हत्यारे व सरस्वती पूजन

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 7 October, 2011 - 07:06

हत्यारांर्चे विविध प्रकार असतात. युध्दात वापरली जाणारी ह्त्यार, किचन मध्ये वापरली जाणारी हत्यारे (सुरी, विळी) अजुन बर्‍यच क्षेत्रात हत्यारे वापरली जातात. तशिच शेतकर्‍यांची हत्यारे वर्षभर शेतकर्‍यांच्या सोबत राबत असतात. त्यांना निवांतपणा मिळतो तो दसर्‍याच्या दिवशी. ह्या शेतीतून अन्न धान्य पिकवण्यासाठी ही हत्यार जी कष्ट करतात त्यांचे आभार, त्यांच्याबद्दलच्या पूज्य भावना दसर्‍याच्या दिवशी हत्यार पूजन करुन केले जाते.

माझे माहेर शेतकरी कुटुंबातले. त्यामुळे आईने पूजलेली हत्यारे मी अगदी बालपणापासून पाहत आले. सासरची शेती पेण गावाला आहे. सासरची शेतजमिन पेण गावात आहे. पण सासु-सासरे नोकरी निमित्त गावोगावी फिरले. त्यामुळे शेतीअवजारांच्या पूजेशी त्यांचा संबंध आला नाही. मात्र बाकी सगळ्या पूजा, सणवार माझ्या सासरी होतात. मी लग्न होऊन आले. पहिल वर्ष माहेरीच असत. त्यामुळे ते वर्ष चुकल. दुसर्‍या वर्षी आमचे सगळे कुटुंब नविन वाडीत शिफ्ट झाल. तिथे सासर्‍यांनी वाडीसाठी हत्यार घेतलीच होती. मी स्वतः सुद्धा ती हत्यारे छोट्या मोठ्या कामांसाठी वापरत होते. त्यामुळे दसर्‍याच्या त्या दूसर्‍या वर्षी रहावले नाही. जाऊन सगळी हत्यारे गोळा केली आणि स्वच्छ धुवून पुसुन आणुन पाटावर मांडली. सासरे आणि सासूबाई पाहत बसले ही काय करते. पण जे करत होते त्यामुळे दोघेही खुष झाले. सासुबाई म्हणाल्या शेतकरीण आहे ना ती म्हणून शाब्बासकी दिली. सासर्‍यांच्या चेहर्‍यावर त्या दिवशी मी वेगळाच आनंद पाहीला.
माझे सासरे खुप मितभाषी होते फार कमी बोलत. ते ४ वर्षापुर्वी वारले. पण प्रत्येक दसर्‍याला ही पूजा करताना मला त्यांना त्या दिवशी हत्यारे पूजल्यामुळे झालेल्या समाधानाची आठवण येते.

ह्या वर्षी केलेले हत्यार पुजन. हत्यारांमध्ये पिकाव/टिकाव, कुर्‍हाड, फावडा, कुदळी,नारळ सोलण्याचे यंत्र भिंतिला टेकून आहे तर पुढे खरळ, हातोडी, कचरा काढण्याचा खुरपा, कोयता, सुरी, काती आहे.

ही सरस्वती माझ्या मुलीसाठी सासुबाईंनी काढून दिली काल. श्रावणीने पुजन केले सरस्वतीचे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

एक दसरा सोडला, तर आपण सरस्वतीला विसरूनच जातो की.
सगळीकडे लक्ष्मीचेच पूजन !

यामागे महाभारतातील कथा आहे ना>>> अमि,
भीम,अर्जुनाने अज्ञातवासात जाण्यापुर्वी विराट नगरीच्या सीमेवरच्या शमी वृक्षाच्या ढोलीत आपली शस्त्रे लपवुन ठेवली.अज्ञातवास संपत असताना कौरवांना पांडवांच वास्तव्य विराट नगरीत असल्याचे कळताच ते सैन्यासह विराटसीमेवर येउन पोहोचले . अर्जुन, भीम इतर पांडव आणि विराटाच्या सैन्य यांनी कौरव सेनेशी युध्द करुन विजय मिळवला तो दिवस म्हणजेच द्सरा/ विजयादशमी.
सीमोल्लंघन करणे या शब्दाचा हा आण्खी एक संदर्भ.

युध्दातील शस्त्रं आणि शेतीची हत्यारं यांच पुजन करण्यामाग्च आणखी ही एक कारण
पावसाळ्याचे ४ मास सैन्यांची छावणी पडायची साधारण दस-याला पाउस संपतो त्यामुळे पुढील मोहीमेची तयारी म्हणुन शस्त्रं घासुन , तेलपाणी चढुन तयार केली जायचे. या उलट संपुर्ण पावसाळ्यात शेतीच्या कामाला लागलेली ह्त्यार जरा मोकळी झालेली असतात त्यामुळे ती नीट करुन पुजुन ठेवली जातात.
विशेषतः महाराष्ट्रात ४ महीने शेतकरी आणि बाकी ८ महीने मुलुखगीरी असायची ... त्यामुळे आधी जय किसान नंतर जय जवान असायचं

लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या....

शाळेत मुलं नेहमी आकड्यांची सरस्वती काढत असत......
मझी चित्रकला जरा बरी होती म्हणून मी पाटीवर सरस्वतीचा फोटो काढला होता...
त्यावेळी संपूर्ण शाळेत माझी पाटी खुर्चीवर ठेवून पुजा केली होती....

दिनेशदा वास्तव आहे हे Happy

घारूअण्णा छान माहीती दिलीत.

अरे वा मानस, आता आपल्या मुलांना ह्या सवई लावायच्या Happy

जागु, फोटो बघुन शाळेतल्या पाटीवरील सरस्वती पुजनाची आठ्वण आली.... आता ऑफीस मधे खुप जोरात

पुजा केली जाते....:)

Pages