द्रोणागिरी देवी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 October, 2011 - 14:50

लक्षूमणाला जीवंत करण्यासाठी हनुमान जेंव्हा संजीवनी आणण्यासाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणत होता त्यावेळी त्या डोंगराचा काही भाग खाली पडला. तो पडलेला भाग म्हणजेच उरण करंजा ह्या गावातील द्रोणागिरी पर्वत (ही अख्यायीका उरणमध्ये प्रसिद्ध आहे). ह्या डोंगरावर जी देवी वसली आहे तिला द्रोणागिरी देवी असे म्हणतात. द्रोणागिरी देवी ही नवसाला पावते. करंजा येथिल रहिवाश्यांचे हे आराध्य दैवत आहे.

द्रोणागिरी देवी ही अगदी निसर्गरम्य परीसरात वसलेली आहे. डोंगराची हिरवाई व समुद्र किनार्‍यावर ही देवी भक्तांचे रक्षण करते. हे डोंगर घनदाट जंगल आहे. फक्त देवीच्या डोंगरावरचा भाग मोकळा आहे. तेथेच आजुबाजुला स्थानिक वस्तीही आहे.

नवरात्रामध्ये ९ दिवस द्रोणागिरी देवीला सजविले जाते. देवीच्या दर्शनाला भक्तांची रिघ ९ दिवस कायम असते. अष्टमीच्या दिवशी होम व गावजेवण घातले जाते. देवीच्या प्रसादासाठी अनेक भक्त स्वेच्छेने अन्न दान करतात.

१) द्रोणागिरी देउळ

२) द्रोणागिरी देवी

३)

४) पादुका

५) कळस

६) देवळा पाठीमागचे घनदाट जंगलाचे डोंगर

७) बाजुला पहुडलेला सागर.

८) करंजा जेट्टी

९) मच्छीमारांच्या बोटी

१०)

११) करंजा गाव

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

प्रकाशचित्रे सुसंगत आणि गावचा वारा घेऊन आली...
शक्य झाल्यास तारांचे वेटोळी वगळता आली तर पाहा.. संदर्भः छायाचित्रे ८,९,१०,११

दिपा, फारएण्ड, लाजो, दिनेशदा, मार्को, सुहास, रोहीत धन्यवाद.

अमित बघते जमत का ते.

जिप्स्या अरेरे तरी मी काल कॅमेरा नेऊ का नेऊ का करत नाही नेला. कालच जाऊन आले रात्री रत्नेश्वरीला. आता परत गेले तर टाकते.

अमी खरच असच ठिकाण आहे ते परत परत जावस वाटणार.

इंद्रा कुठे राहतोस तु ?

मस्त माहिती Happy द्रोणागिरी पहायला लंकेत जायला नको. हनुमंतांनी तिथेच नेला ना तो? आदिमातेचा युद्धासाठी आशिर्वाद घेताना लक्ष्मणाला तिने सांगितले होते की युद्धकाळात संजिवनी (हीच ती द्रोणागिरी आई असणार)बनून तुझे रक्षण करेन आणि रामाला सांगितले होते की युद्धभूमीवर ऐन अटीतटीच्या वेळे तुझ्यासोबत राहून तुला विजय मिळवून देईन (श्री रामवरदायिनी).

जागू, मी जेव्हा तुझ्याकडे येईन तेव्हा इथलं दर्शन घ्यायला मला नक्की ने. Happy

वॉव जागु ताई....मी करंजा वरुनच रेवस साठी तर पकडते.....मला हे बघुन भयंकर ईमोशनल वाटतयं Sad