हत्यारांर्चे विविध प्रकार असतात. युध्दात वापरली जाणारी ह्त्यार, किचन मध्ये वापरली जाणारी हत्यारे (सुरी, विळी) अजुन बर्यच क्षेत्रात हत्यारे वापरली जातात. तशिच शेतकर्यांची हत्यारे वर्षभर शेतकर्यांच्या सोबत राबत असतात. त्यांना निवांतपणा मिळतो तो दसर्याच्या दिवशी. ह्या शेतीतून अन्न धान्य पिकवण्यासाठी ही हत्यार जी कष्ट करतात त्यांचे आभार, त्यांच्याबद्दलच्या पूज्य भावना दसर्याच्या दिवशी हत्यार पूजन करुन केले जाते.
माझे माहेर शेतकरी कुटुंबातले. त्यामुळे आईने पूजलेली हत्यारे मी अगदी बालपणापासून पाहत आले. सासरची शेती पेण गावाला आहे. सासरची शेतजमिन पेण गावात आहे. पण सासु-सासरे नोकरी निमित्त गावोगावी फिरले. त्यामुळे शेतीअवजारांच्या पूजेशी त्यांचा संबंध आला नाही. मात्र बाकी सगळ्या पूजा, सणवार माझ्या सासरी होतात. मी लग्न होऊन आले. पहिल वर्ष माहेरीच असत. त्यामुळे ते वर्ष चुकल. दुसर्या वर्षी आमचे सगळे कुटुंब नविन वाडीत शिफ्ट झाल. तिथे सासर्यांनी वाडीसाठी हत्यार घेतलीच होती. मी स्वतः सुद्धा ती हत्यारे छोट्या मोठ्या कामांसाठी वापरत होते. त्यामुळे दसर्याच्या त्या दूसर्या वर्षी रहावले नाही. जाऊन सगळी हत्यारे गोळा केली आणि स्वच्छ धुवून पुसुन आणुन पाटावर मांडली. सासरे आणि सासूबाई पाहत बसले ही काय करते. पण जे करत होते त्यामुळे दोघेही खुष झाले. सासुबाई म्हणाल्या शेतकरीण आहे ना ती म्हणून शाब्बासकी दिली. सासर्यांच्या चेहर्यावर त्या दिवशी मी वेगळाच आनंद पाहीला.
माझे सासरे खुप मितभाषी होते फार कमी बोलत. ते ४ वर्षापुर्वी वारले. पण प्रत्येक दसर्याला ही पूजा करताना मला त्यांना त्या दिवशी हत्यारे पूजल्यामुळे झालेल्या समाधानाची आठवण येते.
ह्या वर्षी केलेले हत्यार पुजन. हत्यारांमध्ये पिकाव/टिकाव, कुर्हाड, फावडा, कुदळी,नारळ सोलण्याचे यंत्र भिंतिला टेकून आहे तर पुढे खरळ, हातोडी, कचरा काढण्याचा खुरपा, कोयता, सुरी, काती आहे.
ही सरस्वती माझ्या मुलीसाठी सासुबाईंनी काढून दिली काल. श्रावणीने पुजन केले सरस्वतीचे.
खुपच छान कल्पना. असे खरच
खुपच छान कल्पना. असे खरच पहिल्यांदा पाहिले. अभिनंदन.
ऐकून माहीती होते. पण बघितले
ऐकून माहीती होते. पण बघितले प्रथमच. मस्त.
आमच्याकडे खंडेनवमीला हत्यारे
आमच्याकडे खंडेनवमीला हत्यारे पुजतात आणि दसर्याला सरस्वती.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
परवा मला आयत्यावेळी काही मिळाले नाही म्हणुन मी सुरी, स्क्रुड्रायव्हर आणि लॅपटॉपची पुजा केली.
मस्तच. काल खूप खूप आठवण आली
मस्तच.
काल खूप खूप आठवण आली मला घरच्या दसर्याची.
पिकाव>> आम्ही टिकव म्हणतो त्याला. दोन्ही बाजुने असेन तर टिकाव आणि एका बाजूने असेन तर कुदळ.
आमच्याकडे पण शेतीची ही अवजारं धुवून पुसून मांडून ठेवायचं काम आम्हा बच्चे कंपनी कडे असायचं अर्थात आजीच्या नजरेखाली. घमेली, टोकरी, विळे, खुरपे, फावडं म्हणजेच खोरं, कोयते, कुर्हाडी, सुर्या असं सगळं. मोठी अवजारं जसं की नांगर वैगेरेची पुजा त्यांच्या जागेवरच. वह्या, पुस्तकं, पाटीवर कींवा वहीवर सरस्वती काढून त्याची पुजा काकू करायला लावयची.
जागू, तुझे बरेच लेख मला आठवणींच्या गावी घेवून जातात.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त जागू आमच्याकडे मी
मस्त जागू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमच्याकडे मी माझ्या अर्किटेक्चरच्या आयुधांची म्हणजे पेन्स, सेटस्क्वेअर, टीस्क्वेअर इ इ आणि आता ऑफिसचे पास, पुस्तकं, दागिने, गाड्यांच्या चाव्या इ इ अशी सगळ्यांची पूजा करते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त जागू
मस्त जागू![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुनिल, अखि, जिप्सी
सुनिल, अखि, जिप्सी धन्यवाद.
नलिनी
माझ्या आईकडेही बाकिच्या जड अवजारांची अगदी पाण्याच्या पंपाचीही पुजा आम्ही जागेवर करायचो.
चिंगी आम्ही पण स्क्रूड्रायव्हर पक्कड वगैरे ठेवायचो.
लाजो शेवटी आपल्या त्यांच्याबद्दलच्या भावना महत्वाच्या. दागिने आम्ही धनत्रयोदशीला पुजतो तू पण पुजत असशीलच.
जागू :} दागिने आणि पैसे
जागू :}
दागिने आणि पैसे आमच्याकडे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पण पूजतो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जी हत्यारे आपल्याला मदत
जी हत्यारे आपल्याला मदत करतात, त्यांचे उपकार स्मरायचे.
आमच्या कारखान्यात यंत्रांची पूजा झाली.
जागू, माझ्या आईकडे या सगळ्या
जागू, माझ्या आईकडे या सगळ्या गोष्टी व्हायच्या.. खुप मिस करतेय हे सारं..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख प्रचि.
या दिवसांत, मुंबईत रेल्वे
या दिवसांत, मुंबईत रेल्वे सुंदर सजवलेल्या असतात- नियमित जाणारे प्रवाशी मंडळाकडून...
छान
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किती गोड जागु!!!
किती गोड जागु!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदरच जागू! आम्ही खंडे
सुंदरच जागू! आम्ही खंडे नवमीला पूजा करतो. ऑफीसमधेपण मोठ्या प्रमाणावर पूजा केली जाते.खूप धमाल येते.
हत्यारांच्या पुजेबद्दल आजच
हत्यारांच्या पुजेबद्दल आजच कळलं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी दरवर्षी दसर्याला सरस्वती पूजन करते. त्या साठी लहानपणीची पाटी जपून ठेवलीय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
यामागे महाभारतातील कथा आहे
यामागे महाभारतातील कथा आहे ना? अर्जुनाने अज्ञातवासात जायच्या वेळी शमीच्या वृक्षावर शस्त्रे लपवून ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर त्याने दसर्याच्या दिवशी शस्त्रे पुन्हा हाती घेतली असे काहितरी. जाणकारांनी कृपया प्रकाश टाकावा.
वा जागु जुन्या आठवणी जाग्या
वा जागु जुन्या आठवणी जाग्या केल्यास , आमच्याकडे पण हत्यारे , गाड्या वगैरेची पुजा केली जाते. फोटो बघुन खुप मस्त वाटलं.
दिनेशदा, सारीका, राजू, रोहित,
दिनेशदा, सारीका, राजू, रोहित, वर्षू, प्रज्ञा,श्री धन्यवाद.
अमी किती छान अजुन तुझ्याकडे तुझी पाटी आहे. माझ्या मुलीने काल पाटी स्वच्छ धुवुन वगैरे ठेवली आणि नंतर रंगित सरस्वती हवी म्हणून आजीला कागदावर स्केचपेनने काढायला लावले.
आईकडे खंडेनवमीला हत्यारांची,
आईकडे खंडेनवमीला हत्यारांची, गाडीची पुजा व्हायची ते आठवले. छान वाटले.
या दिवसांत, मुंबईत रेल्वे
या दिवसांत, मुंबईत रेल्वे सुंदर सजवलेल्या असतात- नियमित जाणारे प्रवाशी मंडळाकडून...>>>>>येस्स्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जागु, अजुन एक साम्य. मी पण
जागु,![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अजुन एक साम्य. मी पण दसर्याला हत्यार पुजते. माझी साधी हत्यारं,चाकु, सुरी, विळी. सरस्वती पण पुजते. सतार पण. दसर्याची पुजा मा़झी सगळ्यात आवडती पुजा आहे
मैना, जिप्सी धन्स. निकिता
मैना, जिप्सी धन्स.
निकिता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जागू मस्तच! लहानपणचं सगळं
जागू मस्तच! लहानपणचं सगळं आठवलं! खंडेनवमीला ही पूजा असायची.
जागू प्लीज "पुजन" च्या ऐवजी "पूजन" करशील का?(इथे अर्थ बदलत नाहीये)
आणि पहिलाच शब्द "हत्यार्यांच्या" जागी "हत्यारांच्या" असं करशील का?(इथे अर्थही बदलतोय.)
मी घरी होतो तेव्हा टिव्ही,
मी घरी होतो तेव्हा टिव्ही, फ्रिज, म्युझिक प्लेयर, कंम्प्युटर, हत्यारे, पुस्तके,वह्या, पाटीवरची किंवा वहीवर काढलेली सरस्वती,...यांची पूजा करत.......पण इथे...
दसर्याच्या दिवशी रात्री कळले की 'आज दसरा' आहे/होता...![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
जागू, आम्ही पण लहानपणी या
जागू, आम्ही पण लहानपणी या सर्व हत्त्यारांची पूजा करायचो. आज किती वर्षानी ही हत्यारे पुन्हा पहायला मिळाली. धन्यवाद जागू. तुझ्यामुळे माझ बालपण उजळून निघालं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दसराच्या दिवशी रात्री कळले की
दसराच्या दिवशी रात्री कळले की 'आज दसरा' आहे/होता... >>>>चातका, काय रे हे?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
या अस्सल शेतकरीण बाईचं खुप
या अस्सल शेतकरीण बाईचं खुप खुप कौतुक!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चातका आईला सांगुन ठेव सण असले
चातका आईला सांगुन ठेव सण असले की फोन करत जा म्हणजे कळेल तुला.
शोभा, आर्या धन्स.
आईला सांगुन ठेव सण असले की
आईला सांगुन ठेव सण असले की फोन करत जा >>जागुतै दुपारी फोन आलेला....बिझी होतो त्यामुळे उचलला नाही...म्हटलं मीच करतो नंतर आणि विसरलो... मग एकदम संध्याकाळीच बहीणीने समस मधुन 'शुभेच्छा' म्हटलं....तेव्हा आठवलं...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्यात तिन चार दिवस आधी माहीत होते, पण नक्की 'कोणता दिवस' तेच माहीत नव्हते..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
आम्हीसुद्धा दरवर्षी
आम्हीसुद्धा दरवर्षी पुस्तकांची पूजा करत असू. आणि ती चारच्या आकड्यांची सरस्वती पण तशीच काढायचो.ह्यावर्षी नाही जमलं.
Pages