केरळमध्ये ३ मुले असणार्याना तुरुंगवासाची शिक्षा?
केरळमध्ये ३ किंवा अधिक मुले असनार्याना तुरुंगवासाची शिक्षा देण्याचा कायदा होणार आहे म्हणे! महाराष्ट्रात किंवा संपूर्ण भारतात अस कायदा करावा काय?
याबाबत अल्पसंख्यांकांचा दृष्टीकोन कसा असू शकेल? हिंदुंच्यातही पूर्वी बहुपत्नित्वाची आणि भरपूर मुले असण्याची प्रथा होती... ध्रुवबाळाच्या वडिलाना आवडती आणि नावडती अशा दोन बायका होत्या. कृष्णाला १६००० होत्या. पांडवाना , दशरथाला अनेक पत्नी होत्या.. छत्रपती शिवाजी महाराजाना ८ ( की ९) होत्या..
१९-२० शतक येईअपर्यंत हिंदुंची क्रयशक्ती इतकी कमी झाली की १ बायको आणि १-२ मुलेच परवडतील हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळेच त्यानंतर मग एका पत्नीचा कायदा झाला, तो हिंदुनी सहजपणे स्वीकारला. .. त्याचप्रमाणे हे जेंव्हाअल्पसंख्यांकांच्या लक्षात येईल, तेंव्हा आपोआपच बायका पोरे कमी होतील आणि कदाचित तेंव्हाच हा कायदा तेही आपोआप स्वीकारतील. संपूर्ण जगभरात मुसलमानाना अनेक मुले होण्याचे प्रमाण घटत आहे म्हणे.. ही आकडेवारी.. http://www.prb.org/Articles/2009/karimpolicyseminar.aspx
याबाबत भारतातील आकडेवारी काय सांगते? महाराष्ट्रात किंवा पूर्ण भारतात असा कायदा येईल का? सध्या महाराष्ट्रात ३ मुले असणार्याना लोकप्रतिनिधी होता येत नाही.. अशा व्यक्तींचे पद रद्द झालेल्या बातम्या पेप्रात येत असतात ( संपूर्ण भारताचे माहीत नाही.)
बरोबर, नुसत्या केरळात करुन
बरोबर, नुसत्या केरळात करुन उपयोग नाही. अख्ख्या भारतात असा कायदा लागू झाला पाहिजे. ह्यात गोची अशी आहे की लोकांना जेलमध्ये टाकणारे पोलिस, जेलर ह्यांना ३,४ मुलं असली तर ते लाच खाऊन ३ मुलांच्या बाप कम कैद्यांना सोडून देतील.
बाकी पुराणातली वांगी पुराणात. त्या महाभारतातले दाखले आत्ता देऊन काही उपयोग नाही.
असं काय काय नवीन तुमच्या कानावर पडत राहो जेणेकरुन तुम्हांला लिहायची प्रेरणा मिळत राहील.
जामोप्या, अभिनंदन! "रोज एकतरी
जामोप्या,
अभिनंदन! "रोज एकतरी सत्कृत्य करायचे" ह्या स्काऊटच्या बालवीरांच्या नियमाप्रमाणे, "रोज एकतरी नवीन धागा काढायचाच" अशी तुमची भीष्मप्रतिज्ञा दिसते. असो.
>>> संपूर्ण जगभरात मुसलमानाना अनेक मुले होण्याचे प्रमाण घटत आहे म्हणे..
हे त्याच लेखातून -
For Muslims, until the late 70s, the total fertility rates were quite high—6 per woman. In Bangladesh and among Muslims in India, fertility has started converging...for Muslims, it has gone down to a total fertility rate of three children.
म्हणजे एका भारतातल्या एका मुस्लिम कुटुंबात सरासरी ३-१२ मुले असतात.
आणि हे काहीतरीच -
There are different theories as to why Muslim fertility is high: because they don't accept modern methods of contraceptives...or that remarriage among Muslims is allowed whereas with Hindus it's not...
तुम्ही देखील रोज २ पेक्षा जास्त नवीन धागे काढले तर तुम्हाला देखील तुरूंगवास देण्यात येईल.
@सायो >>ह्यात गोची अशी आहे की
@सायो
>>ह्यात गोची अशी आहे की लोकांना जेलमध्ये टाकणारे पोलिस, जेलर ह्यांना ३,४ मुलं असली तर ते लाच खाऊन ३ मुलांच्या बाप कम कैद्यांना सोडून देतील.>>>> १००% अनुमोदन. भारतात अनेक ठिकाणी "मुले देवाघरची फुले" हा विश्वास भक्कम आहे. त्या विधात्याने पाठवलेय तर जगायची सोय पण तोच बघेल यावर अनेक जण विसंबून असतात. त्यांच्या मूलभूत गरजा पण पुरवल्या जात नाहीत. केरळ मधे हा विचार चालु आहे हीच जमेची बाजू आहे. बाकी महाराष्ट्र, भारत याठिकाणी काही हे होणार नाही.
चीनमधे जसा एक मूल नियम करून तो अंमलात आणतात ती स्थिती तर कोसो दूर आहे आपल्याला.
>>जेणेकरुन तुम्हांला लिहायची प्रेरणा मिळत राहील>>आणि आम्हाला खाद्य मिळेल - हसायला, रुसायला, भांडायला, चिडवायला....................... दिवे घ्या प्लिज!!!
<<<<छत्रपती शिवाजी महाराजाना
<<<<छत्रपती शिवाजी महाराजाना ८ ( की ९) होत्या..>>>>
हे विधान येथे अयोग्य आहे असे माझे मत!
तिसरे मुल झाले की त्याला
तिसरे मुल झाले की त्याला दत्तक देउन टाका.
दुसरी बाजू: १. मुलं जगण्याची
दुसरी बाजू:
१. मुलं जगण्याची शक्यता वाढली की जास्त मुलांना जन्म देणं कमी होतं. (यासंदर्भातल्या लिंका शोधते आहे. 'टेड'वर एक व्हीडीओ पाहिला होता, त्यात त्या माणसाने आकडेवारीसकट हे सिद्ध केलेलं होतं की औषधोपचारांतली प्रगती समाजाच्या सर्व थरांपर्यंत पोहोचली की मुलांच्या संख्येत वाढ होणं थांबतं. थोड्या काळासाठी लोकसंख्या भरमसाठ वाढते आणि नंतर कमी व्हायला सुरूवात होते. चीनची लोकसंख्या आता 'नी' पॉईंटला आली आहे असा त्याचा दावा होता असं स्मरतं.)
२. तरूणांची संख्या आणि म्हातार्यांची संख्या यांचे गुणोत्तर कमी झाले की पेन्शनचे प्रश्न निर्माण होतात. युरोपमधल्या अनेक देशांत, जपानमधे हा मोठा प्रश्न आहे.
३. भारतातली लोकसंख्यावाढ थांबलेली नसली तरीही लोकसंख्यावाढीच्या वाढीचा दर (अॅक्सिलरेशनशी साधर्म्य) सतत कमी होतो आहे. (यासंदर्भातल्या लिंका शोधते आहे.)
४. कोणाला किती मुलं असावीत यासंदर्भात कायदे करणं हे लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणं आहे. लोकांनी आपापल्या घरात काय करावं हे सांगणारं सरकार कोण आलं? असल्या हुकूमशाहीपेक्षा काही काळ अमाप लोकसंख्या असलेली नक्कीच चालेल. (कारण ती पुढे कमी होणार याची खात्री आहे.)
आदिती +१ चीन ने केलेल्या
आदिती +१
चीन ने केलेल्या सक्तीच्या कुटुंबनियोजनाचे परिनाम म्हणून तिथे सरासरी वय भारतापेक्षा जास्त आहे आणी आज जपान व जर्मनीला जी समस्या आहे ती लवकरच चीन समोर येणार आहे. तिसर्या मुलाला सवलती न देणे, किंवा पालकांना निवडणूक न लढवू देणे इतपत ठीक आहे पण तुरुंगात टाकणे चुकिचे आहे. आई बाप तुरुंगात गेल्यावर मुले वार्यावर सोडणार का ?
मुले जास्ती असण्याचा संबंध गरीबी आणी शिक्षणाशी आहे. कृपया याही धाग्यावर "मंदिर वही बनायेंगे" नको.
३-१४ Pl. refer Demographic
३-१४
Pl. refer Demographic transition theory of population.
विकुंच्या पहिल्या पॅराशी
विकुंच्या पहिल्या पॅराशी सहमत.
कशाला शेवटचं वाक्य टाकून आवताण देताय?
आदिती >> असल्या हुकूमशाहीपेक्षा काही काळ अमाप लोकसंख्या असलेली नक्कीच चालेल. (कारण ती पुढे कमी होणार याची खात्री आहे.)<< हे कळलं नाही.
बादवे जामोप्या दुसर्या वेळेला जुळे झाले तर काय शिक्षा होणार याबद्दल काही लिहिलंय का तिथे?
> बादवे जामोप्या दुसर्या
> बादवे जामोप्या दुसर्या वेळेला जुळे झाले तर काय शिक्षा होणार याबद्दल काही लिहिलंय का तिथे?

आणि पहिल्या वेळी तिळं चौळं (का काय) वगैरे फक्त अमेरिकेच्य फोरेनमधेच होते का?
त्याबद्दल काय म्हणतो तुमचा काय्दा??
अदिती यांच्या मताशी सहमत. असा
अदिती यांच्या मताशी सहमत.
असा कायदा झालेला आहे का? असेल तर त्याला कोर्टात काही थारा रहाणार आहे का? अशा बंदीने, लोकांच्या व्यावहार स्वातंत्र्यावर गदा येते :अरेरे:. त्या पेक्षा लोकशाही मार्गांचा वापर करुन जनतेला महत्व पटवणे कठिण पण परिणाम कारक उपाय आहेत.
मुले जास्ती असण्याचा संबंध
मुले जास्ती असण्याचा संबंध गरीबी आणी शिक्षणाशी आहे.
---- असा संबंध जरुर असेल... पण कमी मिळकत आणि ७ मुले याने आर्थिक स्तर खालवण्यात जोरदार मदत होते. उदा. माझ्या वडिलांना १५०० रुपये पगार होता, घरात दोन मुले. आता शेजारी रहाणार्यास तेव्हढाच पगार पण ७ मुले... मग गरिबी शेजारी अजुनच जास्त जाणवणार. येथे विचार करण्याची प्रवृत्ती महत्वाची आहेत. गरिबीमुळे मुले जास्त आहेत वा जास्त मुले असण्यामुळे गरिबी आहे ? दोन्ही एकमेकांशी संबंधीत आहेत.
अतिशय उच्चशिक्षण घेतलेली (मेडिकल फिल्ड) व गर्भश्रीमंत घराण्यातील व्यक्तीस ८ मुले (कॅनडा मधील गोष्ट) अशी उदाहरणे २०११ मधे मी बघितली आहेत.
एकच मुलाची सक्ती केली की
एकच मुलाची सक्ती केली की गर्भलिन्ग चाचणी , स्त्री भ्रुणहत्या यातही वाढ होणार. आज कमीत कमी प्रथम अपत्य मुलगी असल्यास तिचे कौतुक होते.
चीनमध्ये एकच मूल या धोरणामुळे
चीनमध्ये एकच मूल या धोरणामुळे तान्ह्या मुलींच्या हत्या आणि त्यांना सोडून देण्याचे प्रकार घडतात.
चीनमधल्या सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेल्या प्रांताने या धोरणात बदल व्हावा अशी मागणी केली आहे.
आदिती, भारतातील जास्त जननदराचं कारण लहान मुलांचे अधिक अपमृत्यू हे आहे. त्याचीच कॉरोलरी तुम्ही सांगितलीय. पुरावे शोधायची गरज नाही. It's a a known and accepted fact.
जिथे संपूर्ण कुटुंब एखाद्या (परंपरागत) व्यवसायात गुंतलेलं असतं , तिथे लहान मुलेही उत्पन्नाला हातभार लावणारी म्हणून हवीच असतात. आता अशा व्यवसायांचं प्रमाणही घटलंय.
लेकुरे उदंड जाहली तो ते
लेकुरे उदंड जाहली
तो ते लक्ष्मी निघोन गेली !!
चला कोणाला तरी समर्थवचन पटलय म्हणायला हरकत नाही.
( समर्थवचन कळलय पण वळेल की नाही या बद्दल शंका आहे.)
असा कायदा असलाच पाहिजे आणि
असा कायदा असलाच पाहिजे आणि त्याची अंमलबजावणीही झाली पाहिजे.
>>> मुले जास्ती असण्याचा
>>> मुले जास्ती असण्याचा संबंध गरीबी आणी शिक्षणाशी आहे.
अगदी बरोबर. पण हे पूर्ण सत्य नाही. गरिबी व शिक्षणाप्रमाणेच या समस्येला धार्मिक कंगोरादेखील आहे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
<<<<छत्रपती शिवाजी महाराजाना
<<<<छत्रपती शिवाजी महाराजाना ८ ( की ९) होत्या..>>>>
हे विधान येथे अयोग्य आहे असे माझे मत!
>>>>>>>>>>>>>>>>>>> १००% अनुमोदन
<<<<छत्रपती शिवाजी महाराजाना
<<<<छत्रपती शिवाजी महाराजाना ८ ( की ९) होत्या..>>>> क्रुपया हे वाक्य काढुन टाका.
हे विधान येथे अयोग्य आहे असे माझे मत!>>> १००% अनुमोदन .
आज काल महाराजाचे नाव घेउन वाद घातल्याशिवाय विचाराना वजन प्राप्त होत नाही.
असा कायदा झालेला आहे का? असेल
असा कायदा झालेला आहे का? असेल तर त्याला कोर्टात काही थारा रहाणार आहे का? अशा बंदीने, लोकांच्या व्यावहार स्वातंत्र्यावर गदा येते . त्या पेक्षा लोकशाही मार्गांचा वापर करुन जनतेला महत्व पटवणे कठिण पण परिणाम कारक उपाय आहेत. >>>
३_१४ अदिती व वज्र३०० शी सहमत. सर्व प्रसार माध्यमांच्या सहाय्याने मर्यादित लोकसंख्येचे महत्व पटविल्यास गरीब आणि अशिक्षित लोकांच्याही ते गळी उतरविणे सोपे होईल. विशेषतः टिव्ही हे माध्यम. मात्र गरीब आणि अशिक्षित लोकांवर पटकन परिणाम करणार्या, टि.व्ही. सारख्या सशक्त दृश्य माध्यामाद्वारे त्या दैनंदिन बिनडोक मालिकांमधल्या प्रत्येक कुटुंबामध्ये दाखविण्यात येणार्या खंडीभर सासवा, जावा, दिर, नणंदा, सुना, पोरं यांच्या गोकुळावर मात्र बंदी घातली गेली पाहिजे. नव्हे, मी तर म्हणेन त्या मालिकांना जबाबदार असलेल्या सर्व कर्त्या करवित्यांना तुरुंगात डांबले पाहिजे....... कुटुंब कल्याणाच्या सरकारी धोरणांना हरताळ फासल्याबद्दल आणि फालतु, हिणकस मालिकांचा रतिब घातल्याबद्दल !
नीधपः भारताची लोकसंख्या
नीधपः
भारताची लोकसंख्या वाढण्याची वाढ कमी होते आहे. ("वाढण्याची वाढ" हा शब्दप्रयोग थोडा किचकट वाटू शकतो म्हणून थोडं स्पष्टीकरणः वेग वाढण्याचं प्रमाण म्हणजे त्वरण किंवा अॅक्सिलरेशन. गाडी चालवणार्यांना हा शब्द माहितीचा असेल.)
दर स्त्रीमागे असणारी अपत्य कमी होत आहेत, साठीच्या दशकात प्रत्येक स्त्रीला सरासरी ६-७ मुलं असायची तर आता हाच आकडा ३च्या आसपास आहे.
टेडवरचा हान्स रोझलिंग यांचा हा व्हिडीओ अतिशय माहितीपूर्ण आहे, विशेषतः शेवटची तीनेक मिनीटं ह्या विषयाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत.
>> एकच मुलाची सक्ती केली की गर्भलिन्ग चाचणी , स्त्री भ्रुणहत्या यातही वाढ होणार. <<
हा सगळ्यात भयंकर परिणाम. चीनमधे एकट्या मुलांच्या समस्या आहेत याची जाणीवही ठेवली पाहिजे.
असले सुलतानी कायदे करण्यापेक्षा शिक्षणावर भर द्यावा हे अनेकांचं मत आहे हे पाहून आनंद झाला.
कोणाला किती मुलं असावीत
कोणाला किती मुलं असावीत यासंदर्भात कायदे करणं हे लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणं आहे. लोकांनी आपापल्या घरात काय करावं हे सांगणारं सरकार कोण आलं? असल्या हुकूमशाहीपेक्षा काही काळ अमाप लोकसंख्या असलेली नक्कीच चालेल. >>> वेग वाढण्याचं प्रमाण म्हणजे त्वरण किंवा अॅक्सिलरेशन. >>> अहो आदिती कमी अॅक्सिलेरशन असलेली सायकल अंगावरुन गेली किंवा भरलेला ट्रक अंगावरुन गेला तर जाम डिफरंस पडतो हो. भारतासारख्या हेवी मालट्रकला ही पिलावळ परवडण्यासारखी नाही. त्यामुळे ह्यापेक्षाही कठोर शिक्षेची जरुरी आहे.
"येथे थुंकु नये लिहिलेल्या पाटीवर थुंकणारी आपली जनता आहे".
"येथे थुंकु नये लिहिलेल्या
"येथे थुंकु नये लिहिलेल्या पाटीवर थुंकणारी आपली जनता आहे".
--- अशी परिस्थिती आहे हे मला मान्य आहे. पण नुसतेच लिहीले म्हणजे सरकारचे काम झाले असे होत नाही. मी केवळ असे म्हणेल कि निव्वळ पाटी लावल्याने समाजाचे प्रबोधन होणार नाही.
ज्या लोकांनी स्वत: हुन असे निर्बंध लादले आहेत, त्यांनी ते का लादले आहेत? याचा अभ्यास केल्यास कुठल्या उपायां वर भर द्यावा हे कळेल. सर्वच थरांतील (गरिब, श्रीमंत, शिक्षीत, कमी शिकलेले) लोकांची सँपल्स मिळतील.
आमची पिढी लहान असतांना क्वचितच विज जायची, आज गेली ८-१० वर्षे सातत्याने दर्-रोज सरासरी ६ ते १४ तासांपर्यंत विज जाते. हेच अन्न धान्याच्या बाबतीत होणार आहे... लोकांना केवळ संदेशाची पाटी लिहील्याने ते डोक्यातील मेंदुत शिरत नाही. जोडीला अनेक उदाहरणे, दुष्परिणाम यांची सचित्र चित्र फित असे विविध कार्यक्रम योजायला हवे.
अर्थात तुरुंगवास हे हास्यास्पद आहे.
आमची पिढी लहान असतांना
आमची पिढी लहान असतांना क्वचितच विज जायची, आज गेली ८-१० वर्षे सातत्याने दर्-रोज सरासरी ६ ते १४ तासांपर्यंत विज जाते. हेच अन्न धान्याच्या बाबतीत होणार आहे... लोकांना केवळ संदेशाची पाटी लिहील्याने ते डोक्यातील मेंदुत शिरत नाही. जोडीला अनेक उदाहरणे, दुष्परिणाम यांची सचित्र चित्र फित असे विविध कार्यक्रम योजायला हवे. >>> खरयं कारण तेव्हा विजेची गरज कमी होती , लोकसंख्या पण कमी होती , आता वीजेची गरज वाढली , वीज वापरणारे वाढलेत पण त्याप्रमाणात वीज जनरेशन नाही वाढलं.
आपण आजवर जाहीरातींमध्ये , पोस्टर्सवर लोकसंख्येचे दुष्परिणाम बघत आलोय पण खरचं किती लोकांनी स्त्रीभृण हत्या , वाढती लोकसंख्या अशा ज्वलंत प्रश्नांविषयी योग्य भुमिका घेतलीय.
आजसुद्धा स्त्रीभृण हत्या होतेय, दुर्दैवाने समाजातली अत्यंत नावाजलेली डॉक्टर , सुशिक्षित मंडळीही ह्यात सहभागी असते. कसं त्यांना समजावयाचं की असं घाणेरडं कृत्य करु नका म्हणुन , ऐकलयं का नुसतं सांगुन , प्रबोधन करुन अशा लोकांनी ?
वज्र जेव्हा क्वचित वीज जायची
वज्र जेव्हा क्वचित वीज जायची तेव्हा देशातल्या किती भागात विद्युतीकरण झाले होते?
चीनमध्ये जन्माला आलेल्या मुलींची नोंदणी न करण्याचे प्रकार होतात. बालिकाहत्या व बालिकांना सोडून देणं हे प्रकार तर चालतातच.
शिक्षणाचा प्रसार आणि वैद्यकीय सेवांची उपलब्धता यांच्या जोडीला कुटुंबनियोजनाचा प्रसार - प्रचार झाला तर ते पुरेसं ठरावं.
मुलगा हवाच हा अट्टाहास हेही वाढत्या लोकसंख्येचं एक कारण आहे. मात्र याचा व्यक्तीच्या अशिक्षित/ शिक्षित/अतिशिक्षित असण्याशी काहीही संबंध नाही.
लगे रहो मोहम्मदप्यारे.....
लगे रहो मोहम्मदप्यारे.....:फिदी:
केरळमध्यी कायदा नेमका कधी पास
केरळमध्यी कायदा नेमका कधी पास होणार आहे? महाराष्ट्रात ३ च्या वर अपत्य असले की लोकप्रतिनिधीचे पद रद्द होते.. हा नियम अल्पसंख्यांकानाही लागू आहे का? हा नियम कधीपासून आहे?
महाराष्ट्रात ३ च्या वर अपत्य
महाराष्ट्रात ३ च्या वर अपत्य असले की लोकप्रतिनिधीचे पद रद्द होते.. हा नियम अल्पसंख्यांकानाही लागू आहे का?
----- अधिक माहिती साठी काही लिंक द्याल का? .... लालू प्रसाद आज केंद्रात मंत्री आहेत, त्यांना ७ मुली, २ मुलगे आहेत. या आधी काँग्रेसचे अत्यंत चमकदार पंतप्रधान पि व्ही नरसिंहराव (त्यांच्या नावाची बाधा आहे आजच्या सोनियांच्या काळात :स्मित:) यांना ८ अपत्ये होती...
पण नोकरी च्या अर्जात २००५ च्या आधी वा नंतर किती अपत्ये आहेत असा काही उल्लेख मी वाचलेला आहे.
वज्र जेव्हा क्वचित वीज जायची
वज्र जेव्हा क्वचित वीज जायची तेव्हा देशातल्या किती भागात विद्युतीकरण झाले होते?
---- प्रत्येक गावांत तेव्हाही नव्हती आणि आज पोहोचली असेल असे मला वाटत नाही (ठोबळ मनाने ८० % ठिकाणी पोहोचल्याचे गुगलल्यावर दिसते). पण मी एकाच गावाची गोष्ट करत आहे. जिथे विज काल होती, आज १४ तास उन्हाळ्यात नसते, व ८ तास पावसाळ्यातही नसते. मला वाटते ह्या मधातल्या काळात ह्या छोट्या गावाची लोकसंख्या २.५ पटीने वाढली (अजुन भर म्हणुन विजेचा माणसी वापर वाढला आहे).
लोकांची संख्या वाढल्यावर उपलब्द असलेल्या साधनांवर भार येणार, मग ते साधने (विज, अन्न धान्य वा पिण्याचे वापरण्याचे पाणी) वाढवली नाहीत तर तुटवडा हा जाणवणारच... पण किती वाढवू शकतो यावर नक्कीच मर्यादा आहेत.
सांगायचा मुद्दा काय सांगितले वा दाखवले तर परिणामकारकता दिसेल?
महाराष्ट्रात ३ च्या वर अपत्य
महाराष्ट्रात ३ च्या वर अपत्य असले की लोकप्रतिनिधीचे पद रद्द होते.
त्यामुळे लालूबाबत मी काही कमेंट करु शकत नाही.. अशा कितीतरी बातम्या मी पेप्रात वाचल्या आहेत. एखादी बातमी मिळाली तर त्याची लिंक देईन.. पण हा नियम अल्पसंख्याकाना लागू आहे का माहीत नाही.
Pages