Submitted by बागेश्री on 28 September, 2011 - 08:43
आज दान मागायला
तू दारी आलास....प्रेमाचं!
अगदी काल- परवा,
जी असहाय्यता मी चेहर्यावरून
उपटून टाकून दिली,
तीच पांघरून...
खाड्कन दार आपटून
उभी होते पाठमोरी,
दार बंद झाल्याचा आवाज
आतूनही आला... मनाच्या गर्भातून
घुमत....
तू बाहेर असल्याची जाणीव
होत राहिली कितीतरी वेळ....
मनातून उमटलीच 'क्षीण विनंती'
कडी उघडण्याची,
बेदरकारपणे चेचलं 'तिला'.....
आज मी जिंकले होते...
पण;
गळणार्या आसवांचं कारण मात्र
अनाकलनीयच!
गुलमोहर:
शेअर करा
मी दिलेला प्रतिसाद दिसत
मी दिलेला प्रतिसाद दिसत नाहीये बागे, कविता खरच खुप छान आहे. भावनांवर असा विजय मिळवणं खरं तर प्रत्येकाला जमेलंच असं नाही. कधी कधी ''जिंकणं'' सुद्धा किती क्लेषदायक ठरू शकतं हे या कवितेतून मांडायला यशस्वी झाल्याबद्दल अभिनंदन!
ग्रेट एक्स्प्रेशन .
ग्रेट एक्स्प्रेशन .
आवडली
आवडली
सगळ्या- सगळ्या
सगळ्या- सगळ्या मित्र-मैत्रिणिंचे मनापासून आभार

सुप्रिया, दक्षिणा- निवडक १० बद्दल विशेष आभार!! मंदार समर्पक विश्लेषण मित्रा!
भुंग्या, अवांतर सल्ल्याबद्दल आभार (???)
बेफी, येऊन हसून गेलात (भुंग्ज कृपेने) गुड गुड!!!!!!
शप्पथ्थ ! काय लिहिलयस ! खुप
शप्पथ्थ ! काय लिहिलयस ! खुप खुप छान !
विशेष आवडली नाही..... हा विषय
विशेष आवडली नाही.....
हा विषय आता पारंपारीकतेकडे झुकत चाललाय असे वाटते..... नव्या जगाची कविता आणायला हवी आता. आजकाल असे काही होत नसावे असा अंदाज आहे.
स्पष्टवक्तेपणाबद्दल राग नसावा
पुलेशु.
मला नाही वाट॑त ही पारंपारिकते
मला नाही वाट॑त ही पारंपारिकते कडे झुकतेय.
>>>खाड्कन दार आपटून
उभी होते पाठमोरी,
दार बंद झाल्याचा आवाज
.....
बेदरकारपणे चेचलं 'तिला'.....<<< हे शक्यच नव्हते पारंपारिक समाजात.
अन हळवे पणाबद्दल म्हणाल, तर तीच तर मोठी गोची आहे आजच्या बायकांची. आपले स्वातंत्र- स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व तर जाणवते, हवेसे वातते; पण तरीही आतली "बाई-आई" हा ताण सोसताना अशी भाऊक होतेच....
नीट मांडता नाही आलं मला, पण मतितार्थ समजावा....
अवल आभार! विदिपा... कवितेचा
अवल आभार!
विदिपा... कवितेचा आशय आणि पारंपारिकपणा ह्याची थेट लिंक मला लागली नाही... असो!
प्रांजळ मताबद्दल आपले आभार
विदिपा... कवितेचा आशय आणि
विदिपा... कवितेचा आशय आणि पारंपारिकपणा ह्याची थेट लिंक मला लागली नाही>>>
>>बेदरकारपणे चेचलं
>>बेदरकारपणे चेचलं 'तिला'.....<<< हे शक्यच नव्हते पारंपारिक समाजात.
अवल यांना अनुमोदन. कविता पारंपारिक अजिबात वाटत नाही.
उलट आधुनिकच वाटते.
बागेश्री, प्रतिसाद
बागेश्री,
प्रतिसाद सकारात्मकरीत्या घेतल्याबद्दल आभार!!
मला फक्त इतकेच म्हणायचे आहे की आजच्या जगातली प्रेयसी एकवेळ दार खाडकन लावून घेईल पण नंतर रडणे......, नाही पटत!!
रच्याकने, थोपु, ट्विटर च्या जमान्यात प्रेयसी, प्रियकर ह्या संकल्पना कितपत जिवंत आहेत ह्याबद्दल मला स्वतःला खात्री नाही...
आजच्या पिढीची कविता नाहीये असे मला म्हणायचे आहे
अवल, आपला मुद्दा समजला...
अवल,
आपला मुद्दा समजला... तुमच्या पिढीची ही कविता नक्कीच आहे त्यामुळे तुम्हाला भावली ह्यात काहीच गैर वाटत नाही. बागेश्री ह्यांच्या वयाची मला कल्पना नाही त्यामुळे माझे मत आगाऊही असू शकेल, चुभूद्याघ्या.
कणखर, आपलं म्हणणं पोहोचलं
कणखर,
आपलं म्हणणं पोहोचलं 
>>मला फक्त इतकेच म्हणायचे आहे
>>मला फक्त इतकेच म्हणायचे आहे की आजच्या जगातली प्रेयसी एकवेळ दार खाडकन लावून घेईल पण नंतर रडणे......, नाही पटत!!
कणखर, काय म्हणायचंय ते समजलं, पण त्यात एक गडबड आहे.
आजच्या जगातील प्रेयसी असो किंवा कुठल्याही काळातील. आपल्याच माणसांच्या बाबतीत नाईलाजाने काही गोष्टी कराव्या लागतात, मन कठोर करुन. मग त्या केल्यावर डोळे ओले होणं हे स्वाभाविक वाटतं, विशेषतः ते करणारं माणुस संवेदनशील असेल तर.
आणि आजच्या पिढीत अशी संवेदनशील माणसे नसतात असं ढोबळ विधान नाही करता येत. भावुक आणि कोरडी अशी माणसे कुठल्याही पिढीत आणि काळात सापडू शकतात. आपण यंत्रमानव होत नाही तो पर्यंत तरी.....
आणि आजच्या पिढीत अशी
आणि आजच्या पिढीत अशी संवेदनशील माणसे नसतात असं ढोबळ विधान नाही करता येत. भावुक आणि कोरडी अशी माणसे कुठल्याही पिढीत आणि काळात सापडू शकतात. आपण यंत्रमानव होत नाही तो पर्यंत तरी.....>>>>
मंदार,
कवितेतला आशय प्रतिकात्मकरीत्या वापरला गेला असल्यास तो मग थेट पोहोचत नाही. कवितेत प्रासंगिकताच आलेली आहे. आपण बोलता आहात त्यात कविता युनिव्हर्सल झाली असल्यासारखे आपल्याला वाटले आहे का ते सांगावेत.
अर्थात ही चर्चाच आहे त्यामुळे रागाऊ वगैरे नयेत
कणखर, मला एवढंच म्हणायचंय की
कणखर, मला एवढंच म्हणायचंय की कवितेत प्रासंगिकता आली असली तरी हे उदाहरण कुठल्याही काळात आणि पिढीत घडू शकतं. आशय थेटपर्यंत पोहोचण्याबद्दल म्हणत असाल तर तो पोहोचला आहे असं मला तरी वाटतं. कारण तेच - हे कधीही घडू शकतं - स्वभाव हा कालसापेक्ष असू शकत नाही.
आशय थेटपर्यंत पोहोचण्याबद्दल
आशय थेटपर्यंत पोहोचण्याबद्दल म्हणत असाल तर तो पोहोचला आहे असं मला तरी वाटतं>>>
आशय थेटपर्यंत पोचणे हे अशा कवितांमध्ये अतिशय सहज जमते.
मंदार, मी आशय नव्हे
मंदार,
मी आशय नव्हे प्रतिकात्मकता थेट आलेली नाही असे म्हणतोय... असो, छान आहे कविता, ओके?
:आपल्या युक्तिवादामुळे मत परीवर्तन झालेला बाहुला:
>>कवितेतला आशय
>>कवितेतला आशय प्रतिकात्मकरीत्या वापरला गेला असल्यास तो मग थेट पोहोचत नाही.
यामुळे गैरसमज झाला. ती पोहोचत नाही म्हणायला हवे होते.
धन्यवाद
विदिपा, मंदार ने उत्तम मत
विदिपा, मंदार ने उत्तम मत मांडलय...
आणि हो, तुम्ही फेबू, ट्विटरला मध्यवर्ती मानुन वाचत असाल, तर ही कविता किंवा माझे बेरेच लेखन त्या अनुषंगाने, आजचे वाटणार नाहीच तुम्हांला..
आणि हो,
"उथळपणा" नव्हताच वरिल कवितेत!!
फक्त एक "निर्णय" होता, कठोरसा.... आणि मंदार म्हणाला तसं, संवेदनशील मनाचे लक्षण म्हणून डोळा आलेले पाणी आहे!!
त्यामुळे, आजच्या नवयुवांच्या उथळ प्रेमाला अनुसरुन कविता असवी अशा अर्थाने तुम्ही ह्या कवितेला पारंपारिक म्हणत असाल, तर मला आनंद आहे!
घिसापिटा विषय आहे असे
घिसापिटा विषय आहे असे म्हणायचे होते बागेश्री...
कृपया रागाऊ नयेत ही चर्चा आहे. मंदार, शुद्धलेखनाच्या दुरूस्तीबद्दल धन्यवाद!!
मस्तय कविता. मला आवडली. हारकर
मस्तय कविता. मला आवडली.
जाऊ देत.)
हारकर भी जितनेवाले बाजिगर कहते है! क्या कहते है?
(इतका छान डायलॉग शाहरूखला मिळावा नां!
बाप्रे!!
बाप्रे!!
आपला मुद्दा समजला... तुमच्या
आपला मुद्दा समजला... तुमच्या पिढीची ही कविता नक्कीच आहे त्यामुळे तुम्हाला भावली ह्यात काहीच गैर वाटत नाही. बागेश्री ह्यांच्या वयाची मला कल्पना नाही त्यामुळे माझे मत आगाऊही असू शकेल, चुभूद्याघ्या.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
वय जाणून घ्यायची ही आयडिया मला विशेष करून आवडली........ कॉपीराईट नाही अशी अपेक्षा करून इथून पुढे वापरेन म्हणतो.....
(कणखर दादा, ह.घ्या. हा भुंगा ईस्टाईल ईनोद हाय
)
भुंग्या __/\__
भुंग्या __/\__
भुंग्या
भुंग्या
अनाकलनीयच काहीतरी....
अनाकलनीयच काहीतरी....
आज दान मागायला तू दारी
आज दान मागायला
तू दारी आलास....प्रेमाचं! >> चुक कळली असावी....आणि मत परिवर्तन होउन तो पुन्हा आला असावा तिच्यासाठी.
--------------------------------
अगदी काल- परवा,
जी असहाय्यता मी चेहर्यावरून
उपटून टाकून दिली,
तीच पांघरून... >>> त्याने तिच्या प्रेमाला दुर्लक्षित केल्यामुळे तिच्या चेहर्यावर जी असहाय्यता आलेली....तीच असहाय्यता आज त्याच्या चेहर्यावर घेउन तो आला आहे तिच्या दारी...तिच्या प्रेमाची भिक मागायलाच जणु.
----------------------------------
खाड्कन दार आपटून
उभी होते पाठमोरी,
दार बंद झाल्याचा आवाज
आतूनही आला... मनाच्या गर्भातून
घुमत.... >>>>>>>>>>>>>प्रत्यक्ष तोच दारी आला असत्याना... त्याच्या तोंडावर दार आपटुन बंद करणे....हे तिच्यासाठी सात जन्म अशक्य होते....कुठेतरी बोचले मनाला....आतुनही आवाज आला दार बंद होण्याचा.
-----------------------------------
तू बाहेर असल्याची जाणीव
होत राहिली कितीतरी वेळ....>>>>>> "तो" बाहेर आहे.....ज्यावर जिवला....'तो' प्रत्यक्ष आपल्या दारावर. हे मनाला सुखकारक तरीही यातना देत जाणावत राहीले तिला.
-------------------------------------
मनातून उमटलीच 'क्षीण विनंती'
कडी उघडण्याची,
बेदरकारपणे चेचलं 'तिला'..... >>>>>> एकदा तर उफाळ आलाच मनातील त्या खर्या "प्रेमाचा" आणि विचार केला....'त्या' ला माफ करुन टाकावं...पण्......पण नाही......पुन्हा त्या यातना आणि ती असहाय्यता डोळ्या समोर तरळुन गेली...आणि दारावरील "कडी" तिने आणखीच घट्ट केली. जणु 'त्या' चं इथलं अस्तित्त्वच असह्य आहे तिला.
------------------------------------------
आज मी जिंकले होते...
पण;
गळणार्या आसवांचं कारण मात्र
अनाकलनीयच!
>>>>>>>>>>>>>>>>आणि अश्या प्रकारे आज "ती" जिंकली होती..., त्याच्याशी त्याच्या सारखंच वागुन.....एक अस्सीम अनंद झाला होता....पण्....तरी.., अरेरे....या डोळ्यांतुन वाहणार्या या धारांचं अस्त्तित्त्व का आहे..? अनाकलनियचं!
---------------------------------------------
हे बरोबर असल्यास
माझे मत...!!!
( ही कविता जुन्या विचांरांची किंवा नव्या स्टाईलची आहे असे मला वाटत नाही......व्यक्ति सापेक्ष असु शकते....कारण "प्रेम" हे जुने किंवा नविन नसते......ते फक्त 'असते'.....ज्या व्यक्तिला"प्रेम" होते, फक्त त्या व्यक्तिसाठी ते नविन असावे......)
कवितेत शेवटी फक्त 'राग' व्यक्त झालेला आहे. "प्रेम" फक्त निमीत्त होते 'राग' व्यक्त करण्यासाठीचे. जे 'त्या' ने केले तेच 'ति' ने केले आहे.
अर्थात कवितेचा आशय सुंदरच आहे....फक्त 'ति'नेच का सहनशिल असावे..? 'त्या' ला ही थोडे सहन करु द्यावे.....असहायतेची जाणीव होउ द्यावी.......................पण मग 'माफ' करावे....
"हॅप्पी एंडीग"
हुश्शSSss धन्स बागु....
आवडली .........
आवडली .........
मी पहिल्यांदा विडंबन वाचलं...
मी पहिल्यांदा विडंबन वाचलं... तेव्हा फारसं काही वाटलं नाही. आत्ता मूळ कविता वाचली तेव्हा विडंबन आठवून पोट धरधरून हसलो... मूळ कविता गंभीर असतानाही ती हसत हसत वाचण्याचा अनुभवच बेक्कार मस्त होता !
कविता मात्र खरच मस्त ! आवडेशकुमार
Pages