Submitted by बेफ़िकीर on 2 November, 2011 - 06:15
समाज अमुचा इतका सुधारलेला आहे
वेद गायला आमच्याकडे हेला आहे
मार्क मिळाले, प्रवेश नाही मला मिळाला
ब्राह्मण असणे हाच गुन्हा झालेला आहे
पैशासाठी अमेरिकेला इतके गेले
मला वाटले देशच तिकडे नेला आहे
ज्यांना पहिले दर्शन मिळते त्या नेत्यांचा
पंढरपुरच्या वाटेवरती ठेला आहे
एक लिटरवर मैल मैल मी चालत असतो
डिझेलपेक्षा स्वस्त बिअरचा पेला आहे
उरकत आहे उरलेली पापे मी इथली
तसा यमाचा कॉल मला आलेला आहे
दुनिया इतकी सुखी कशी हे विचारले मी
कुणी म्हणाले 'बेफिकीर' मेलेला आहे
-'बेफिकीर'!
गुलमोहर:
शेअर करा
गजल आवडली! आणि
गजल आवडली! आणि प्रतिक्रियासुद्धा
मस्तच.
मस्तच.
गंमत म्हणजे ज्या संकेतस्थळावर
गंमत म्हणजे ज्या संकेतस्थळावर एव्हडा गझलांचा रतीब घातला जातोय ते अमेरिकेतच जन्मलेले आहे!
बाकी चालूदेत.
मार्क मिळाले, प्रवेश नाही मला
मार्क मिळाले, प्रवेश नाही मला मिळाला

ब्राह्मण असणे (आणि डोनेशनला पैसे नाही) हाच गुन्हा झालेला आहे>>>
बेफि च्या इतर गझलासारखी भिडली नसली तरी मर्म आहे.......
कुणी अमेरिकेला जातो किंवा कुठे हा त्याच्यासमोर उपलब्ध झालेल्या संधी आणि आवडीनेच गेलेला असतो,
त्यांच्या जाण्याबाबत किंवा पैसे कमविण्याबाबत आक्षेप नसावा
(इथे कमविणारे कमी आहेत का ? दाखवत नाहीत एवढच , जरा संधी मिळाली कि खा पैसे)
पैसे कसे खावे याबाबत नविन धागा सुरु करावा म्हणतोय ................
डिझेल आणि बियरचे म्हणाल तर त्याला कुठेतरी आपणच जबाबदार असल्याचे चित्र दिसते,

अनावश्यक प्रवास करुन डिझेल जाळायचे आणि श्रमपरिहाराच्या किंवा क्षणभंगूर आनंदाच्या नावाखाली घोट घोट मारत बसायचे मग वाढणारच ना किमती .......
शीर्षक आवडले. सत्य हेच आहे.
शीर्षक आवडले. सत्य हेच आहे.
संधी मिळाली नाही,
देशावर प्रेम असूनही नाईलाजाने दुसर्या देशी जावे लागले
हे सारे झुठ आहे. पैसा कमावणे चांगल्या मार्गाने बक्कळ पैसा कमावणे हा सार्यांचा हक्क आहे मग तो कोणत्याही देशात जावून का कमवेना.
फक्त इतरांना दाखवण्यासाठी खोट्या देश प्रेमाचे उमाळे नको.
"हे सारे झुठ आहे.
"हे सारे झुठ आहे. ............. खोट्या देश प्रेमाचे उमाळे नको."
नेहेमी प्रमाणे बर्याच अंशी खरे नि मार्मिक.
सर्वस्वी खरे नाही कारण सगळेच तसे नाहीत. प्रत्येकाच्या बाबतीत संधि न मिळणे हे कशाची संधि हवी होती, नि ती ताबडतोबच का पाहिजे होती याची कारणे वेगळी असतात. काळानुसार परिस्थिती वेगळी असते, ती माहित आहे का? तेंव्हांच्या तरुण पिढीची काय मते होती, त्यांना काय हवे होते याबद्दल काय माहिती गोळा केली आहे तुम्ही? त्यावरून सरसकट सर्वांबद्दल असे मत बनवणे योग्य आहे का?
आता सध्याच्या भारताने जी काही सर्वांगीण प्रगति केली आहे त्याबद्दल आनंद दर्शवणे, व आपणहि तेथूनच आलो याचा अभिमान प्रदर्शित करणे म्हणजे देशप्रेमाचे खोटे उमाळे नव्हेत!
तुम्हाला त्याचा त्रास का होतो बुवा?
तुम्हाला अमेरिकेत गेलेले लोक आवडत नसतील. पण निदान खोटे तरी लिहू नका त्यांच्याबद्दल.
"हे शीर्षक दिले तेच मुळी
"हे शीर्षक दिले तेच मुळी झक्कींनीकाहीतरी म्हणावे म्हणून! "
अरे बापरे, फक्त माझ्या साठी? असे नका करू हो. मज पामरासी काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी!
उलट असे वाचून मन खंतावते. इथे येऊन मला जेव्हढे पैसे मिळाले त्यापेक्षा दसपटीने अधिक पैसे आज भारतात माझ्या बरोबरीच्या अनेकांजवळ आहेत. असो.
ज्यांच्यासाठी गझला लिहाव्यात असे बरेच लोक आहेत जगात.
"आणि ते सफल झाल्यावर त्यांच्यावरच आगपाखड करणे म्हणजे टुकार भारतीयपणा होईल. "
असे काही नाही. झक्कीवर कुणिहि आग पाखडावी, त्याची निंदा करावी, तुमच्या मनाचे त्यामुळे समाधान होत असेल तर माझी काहीच हरकत नाही. उलट त्यामुळे माझी आवडती मायबोली मनोरंजक होण्यास मदत होते. पण खोटे काही लिहू नका.
मी फक्त वाईटच आहे, माझ्यात चांगले काहीच नाही असे तुम्हाला वाटत असेल, तर वाटू दे. त्याला एकदम्,टुकार म्हणू नये. टुकार मुळीच नसलेल्या बर्याच चांगल्या भारतीयांना सुद्धा तसे वाटते. तुम्ही त्याबाबतीत एकटे नाही.
खुपच छान !!
खुपच छान !!
बेफिकीरजी, सलाम ! आपले शेर,
बेफिकीरजी, सलाम !
आपले शेर, झक्कीजींचे शेरे, त्यावर आपले ताशेरे [ उदा., <<बीअरवर चालणार्या इंजिनाशीच बोलताय आपण!>>] ... मजा आला !!
निलिमांच्या छान विडंबनामागेही प्रेरणा झक्कीजींच्याच रसग्रहणाची असावी !
Pages