रोड रॅष..

Submitted by मी विडंबनकार on 11 October, 2011 - 03:12

त्या वेळेस आठवीत होतो मी. कॉम्पुटर गेम्सचं नवीनच वेड अंगात शिरलं होतं (भूत म्हटलं तरी हरकत नाही). सकाळी सहाला उठणं, आंघोळ करणं, बोर्नव्हिटा ढोसणं, आणि कॉम्पुटर लावून बसणं.....Road Rash हा माझा त्यातला आवडता खेळ झाला होता - तो दोन तास खेळणं आणि नऊ वाजता शाळेत जाणं.

आणि शाळेत गप्पा कोणत्या? तर "अरे आज तर ३ मिनिटात गेम पार केला". टेम्भुर्नि एक खेडं होतं. तिथली मुलं वैतागून जात 'काय बोलतो हा मुलगा!' असं मनातल्या मनात म्हणत नक्कीच मला नावं ठेवत असणार. 'आम्ही कॉम्पुटर हाताळला नाही आणि हा गेम बद्दल बोलतोय' असच काहीसे भाव त्यांच्या चेहर्‍यावर वाटायचे.

संध्याकाळी पाचला शाळा सुटल्यावर पुन्हा तेच. घरी जाऊन हात-पाय-तोंड धुतले, की झाला कॉम्पुटर सुरू. रविवार तर यासाठी पर्वणीच वाटायची.....हे रुटीन जवळ जवळ ४ महिने चाललं.

" अरे रोहित, देवळात जाऊन येऊया रे..मला नेऊन आण जरा.." आई म्हणायची .

(त्या वेळेस मला गाडी चालवायला जमत होती) "नाही ग आई, पोट दुखतंय, डोकं दुखतंय" हे माझं प्रत्येक वेळी ठरलेलं उत्तर (बहाणा). आई अगदी कंटाळून जायची..पण ती माऊली तरी काय करणार बिचारी....मार खाऊन पण माझं हे वेड काही कमी होईना. हे तिच्याही लक्ष्यात आलं असावं.

हे वेड कमीत कमी वर्षभर चाललं असतं जर 'तो' प्रसंग माझ्यावर गुदरला नसता....

"रोहित, मामा येणारेत तुझे, बंद कर आता तुझा कॉम्पुटर नाहीतर फोडून टाकेन" या आईच्या वाक्याने मी थोडाही थबकलो नाही कारण "कॉम्पुटर फोडून टाकेन" हे आईचं रोजचं ठरलेलं वाक्य.

रविवार असल्यामुळे मी ६-७ तास तो गेम खेळत होतो. गेम मध्ये बाजूने कोणी आलं कि बाईकवरूनच लाथ घालायची सोय होती. हा माझा आवडता स्टंट.

खेळता खेळता एकदा वीज गेली असं वाटलं म्हणून मी उठलो. मागे वळून पाहतो तर आईचा हात कॉम्पुटर च्या plug वर.

"हे काय गं आई? का बंद केलास पीसी?"

"मामा येणारेत आणि अमित पण (मामांचा मुलगा), तेव्हा आता हे बास कर आणि आधी जाऊन थोडे पोहे घेऊन ये.

ठीक आहे, बर्‍याच नाराजीने मी उठलो. पिशवी घेतली आणि निघालो गाडीवर एका मित्राला - अजयला घेऊन.

पण डोक्यात मात्र रोड रॅषच, तासनतास तोच खेळ खेळून डोक्यात तेच भिनलेलं.

गाडी चालवता चालवता मी अजयचं डोकं खायला सुरवात केली, "अरे आज असला भारी खेळलो इतक्या बाईक्स्ला लाथा मारून पाडलं न रायडरला"...असं बोलता बोलता मी तीच एक्शन करून दाखवली बाईक सुसाट चालवताना दुसर्‍या बाईकला लाथ मारतानाची......आणि तेच माझं दुर्दैव.....बाजूने एक राजदूत नामक रणगाडासदृश्य मोटारसायकलवर दूधवाला जात होता त्याला ती लाथ बसली आणि दुधासकट तो जमिनीवर आदळला.

अजयने वैतागून माझे केसच ओढले. मी प्रचंड घाबरलो, गाडी भन्नाट पळवली आणि त्याच धांदलीत गाडी एका शाळेच्या पायर्‍यांवर चढवली. शाळेच्या मैदानावर जवळ जवळ २-३ तास थांबलो.

डोकं जरा शांत ४-५ तासानंतर जेंव्हा घरी गेलो तेंव्हा मामा डोकं धरून बसले होते तर आई अक्षरशः रडकुंडीला आली होती.

"कुठे होतास रे इतका वेळ, किती घाबरलो होतो आम्ही " आई जवळजवळ ओरडलीच.

दुधवाल्यांने घोटाळा केला वाटलं. तसं काहीही झालेलं नव्हतं. पुढे काहीही नं बोलता मी ताबडतोब कॉम्पुटर सुरु केला, आणि रोड रॅश डिलीट करून टाकला......पुन्हा कधीही न खेळण्यासाठी.

मग आईला सगळंच सांगितलं. अगदी खरं खरं. मामाने ओरडण्याऐवजी शाबासकी दिली आणि म्हणाला " गुड जॉब रोहित."

माझं रडवलेला चेहरा पाहून सगळेच हसू लागले. मी मात्र नं राहवून रडलोच. आणि निश्चयही केला, कॉम्प्युटर गेम्स च्या फार नादाला न लागण्याचा. हे व्यसन कायमचं सोडण्याचा.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सही रे. चूक लक्षात येताच दुरुस्त केलीस गेम डिलीट करुन हे उत्तम केलंस. याच साठी मामांनी शाबासकी दिली ना?
प्रमाण केव्हाही महत्वाचं. जास्त झालं की काय होतं याचा तू अनुभव घेतला आहेसच. Happy

कथा, छान मांडली आहेस, रोहित!!
रोड रॅश चं वेड लागावं असा होताही तो खेळ (त्याकाळी) Wink
पु. ले. शु Happy

खरा प्रसंग आहे की काल्पनिक?
काहीही असो, चूक लक्षात येताच दुरुस्त करण्यासाठी गेम डिलीट करण्याची कृती आवडली. Happy

प्रसंग खरा असला किंवा काल्पनिक असला, व्यसन सूटण्यासाठी निमित्त झाला ना, म्हणून मला आवडले हे लेखन.

रोड रॅश माझा सर्वात आवडता गेम होता, कोणालाही लाथा (पोलिसासकट) घालायला आणि बडवायला मजा यायची.

शौर्ट्कट्स वापरून वेगवेगळी हत्यारे मिळायची

जुन्या आठवणी ताज्या झाल्यात.

कथा लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे तरी आपल्या सर्वांच्या मार्गदर्शनाची अपेक्षा करतो.

मंदार , बागेश्री , धारा , दिनेशदा ..

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद... Happy

खुप हसायला आले.
एकदम शेखचिल्लि स्टाइल. परिणाम मात्र चांगला झाला नाही पण नशीब की व्यसन सुटले.
दिवे घ्या हं.

आम्ही हा गेम ऑफिसमध्ये सगळेजण एकत्र नेटवर्कवर खेळायचो... खूप मज्जा यायची पण नेटवर्कवर लोड यायचं... जुनी आठवण, १० - १२ वर्षे झाली...

@ निलिमा : धन्यवाद !! Happy

@ राजु : धन्यवाद !!
परत खेळावा वाटतोय गेम ..पण परत असं घडलं तर? त्यापेक्षा नको बाबा...

रोहित, लाथा न घालता लोकांना पाडण्याचा इथल्या, म्हणजे पुण्यातल्या, टूव्हिलरवाल्यांना चांगलाच सराव आहे Wink Proud

मी पण रोड रEशचा भक्त आहे, अजूनही. आता एनेफेसही खेळतो खूप... पण जेव्हा ड्राईव्ह करतो तेव्हा इज्जतीत... बाकी सगळी भडास एनेफेसमधे कमारो वगैरे गाड्या फुलस्पीडमधे ट्रकवर क्रEश करण्यात घालवयची! Happy

रोहित..... सेम पिंच...

"रोडरॅश" मी घरी पीसी नसतानाही वेड्यासारखा खेळायचो.... शेजारच्या बॅचलर (आणि एकटा राहणार्‍या) दादाच्या घरी तासन तास हा गेम खेळायचो.... घरी पीसी आल्यावरही "नापा व्हॅली" फेव्हरेट होती..... त्याची आठवण करून दिलीस. लाथा मारणं तर धमाल...... Happy
छान लिहिलयेस रे.... !!! पु.ले.शु. !!!!!!

अजून एक आठवण ताजी केलीस..... एका वर्षी ३१ डिसेंबर साजरा करून लोणावळ्याहून परत येताना भल्या सकाळी ६ वाजता जुहू गल्लीत मित्राने सँट्रोची कट अनावधानाने दुधवाल्याच्या सायकलला मारली आणि सगळे दुधाचे कॅन रस्त्यावर पडले..... खुप वाईट वाटलं होतं त्या दिवशी... बिचार्‍याचं नुकसान नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालं होतं..... Sad

अजून लिहित जा..!!!