राणीच्या राज्यात दिवाळी सम्मेलन

Submitted by अदिती on 7 October, 2011 - 04:11
ठिकाण/पत्ता: 
माधुरीचे घर, ईस्ट क्रॉयडन. पत्ता संपर्कातून पाठवण्यात येईल.

दिवाळी गटग आहे. त्याप्रमाणे वेषभुषा अपेक्शित आहे Happy

प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, November 5, 2011 - 08:00 to 15:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इकडे शांतता का आहे? गटग आहे ना? रद्द वगैरे नाही ना झाले?
मी काल लाडू केले आहेत. गटग नसेल तर एव्हढे लाडू कोण खाणार? Happy

जाजु, तुझी काय प्रगती?? जमतय न गटग ला यायला?? कुठे आहेस सध्या??
अगो Sad काय ग मज्जा आली असती ना..
मंडळी, भेटु लवकरच....

माधुरी.. मला पण मेल पाठवा.. मी बहुदा येईनच.. अजित आणि निमोपण येतील मोस्टली! शेवटी चिरोट्यांचा प्रश्ण आहे Wink

प्राची, मार्गे वेंब्ली जा बरं..>>> हो का आम्हाला काहीच मिळणार नाही मग... सगळ तिकदेच गट्ट्म...:)
अर्पणा चा पण फोन आला होता .. पण माझे बोलणे नाही झाले.. चकल्या येत आहेत तिच्या सोबत .. -इती माझा नवरा.. Happy

मस्त गटग...! शेवटच्या क्षणी जायचे ठरून तिथे पोहोचल्यानंतर मज्जा आली.. मुकमन.. सह्ही आदरातिथ्य.. आणि मस्त घर हां! Happy

हायलाईट ऑफ द डे.. पुढची पीढी वय २१ ते ९ महिने.. ह्या सगळ्यांनी सुद्धा मज्जा केली! Wink

जरा चित्रं वगैरे तरी दाखवा की.......>>>>>> हो... पाहण्या साठि आतुर आहोत.... आणि वृतांत तर हवाच... ज्यांनी ज्यांनी मिस केला त्यांच्या साठि... आम्ही पण येतोच त्यात..

मी पहिल्यांदाच मायबोलीच्या गटगला गेलो होतो.

सोबत कुटूंबिय, भार्या आणि लेक ( भार्या म्हणजे माझी बायको), मुद्दाम नमुद करतोय, नंतर मायबोलीकर विचारतात रूमाना तुमची बायको मग भार्या अजुन कोण? चक्क असली अडचणीत आणणारे प्रश्न सर्वांदेखत विचारतात ( नंतर माझी लफडी यांना कशी कळाली मी ह्या विचारात पडलो )

बरे झाले बायकोने मंजुचा हा प्रश्न ऐकला नाही, नाहीतर बायकोने फक्त ' बाहेर या' एवढेच म्हणायचे शिल्लक ठेवले असते.

बादवे, सर्वात जास्त मनापासुन धन्यवाद द्यायचे म्हटले तर ह्या दोघा पतीपत्नीचे, ज्यांनी अत्यंत मेहेनत घेऊन यजमानत्व पार पाडले. सर्वांनी अगदी पोट फुटेस्तोवर फराळ आणि सुग्रास जेवणाचा (खासकरून हॅलोविन चे भोपळ्या चे भरीत पावा सोबत) "द्राक्षासवासकट (काही माझ्यासारखे सन्मान्य अपवाद वगळता Happy ) " पुरेपूर आस्वाद घेतला .

(जर उपस्थितांपैकी कोणी जर माझ्याशी असहमत असाल तर क्रुपया अर्पणाशी संपर्क साधावा, शंकासमाधान करून दिले जाईल)

लवकरच राणीच्या राज्यात " हॅलोविनचे भोपळ्याचे भरीत" कसे बनवायचे याचे प्रशिक्षण वर्ग मा. अर्पणा ( रेसिपी
आविष्कारक) ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होणार आहेत. क्रुपया जागा मर्यादित असल्याने त्वरीत संपर्क (अर्पणाशी , माझ्याशी नव्हे, मला या मार्केटिंग मध्ये काहीही मिळत नाहीये हे आधीच स्पष्ट करतोय) साधावा.

खुप मजा आली आणि खुप छान वाटले. दिवाळीचे विविध चविष्ट पदार्थ आणि फराळ अजुनही जीभेवर रेंगाळताय.

खुप गप्पागोष्टी झाल्या, मायबोलीवरील विविध विषय, आयडी, लेख, कथा यांचेवर चर्चावितरण आणि समीक्षण ही झाले.

अहं चा नवा शोध सुद्धा लागला ( सविस्तर माहिती स्त्रोत : मिलींदा लिहीतीलच)

सर्वात कळस (आनंदाचा) झाला जेव्हा शुभदाताई आणि अर्निका यांच्या गोड गळ्यातुन "दयाधना" ऐकायला मिळाले तेव्हा. यु.के. मी पहिल्यांदा मराठी गायन पहिल्यांदा ऐकले.
ईतर लंडनस्थित मायबोलीकरांना ह्यांचा गायनाचा लाभ नेहेमीच होत असेल असे माझे अनुमान.

खुप गोड गळा आहे दोघांचा.

आशा लतांसारखे सम वर खाली करायचा अर्निकाचा प्रयास चालु आहे असे कळाले (सौजन्य. अर्निका)

बाकी काय लिहु. अजुनही त्याच धुंदीत आहे (आनंदाच्या, द्राक्षासवाच्या नव्हे)

प्र. चि. टाकणार होतो, परंतु संपर्कातुन पाठवणे जास्त योग्य राहिल असे जाणवतेय, त्यामुळे प्र. चि. पहायची असल्यास तसे संपर्कातुन मला कळवा, मी ई - मेल करेन

माधुरी आणि मुकुंदनं आदरातिथ्य फारच जंगी केलं, खूप मजा आली. जेवायचे आणि फराळाचे कितीतरी प्रकार गट्टम केले, सगळं मस्त मस्त झालं होतं.

करंज्या, अनारसे, रव्याचे लाडू, चिवडा, शंकरपाळे ...अहाहा.. या सगळ्याबरोबर कोमलरिषभ आणि अर्निकाचं गाणं ,खरंच बहार आली. कौंसिलनं आमच्यासाठी फटाकेसुद्धा वाजवले ...

लौकरच भेटूया Happy

व्वा प्रफ्फुल पहिला नंबर !! मस्त वॄ!!
लोक्स, खुप खुप मज्जा आली तुम्हा सगळ्यांना भेटुन.
धन्स सगळ्यांना , आणि हो आदरातिथ्य वगैरे काय ..आपले माबो कर आपल्या घरी येणार याचाच तो आनंद होता....तुम्ही सगळे जरा जास्तच कौतुक करताय इइश ग बाई :-)....
तुम्ही सगळे एवढे प्रेमाने आलात, मदत केलीत ... अगदी घरचच कुणितरी आल आहे अस वाटत होत....

आणि हो आता जे आले नाहित त्यांच्या साठी...
प्राची-----शंकरपाळे, चिवडा, ओल्या नारळाच्या करंच्या--- --- अप्रतिम!!!
अदिती-- लाडु, चिवडा, --- एकदम सुंदर
अर्पणा --चकल्या---- खुसखुसीत आणि मस्त... सगळ्या झाल्या फस्त!!
सौ. प्रफुल्ल-- रव्याचे कटलेट, वटाण्याची उसळ, गुलाबजामुन-- चविष्ट, अगदी यम .. यम.. !!
कोमलरिशभ--- अनारसे-- लाजवाब!!
जाजु-- चॉकलेट्स----- सगळ्याचे फेवरेट!!

बापरे आता माझ्या कडचे विशेषणं संपले.... Happy

एक़दरीत दिवाळीचा फराळ सगळ्यांनी खुप छान बनवला होता...

आणि बहार आणली ती माय-लेकीच्या गाण्याने.. काय गोड आवाज आहे दोघींचा!!!!

बाकी मग खाण्या सोबत गप्पा गोष्टीं, आयडीं ची चर्चा आणि बरच काही..... येईलच हळु हळु..

अर्निका ला ह्या वेळेस टारगेट केल होत, आयडि ओळखण्या साठी... Happy
ती आमच्या मधे सायो ला शोधत होती Happy
बाकी तिची ओळख मात्र तुम्हाला तिच्या ह्या दिवाळी अंका मधल्या लेखातुन आणि आधिच्या 'गुलाबजामुन प्रवास' तुन झालीच असेल.. Happy

बालगोपालांनी पण खुप मस्ती केली...
दिवस खुपच लवकर संपला असं वाटल..... Sad
तुम्ही सगळे गेल्यावर काही वेळ तर करमलंच नाही...

भावना, मॄदुला, अगो, दिपा चव्हाण तुम्ही आला असता तर अजुन छान वाटल असत...

आता त्या भोपळ्याच्या भरताचे, अहं चे, डिटेल्स लिहा बर...
चला लिहा पाहु आता पटापट..
आज सगळे किस्से परत परत आठवून हसु आवरत नव्हतं ऑफिस मध्ये...
आता परत लवकरच भेटुया

माधुरी आणि मुकुंद, तुमचे आदरातिथ्य .. लाजवाब Happy

आणि हो भरीत(!) पाव आणि पुलावसुद्धा. बायदवे, मठरीचे काय झाले? Wink

प्राचीच्या ओल्या नारळाच्या करंज्या, अर्पणाच्या चकल्या आणि कोमलरिषभचे अनारसे.. वा वा.. अजुनही चव रेंगाळते आहे जीभेवर.

खारे शंकरपाळे कुणाचे होते? मला दिलेल्या डब्यात होते. फार छान आहेत. ज्या कुणी केले आहेत, त्यांनी प्लिज रेसिपी लिहा. मस्त आहेत.

पुढच्या गटगला अर्पणाने भरीत आणायचे आहे, तेही तिच्या हॅलोविन रेसिपीचे. प्रफुल्ल, तेंव्हा मात्र तुम्ही भार्याला घेउन या, रुमानाला नको Happy

नमस्कार मंडळी,

https://www.lms2017.org.uk/

युके मधील पहिलं वहिलं जागतिक मराठी संमेलन २, ३, ४ जून ला लंडन येथे आयोजित केले गेले आहे. भरपूर कार्यक्रम, भारतीय मान्यवरांची व कलाकारांची उपस्थिती, बिझिनेस नेट्वर्कींग, थेम्स क्रूझ, तडका मराठी जेवण, स्थानिक कलाकार असे ३ दिवस संपूर्ण मराठी धमाल आहे.
लवकरात लवकर तुमची तिकीटे बूक करा. वेब्साईट्वर किंवा मला संपर्क करा. १० पेक्षा अधिक तिकीटांवर सौलत आहे.
कार्यक्रमात सहभागी व्हायचे असल्यास मला वि.पू. मधून संपर्क करू शकता. किंवा ईथे ईमेल पाठवा
ypjoshi@hotmail.com

योग
LMS-2017 Programme Committee

Pages