सूर्यास्त

Submitted by विनार्च on 13 October, 2011 - 02:54

हा आहे माझ्या लेकीचा (वय वर्ष साडे-सात) परिक्षांच्या दिवसातला जोरदार अभ्यास.मॅडम शाळेत जाताना चित्र अपलोड करण्याचा हुकूम देउन गेल्या आहेत. (आल्यावर स्वत:च प्रतिसाद पहायला बसेल शहाणी Happy )
DSCN0669.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

लेकीच्या शाळेत तोंडी परिक्षा चालू आहे त्यामुळे तिला सकाळीच उठ्लेल पाहून वाटल चला मॅडम अभ्यास करणार तर अखेर...पण कसलं काय खडू आणि ड्रॉईंग पेपर घेउन बसली, विचारल तर म्हणाली "अगं सारख डोक्यात येतय हे चित्र, काढल नाही तर लक्ष नाही लागणार शाळेत." मग काय?? तिच चित्र पुर्ण होण्याची वाट पहाण्या व्यतिरिक्त काय होत माझ्या हातात????
(परिक्षेच्या दिवशी मी माझ्या आईला असं उत्तर दिलं असत तर बडव बडव बडवल असत तिने मला Lol कालायतस्मै नमः)

मस्त ! ३डी इफेक्ट मस्त आलाय.
अगदी वाटतय की आता मागची लाट पुढे येईल Happy ए भिजले ना मी त्या लाटेने Wink

मस्तय चित्र.३ डी ईफेक्ट पण जमलाय
हे अस पाहीजे , ठरवलं की लगेच करूनच टाकायचं , करू ,करूयात म्हण्ट्लं की ते व्हायचं नाही....

मस्त Happy

दिनेशदा तुम्ही केलेल्या सुचना चित्रकारापर्यंत पोहोचवल्या, धन्यवाद...
अवल,टोकुरिका,गजानन्,हर्षदा,संजय,तोषवी,रोहित धन्यवाद.
टोकुरिका लेकीच नाव अनन्या.
तिची चित्रकलेत प्रगती व्हावी म्हणुन काही सुचना असतील किंवा चित्रात काही त्रुटी असतील तर जरुर कळवा.