माझं जिंकणं??

Submitted by बागेश्री on 28 September, 2011 - 08:43

आज दान मागायला
तू दारी आलास....प्रेमाचं!

अगदी काल- परवा,
जी असहाय्यता मी चेहर्‍यावरून
उपटून टाकून दिली,
तीच पांघरून...

खाड्कन दार आपटून
उभी होते पाठमोरी,
दार बंद झाल्याचा आवाज
आतूनही आला... मनाच्या गर्भातून
घुमत....

तू बाहेर असल्याची जाणीव
होत राहिली कितीतरी वेळ....

मनातून उमटलीच 'क्षीण विनंती'
कडी उघडण्याची,
बेदरकारपणे चेचलं 'तिला'.....

आज मी जिंकले होते...
पण;
गळणार्‍या आसवांचं कारण मात्र

अनाकलनीयच!

गुलमोहर: 

"आज मी जिंकले होते...
पण;
गळणार्‍या आसवांचं कारण मात्र
अनाकलनीयच! "

.... छान ....
............खरंच अनाकलनीय असतात काही गोष्टी

बागे, अप्रतिम ! नेहमीसारखेच खुप अपिल झाली.

का? कसं? आपण बोललोच आहोत कि आज. या कवितेबद्द्ल अजुन वेगळं काय लिहु. Happy

.

मस्त आहे.
(बायकांची आसवे(क्षेपणास्त्रे) पुरुषांसाठी तर अनाकलनीयच असतात ओ! :P)

संवेदनशील व्यक्तींच्याबाबतीत त्यांना कुणासाठीही मनाचं दार बंद करावं लागणं खूपच क्लेशकारक असतं.
आपल्या भावुक स्वभावाला मुरड घालून कठोरपणे निर्णय घ्यावा लागणं हे केव्हाही वेदनादायकच.
...........हे अर्थातच आसवं गळण्याच्या अनेक कारणांपैकी एक. बाकी कारणं कदाचित कवितेत म्हटल्याप्रमाणे अनाकलनीयच.

दुसर्‍या महायुद्धाच्या काळातील इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांचं एक वाक्य वाचलं होतं - एका अत्यंत वेगळ्या संदर्भात आहे - पण इथे ते महत्वाचं वाटतं म्हणून देतोय:
The problems of victory are more agreeable than those of defeat, but they are no less difficult.
(विजयामुळे निर्माण होणार्‍या समस्या ह्या पराभवामुळे उद्भवणार्‍या त्रासांपेक्षा निश्चितच सुसह्य असतात, पण त्यांपेक्षा कमी कठीण नव्हे.)

जिंकणं हे नेहमीच आनंददायक असतं असं नव्हे, अनेक वेळा दु:खदायकही असतं. कारण त्यासाठी मोजावी लागणारी किंमत.

बागेश्री, पुन्हा एकदा एक अतिशय भिडणारी कविता. मनिमाऊ अनेकदा म्हणते तशी आपली वाटावी अशी कविता.
पु.ले.शु. Happy

मस्तच..........................

तशी आसवांची कारणं असतातच

आनंदाची ...दु:खाची

कळत नकळत डोळ्यात येण्याची,

पण हा ना आनंद... ना दु:ख

अनाकलनीयच काहीतरी....

.................................................

होतं असं कधी कधी.
कधी कोणा बरोबर भांडले आणि त्याचे काहीच चुक नसताना त्यांनी माघार घेतलं तरीही होतं असं.

कविता भावली Happy

<<आज मी जिंकले होते...
पण;
गळणार्‍या आसवांचं कारण मात्र

अनाकलनीयच<<<
खरच गं... अगदी मनातलं मांडलस!! Happy

कधी कधी जिंकल्यावर सुद्धा आसवे ओघळुन येणे म्हणजे खुप संवेदनशील मनाचं प्रतिबिंब आहे ते! .... कि आपण जिंकतांना समोरच्यात गुंतलेल्या मनाला तो हरतोय ही कल्पना सहन होत नाही ? Sad

बागे,

कधीतरी दार उघडत जा गं.... Proud नेहमी असं दार लावणं तब्येतीला बरं नाही Wink

मांडणी भन्नाटच... Happy आरपार एकदम..... !!!

बागेश्री,
कालच वाचली होती ही कविता, आज पुन्हा वाचली.
मला खात्री आहे अनेकांनी ही कविता स्वत:शी रिलेट केली असेल. Happy
भावनांच्या चढाओढीची अतिशय समर्पक मांडणी.... माझ्यामते सर्वात अवघड, पण तु सहजगत्या व्यक्त करून गेलीस.
माझ्या आवडत्या लेखनात. Happy

पुलेशु!

Pages