Submitted by जिप्सी on 3 October, 2011 - 09:58
आम्ही काही मित्र ४ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर (८ दिवस) पर्यंत उत्तर कर्नाटक फिरायला जाणार आहोत. बेळगावमध्ये (खानापूर) मित्राचे घर (आणि स्वतःची गाडी) असल्याने तेथे एक दिवस राहून बेळगाव, गोकाक, गोकर्ण, सिरसी, मुरूडेश्वर फिरण्याचा मानस आहे. तरी या परीसरात न चुकता पहावी अशी अशी काही ठिकाणे असतील तर जरूर सांगा. तसेच या ट्रिपचा रफ प्लान दिला तरी चालेल (म्हणजे कुठले ठिकाण पहिले करायचे ते).
१. मुरूडेश्वरसाठी किती दिवस राखुन ठेवावेत?
२. येथील चांगल्या हॉटेलची कॉन्टॅक्ट्स आहेत का?
३. रस्ते चांगल्या स्थितीत आहेत का?
४. रात्रीची ड्रायव्हिंग करणे सेफ आहे का?
(आंतरजालावर पाहत आहे, पण कुणी आधी जाऊन आले असल्यास ठिकाण/अनुभव सांगा)
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मजा आहे की ल्येका ! कॅमेरा
मजा आहे की ल्येका !
)
कॅमेरा सुरळीत सुरू ठेव आणि आम्हाला फोटो दाखीव मंजे झाले.
(बाकी तुला माहिती जाणकार देतीलच!
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/3992
कितपत उपयोग होईल माहित नाही. पण बघुन ठेव
मायबोलीकर सोनचाफा उर्फ रुपाली
मायबोलीकर सोनचाफा उर्फ रुपाली बेळगाव मधेच असते. तिचा नवरा इको टुर्स अरेंज करतो. तिला इथे नाहीतर फेसबुक वर नक्की कॉन्टॅक्ट कर.
प्रक्स साधना, मी चेक करतो
प्रक्स


साधना, मी चेक करतो लिंक.
दिनेशदा, धन्स माहितीबद्दल.
http://www.bakulahomestay.com
http://www.bakulahomestay.com/in_and_around.aspx
http://www.visitsirsi.com/places-to-visit.html
तुम्ही दान्देलि सुधा करु शकाल ...
धन्यवाद गीतु दोन्ही लिंक
धन्यवाद गीतु

दोन्ही लिंक मस्त आहेत.
बेळगावला जात आहे तर हे जरुर
बेळगावला जात आहे तर हे जरुर पहावे
माळ मारुती चे देऊळ

मिलीट्री महादेव (भगवान शंकराचे देऊळ) : मिलीट्री च्या लोकांनी छान मेंटेन केले आहे
अनघोळ येथे एक मातेचे आश्रम आहे, शांत निवांत परिसर आहे
And last but not the least
कुंदा (पेढे) चे फोटु जरुर डकवावे.
मुरूडेश्वर बीच सुरेख आहे.
मुरूडेश्वर बीच सुरेख आहे. तिथेच एक हॉटेल आहे आणि एक भव्य मंदिर आणि मूर्ती पण आहेत. १ दिवसात व्यवस्थित पहाता येत. बेळ्गाव - मुरूडेश्वर रस्त्यावर कुठेतरी हत्तीवेरी पक्षी अभयारण्य आहे. वेळ असेल तर जरूर पहा.
जिप्स्या फिरुन घे. मजा कर.
जिप्स्या फिरुन घे. मजा कर.
मायबोलीकर डॅफोडिल्स यांची
मायबोलीकर डॅफोडिल्स यांची भटकंती..
http://www.maayboli.com/node/22683
http://www.maayboli.com/node/23087
http://www.maayboli.com/node/23262
बेळगावला मिलीट्री महादेव आणि कलावती आईंचे मंदीर अवश्य जा..
सदाशिवगड पासुन जवळच आहे..
कारवार ते मुरडेश्वर NH17 खुपच छान आहे. कारवार परिसर खुप छान आहे..
देवबाग must visit..
आणि गोव्यात शिरलाच तर दुधसागर अवश्य कराच.. दिवाळी नंतर तिथे by road जाता येते..
जिप्सी, मुरूडेश्वरला बीच फार
जिप्सी, मुरूडेश्वरला बीच फार सुंदर आहे, आणि शंकराचे एक मंदिर आहे. तुम्हाला बीचवर किती खेळायचय त्यावर तिथे किती वेळ थांबाल हे ठरेल, आम्ही साधारण दोनेक तासात निघालो होतो.
मुरूडेश्वरचे मंदिर दुपारी एक ते तीन बंद असते. हे लक्षात ठेवणे. रस्ते बरेच बरे आहेत. खासकरून नॅशनल हायवे चांगला आहे. गावातले रस्ते थोडेफार खड्डेमय असायचेच.
रात्रीची ड्रायव्हिंग हायवेला करायला काहीच हरकत नाही. आम्ही गोवा-मंगळूर कायम रात्रीच येतो.
गोकाक धबधब्याचे जिप्सी स्टाईल फोटू मस्ट आहेत.
गोकाक धबधब्याचे जिप्सी स्टाईल
गोकाक धबधब्याचे जिप्सी स्टाईल फोटू मस्ट आहेत
भर पावसात हा धबधबा आटलेला असतो. आता नोवेंबरात काय असणार तिथे??
कधीतरी तो भरलेला दिसुदे हीच प्रार्थना.
कर्नाटकात विजयनगर्-हंपीही आहे ना? तिथे जाणार नाहीयेस का रे?? जुन्या माबोवर कोणीतरी बाईकसफारी टाकलेली तिथली.
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/126209.html?1178588161
मस्त मस्त धन्यवाद लोक्स
मस्त मस्त



धन्यवाद लोक्स
सगळी माहिती नीट नोंदवून घेत आहे.
मायबोलीकर डॅफोडिल्स यांची भटकंती..>>>>>डॅफोडिल्स यांनीही काल छान माहिती दिली.
अजुन काही माहिती??????
अजुन काही माहिती??????
अरे तू आठ दिवस जातोयस ना
अरे तू आठ दिवस जातोयस ना फिरायला? मग कारवार मंगळूर पण जमेल की करायला! यडगुंजीचा उभा गणपती/उडुपी, वगैरे आरामात करता येइल.
वेळ मिळाल्यास हि ठिकाणे
वेळ मिळाल्यास हि ठिकाणे करण्याचा विचार आहेच
जिप्सी, बेळगाव ला कणबर्गी
जिप्सी,
बेळगाव ला कणबर्गी म्हणुन एक निसर्गरम्य ठिकाण आहे, तिथे अवश्य जा. मला जास्त माहित नाही, फक्त ऐकुन आहे.
सौंदत्ती तालुका (जिल्हा : हुबळी / बेळगाव ) ला मनोळी गावात स्वगल येथे धबधबा आहेत, ते ही शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे.
सौंदत्तीला गेलास तर
सौंदत्तीला गेलास तर यल्लम्माचा डोंगर पण चढून येणे.
धन्यवाद म्हमईकर, नंदिनी
धन्यवाद म्हमईकर, नंदिनी
सौंदत्तीला गेलास तर
सौंदत्तीला गेलास तर यल्लम्माचा डोंगर पण चढून येणे. <<< आणि हो दोन मंदिर आहेत तिथे, दोन्ही मंदिरात जाणे एक यल्लम्मा मातेचं (रेणुका देवी बहुतेक) आणि दुसरे जमदग्नी ऋषी चे / कि भगवान परशुरामाच्या आई चे, नक्की कुणाचे ते आठवत नाहीये मला आता.
म्हमईकर. यल्लम्मा ==
म्हमईकर. यल्लम्मा == रेणुकामाता== परशुरामची आई.:फिदी:
दुसरे मंदिर जमदग्नी ऋषीचे आहे.
म्हमईकर. यल्लम्मा ==
म्हमईकर. यल्लम्मा == रेणुकामाता== परशुरामची आई. <<< धन्स नंदिनी, मला वाटलंच होतं but was not sure, पण मग उगाच कशाला कोणतंही कनेकशन कोठे ही जोडायचं
जिप्स्या, लवकर जाऊन ये. मलाही
जिप्स्या, लवकर जाऊन ये. मलाही कर्नाटक भटकायचाय.. तुझी माहिती मला उपयोगी पडेल.
जोगचा धबधबाही माझ्या विशलिस्टवर आहे (आटला नसेल ही प्रार्थना). जमला तर बघुन ये.
गोकाकमघ्य्र या दिवसात बुचाची
गोकाकमघ्य्र या दिवसात बुचाची झाडे फुलली असतील. गोकाज बुचांनी भरलेय. धुंद हवा असेल तिथली
वरील सर्व माहितीमुळे उत्तर
वरील सर्व माहितीमुळे उत्तर कन्नडा ट्रिप झक्कास झाली
सगळ्यांचे मनापासुन आभार 