भयानक : भाग ३

Submitted by यःकश्चित on 30 September, 2011 - 06:05

पहिल्या भाग वाचा.
दुसऱ्या भाग वाचा.

----------------------------------------------------------------------------------------

"पण हे कसं शक्य आहे ? "

गोंधळलेल्या चेहऱ्याने विश्वासने मोहनरावांना विचारले. मोहनरावसुद्धा गोंधळले होते. त्यांना हे काय घडत आहे याचा काहीच बोध होत नव्हता. त्यांना हे कळत नव्हते की मुळातच ज्या माणसाचा दामले घराण्याशी काडीमात्र संबंध नाही तो माणूस दामले घराण्याचा वारसदार कसा काय असू शकेल ? विश्वासलाही हाच प्रश्न पडला होता.

खरंतर विश्वासने हे पत्र मिळाल्याबरोबर मोहनरावांना फोन केला होता आणि घरी बोलावले होते. त्याने ते पत्र वाचलेच नव्हते. पण जेंव्हा त्या दोघांनी मिळून पत्र वाचलं तेंव्हा दोघांनाही एकदम झटका बसला.

"मलाही तेच कळत नाहीये. ", मोहनराव म्हणाले , "हे पत्र तुम्हाला कोठून मिळाले..? "

"हि रोजनिशी पाहिलीत का ? ", विश्वासने ती वही हातात घेत मोहनरावांना विचारले . त्या वहीच्या मलपृष्ठाचा फाटलेला पुठ्ठा दाखवून तो म्हणाला , "काल रात्री मी हि वही वाचायला घेतली. वही अर्ध्यापर्यंत वाचून झाली होती. तेवढ्यात वाचता वाचता मला शिंक आली आणि डोक थोडसं गरगरल्यासारखं झालं. कदाचित दिवसभराच्या थकव्याने आणि या घटनांच्या ताणाने मला चक्कर आली असावी. नंतर थोडा वेळ मी बेशुद्धावस्थेत होतो. बहुतेक १०-१५ मिनिटे झाली असावीत. मला शुद्ध आली. उठून तोंड धुतले आणि पाणी पिऊन परत वाचायला लागलो. जसा वहीच्या शेवटच्या पानावर पोहोचलो , बघतो तर काय ! वहीचा मागचा पुठ्ठा जरासा फाटला होता आणि त्यातून एक कागदाचा तुकडा बाहेर आला होता. कदाचित शिंक देताना वहीला हिसका बसून तो कागद बाहेर आला असावा. तो कागदाचा तुकडा बाहेर ओढला. तो एक लिफाफा होता. त्या लिफाफ्यात हे पत्र होतं."

"अच्छा..पण मला आणखी एक शंका येतीये की हा तुकडा तुम्हालाच कसा सापडला ? माझ्या हातूनसुद्धा कितीतरी वेळा या वहीची हेळसांड झाली आहे पण तेंव्हा कधी पुठ्ठा फाटला नाही मग ...."

"मोहनराव आता मला काही विचारू नका. माझ्या मेंदूने विचार करणं केंव्हाच थांबवलंय. आधी तुम्ही येता काय , त्या रात्री ते अजब काहीसं होत काय आणि आता मी दामलेंचा वारसदार ? बापरे सगळंच विचित्र आणि माझ्या बुद्धीबाहेरचं आहे."

"आपण तुमच्या आई-वडिलांना याबद्दल विचारलं तर ? "

"ते या जगात नाहीत.", त्यांच्या आठवणीने विश्वासच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले . भावनांना आवर घालत अश्रू पुसत तो म्हणाला ," काही वर्षांपुर्वी एका कार अपघातात ते दगावले."

"माफ करा...पण मग आता करायच तरी काय ?"

"आता फक्त एकच पर्याय उरतो..ते म्हणजे तुमचे आजोबा."

"मी त्यांच्याबद्दल काही माहिती घ्यावी आणि आजार बरा करावा म्हणून तुमच्याकडे आलो होतो. पण उलट तुम्हीच यात अडकत चालले आहात आणि नवनवीन प्रश्न उद्भवत आहेत. माझे आजोबा आता विचित्र वागू लागले आहेत. ते अशा अवस्थेत काही सांगू शकतील यात मला शंकाच वाटते."

"आपण एकदा तुमच्या आजोबांना भेटून बघुया तरी. आधी आपण त्यांच्या विचित्र वागण्यामागचे कारण शोधूया आणि मग या रहस्यांचा शोध घेऊया. तसेच आपल्याला अजून एका व्यक्तीला भेटावे लागेल. त्या व्यक्तीचं नाव आहे 'दाजी' "

"तुम्ही कसे दाजींना ओळखता ?"

"मी त्यांना ओळखत नाही. पण यांचा उल्लेख त्या वहीत बऱ्याच वेळा झाला आहे. त्या उल्लेखांवरून मला असे वाटते की दाजी हे नानाभटांचे खूप जवळचे मित्र असावेत."

"तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे. दाजी म्हणजे नानांचा जिगरी दोस्त. आमच्या घराच्या माग एक गल्ली सोडून त्यांचे घर होते. दाजींचे आमच्या घरी नेहमी येणे-जाणे असायचे. दाजी आणि नाना चांगले ३-४ तास गप्पा मारत बसायचे. पण गेल्या ५-६ महिन्यांपासून ते आलेच नाहीत. त्यांचे घरसुद्धा ५-६ महिन्यांपासून बंद आहे. दाजींच्या गायब होण्याच्या एक-दीड महिन्यानंतर नानासुद्धा विचित्र वागू लागले. नेहमी हसतमुख असणारे नाना एकलकोंडे झाले. स्वतःला खोलीत कोंडून घायचे. मधूनच ओरडायचे , 'तो जिंकेल त्याला अडवा नाहीतर विनाश अटळ आहे'. या वाक्याचा थोडा संदर्भ लागतोय मला. पण त्यांची ही अशी अवस्था पाहवत नाही हो."

आणि अचानक मोहनरावांना रडू फुटले.

"मोहनराव शांत व्हा. आपण सगळे प्रॉब्लेम हळू हळू सोडवूया. मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की आपण आधी तुमच्या आजोबांना बरे करुया आणि मग माझ्या शंकांची उत्तरे शोधूया."

"ठीक आहे.", मोहनराव डोळे पुसत म्हणाले, "मी उद्या रजा काढतो. मग आपण आमच्या गावी जाऊया."

********

दोन-तीन दिवसांनंतर विश्वास आणि मोहनराव सकाळी गावाकडे निघाले. विश्वासच्या कारमधून ते दोघे निघाले. जवळपास तासाभराने ते गावाकडे पोहोचले. विश्वासची कार नानाभटांच्या घरासमोर येऊन थांबली. घर कसले ते .. वाडाच होता तो. एक भव्य चिरेबंदी वाडा . बांधकाम तसं जुन्या धाटणीचंच पण दगडी भिंती, जुन्या काळाची कलाकुसर त्या तिमजली वास्तूची शोभा वाढवत होते. एकविसाव्या शतकातही तो आपली संस्कृती व इतिहास जोपासत होता. विश्वास आणि मोहनराव वाड्यात गेले.

विश्वास वाड्याकडे नुसता पाहताच राहिला. बाहेरून वाटला त्यापेक्षा जास्त भव्य आणि आल्हाददायक होता. वाड्यात आत आल्या आल्या समोर मोकळी जागा होती. डावीकडे न्हाणीघर , उजवीकडे एक खोली , नवीन पाहुणे किंवा बाहेरचे लोक आल्यावर ज्या खोलीत बसतात , ती खोली..आणि समोर दिवाणखाना. दिवाणखान्याची रचना पूर्वीच्या वाड्यांसारखीच . एक झोपाळा, समोर छोटा टेबल किंवा स्टूल, बाजूने खुर्च्या , मागे पलंग वगैरे...

विश्वास आणि मोहनरावांनी पाय धुतले आणि दिवाणखान्याच्या पायऱ्या चढले. विश्वासला बसायला सांगून मोहनराव आत गेले. विश्वास खुर्चीत बसून समोर ठेवलेलं वर्तमानपत्र वाचत बसला. मोहनरावांनी विश्वासला पाणी दिले व ते आत गेले . थोड्या वेळाने ते कपडे बदलून आले.

"चला तुम्हाला घर दाखवतो आणि सर्वांची ओळख करून देतो.",मोहनराव.

मोहनरावांनी विश्वासला घरातल्या सर्वांची ओळख करून दिली. घरात सर्वांना त्यांनी विश्वासच्या येण्याच कारण सांगितलं. ते ऐकताच घरातल्या साऱ्यांना अत्यानंद झाला. कारण नाना आता बरे होणार होते. ( नाना खरच बरे होणार होते का विश्वास अजून एका नवीन कोड्यात अडकणार होता, देव जाणे..! )

घरातल्या साऱ्यांची ओळख झाली. आता फक्त एकच व्यक्तीची ओळख राहिली होती जिच्यासाठी विश्वास इकडे आला होता....नाना . नानांची खोली वरच्या म्हणजे पहिल्या मजल्यावर होती. ते दोघे नानाच्या खोलीच्या दिशेने जाऊ लागले.
वरच्या मजल्यावर गेल्यावर मोहनरावांनी शेवटच्या खोलीकडे बोट दाखवून 'ही नानाची खोली' सांगितले. त्या खोलीचे दार बंद होते. त्या खोलीकडे जात जात मोहनराव विश्वासला सांगत होते,

"पाच-सहा महिनांपासून ते असेच स्वतःला कोंडून घेतात. आतासुद्धा ते दरवाजा उघडतील का सांगता येत नाही. "

जसे जसे ते खोलीच्या जवळ जात होते. विश्वासच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. त्याला कसल्या वेदना होत होत्या. मोहनरावांचे तिकडे लक्ष गेले .

"काय होतंय विश्वास ? "

"काही नाही ", त्याने आता डोक धरले आणि मटकन खाली बसला , "जरा डोक्यात कळा येत आहेत."

विश्वासच्या डोक्यात कळा वाढत गेल्या. तो जमिनीवर गडबडा लोळू लागला. मोहनराव पाणी आणायला खाली गेले. इकडे विश्वासला फारच त्रास होऊ लागला.

मोहनराव पाणी घेऊन आले. त्यांना धक्काच बसला. जमिनीवर विश्वास नव्हता. ते तसेच पुढे चालत गेले.

ठळळळळळळ....

...समोरचे दृश्य बघून त्यांच्या हातातला ग्लास खाली पडला.

विश्वास नानाच्या खोलीसमोर उभा होता आणि खोलीचे दार उघडे होते. मोहनराव विश्वासच्या जवळ आले. आतमध्ये नाना पलंगावर मान खाली घालून बसले होते. त्यांनी दरवाजा उघडलेला पाहून मान हळूहळू वर केली.

त्यांनी समोर उभा असलेल्या विश्वासकडे पहिले. त्यांच्या चेहऱ्यावर अचानक हास्य आले. एका आशावादी नजरेने त्यांनी विश्वासकडे बघितले. ते विश्वासकडे पाहून आनंदाने ओरडले,

विश्वाsssssssss तू आलास..........

...आणि पलंगावरून उठून विश्वासकडे झेपावले.

क्रमशः

गुलमोहर: 

नाही ..........मज्जा नाही......चुकल्या सारखे वाटले ....इतके दिवस वाट बघुन निराशाच आली...........

मला सबमिशन असल्यामुळे जरा उशीर झाला आणि उशीर झाला म्हणून गडबडीत लिहून पोस्ट केली त्यामुळे जमलं नसेल कदाचित....पुढच्या भागात नक्की मज्जा करेन उदयभौ ... तुम्हाला मज्जा न आल्याबद्दल माफी असावी....

अहो मज्जा म्हणजे......जे अपेक्षीत होते ते आलेच नाही......जसा कथा सुरु झाल्या बरोबर संपल्यासारखी वाटली..
पुढची वाट बघत आहेत सगळे

अरे जरा लवकर लिहा.............

एका एका भागाला तुम्ही १ - १ महीना लावत आहे.......... Happy

मग तर वर्षच लागेल आम्हाला........ Wink

काही मदत हवी असेल तर सांगा............आम्ही करु ती........

छान

प्रणव जी.............मोठ्ठा भाग ५ ऑक्टो ते १३ ऑक्टो ८ दिवस झाले राव................ बस जास्त लिहु नका...आहे तेवढे प्रसिध्द करा......... Happy