खोपा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 November, 2011 - 01:26

अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला |
देखा पिलासाठी तिने, झोका झाडाले टांगला ||


खोपा म्हणजे सुगरणीचे घरटे दिसले की बहीणाबाई चौधरींच्या वरील पंक्ती आठवल्या शिवाय राहत नाहीत. खरच मानवी जीवनालाही किती सार्थक ओळी आहेत ह्या. आईच्या जीवाची आपल्या लेकरासाठी होणारी घालमेल, माया, ममता, काळजी ह्या पंक्ती जीवाला घोर लावून जातात.

ज्या सुगरण पक्षावरून ही कविता बहीणाबाईंना सुचली ते दिसायला जसे मोहक असतात तशीच त्यांची कलाकुसरही सुबक असते. पक्षांबाबत वाचनात आल आहे की नर पक्षी हे घरटे तयार करतात व मादी पक्षी ते निरखून पाहतात व ते ठिकठाक आहे की नाही हे पाहून त्यात रहायच की नाही हे त्या ठरवतात.

हे सुगरण पक्षी घरटी विणतात त्यावरून मला नेहमी प्रश्न पडतो हत्ती, घोडे, बैलांसारखे मोठ्या शरीराच्या प्राण्यांना आपले स्वतःचे घर बनवता येत नाही पण हे चिमुकले पक्षी आपल्या चोचीत गवत-पात्या गोळा करुन सुंदर विणीचा खोपा तयार करतात.

झाडाच्या फांदीला धरून ह्यांच्या पायाभरणीला (विणण्याला) सुरुवात होते.

किती बारीक लक्ष आहे पहा, ही मादी सुगरण असावी. आपल घरकुल व्यवस्थित झाला की नाही ते पडताळून पाहात आहे.

हा सुगरण बिचारा विणून विणून थकलेला दिसतोय. एकदाच जोर मारला असेल त्याने खोपा लवकर तयार होण्यासाठी.

खोप्यांच्या इंटेरियर व डिझाइन्स मध्ये थोडा फार फरक जाणवतो.

हे सुगरण पक्षी एखाद्या झाडावर जणू आपले गावच वसवतात. एखादे लांबचे म्हणजे रहदारी जिथे कमी असेल किंवा आपले गाव दिसणार नाही अशा ठिकाणी असलेले झाड बहूतेक निवडतात असा माझा अंदाज आहे. एकाच झाडावर ह्यांची १५-२० जणांची वस्ती विसावते.

ह्या सुगरणी तसेच बरेच घ्ररटे करणारे पक्षी आपल्या पिलांना जन्म देतात आणि बाळे स्वावलंबी झाली की नंतर घरटी सोडून देतात. खास आपल्या बाळांच्या जन्मासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी हे सुगरण पक्षी किती मेहनतीने ही घरटी बनवतात. एकच इश्वरचरणी प्रार्थना आहे की आजच्या ह्या सिमेंटच्या जंगलात ह्यांच्या वस्तीला कुणाची नजर न लागो उलट अधिकाधिक त्यांच्या हिरव्या वस्त्यांची ठिकाणे त्यांना उपलब्ध होवोत.

(हे लेखन जालरंग प्रकाशनाच्या दिपोत्सव ह्या दिवाळी अंकामध्ये प्रकाशीत झाले आहे. जालरंगच्या टिमचे आभार)

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

साधना :स्मितः

गंधर्व, लाजो, प्रज्ञा, आरती, रोहीत धन्यवाद.

अरे वा जयु नविनच माहीती काजव्याची. मस्त.

भुंगा ते सलिम अलींचे लिखाण कुठे वाचता येईल ?
>>>>>>>>>>>

जागूताई, माझ्याकडे सलीम अलींचे ते पुस्तक आहे..... भेटून तुला देऊ शकतो. ते अनुवादीत पुस्तक आहे.

माझ्याकडे वापरुन फेकलेले ४-५ खोपे आहेत. आताच्या खोप्यांमध्ये मी पाहिले नाही काय आहे ते पण ब-याच वर्षांपुर्वी एक होता त्याच्यावर मी बरेच संशोधन केले होते. त्याच्या आत दोन खोल्या होत्या. आणि दोन खोल्यांमधली भिंत इतकी मजबुत होती की मी हाताने प्रयत्न करुनही मला ती तोडणे सोडाच, साधी विस्कळीतही करता आली नाही.
>>>>>>

अनुमोदन......

साधना, परत कधी जर डबलडेकर घरटं मिळालं तर साधारण अंदाज घेता येईल तुला.. विशेषतः ते वापरून झालेलं असेल तर त्यातल्या एका कप्यात तुला विष्ठा सापडू शकते ज्यावरून तुला अंदाज बांधता येतो की कुठल्या कप्यात पिल्लं होती. अर्थात दुसर्‍या कप्याचा वापर मादीही कधी कधी करते.

भुंगा मला त्या पुस्तकाचे नाव विपुत टाक. मला विकत किंवा लायब्ररीत मिळाल तर पहाते नाहीतर तुझ्याकडून घेते.

आरती खुप गोड लिंक आहे.

छान...

छान

आर्च, मार्कोपोलो, विभाग्रज, जिप्सि, वेताळ, यो, दिपक, वाल्याकोळी, दिपक, दादाश्री, पल्लवी, स्मितू धन्यवाद.

जागू फोटो मस्त आहेत. पण technically बहिणाबाईंच्या त्या ओळीत 'त्याचा पिलामंदी जीव जीव झाडाले टांगला' असे पाहिजे ना? Happy नर सुगरण खोपा बांधतो मादी सुगरण नाही.

सुंदर तो खोपा, सुंदर प्रचि ती |
सुंदर घराची, सुंदर प्रचिती ||

जागूताई, सुंदर घराच्या नीटस घरबांधणीचे सुखद दर्शन घडवलेत! धन्यवाद!!

झोके घेतल्यासारखे वाटत असेल त्यांना. >>>>>
मुळात बहिणाबाईची ओवी.......

अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला |
देखा पिलासाठी तिने, झोका झाडाले टांगला ||

अशीच आहे. तेव्हा त्या खोप्याचे खरेखुरे बहारदार वर्णन म्हणजे "...झोका....".

वावरातल्या विहीरीवर बाभळीच्या लांबसडक डहाळीच्या दूरवर झुलत्या टोकावर बांधलेला खोपा, झोका तर झुलवतोच, शिवाय कुठल्याही शत्रूला तिथवर पोहोचणेच असंभव करत असतो!

धन्य सुगरण!
धन्य तो खोपा!!
धन्य त्याचे दर्शन घडवणार्‍या जागूताई!!!

आणि धन्य त्या दर्शनाने हर्षभरीत होणारे आपण सारे मायबोलीकर.

लिंबुदा असे कसे हो. प्रयत्न करा परत.

माधव, प्रिती धन्स :स्मितः

नरेंद्रजी ओळी दिल्याबद्दल धन्यवाद बदलते आता.

सुंदर फोटो, सुंदर माहीती. खरच हे बांधणं, मादि आल्यावर नरांची धांदल, सगळं पहायला मजा येते.
पुर्वी ह्यावर माझा एक लेख लोकप्रभामध्ये फोटोंसह छापला होता, त्याची आठवण झाली.

Pages