Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25
स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.
इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्यांची आईस्क्रीमं उरतात कशी?
ह्यांची आईस्क्रीमं उरतात कशी?
मी तर रोज घरी आल्यावर रतिब लावल्यासारखं खाऊन संपवलं असतं 
गुलकंद घालून फिरवून परत फ्रिज
गुलकंद घालून फिरवून परत फ्रिज करा. आमरस, सीताफळ गर पण घालता येइल. कॉफी घालता येइल. , कोल्ड कॉफीत घालता येइल.
स्ट्रॉबेरी क्रश किंवा आमरस
स्ट्रॉबेरी क्रश किंवा आमरस घालून नीट मिक्स करून परत फ्रीज करा. नवीन चवीचं आईसक्रीम मिळेल.मंजूडी ने सांगितलंय तसं फ्रूट सॅलेड पण छान लागेल.
ह्म्म.. पण एवढ्याने नाही
ह्म्म.. पण एवढ्याने नाही संपणार.. २ kg आहे..
वर चॉकलेट सिरप/सॉस घालून,
वर चॉकलेट सिरप/सॉस घालून, आमरस घालून, हवे ते जॅम घालून, ब्राउनी विथ आईस्क्रीम, कोल्ड कॉफी विथ आईस्क्रीम,जेली विथ आईस्क्रीम, ट्रफल पुडिंग
एकदम सगळे नाही करायचे. ज्याला जसा फ्लेवर आवडेल तसे करायचे.
चिऊ, आयस्क्रिम सम्पल नसेल
चिऊ, आयस्क्रिम सम्पल नसेल तर...
- १ /२किलो आयस्क्रिम पूर्ण वितळवायचं. कुल्फी मोल्ड्स किंवा कँडी मोल्डस मधे आधी कुठल्याही फळाची प्युरी घालायची वरतुन हे वितळलेलं आयस्क्रिम ओतायचं अस आलटुन पालटुन करायचं आणि सेट करायला ठेवायचं.. होममेड आईस-फ्रुट कँडी तय्यार...
- १/२ किलो आयस्क्रिम स्पाँज केक च्या लेयर्स मधे घालायचं. लेयर्स लावताना हवं तर मधे फ्रेश स्ट्रॉबेरीज्/मँगो, पॅशनफ्रुट वगैरे घालायचं. हा लेयर्ड केक परत थोडा फ्रिझ करुन मग सर्व्ह करायचा.
- १/२ किलो आयस्क्रिम चॉक कप्स मधे घालुन फ्रिझ करायचं. वरतुन रोस्टेड नट्स घालुन सर्व्ह करायचं
- उरलेलें १/२ किलो आयस्क्रिम - २ चॉकलेट बिस्किट्स च्या मधे आयस्क्रिम घालुन सँडविच बनवायचे. सॅंडविच बनवल्यावर क्लिंग रॅप मधे गुंडाळायचे व फ्रिझ करायचे. अशी बिस्किट सँडविचेस बनवुन ठेवायची. चॉकलेट बिस्किट्स ऐवजी मारी बिस्कीट पण चालेल पण त्यात आधी दोन्ही बाजुला चॉक फज सॉस लावायचा आणि मग आयस्क्रिम घालुन सँडविचेस बनवायची.
मला तो गोड कापुस (बुढ्ढी के
मला तो गोड कापुस (बुढ्ढी के बाल) घरी बनवता येतात का याची माहिती हवी आहे. परवाच लेकाने डीमांड केलीये. कोणालाम्महिती असल्यास सांगा.
तो तितका तंतूमय नाही बनवता
तो तितका तंतूमय नाही बनवता येत कारण त्यासाठी वेगाने साखरेच्या गरम पाकाचे तंतू फेकणारे एक अवजार लागते. साखरेचा पाक करुन तो जेवायच्या काट्याने (फोर्क) ने जरा उंचावरुन सोडला तर त्याचे सोनेरी धागे तयार होतात. आईसक्रीम वगैरेवर सजावट म्हणून वापरतात. पण पाक गरम असल्याने अंगावर पडल्यास चटका बसतो हे लक्षात घ्यावे.
तसेही बाजारात मिळतात ते बुढ्ढी के बाल फक्त साखरेपासूनच बनत असल्याने, त्यात काहिही पोषक नाही.
तंतू फेकणारे एक अवजार >>> हो
तंतू फेकणारे एक अवजार >>> हो हो ते पाहिले आहे म्हणुनच विचार करत होते घरी कसे बरे होईल.
त्यात काहिही पोषक नाही>> पण लेकाला कशी सांगु. आपणही लहानपणी खायचोच ना
मॉडर्नच्या ब्राउन ब्रेडसोबत
मॉडर्नच्या ब्राउन ब्रेडसोबत चीझी गार्लिक क्रीमी स्प्रेड फुकट मिळालंय. आणि आणखी काही दिवस मिळत राहील असं दिसतंय.कंटेंट्स मेयॉनिजी सॉस असं दिलं आहे.
ब्रेड फक्त बाबा खातात, तेही सकाळच्या चहाबरोबर. त्यांना हे उपयोगाचे नाही.
आणखी कुठे वापरता येईल?
कॉर्नफ्लोर आणि कस्टर्ड पावडरच्या पाकिटांवर एक्स्पायरी डेट आहे. ती गेल्यावर हे पदार्थ टाकूनच द्यावेत का?
भरत, ते चीझी गार्लिक क्रीमी
भरत, ते चीझी गार्लिक क्रीमी स्प्रेड बहुतेक पास्ता, पिझ्झा, बर्गर सारख्या पदार्थांत वापरता येईल. किंवा सरळ पोळीला लावून त्यात इतर भाज्या घालून त्याचा देसी पिझ्झा करून खाता येईल. मेयॉनिज सॉस हा अंडे घातलेला असू शकतो. आधी वास घेऊन बघा. तुम्हाला ती चव व वास आवडत नसेल तर मग वापरू नका.
आज काकडीच्या काही फोडींवर
आज काकडीच्या काही फोडींवर घालून बघितलं. अगदीच गिळगिळीत आणि मिळमिळीत आहे. अंडे नाही त्यात.
बहरत, पास्ता सॅलड, रोस्ट
बहरत, पास्ता सॅलड, रोस्ट व्हेजिटेबल सॅलड वर घालता येइल.
स्प्रेडमधे थोड्या चिली फ्लेकस किंवा मिरेपूड घालु शकता. टोबॅस्को सॉस पण चालेल.
ओपन ग्रिल सँडविच, चिझी गार्लिक ब्रेड करु शकता...
जाड दळलेले गव्हाचे पिठ आहे ५
जाड दळलेले गव्हाचे पिठ आहे ५ किलो,,
निट चपात्या होत नाहित
झाल्यातर करायला वेळ लागतोय...
मी उकड्पेंडी केलि पण किति दिवस खायची ती....
काय करावे
डोसे करता येतील. ग. पीठात
डोसे करता येतील. ग. पीठात पाणी, चवीपुरते मीठ, तिखट घालून डोस्याच्या पीठासारखे भिजवून डोसे घालायचे.
चकोल्या करता येतील. ग. पीठाचा हलवा करता येतो.
गुळपापडी करावी. एकदम सोप्प.
गुळपापडी करावी. एकदम सोप्प.
पीठाचा हलवा ,गुळपापडी रेसेपी
पीठाचा हलवा ,गुळपापडी रेसेपी टाकावी
पिपे गुळपापडी इकडे आहे.
पिपे गुळपापडी इकडे आहे.
प्रितीभुषण, दाल बाटी साठीसुधा
प्रितीभुषण,
दाल बाटी साठीसुधा गव्हाचं जाडसर पीठ चालेल.
प्रिभु, धिरडी, डोसे, कणकेचा
प्रिभु, धिरडी, डोसे, कणकेचा शिरा, खीर.
पीठ कोरडे किंवा तुपावर खमंग भाजून त्यात भाजलेले खोबरे, खारीक, खडीसाखर / पिठीसाखर, सुका मेवा घालून सारण टाईप खाऊ बनवता येईल. कोरडा / दुधात घालून छान लागतो.
खीर????????
खीर????????
कणकेचे लाडूही होतील. नुसते
कणकेचे लाडूही होतील. नुसते कणकेचे किंवा जागूच्या रेसिपीने मेथीचे.
डाळढोकळी साठीहि चालेल ती
डाळढोकळी साठीहि चालेल ती कणिक.
पियापेटी, गरगटं असतं गं ते
पियापेटी, गरगटं असतं गं ते खीर म्हणजे, कणकेच्या शिर्याचं आणखी पातळ रूप... पण गरम गरम छान लागते!
चुरमा लाडू मस्त होतील त्याचे.
चुरमा लाडू मस्त होतील त्याचे. पुर्या कर हाकानाका
@प्रितीभुषण, कणकेची
@प्रितीभुषण,
कणकेची बिस्किटं, तिखट्मीठाचे शंकरपाळे - बेक करुन, कणकेचे धपाटे (कांदा, कोथिंबीर, हिमि, जीरे इ इ घालुन) .. अजुन काही आठवलम तर लिहीते
जरीच्या , सिल्कच्या किंवा
जरीच्या , सिल्कच्या किंवा ईतरही साड्यांची निगा कशी ठेवावी.
मी प्रत्येकवेळी साडी वापरल्यानंतर थोडावेळ व्यवस्थित लांब घडी घालून सुकत घालते. घडी घालून ठेवून देते. अधूनमधून साडीची घडी बदलून ठेवते, म्हणजे घडीवर फाटू नये म्हणून.
ज्या साड्या घरी धुता येणे शक्य नाहित ( भारी जरीच्या, सिल्कच्या ) त्या मी ड्रायक्लीनमध्ये देते , पण तीनदा चारदा वापरून .
सण समारंभाशिवाय ईतरवेळी साडी वापरली जात नाही. केव्हा केव्हातर साड्यांना वेगळाच वास येतो, किंवा जरीच्या घडीवर फाटतात, विरतात... अस कस..
कोणी सांगाल का अस होऊ नये म्हणून काय करावे ?
जरीच्या साड्या माझी आई आणि
जरीच्या साड्या माझी आई आणि पर्यायाने मीही सुती धोतरात गुंडाळून ठेवतो. बाकी घडीवर चिरण्याचा मला तरी अनुभव नाही.
जरीच्या, सिल्कच्या साड्या
जरीच्या, सिल्कच्या साड्या सुती धोतरात, साडीत किंवा इव्हन सुती दुपट्ट्यामधे ठेवायच्या. लव्हेंडर पाऊच किंवा एका सुती रुमालात लवंगा घालुन ती घडी ठेवायची त्यात म्हणजे कसर लागत नाही. एखाद दिवस कडक उन्हात पसरुन ठेवायच्या म्हणजे बुरशी वगैरे येणार नाही.
घडीवर विरु नयेत म्हणून मधुन मधुन हलकी इस्त्री फिरवुन साडीच्या घड्या बदलायच्या.
एखाद दिवशी जास्त काम नसेल तेव्हा घरातच नेसायची
वापरात असेल तर विरणार नाही घडीवर...
बादवे.. हा बाफ फक्त आहारशास्त्र आणि पाकृ संदर्भात आहे ना?
शीर्षकात पुरेसं स्पष्ट होत
शीर्षकात पुरेसं स्पष्ट होत नाही, पण हा धागा स्वयंपाकघरातल्या, स्वयंपाकाच्या युक्त्यांसाठी आहे. कपड्यांची निगा असा एक धागा बहुतेक मायबोलीत वेगळा आहे.
Pages