Submitted by बेफ़िकीर on 2 November, 2011 - 06:15
समाज अमुचा इतका सुधारलेला आहे
वेद गायला आमच्याकडे हेला आहे
मार्क मिळाले, प्रवेश नाही मला मिळाला
ब्राह्मण असणे हाच गुन्हा झालेला आहे
पैशासाठी अमेरिकेला इतके गेले
मला वाटले देशच तिकडे नेला आहे
ज्यांना पहिले दर्शन मिळते त्या नेत्यांचा
पंढरपुरच्या वाटेवरती ठेला आहे
एक लिटरवर मैल मैल मी चालत असतो
डिझेलपेक्षा स्वस्त बिअरचा पेला आहे
उरकत आहे उरलेली पापे मी इथली
तसा यमाचा कॉल मला आलेला आहे
दुनिया इतकी सुखी कशी हे विचारले मी
कुणी म्हणाले 'बेफिकीर' मेलेला आहे
-'बेफिकीर'!
गुलमोहर:
शेअर करा
फारच छान. सर्व शेर आवडले.
फारच छान. सर्व शेर आवडले.
गजल आवडली! उरकत आहे उरलेली
गजल आवडली!
उरकत आहे उरलेली पापे मी इथली
तसा यमाचा कॉल मला आलेला आहे>>>>
हे सगळ्यात जास्त आवडले.
मार्क मिळाले, प्रवेश नाही मला मिळाला
ब्राह्मण असणे हाच गुन्हा झालेला आहे
>>>>>काहीतरीच काय? हल्ली पैशाला पासरी प्रायवेट कॉलेजेस झालेली आहेत तिथे कुठल्या फुटकळ कॉलेजात प्रवेश घ्यायचा की. चांगल्याच कॉलेजात दर्जेदारच शिक्षण घ्यायचा एवढा सोस का या बामणाना.. आणि असेलच सोस एवढा तर जा की अमेरिकेला, इंग्लंडला, ऑस्ट्रेलियाला..कोणी थांबवलेय?
टीप:मायबोलीवर नुकत्याच झालेल्या एका प्रदीर्घ चर्चेनंतर बामण हा "ब्राह्मण" शब्दाला योग्य असा समानार्थी शब्द असल्याचे सिद्ध झाले आहे त्यामुळे तोच वापरला आहे याची संबंधितानी नोंद घ्यावी.
हल्ली पैशाला पासरी प्रायवेट
हल्ली पैशाला पासरी प्रायवेट कॉलेजेस झालेली आहेत >>>>>>
होय, पण तेथील फिया व देणग्या 'पैशाला पासरी' नसतात.
मार्क मिळाले, प्रवेश नाही मला
मार्क मिळाले, प्रवेश नाही मला मिळाला
ब्राह्मण असणे हाच गुन्हा झालेला आहे
सत्य.
जन्माला आलो,नागरिकत्व मिळाले
हिंदू आहे हाच गुन्हा झालेला आहे
मार्क मिळाले, प्रवेश नाही मला
मार्क मिळाले, प्रवेश नाही मला मिळाला
ब्राह्मण असणे हाच गुन्हा झालेला आहे
व्वा क्या बात...... ....१ नंबर गझल
जानव्याच्या जाणीवा छेडल्या कुणी
सरकारी "महार" ही वेदना जुनी................
व्वा..व्वा पुन्हा एक वेगळी
व्वा..व्वा पुन्हा एक वेगळी गझल.
आवडली.
गझल आवडली मला,,,
गझल आवडली मला,,,
वा! मस्त गझल आहे!!!
वा! मस्त गझल आहे!!!
सुन्दर!!!
सुन्दर!!!
माझा अनुभवः वर्गात
माझा अनुभवः
वर्गात विद्यार्थ्यान्नी लक्ष द्याव, कॉलेज कराव, अभ्यास करावा .... मुळात त्यान्नी "एज्युकेशन सीरीयसली" घ्याव म्हणुन शीक्षकाने "अरे तुमचे आई वडिल ईतके कष्ट करुन फी भरतात हे लक्षात ठेउन तरी कॉलेजला येत जा" अस म्हणण म्हणजे शीक्षकाने स्वःताची मजा ऊडवण झालय.
मार्क्स नाही पण तरी 'ईतर' सवलती मुळे प्रवेश मीळणार्या विद्यार्थ्याला फी ची जवळ जवळ सगळी रक्कम सरकार कडुन मीळते ... आपल शीक्षण फुकट (वा खुप कमी/कमी खर्चात ) होतय हे त्यान्ना माहित असत त्यामुळे ते एज्युकेशन सीरीयसली घेत नाहीत (९९% स्टुडन्ट)
ओपन वाले मार्क असनुन ईतर सवलती नसल्याने चान्गल्या कॉलेजला हुकतात वरुन फी भरण्यात त्यान्च्या घरच्यान्ची कबर कसते
ओपन असणारे श्रीमन्तच हवेत वा श्रीमन्त असाल तरच ओपन हवे अस झालय
शीक्षणाचा दर्जा खालावतोय.... सेनसेक्स खालावण्या पेक्षा हे जास्त सीरीयस वाटत
मस्त सगळेच शेर आवडलेरे निलीमा
मस्त सगळेच शेर आवडलेरे
निलीमा विडंबनही मस्त
सुधीर
बेफिकीरजी, सही रे सही
बेफिकीरजी,
सही रे सही !
पंढरपुरचा संदर्भ वारीसाठी घेतला ना ...?
तसं सध्या ऊसाच्या दरासाठी हजारो शेतकरी बारामतीची वाट तुडवत चालले आहेत ...
(No subject)
उरकत आहे उरलेली पापे मी
उरकत आहे उरलेली पापे मी इथली
तसा यमाचा कॉल मला आलेला आहे
देवा,चाबूक लिहिता तुम्ही .व्यंग टिपता येणे ही फार अवघड गोष्ट आहे .तुम्हाला ते फार छान जमते .प्रत्येक शेर
'शेर ' आहे .
छान आहे गझल... अगदी मार्मिक
छान आहे गझल...
अगदी मार्मिक टिपणे शोधून काढली आहेत.
एकदम बेफि..गझल.
आवडली.
एक लिटरवर मैल मैल मी चालत
एक लिटरवर मैल मैल मी चालत असतो
डिझेलपेक्षा स्वस्त बिअरचा पेला आहे
मार्क मिळाले, प्रवेश नाही मला मिळाला
ब्राह्मण असणे हाच गुन्हा झालेला आहे
पैशासाठी अमेरिकेला इतके गेले
मला वाटले देशच तिकडे नेला आहे
>> प्रचंड आवडली.
आवडली.......व्वा..मस्तच
आवडली.......व्वा..मस्तच
कॉमेंटस आवडल्या
कॉमेंटस आवडल्या
लय भारी.
लय भारी.
आपले सरकार म्हणेल गोर
आपले सरकार म्हणेल
गोर गरीबांचे पोट आम्ही का भरावे
कसाबच आम्ही पोसलेला आहे
मस्त !! यमाचा शेर एकदम जबरी
मस्त !! यमाचा शेर एकदम जबरी
भारतीयांना भारतात त्यांच्या
भारतीयांना भारतात त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आधीच्या पिढीने 'अमेरिकेत जाऊन' काय केले झक्की?
अमेरिकेत राहून भारताच्या कल्याणाची काळजी कशाला? इथे आले त्यांच्यापेक्षा संख्येने १०० पट नि गुणांनी दसपट, हुषार, कर्तबगार, श्रीमंत लोक भारतात आहेत. त्यांना आम्ही काय सांगणार?
खरे तर भारतीयांची आजकाल चांगलीच प्रगती होत आहे. अगदी भारतात राहून देखील. ७ नोव्हेंबरचा 'टाईम' चाळा. त्यांना कुणिहि अमेरिकावासी भारतीयांनी मदत केल्याचा उल्लेख नाही. "लोकांनी आमच्यासाठी काहीतरी करावे " असली भिकारी व्रूत्ति असलेल्या लोकांनी नुसत्या गझला, कविता लिहाव्या. नाहीतर शिव्यागाळींनी भरलेली गोष्ट लिहावी. एकदम 'titillating'!
असो. या गझलेकडे गझल, कविता, साहित्य एव्हढ्याच दृष्टीने पहावे. कवितेत सगळे कुठे खरे असते? 'म्हणजे माझे हृदय चोरले' असे कवितेत लिहीतात म्हणजे काही खरेच हृदय कसे कुणि चोरील, नि चोरले तर ते सांगायला माणूस जिवंत राहील का? तरी पण ती चांगली कविता होऊ शकते. तसेच ही पण एक कविता आहे!! त्यातले काव्यगुण बघा, कल्पना विलास बघा.
<<<< "लोकांनी आमच्यासाठी
<<<< "लोकांनी आमच्यासाठी काहीतरी करावे " असली भिकारी व्रूत्ति असलेल्या लोकांनी नुसत्या गझला, कविता लिहाव्या. नाहीतर शिव्यागाळींनी भरलेली गोष्ट लिहावी>>>> बरं!
धन्यवाद!
भन्नाट गझल मतल्यात मात्रा
भन्नाट गझल
मतल्यात मात्रा वगैरे जास्त झाली नाहीय ना
की मलाच जास्त झाली आहे आज ??:अओ:
आवडली !
आवडली !
बेफिकीरजी! ही तुमची गझल
बेफिकीरजी! ही तुमची गझल भन्नाटच आहे. जाम आवडली! मतल्यातल्या हेला शब्दाचा अर्थ रेडा असाच घ्यायचा ना? असो.
काही –हस्वदीर्घ खटकले, ते नमूद करतो, चालेल ना...............
“अमुचा” शब्द “आमुचा” असा हवा.
“पंढरपुरच्या” ऎवजी “पंढरपूरच्या” असे हवे.
“एक लिटरवर” ऎवजी “एका लिटरवर” असे पाहिजे.
मतला जर असा केला तर कसा वाटेल?.....एक नम्र विनंती......सक्ती नाही.
“समाज माझा, इतका सुधारलेला आहे!
वेद गायला आमुच्याकडे हेला आहे!!”
“आमुच्याकडे” ऎवजी “माझ्याइकडे” देखिल चालू शकेल. मला “आमुच्याकडे” बरे वाटले.
मार्क मिळाले......शेर असा वाचला तर कसा वाटेल?
मार्क मिळाले! जात परंतू, अडवी आली!
ब्राम्हण असणे हाच गुन्हा झालेला आहे!!
पंढरपूरचा शेर जर असा वाचला तर कसे वाटेल?
त्या नेत्यांना पहिले दर्शन मिळते, ज्यांचा;
पंढरपूरामधे कुठेही ठेला आहे!
बिअरचा शेर असा वाचला तर कसे वाटेल?
एका लिटरावरी चालतो मैल मैल मी!
डिझेलपेक्षा स्वस्त बिअरचा पेला आहे!!
लिटरला मराठी शब्द सापडल्यास जरूर कळवावा!
माझ्या सूचनांत काही चूक असेल तर कृपया माफ करावे!
..............प्रा.सतीश देवपूरकर
उरकत आहे उरलेली पापे मी
उरकत आहे उरलेली पापे मी इथली
तसा यमाचा कॉल मला आलेला आहे
>>> लोटांगण! __/\__
तसा यमाचा कॉल मला आलेला आहे
तसा यमाचा कॉल मला आलेला आहे >>>
बेफि मिसकॉल म्हणायला हवं ना तसा मागच्या रविवारी मलाही मिसकॉल आला होता .. पण फक्त गाडीवर निभावलं.. . .
ज्यांना पहिले दर्शन मिळते
ज्यांना पहिले दर्शन मिळते त्या नेत्यांचा
पंढरपुरच्या वाटेवरती ठेला आहे>>>>>>>>>>>>
शेर फारच आवडला..........
माझ्या आवडीचा विषय इथे निघाला आहे म्हणून न राहवून माझे काव्यगुण आगाऊपणेच प्रकट करतोय
क्षमा असावी ..............
त्यांना पहिले दर्शन द्याहो..त्यांचा आत्मा..
पंढरपुरच्या वाटेला मुकलेला आहे!!
(खरे सुख पंढरपुरात आहे की वारीच्या वाटेवर हे वारकर्यालाच विचारा .........
विठ्ठलाच्या दर्शनानं "त्यांचा"आत्मा मोक्षाची वाट अनुभवेलही पण जे सुख पंढरीच्या वाटेवर आहे ते मोक्षाच्या वाटेवरही नाहीये !!
.........आजही हजारो वारकरी मैलोन्मैल चालून आल्यावर फक्त कळसाच्या दर्शनावर समाधान मानतात हे एक न उलगडणारं कोडं आहे तर कितीतरी जणाना दर्शनासाठी तब्बल ७२ तास १०-१२ कि.मी. रांग लावून उन्हातानात उभं राहिल्यावर दर्शन मिळतं हे तितकंच व्यथित करणारं वास्तव!! )
सगल वाच्ल आता रिप्लाय
सगल वाच्ल आता रिप्लाय कर्त्या. लै बारी.
Pages