पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे खोबरं तर असतचं ना गव्हाच्या (दलियाच्या) खीरीत. मी दलिया बेताचे पाणी घालून कुकर मधून काढते आणि त्यात नंतर भरपूर खोबरं, गुळ घालून गॅसवर शिजवते. जरा वेळानी कोमट दूध घालते आणि उकळते.
प्राजक्ता

इतकी चर्चा वाचल्यावर आज रात्री स्वप्नात काय दिसणार : परसदारी अंगणात पुरलेल्या हंड्यात स्वातीचा उंधियो खदखदतोय, त्यावर सिंडी गहू 'पेरतेय', उगवलेल्या गव्हाला नारळ लोंबताहेत, त्यांना वाचा फुटून "दूधाचा रतीब कोन्या खिरीत ताई" असं ते प्राजाला विचारताहेत, डोक्यावर खिरीचं भांडं बॅलन्स करत सशल 'दूध नको, गूळ हवा' असं ओरडंत धावतेय. Proud

कोबीचा आतला भाग म्हणजे दांडा नव्हे, तर आतली कोवळी पाने. ती अगदी बारिक चिरून घ्यावीत.
ती साधारण दोन कप असतील तर ताटात ठेवून कूकरमधे थोडी वाफवूण घ्यावीत. याने त्याचा उग्र वास जातो. मग ती साजूक तूपावर परतून घ्यावीत. एवढ्या कोबीला दोन ते तीन कप दूध आणि अर्धा कप साखर पूरेल.

नारळाचे दूध सहसा फाटत नाही. म्हणून अगदी चिंचेच्या सोबतीने पण ते वापरता येते. साधारणपणे पातळ दूधात पदार्थ शिजवून शेवटी दाट दूध घालतात. दाट दूध घातल्यावर मात्र पदार्थ उकळायचा नसतो.
या दूधामूळेच, केळ्याचीही खीर करता येते.

जुन्या हितगुज प्रमाणे इथे पण हळू हळू खिचडी होते आहे असं दिसतंय.
बायांनो, खिरीची चर्चा वेगळे पान उघडून केलीत ना तर सापडायला सोपे जाईल, असे वाटते. Happy

फ्रोझन पालक नगेट्स वापरुन काय करता येइल ?

शिंडीबाय - कढीगोळ्यासारखे काय करता येईल का?

ती विचारते आहे तर तु पण तिलाच विचारतेस ? कमाल आहे Happy

ए गप रे!

मिलिंदा काही दिवस गायब होता ते बरं होतं किनै? आता परत पहारेकरी मोड मध्ये गेलाय Wink

पहारेकरी मोड >>> अगदी अगदी. दुसर्‍याला चाबूक म्हणायचं आणि स्वतः फटकारे ओढत बाफं-बाफं खेळायचं Wink

Lol

स्वतः फटकारे ओढत बाफं-बाफं खेळायचं >> ते जर स्वतःलाच असतील तर कडकलक्ष्मी खेळत असेल ग. Proud

सिन्ड्रेला, साधारणपणे पालकाचे जे अनेक प्रकार आपण करतो, त्यातले बरेचसे करता येतात, मी खास करुन सालन, पराठे आणि पुलाव केलाय.

मोड आलेल्या मेथ्यान्ची उसळ कशी करतात कोणी सान्गु शकेल का?

सोप्पय, मेथीला मोड आले की त्याची उसळ करायची Happy

इथे बघ.

'एन्चिलाड्स' कोणाला क्रुती माहित आहे?

मी लिहिले होती बहुतेक. मेक्सिकन मधे सापडेल.

रवा समजून नवर्‍याने मक्याचे पीठ आणि ते सुद्धा ४ पॅक्स आणलेत. Uhoh काय करून ते संपवता येईल ?

या पिठाचे थालीपिठ ( कांदा, मिरची, गोडा मसाला वगैरे घालून ), उपमा, भाकरी वगैरे करता येते. मेक्सिकन प्रकारात वापरता येते.
त्यातल्या त्यात थालीपिठ करायला सोपे आणि चवदार लागते.

संपदा, पीठ रवाळ असेल तर उपमा किंवा सांजा उत्तम होतो, अगदी शिरासुध्दा!! ब्रेड क्रम्सऐवजी वापरता येतं. ढोकळे पण मस्त होतात ह्या पीठाचे. बाहेर ठेऊ नकोस. फ्रीझरमधे टाकलंस तर वर्षभर छान टिकेल. (स्वानुभव).

मक्याचे पीठ असेल तर भाकरीही करता येतील. एकदम शुभ्र होतात. Happy

गजानन मक्याच्या शुभ्र भाकर्‍या ? कुठे खाल्ल्या ? माझ्या आजोळी, मलकापूरला करतात.
फारच चवदार लागतात.
पण बाजारात मिळणारे पिठ, पिवळे असते खूपदा, जरा कडवटच लागते.

दिनेश, आमच्या घरीच होते केव्हातरी. दुकानातली पीठं संकरीत मक्याची असतील किंवा त्यात आणखी काही मिसळीतही असतील. ते अजून कधी आणले नाही आम्ही पण देशी मक्याची भाकरी भारी होते. Happy

धन्यवाद धन्यवाद. परवा खरे तर मी डोक्याला हातच लावला होता , आता जरा आशेचा किरण दिसतो आहे. Happy

गुळांबा आणि साखरांब्याची क्रुती लिहा ना जरा प्लिज....

http://vadanikavalgheta.blogspot.com/2007/07/blog-post_19.html

माझी साखरांब्याची रेसीपी इथे मिळेल. हिच रेसिपी मी मायबोलीवर देखील लिहिली होती काही वर्षांपूर्वी शोधायला वेळ नाहीये पण आता.

लीना
गुळांबा - छान मोठ्या कैर्‍या(रेषा वगैरे नसलेल्या) आणाव्या. त्याची साले काढून घा. फोडी करा. त्या कुकरमधून पाणी न घालता - (कुकरमधे पाणी घाला पण फोडीत नको.) एक शिट्टी काढून लगेच प्रेशर काढून टाका. आता साधारण फोडींच्या ऐवजाच्या दीडपट गूळ घ्या. त्यात तो भिजेल एवढेच पाणी घाला. गॅसवर ठेऊन एक उकळी आली की वाफवलेल्या फोडी घाला व परत एक उकळी येताच लगेच गॅस बंद करा. एकदा गुळाच्या पाकात फोदी पडल्या की फार शिजवू नये. गुळांबा डांडरतो.(फोडी चिवट होतात.) केशर,वेलदोडा पूड घाला.
अशीच कृती साखरांब्याची. फक्त गुळाऐवजी साखर.
फोडींऐवजी खिसाचाही साखरांबा करू शकतो.

बेक्ड बीन्सच्या रेसिपी शोधते आहे. मिळत नाहीत. कुणी लिंक देईल का? मी पूर्वी कधीही हा प्रकार केलेला नाही. नवरा २ छोटे कॅन्स घेउन आलाय...

-प्रिन्सेस...

Pages