फंडु-अंडु - १ - 'मिनी पावलोवा' (ऑस्ट्रेलिया)

Submitted by लाजो on 10 October, 2011 - 08:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

६ अंड्यातील फक्त पांढरे (एग व्हाईट्स)
१ कप बारीक साखर (पिठीसाखर नाही)
३००मिली फ्रेश क्रिम (फेटुन )
स्ट्रॉबेरीज/ रासबेरीज/ ब्लुबेरीज/ किवी फ्रुट / किसलेले चॉकलेट/ अननसाचे तुकडे / आंब्याच्या फोडी/ पॅशनफ्रुटचा गर/ केळ्याचे काप यापैकी काहिही किमान २.

क्रमवार पाककृती: 

'वर्ल्ड एग डे'

'संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे' ही जाहिरात आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची आहे. अंडी खाल्याने होणारे अनेक फायदे आहेत.

ऑक्टोबर महिन्यातील दुसरा शुक्रवार हा 'वर्ल्ड एग डे' म्हणुन साजरा केला जातो. इंटरनॅशनल एग कमिशन तर्फे या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

यंदाचा वर्ल्ड एग डे या शुक्रवारी १४ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. त्या निमित्ताने अंडी वापरुन बनवलेल्या काही पाककृती या आठवड्यात देण्याचा विचार आहे.

फंडु अंडु - २ - 'मार्बल्ड टी एग्ज' (चायना)


फंडु अंडु - ३ - 'मोक्का साबायॉन/झाबायोन - Mocha zabaglione ' (इटली)

फंडु अंडु - ४ - 'ग्येरन झिम - Gyeran Jjim' (कोरिआ)

फंडु अंडु - ५ - डेझर्ट - 'स्नो एग्ज' (फ्रान्स)

**************************************************************************

फंडु अंडु - १- "पावलोवा"

'पावलोवा' चा उगम ऑस्ट्रेलियात झाला असे म्हणतात. तर कुणाच्या मते 'पावलोवा' हा प्रथम न्युझीलंड मधे बनवला गेला. अ‍ॅना पावलोवा या प्रसिद्ध बॅले डान्सरच्या सन्मानार्थ, तिच्या फर्माईशीनुसार 'हाय इन प्रोटिन्स' डेझर्ट - 'पावलोवा', १९२० साली प्रथम बनवला गेला होता.

हा 'पावलोवा' ऑस्ट्रेलियन पार्टीज मधे नेहमी हजेरी लावणारा आवडता डेझर्ट चा प्रकार आहे Happy

pavl4.JPGक्रमवार पाककृती:

१. सर्वप्रथम ओव्हन १२० डिग्री सेल्सियस वर गरम करायला ठेवा. बेकिंग ट्रे, बेकिंग पेपर किंवा फॉइल लाऊन तयार ठेवा.

२. एका स्वच्छ, कोरड्या काचेच्या बोल मधे ६ अंड्यातील पांढरे वेगळे करुन घ्या. पांढरे वेगळे काढताना पिवळ्या बलकाचा अंश येणार नाही याची खबरदारी घ्या.

३. एग बिटर किंवा इलेक्ट्रिक बीटर्स (हँड मिक्सर) लो स्पिडवर ठेऊन अंडी फेटायला सुरुवात करा. जरा फेसाळ दिसायला लागले की स्पिड मिडीयम वर वाढवुन फेसायला लागा. 'सॉफ्ट पिक्स' दिसायला लागले की एका वेळेस थोडी थोडी साखर घालुन फेसत रहा. सगळी साखर संपल्यावर सुद्धा थोडावेळ फेसायला लागेल. मिश्रण हलके आणि चकचकित दिसायला लागे पर्यंत फेटा. 'स्टिफ पिक्स' दिसायला हव्यात.

pavl1.JPG

४. बेकिंग ट्रेवर हे मिश्रण ओता. साधारण दोन ते अडीच इंच जाडीचा थर गोलाकारात पसरवुन घ्या. यासाठी स्पॅट्युलाचा वापर करा. (बेक केला की थोडा खाली बसतो. उंची कमी होते).

pavl2.JPG

५. ट्रे ओव्हनमधे मधल्या रॅकवर ठेऊन साधारण १ तास बेक करा. बेक केलेले 'मोरँग' हे बाहेरुन खुटखुटीत आणि कुरकुरीत असयला अवे तर आतुन थोडे च्युयी रहायला हवे.

६. मधल्यावेळात क्रिम फेसुन घ्या. फळांचे तुकडे कापुन तयार ठेवा.

७. 'मोरँग' गार झाले की त्यावर क्रिमचा थर पसरवुन त्यावर आपल्या आवडीची फळे पसरवा आणि लगेच खायला द्या.

---

मी २ अंड्यातिल पांढरे वापरुन हे 'मिनी पावलोवा' बनवले आहेत. यात २ अंड्यांसाठी पाव कप साखर वापरली आहे.

pavl5.JPG

---

मोठ्या पावलोवाचा फोटो लवकरच टाकेन Happy

वाढणी/प्रमाण: 
खाल तेव्हढे.
अधिक टिपा: 

- 'पावलोवा' अगदी हलका आणि कितीही खल्ला तरी अजुन खावासा वाटणारा पदार्थ आहे Happy
- काहि पाककृतींमधे फेटताना थोडे कॉर्नफ्लावर व व्हिनेगर वापरायला सांगितले आहे. मी वापरलेले नाही.
- 'मोरँग' दोन दिवस आधी बनवुन ठेवता येते. क्रिम आणि सजावट मात्र आयत्या वेळेसच करावी लागते.
- स्ट्रोबेरीज, ब्लुबेरीज आणि किवी - आंबा आणि पॅशनफ्रुट चा गर - स्ट्रॉबेरीज आणि चॉकलेट - केळ्याचे काप आणि पॅशनफ्रुट चा गर ही पॉप्युलर कॉम्बिनेशन्स आहेत.
- मी दिलेली पाककृती ही अगदी बेसिक पावलोवा ची आहे. या पावलोवा ची अनेक व्हर्जन्स आहेत. यात अंडे फेटताना त्यात कोको पावडर, व्हॅनिला इ फ्लेवरिंग पण घातले जाते.
- खास करुन उन्हाळ्यात करण्यासाठी हे अगदी आवडते डेझर्ट आहे.

माहितीचा स्रोत: 
बेकिंग बेसिक्स पुस्तक, माझे यशस्वी प्रयोग
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लाजो. ऑस्ट्रेलिया मधे २ ठिकाणी खूप छान पावलोवा खाल्ला होता. मी पण सुरुवातीला २ अंड्यांचा करून बघेन. फोटो मस्त दिसत आहेत.

पहिल्यांदा घाईत बघताना मला 'लाळगाळू अंडाकरी' ची रेसिपी आहे असं वाटलं Proud ( खरं तर ते पॅव्हलॉव्ह आहे पण पावलोवाशी साधर्म्य Happy )
मस्त रेसिपी. करुन बघायला आवडेल. अंड्याच्या वेगवेगळ्या पाककॄती 'वर्ल्ड एग डे' असलेल्या आठवड्यात टाकण्याची कल्पनाही आवडली Happy

सगळ्यांना धन्यवाद Happy

@वर्षा, अमुलचे फ्रेश क्रिम व्हिप करुन थिक होत असेल तर चालायला काहिच हरकत नाही Happy

@ दिनेशदा, पाईपलाईनमधे दडलय काय???? सांगणार नाही सिक्रेट हाय Happy

@ वत्सला, तु नुसते आशिर्वाद दे... कधी येत्येयस ते बोल कॅनबराला????