भूपाळी नळराजाची (पाण्याच्या)

Submitted by सुरेखा कुलकर्णी on 19 October, 2010 - 12:26

उठी उठी बा नळराजा
घेउनी ये पाण्या ताज्या,
वाट पाहती हो बापुडे
येई येई लवकरी,

सकाळ झाली उठले सारे
उठोनि आले सकळीक,
चहा पिऊन झाले ताजे
झाली भांडण्या मोकळिक,

बाया पोरे जमली सारी
हंडे भांडी घेऊन हाती,
झोंबाझोंबी बारीसाठी
चढाओढ जणु पळण्याची,

एकमेका शिव्या घालिती
कुळांनाही उध्दारिती,
लाथा बुक्क्यांचाही करिती
एकमेका आहेर,

वेण्या अंबाडे सूटती
भान सारे विसरुन जाती,
बघे उगाच गोळा करिती,
लोकां बघण्या देखावा,

आले आले हो नळराज
घेऊन पाणी पिवळे जर्द,
तोंड सारे वासुन बघती
मिटती सारे मतभेद,

शांत झाला हो गलबला
देती एकमेका सल्ला,
म्हणती मागवु टेंकरगाडा
घेऊ पाणी त्याचेच,

असे म्हणुन निघून जाती
धोधो नळराजे वाहती,
परी त्याकडे कुणि न पाहती
ऐशी कथा नळराजाची.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

Happy Happy

मजेदार आहे Happy
“धोधो नळराजे वाहती,
परी त्याकडे कुणि न पाहती”
हे अधिक गमतीदार.

पूर्वी, चाळीत पाण्यावरून होणारी भांडणे आठवली.

आले आले हो नळराज
घेऊन पाणी पिवळे जर्द,
तोंड सारे वासुन बघती
मिटती सारे मतभेद,

मजेदार काव्य. खूप एंजोय केले.

सर्वांना धन्यवाद. माझी ही कविताही पहिल्यांदा सर्वांना नळाच्या पिवळ्याजर्द पाण्यासारखी
वाटली बहुतेक. कारण तिच्याकडे न पहाता सगळे निघुन गेले. एकही प्रतिसाद न घेता
ती निघुन गेली. प्रद्युम्न तुम्ही ती एंजोय केली हे वाचून बरे वाटले. पुन्हा एकदा वरील सर्वांना धन्यवाद.

पाण्यासाठी फार हाल काढले हो आम्ही. दोन तिन मैलावरून सायकल, खांद्यावर पाणी आणायचो हंडा, बादल्यातून. त्याच वेळी काही लोकांना मुबलक पाणी मिळायचे अन ते वायाही जावू द्यायचे पण ते लोकं, बाया काही म्हटले नाही की बाबारे, भर एखादा हंडा. स्वार्थी अप्पलपोटे साले. आपल्याकडची पाणीवाटपाची सिस्टमही वाईट. टॅंकरवर पाणी भरतांना तर खुन होईल अशी परिस्थिती.
अजूनही कुणी रस्त्यात सडा टाकतांना पाहीले की जीव जातो. खरोखर सडा टाकणे चुकीचेच आहे. पाणी खुप वाया जाते. रस्ता धुतात हो लोकं. फक्त धुळ उडू नये म्हणून पाणी शिंपडणे वेगळे अन बादल्यांचा सडा टाकणे निराळे. अन सडा जरी टाकला तरी तो टिकतो का दिवसभर? नाही ना? मग कशाला उगाचच पाण्याचा अपव्यय?
आता आमच्या घरासमोरचे महाशय दररोज इतका सडा टाकतात अन पोर्च, चपलादेखील धुतात की त्या पाण्याचा ओहोळ (हो हो ओहोळच) वाहतो रस्त्यावर. ते कुटूंब एकतर घुमे आहेच अन हे पाहून डोक्यातूनच गेलंय.
नळराजा कवितेवरून सारे काही आठवले. ग्रामिण भागात खुप दुर्दैवी परिस्थिती आहे पाण्याबाबत. असो. शेवटी आपण भारतीय. नाही सुधरणार.

छान कवित बीड, गेवराई, जालना आणि आशा बर्‍याच ठीकाणच्या लोकांच्या डोळ्याला कविता वाचून पाण्याच्या
धारा सूरु झाल्या असतील.

नळाला पाणी येते या गोष्टीवरचा माझा विश्वास केव्हाच उडालाय.
आम्ही जितकी नळाची प्रतिक्षा केलीय, तितकी आजवर कुणीच केलेली नसेल... अगदी दमयंतीनेसुद्धा..!!

- पु. ल.

बाकी कविता मजेदार..!!

"पाषाणभेदांच्या मर्मभेदी प्रतिसादानं मूक व्हायला झालं" अगदी खरं. आम्ही हे भोगलं नाही पण पाहिलं खूप.
फार वाईट वाटायचं.
सुहासिनी फक्त बीड जालनाच नाही तर बर्‍याच ठिकाणी असे हाल आहेत. एकदा आम्ही येरमाळा येथे देवीच्या दर्शनाला गेलो असताना रस्त्यावर कोणी दिसत नव्हते पण कलकलाट मात्र खूप येत होता म्हणून आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले तर तिथे असलेल्या एका मोठ्या विहिरिमध्ये तीस चाळीस बायका बसल्या होत्या. आणि वाटीने पाणी काढत होत्या. दोन दिवस ते दृष्य डोळ्यासमोरून गेले नाही. अजूनही आठवण झाली की कसं तरी होतं.
@अमित पु.ल.चा हा लेख मीही वाचला आहे.

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.