पैशासाठी अमेरिकेला इतके गेले

Submitted by बेफ़िकीर on 2 November, 2011 - 06:15

समाज अमुचा इतका सुधारलेला आहे
वेद गायला आमच्याकडे हेला आहे

मार्क मिळाले, प्रवेश नाही मला मिळाला
ब्राह्मण असणे हाच गुन्हा झालेला आहे

पैशासाठी अमेरिकेला इतके गेले
मला वाटले देशच तिकडे नेला आहे

ज्यांना पहिले दर्शन मिळते त्या नेत्यांचा
पंढरपुरच्या वाटेवरती ठेला आहे

एक लिटरवर मैल मैल मी चालत असतो
डिझेलपेक्षा स्वस्त बिअरचा पेला आहे

उरकत आहे उरलेली पापे मी इथली
तसा यमाचा कॉल मला आलेला आहे

दुनिया इतकी सुखी कशी हे विचारले मी
कुणी म्हणाले 'बेफिकीर' मेलेला आहे

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

मतला वगळता सर्वच शेर धडाकेबाज!!

एक वेगळीच बेफिकीर गझल. ज्वलंत मुद्दे तरीही आक्रस्ताळेपणा न आणता मांडलेले खयाल.

सुंदरच!!

उरकत आहे उरलेली पापे मी इथली
तसा यमाचा कॉल मला आलेला आहे.......व्वा व्वा!!

जबरदस्त!

पैशासाठी अमेरिकेला इतके गेले
मला वाटले देशच तिकडे नेला आहे >> अगदी अगदी...

एक लिटरवर मैल मैल मी चालत असतो
डिझेलपेक्षा स्वस्त बिअरचा पेला आहे >>>> हा शेर जबरदस्त आवडला भूषणराव.

धन्यवाद!!!

पैशासाठी अमेरिकेला इतके गेले
मला वाटले देशच तिकडे नेला आहे

मला वाटते गझल या प्रकारात वृत्त, छंद, वगैरे वगैरे साठी काय वाट्टेल ते खोटे लिहीले तरी चालते. त्यात कसलातरी बोडक्याचा अर्थ, सौंदर्य दिसते काही लोकांना. 'अगदी अगदी' म्हणे!! अगदी अगदी काय? बरोबर का चूक? चांगले की वाईट?

बरेचसे लोक भारतात त्यांच्या चांगल्या गुणांना वाव मिळत नाही म्हणून इथे येतात. आजकाल भारतातल्या कंपनीने धंद्यासाठी पाठवले म्हणून येतात, बर्‍याच लोकांना इथे आवडत सुद्धा नाही.

दुसरी गोष्टः भारत कुठे इकडे आला? भारताची लोकसंख्या १०० कोटी आहे, इथे फक्त २० लाख भारतीय असतील!

शिवाय तिथे बसून आमच्या हुषारीमुळे अमेरिका चालते वगैरे बढाया मारणारे लोक! आमची आय आय टी कित्ती कित्ती उच्च दर्जाची असल्या फुकटच्या गप्पा मारायच्या!! एव्हढी अक्कल आहे तर डिझेल ऐवजी बीअरवर चालणारे इंजिन बनवा ना!! पण ते नाही!!

वाट बघतील, अमेरिकेत येऊन एखाद्या भारतीयाने तसे काही केले की हे फुक्कटची बढाई मारणार, भारतीयाने केले!! तो बिचारा भारतीय संपूर्णपणे अमेरिकन समाजात वाढलेला, भारताबद्दल काही माहिती नसलेला, अमेरिकेचा नागरिक असेल!

Proud

बरेचसे लोक भारतात त्यांच्या चांगल्या गुणांना वाव मिळत नाही म्हणून इथे येतात. >> अगदी अगदी Proud
पण तुमच्या सारखा वेळ नाही ओ झक्की काका...भला मोठा प्रतिसाद द्यायला.. Happy

भूषणराव..,अप्रबक्षमाप्रार्थि.

तरी म्हटलं अजून अमेरिकेतले नेहमीचे यशस्वी कलाकार कसे आले नाहीत?

झक्कीकाका, कवीत्वाचे स्वातंत्र्य म्हणून सोडून द्यायचे हो अशा लोकांना(म्हणजे मराठीत पोएटिक लिबर्टी)
तुम्ही मराठी विसरलात तिकडे अमेरिकेत जाऊन म्हणून मराठी अर्थही कंसात लिहिलाय Happy

हे झक्की जे बोलतात तो अमेरिकेत राहिल्यानंतर अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांचा, संस्कृतींचा, स्वतःचा, तसेच या संकेतस्थळाचा आलेला उबग, तिटकारा, संताप असे काहीतरी आहे. अनुमोदन देणार्‍यांबाबत मला एक श्वासही वाया घालवायचा नाही. (हे वाक्य मी श्वास रोखून लिहिले)

सकारात्मक प्रतिसाद देणार्‍यांचे आभार, नकारात्मक प्रतिसाद देणार्‍यांचे त्याहून आभार, कारण त्यांना अधिक समजते.

-'बेफिकीर'!

मला हे कसे आठवले नाही की गझलेला (गझलेला शीर्षक नसतेच, तरीही, येथे द्यावे लागते म्हणून) शीर्षकः

'ब्राह्मण असणे हाच गुन्हा झालेला आहे'

या ऐवजी

'पैशासाठी अमेरिकेला इतके गेले'

हे शीर्षक दिले तेच मुळी झक्कींनीकाहीतरी म्हणावे म्हणून! आणि ते सफल झाल्यावर त्यांच्यावरच आगपाखड करणे म्हणजे टुकार भारतीयपणा होईल. झक्की इज ग्रेट असा जप मोजून दहा व्ळा केल्याशिवाय मी लॉगीनच करत नाही.

-'बेफिकीर'!

बरेचसे लोक भारतात त्यांच्या चांगल्या गुणांना वाव मिळत नाही म्हणून इथे येतात. आजकाल भारतातल्या कंपनीने धंद्यासाठी पाठवले म्हणून येतात, बर्‍याच लोकांना इथे आवडत सुद्धा नाही.>>>>>>

भारतीयांना भारतात त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी आधीच्या पिढीने 'अमेरिकेत जाऊन' काय केले झक्की?

एव्हढी अक्कल आहे तर डिझेल ऐवजी बीअरवर चालणारे इंजिन बनवा ना!! पण ते नाही!!>>>>>>

बीअरवर चालणार्‍या इंजिनाशीच बोलताय आपण!

Proud

-'बेफिकीर'!

छान आहे .
विडंबन .. दिवे घ्या

समाज अमुचा इतका सुधारलेला आहे
वेद गायला आमच्याकडे हेला आहे

वेद गायला येत नसेल थोडे तरही
वाद घालायला विषय इथे मिळाला आहे

पैशासाठी अमेरिकेला इतके गेले
मंदीत पैसे गेले कपडेपण जात आहे

एक लिटरवर मैल मैल मी चालत असतो
डिझेलपेक्षा स्वस्त बिअरचा पेला आहे

बायको म्हणते बिअर इतकी कशाला पितो
बिअरपेक्षा रमचा मायलेज चांगला आहे

उरकत आहे उरलेली पापे मी इथली
तसा यमाचा कॉल मला आलेला आहे

स्मार्टफोन वर फिचर्स माझ्या इतके असती
कॉल मी जगजितला फॉर्वर्ड केलेला आहे

(गझलसम्राट जगजित यांच्याबद्दल पुर्ण आदर बाळगुनच शेर लिहिला आहे)

दुनिया इतकी सुखी कशी हे विचारले मी
कुणी म्हणाले 'बेफिकीर' मेलेला आहे

नरकात हा जल्लोष कसा विचारले मी
सर्व म्हणाले 'बेफिकीर' मेलेला आहे

बायको म्हणते बिअर इतकी कशाला पितो
बिअरपेक्षा रमचा मायलेज चांगला आहे>>>>>> Rofl

नरकात हा जल्लोष कसा विचारले मी
सर्व म्हणाले 'बेफिकीर' मेलेला आहे>>>>>> Lol

थॅन्क्स बेफिकीर तुम्ही दिवे घेतल्याबद्दल
कारण स्वतःवर असा शेर लिहिणे ठीक पण दुसर्यावर लिहु नये.
केवळ विडंबन म्हणुन सुट घेतली.

>> पैशासाठी अमेरिकेला इतके गेले
>>मला वाटले देशच तिकडे नेला आहे

भारतात कुठे जागा आहे की माणसे कमी आहेत . जावु द्यात. आपण जगात पसरलोय अमेरीकेतच नाही
That sends Indian clothes/Grocery/Movies all over the word. Give export business to India. People travel from different countries to India giving forgiven exchange to India. So many Indians from overseas have branches of their companies in India the way Chinese have a branches in China. NRI are contributing to India all the time.......

पैशासाठी अमेरिकेला इतके गेले
मला वाटले देशच तिकडे नेला आहे

हा हा हा - सहमत Happy

अमोल केळकर
-----------------------------------------------------------------------------------
मला इथे भेटा

उरकत आहे उरलेली पापे मी इथली
तसा यमाचा कॉल मला आलेला आहे

दुनिया इतकी सुखी कशी हे विचारले मी
कुणी म्हणाले 'बेफिकीर' मेलेला आहे >>> Happy

बाकी झक्कींनी ही गझल वाचली म्हणजे बेफी तुमची गझल साता समुद्रापार पोचली म्हणायची Happy

त्रिवार अभिनंदन Happy

तोडफोड गझल आहे!!

"अशी"ही गझल लिहिता येते...!! वाह... लै मजा आली!!

पण मतल्यात जरा कमी मजा आली.

बाकी...
झक्की ह्यांची फक्की
फालतूचीच नक्की!!

>>बायको म्हणते बिअर इतकी कशाला पितो
बिअरपेक्षा रमचा मायलेज चांगला आहे<< निलिमा... ग्रेट...!!!!!!

Pages