते. लोकांना "काय राजा आमच्या वेळची गाणी" असा गळा काढताना ऐकते तेव्हा वाईट याचंच वाटतं. त्या त्या काळातलं गाणं त्या त्या काळातली भाषा बोलतं. त्यावर कोणतीही भाषा मुद्दामून लादू शकत नाही तुम्ही. 'जुने जाऊद्या मरणालागुनि' असं म्हणायचं नाही पण जुन्याला ग्लोरिफाय करताना आपण नव्याची मुळं नाही ना छाटत आहोत याचा विचार झाला पाहिजे. साड्डा हक म्हणा, जो भी मै म्हणा, बंडखोरी ओतप्रोत भरली आहे, काहीतरी नवा विचार आहे. तेच आचल, काजल, बिंदीया, बदन वगैरे नाही. 'तुम हो' सारखं तरल, अरुवार गाणं आहे, 'फाया कुन' सारखं सुफीयाना, शांत रसातलं गाणं आहे. 'आउ' संगीत क्लासिक आहे म्हणून प्रत्येक गाणं त्याबरोबरच कंपेयर झालं पाहिजे, केलं पाहिजे असा नियम नाही, किंबहुना नसावाच. प्रत्येक गाण्याचा एक धर्म असतो, एक स्वत्व असतं, रॉकस्टार मधलं प्रत्येक गाणं आपला धर्म पाळतं, जे पोहोचवायचं आहे ते बरोब्बर पोहोचवतं.
नंद्या, +१ रे!
एकाच धर्तीवर तुलना करायची
एकाच धर्तीवर तुलना करायची झाल्यास मला rock on ची गाणी आणि music जास्त छान वाटले .... !! [rockstar ची फक्त गाणी ऐकली आहेत movie बघितला नाहीये अजून ..!! ]
मला आवडला
मला आवडला :).
रणबीर-रेहमान-मोहित चौहान जबरदस्तं !
मी 'साड्डा हक' सोडून सगळी गाणी मुव्ही बघतानाच पहिल्यांदा ऐकली आणि आवडली .. नंद्या ++१ .
रॉक म्युझिक अफाट आणि सुफी साँग पण सही.
मधे एक शहनाई -गिटार इन्स्ट्रुमेन्टल दाखवलय, ते उच्च !
रणाबीर चं काम सही झालय आणि 'बवळाट्ट पोरा पासून रॉकस्टार ची सगळी रुपं ' मस्तं जमवलीयेत..सगळे लुक्स मस्तं कॅरी केलेत.. ( गेल्या वर्षी कधीतरी रणबीर चा तो लांब केस वाला पोस्टर लुक पाहिला तेंव्हा हसले होते पाहून, वाटलं क्युट बॉय 'बच्चा' काय कॅरी करणार रॉकस्टार लुक. पण १०० पैकी १०० मर्क्स रणबीर ला.)
शम्मी कपुर ला 'उस्ताद बिस्मिल्लाह खान' च्या रोल मधे बघून मस्तं वाटलं :).
नर्गिस चांगली वाटली , खरच कट्रिना-सोनम काँबो आहे.. ओठ एकदम पॅनोलपी क्रुज सारखेत ... अनुष्का शर्माला पण सुट झाला असता हा रोल :).
(Btw, जो शेवट दाखवलाय , त्याचा कोणी कसा अर्थ काढला , स्पॉयलर वॉर्निंग देउन लिहा किंवा विपु मधे .)
ह्या हिरॉइनने ३१ व्या वर्षी
ह्या हिरॉइनने ३१ व्या वर्षी या चित्रपटात प्रवेश केला आहे
इतके जून धूड ?
बाजो, धूड वगैरे नाहीये हो,
बाजो,
धूड वगैरे नाहीये हो, नाजुक आहे :).
नाही तर त्या ९० च्या काळातल्या लिडिंग लेडिज काजोल-मनिशा-माधुरी-जुही थोराड असल्यामुळे २५ असतानाही ३५+ दिसायच्या
ए आर रेहमानचे म्युझिक
ए आर रेहमानचे म्युझिक सुरुवातीस कधीच अपील होत नाही. ते जसजसे मुरते तसे ते आवडू लागते... >> +१
मनिरत्नमच्या "रावण"मधील रहमानची गाणीही आधी बोअर वाटली होती, पण नंतर ती आवडू लागली.
त्याचा आधीच्या आयुष्यातला इनोसन्स दाखवायला रणबीरला जमलं नाही. मतिमंद वाटतो. >> प्रोमो पाहून मलाही तसचं वाटलं.
गाणी न अपील झालेल्या
गाणी न अपील झालेल्या सगळ्यांना,
नुसती गाणी एकदा ऐकून असं मत होणं स्वाभाविक आहे. माझंही बर्यापैकी झालेलं. असं वाटलेलं कि शंकर्-एहसान्-लॉय नी जास्त चांगलं काम केलं असतं पण नाही, गाणी मुरत गेली तशी फार म्हणजे फारच आवडायला लागलियेत.
मी गेले ८-१० दिवस हवा हवा च ऐकतेय नुसतं. इतक्या अनवट चालीत बांधलेलं इतकं सुरेख गाणं खूप दिवसांनी आलय..
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चित्रपटाला खूप सुट होतायेत गाणी. रादर मी आधी म्हटलं त्याप्रमाणे आपण रॉकस्टार बघतोय हा फील फक्त म्युजिकमुळे येतोय्..हॅट्स ऑफ टू रेहमान..
ज्ञानेशच्या म्हणण्याप्रमाणे एक कंसेप्ट मूव्ही खरच चुकवू नये..
ए आर रेहमानचे म्युझिक सुरुवातीस कधीच अपील होत नाही. ते जसजसे मुरते तसे ते आवडू लागते...>> १०००% सहमत..
नंद्या +++१
अमित. मनिरत्नमच्या "रावण"मधील
अमित.
मनिरत्नमच्या "रावण"मधील रहमानची गाणीही आधी बोअर वाटली होती, पण नंतर ती आवडू लागली.>> अगदी अगदी...
<<<ए आर रेहमानचे म्युझिक
<<<ए आर रेहमानचे म्युझिक सुरुवातीस कधीच अपील होत नाही. ते जसजसे मुरते तसे ते आवडू लागते...>>>
एक बदल :
ए आर रेहमानचे म्युझिक सुरुवातीस कधीच अपील होत नाही. ते जसजसे भिनते तसे ते आवडू लागते...
मला rock star बघायचा होता तो
मला rock star बघायचा होता तो गाण्यांसाठी.. मी एवढं expect केलं होतं की खूप चांगला नसेल पण खूप वाईटही नसेल, पण घोर निराशा झाली.. interval नंतर ह्या सिनेमा ला बसू नये.. depressing nonsense ह्या शब्दांचा अर्थ हा सिनेमा बघितल्यावर कळला.. पैसे पण गेले..
मी मुक्ता.. बाकी सगळे परिक्षण
मी मुक्ता.. बाकी सगळे परिक्षण छान लिहले आहे.. पण कॅटबद्दल तिव्र निषेध..
आपल्याला तर लय आवडला. 'जो भी
आपल्याला तर लय आवडला. 'जो भी मैं' ऐकलं सुरवातीला, गिटार टॅब्ज चुथडून झाल्यावर मग 'सड्डा', मग एकेक करत सगळीच ऐकतोय... रेहमान महान! अजुन, अजुन करत YouTube वर मुंबईची रॉकस्टारची लाईव कॉन्सर्ट सापडली, २-३ गाणीच ! HD आहेत सड्डा आणि नादान परिंदे
रणजीत बारोट, संजीव थॉमस ...! दुसरा गिटारिस्ट कोण आहे ते कळले पाहिजे.
रॉकस्टारच्या संगीताचे कौतुक
रॉकस्टारच्या संगीताचे कौतुक करणार्या प्रत्येक पोस्टला आपला प्लस वन.
अवांतर-
एक दुसरा नजरिया, रॉकस्टारकडे पाहण्याचा-
http://www.maayboli.com/node/30519
रणजित बारोट हा सितारादेवीचा
रणजित बारोट हा सितारादेवीचा मुलगा काय की शोभा गुर्टु.न्चा?
सितारादेवी
सितारादेवी
बाकी सगळे परिक्षण छान लिहले
बाकी सगळे परिक्षण छान लिहले आहे.. पण कॅटबद्दल तिव्र निषेध.. >>
अहो चालयचंच..
जो भी मै कहना चाहूं, बरबाद
जो भी मै कहना चाहूं,
बरबाद करे अल्फाज मेरे.
या एका ओळीतच आपण खलास, बाकी सिनेमा....ठीक आहे! नर्गिस नावाची महामिस्टेक नसती तर फार फार बरं झालं असतं, इम्तियाज आपल्या प्रत्येक नायिकेतून करिना शोधतोय असे वाटते.
रणबीर विल बी द बेस्ट कपूर...एव्हर!
Pages